मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेम करुन करुन दमावं

चिन्ट् · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
प्रेम करुन करुन दमावं असं आमच्या आयुष्यात कधी घडलंच नाही, आणि तसं काही घडण्यासाठी कधी कोणी आमच्या प्रेमात पडलंच नाही. प्रेमात होकार मिळवणार्‍याची गावात मोठी वट आहे, समोरुन जर नकाराचा 'रेड' सिग्नल आला तर लगेचच गावच्या 'मजनु' चा डाग आहे सैफ च्या म्हातारपणात तरी असं काय रहस्य दडलंय, त्याला जर करीना पटतेय तर आमचच घोड कुठ अडलंय. आता तर म्हणे पोरगी कशी पटवावी याचेसुध्दा क्लासेस आहेत, तरी सुध्दा नकार मिळणार्‍याच्या ओठी तर मद्याचेच चिकटलेले ग्लास आहेत. आता तर मीही म्हणतो नाही मिळाली प्रेयसी तर नसू दे, लग्नानंतर येईलच की बायको, फिर यारो डरना कायको? ------------------- लेखन संपादित केले आहे

वाचने 3544 वाचनखूण प्रतिक्रिया 15

गवि गुरुवार, 06/11/2015 - 12:16
..पहिलीच ओळ काही हर्बल औषधांच्या जाहिरातीत फिट्ट बसावी. .कॉपीराईट रजिस्टर करुन घेणे.. :) ..हा विनोद झाला.. लिहीत रहा.शुभेच्छा.

In reply to by गवि

चिगो गुरुवार, 06/11/2015 - 23:54
.पहिलीच ओळ काही हर्बल औषधांच्या जाहिरातीत फिट्ट बसावी.
ROFL =)) साष्टांग दंडवत, गवि.. 'आजकल के असंतुष्ट पारीवारीक जीवन का कारण है स्ट्रेस' टाईपातल्या ताकाला जाऊन भांडं लपवणार्‍या जाहिराती आठवल्या..

In reply to by संदीप डांगे

सतिश गावडे गुरुवार, 06/11/2015 - 12:59
अगदी असंच काही नाही. मराठी आंतरजाल सर्व प्रकारच्या वयोगटातील, सर्व प्रकारच्या शैक्षणिक थरांतील लोकापर्यंत पोहचलंय याची ही निशाणी आहे.

नाव आडनाव गुरुवार, 06/11/2015 - 20:36
व्वा ! पहिल्याच लायनीत अख्ख्या कवितेचा अर्थ समजला. एकदम भारी लाईन. प्रेम करुन करुन दमावं दमल्यानंतर परत प्रेम करावं. मला पण जमली कविता !