✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शेअरबाजार- बस्स 02 मिनिट्स...आपण काय करावे??

प
प्रसाद भागवत यांनी
Wed, 06/03/2015 - 13:13  ·  लेख
लेख
सध्या गाजत असलेल्या 'मॅगी' प्रकरणामुळे आज नेस्ले ईडिया कंपनीच्या शेअरने जवळजवळ 10% ची गटांगळी खाल्ली. हे प्रकरण मिडियात आल्यापासुन म्हणजेच गेल्या पंधराएक् दिवसांत हा शेअर सधारण 1000 रुपयांनी (म्हणजे जवळजवळ 14% घसरला) आपण, एका सामान्य गुंतवणुकदाराने या बाबत काय करावयास हवे असे आपणास वाटते??.. कर्मधर्मसंयोगाने मी याच विषयावर् अर्थपुर्णच्या येत्या मासिकात एक लेख लिहिला आहे. जरुर वाचावा. आपल्या प्रतिक्रिया, सुचनांचे स्वागत आहे. - प्रसाद भागवत

Book traversal links for शेअरबाजार- बस्स 02 मिनिट्स...आपण काय करावे??

  • ‹ शेअरबाजारः भुकंप पुन्हा पुन्हा होतात का ?? किंवा भुकंप पुन्हा पुन्हा का होतात??
  • Up
  • शेअरबाजारः प्रवाहाच्या विरोधी,वेगळी विचारसरणी उपयुक्त ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
अर्थकारण
अर्थव्यवहार
गुंतवणूक
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
49547 वाचन

💬 प्रतिसाद (113)

प्रतिक्रिया

कळ काढू..

ब़जरबट्टू
गुरुवार, 06/04/2015 - 14:31 नवीन
मला तरी नेस्ले ५००० नक्की जाणार असे वाटते... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सुवेन लाईफ सायंसेज घ्यावा काय

पथिक
गुरुवार, 06/04/2015 - 12:34 नवीन
सुवेन लाईफ सायंसेज घ्यावा काय?
  • Log in or register to post comments

एकेकाळी प्रत्येक थिएटरमध्ये

प्रसाद भागवत
Fri, 06/05/2015 - 10:03 नवीन
एकेकाळी प्रत्येक थिएटरमध्ये प्रत्येक शो आधी हळद आणि चंदनाच्या गुणांनी युक्त अशा क्रीमची जोरात जाहिरात होत असे. एकवेळ पोलिसांची एंट्री न होता सिनेमा संपेल पण ह्या 'हल्दी/चंदन के गुणवाल्या' क्रीमची जाहिरात लागल्याशिवाय सिनेमा सुरु होणे अशक्य अशी स्थिती होती. पुढे काही काळाने ,.......WSO क्रीम बनले. 'WSO' हे 'Without Sandal Oil' या ' सत्याचे' लघुरुप आहे हे कितीजणांना माहित आहे ??... हे आठवायचे कारण म्हणजे अर्थातच मॅगीपुराण. गेला बाजार काय होईल ?? Maggi(WML)....with Led & monosodium असा नावांत बदल होईल.दुसरे काय?? गेला बाजार काय होईल ?? Maggi(WML)....with Led & monosodium असा नावांत बदल होईल.दुसरे काय?? - प्रसाद भागवत.
  • Log in or register to post comments

हायला!!

तुषार काळभोर
Fri, 06/05/2015 - 11:29 नवीन
विको: असं पण आहे का?!! मॅगी: Maggi(WML)....with Led & monosodium असं होईल नाहीतर मॅगी चं स्पेलिंग किंचीत बदलून परत आहे तसं येईल. जॉन्सन & जॉन्सनच्या बेबी प्रॉडक्ट्सचं नाव आता नुसतं जॉन्सन्स आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत

उगीच काहीही काय राव … vicco

कहर
Fri, 06/05/2015 - 15:30 नवीन
उगीच काहीही काय राव … vicco turmeric ayurvedic skin cream (ज्याची जाहिरात दाखवायचे ) आणि vicco turmeric WSO cream दोन्ही वेगळे product आहेत. आणि दोन्हीहि मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत

अरे बापरे, माझी तपशीलांत चुक

प्रसाद भागवत
Fri, 06/05/2015 - 16:31 नवीन
अरे बापरे, माझी तपशीलांत चुक झालेली दिसते. मी हा पोस्ट मागे घेतो. तशी विनंती मी संपादक मंडळास कळवितो. वस्तुस्थिती नजरेस आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर

हा सगळा पैशाचा खेळ आहे.

सुबोध खरे
Fri, 06/05/2015 - 21:12 नवीन
हा सगळा पैशाचा खेळ आहे. सुरुवातीला हे क्रीम विको टरमेरिक व्हेनिशिंग क्रीम म्हणून होते. व्हेनिशिंग क्रीम हे सौंदर्य प्रसाधन म्हणून त्यावर केंद्रीय अबकारी कर ७० टक्के लागतो. मग त्यांनी नाव बदलले आणी विको टरमेरिक आयुर्वेदिक क्रीम केले कारण आयुर्वेदिक नाव दिले कि ते "औषध" होते. आणी त्यावर अबकारी कर १५ टक्के लागतो. म्हणजे तब्बल ५५ % ची बचत. http://www.cosmeticsdesign-asia.com/Regulation-Safety/Indian-Supreme-Court-makes-cure-or-care-ruling-on-cosmetics-and-medicines नंतर काय झाले कि विको टरमेरिक आयुर्वेदिक क्रीम चंदनाच्या तेला सकट ( ०.५ % चंदनाचे तेल) ७० ग्रामला किमत २००/- रुपये आहे. हि किंमत सर्व सामान्य निम्न आणि मध्य मध्यम वर्गाला परवडणारी नव्हती म्हणून त्यांनी त्यातील चंदनाचे तेल काढून टाकले आणि किंमत ६०/- रुपये केली म्हणून ते विको टरमेरिक आयुर्वेदिक क्रीम WSO म्हणून आले. यात १६ % हळद असते पण चंदनाचे तेल नाही. मूळ ब्रान्ड चा फायदा मिळवणे पण किमत कमी करणे हा हेतू होता. लोक कुठे WSO वाचतात. आयुर्वेदिक आणी सौंदर्यप्रसाधने यांच्या कहाण्या सुरस आणी चमत्कारिक आहेत. त्याबद्दल परत केंव्हा तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत

येस्स येस्स येस्स....

तुषार काळभोर
Sat, 06/06/2015 - 11:07 नवीन
आयुर्वेदिक आणी सौंदर्यप्रसाधने यांच्या कहाण्या सुरस आणी चमत्कारिक आहेत. त्याबद्दल परत केंव्हा तरी.
पायजे! पायजे!! पायजे!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

उद्बोधक आणि मनोरंजक माहिती डॉ

प्रसाद भागवत
Sat, 06/06/2015 - 13:05 नवीन
उद्बोधक आणि मनोरंजक माहिती डॉ. साहेब, धन्यवाद. आणखी लिहा या विषयावर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आयुर्वेदिक आणी

कहर
Wed, 06/10/2015 - 16:25 नवीन
आयुर्वेदिक आणी सौंदर्यप्रसाधने यांच्या कहाण्या सुरस आणी चमत्कारिक आहेत. त्याबद्दल परत केंव्हा तरी.
ऐकायला नक्की आवडतील. एका नामवंत टूथपेस्ट चा किस्सा वाचनात आला. वाढत्या स्पर्धेमुळे खप वाढत नव्हता. म्हणून चर्चा चालू असताना एका शिपायाने सल्ला दिला कि खप वाढवू शकत नसाल तर वापर वाढवा. त्यासाठी ट्यूब चे तोंड फक्त १ mm ने मोठे करा. एवढा छोटा फरक लोकांना समजणार नाही. वापर वाधेल. पेस्ट लवकर संपेल आणि खप आपोआप वाढेल. कंपन्या अशा फसवत असतात ग्राहकांना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ही खूप जुनी आणि प्रभावी

श्रीगुरुजी
Wed, 06/10/2015 - 22:47 नवीन
ही खूप जुनी आणि प्रभावी युक्ती आहे. मी पूर्वी काही महिने डोळ्यात एक विशिष्ट ड्रॉप्स टाकत होतो. अडीच मिलीची ड्रॉप्सची बाटली सुरवातीला २४० रूपयांना व नंतर ३६० रूपयांना मिळायला लागली. सुरवातीचे काही महिने एक बाटली ४०+ दिवस पुरायची. काही महिन्यांनंतर तीच बाटली जेमतेम २३-२४ दिवस पुरायला लागली. डोळ्यात ड्रॉप टाकल्यावर पूर्वीच्या तुलनेत जास्त क्वांटिटी आहे हे स्पष्टपणे जाणवत होते. बाटलीचे भोक थोडे मोठे केल्यामुळे जास्त क्वांटीटी जाऊन बाटली लवकर संपायला लागली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर

एके काळच्या रिचर्डसन

सुबोध खरे
Fri, 06/12/2015 - 10:38 नवीन
एके काळच्या रिचर्डसन हिंदुस्तानने( आता प्रोक्टर आणि गम्बल) व्हिक्स व्हेपोरब आणि इन्हेलर हि आयुर्वेदिक औषधे आहेत असे म्हणून त्यावर ५५ % अबकारी कर चुकवला होता. त्यावर त्यांना सर्व कर भरायला लावला होता. कारण जर आयुर्वेदिक औषध असेल तर त्यात वापरले जाणारे मेंथोल आणि थायमोल हे वनस्पतीजन्य असणे आवश्यक असते पण ते महाग आहे. म्हणून त्यांनी त्यात पेट्रोलियम पासून तयार केलेली वरील औषधे वापरली होती आणि कर चुकवला होता. असाच प्रकार आयोडेक्स(SKF स्मिथ क्लाईन आणी फ्रेंच) ने केला होता. त्यातील मिथाईल सालीसिलेट पेट्रोलियम जन्य होतेतरीही आयुर्वेदिक औषध म्हणून दावा करून कर चुकवला होता. एकदा न्यायालयाकडून डंका मिळाल्यावर त्यांनी आयुर्वेदिक( वनस्पतिजन्य) कच्चा माल वापरायला सुरुवात केली. (सुरस आणी चमत्कारिक कथा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

एकावे ते नवलच.

प्रसाद भागवत
Fri, 06/12/2015 - 11:08 नवीन
एकावे ते नवलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

.इंटरेस्टिंग...इनोदेखील

गवि
Fri, 06/12/2015 - 12:48 नवीन
.इंटरेस्टिंग...इनोदेखील आयुर्वेदिक असं लेबल वापरते बहुधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

भागवत साहेब

सुबोध खरे
Fri, 06/05/2015 - 10:18 नवीन
भागवत साहेब हा सगळा गदारोळ कुणी उठवला आहे हे सांगणे कठीण आहे. नेसले हि ब्लू चीप कंपनी आहे त्यामुळे ती उद्या वर येणार हे नक्की आणि शिवाय भांडवल बुडणार नाही हे नक्की. त्याचा समभाग घेणे कि न घेणे हा एकदम वेगळा विषय आहे. मुळात नुडल साठी वापरलेल्या गव्हाच्या पिठातच किंवा त्यात वापरलेल्या तेलात शिसे ( लेड) नाही हे ठरवणे आवश्यक आहे. जिथे गहू पिकतो ती राज्ये उदा. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार येथे . वाहनाच्या बॅंटरीची( ज्यात शिसे वापरले जाते) विल्हेवाट कशी लावतात हि सुरस आणि चमत्कारिक संशोधनाची कथा आहे.तेंव्हा हे शिसे पाण्यात मिसळून गव्हात येत नाही हे म्हणणेच धारिष्ट्याचे ठरेल.गाझियाबाद, कानपूर इ ठिकाणी असणारे कारखाने आणि ते सोडत असलेले सांडपाणी बंद कोण आणि कसे करणार? पण कुठलीही ऑरगेनिक वस्तू म्हणजे स्व्च्छ आणि शुद्ध असते हे म्हणणाऱ्या लोकांना तुमचा गहू किवा तेलच शुद्ध नाही हे म्हणणे पचेल का? ( मग ते तेल अगदी घरगुती तेलघाणीत पिळून काढलेले असेल तरीही) परंतु या प्रकरणातून वर उठायला नेसलेला बराच वेळ( सहा महिने तरी) लागेल असे वाटते. तेंव्हा म्यागी खायचे कि नाही तसेच नेस्लेचा समभाग घ्यायचा कि नाही हे ज्याचे त्याने ठरवणे आवश्यक आहे पण या दोन्ही गोष्टीं मुळात वेगळ्या आहेत.
  • Log in or register to post comments

सहमत.हा आताचा पोस्ट सहज आठवले

प्रसाद भागवत
Fri, 06/05/2015 - 10:20 नवीन
सहमत.हा आताचा पोस्ट सहज आठवले, संदर्भ जुळला म्हणुन लिहिला एवढेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

http://www.business-standard

प्रसाद भागवत
Fri, 06/12/2015 - 09:37 नवीन
http://www.business-standard.com/article/opinion/t-thomas-maggi-imbroglio-the-big-picture-115061101336_1.html आजच्या बिझनेस स्टॅंडर्ड मधे आलेला हा लेख नेस्लेमधील गुंतवणुकीसंदर्भांत उपयोगी आहे.शिवाय आज कळफलकावर बोटे फिरविण्यासाठी तयार रहा......... उच्च न्यायालयातील सुनावणीमुळे बाजारभावांत मोठी हालचाल संभवते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मी बर्‍याचदा पाहतो की या अशा

नगरीनिरंजन
Sat, 06/06/2015 - 16:01 नवीन
मी बर्‍याचदा पाहतो की या अशा लेखांमध्ये टेक्निकल ॲनालिसिसच केलेले असते; फंडामेंटल ॲनालिसिस औषधालाही सापडत नाही. मॅगीवर बंदी आणली काही दिवस म्हणून नेसले कंपनी बंद पडणार नाही हे शेंबडं पोरही सांगेल पण मॅगी हा नेसलेचा जुना आणि प्रस्थापित ब्रँड आहे आणि कंपनीच्या शेअरच्या किंमतीत ब्रँडची किंमतही अंतर्भूत असते. इतक्या वर्षांच्या प्रस्थापित ब्रँडला धक्का बसणे याचा कंपनीच्या पुढील उत्पन्नावर परिणाम होतो आणि शेअरच्या किंमती कंपनीच्या भावी उत्पन्नावर आणि वाढीच्या दरावर अवलंबून असतात. याठिकाणी रेझिस्टन्स लेव्हल आणि सपोर्ट लेव्हल हे शब्द नुसतेच अनाठायी नसून दिशाभूल करणारे आहेत. लेखकाने विश्लेषण करुन ब्रँडच्या डॅमेजचा अंतर्भाव करुन शेअरची नवी किंमत किती असायला हवी याचा अंदाज काढून मग सध्याच्या किंमतीवरुन शेअर अंडरव्हॅल्यूड आहे कीओव्हरव्हॅल्यूड आहे ते ठरवण्याचा प्रयत्न केला असता तर अधिक समर्पक झाले असते. बाकी अचानक लोकांना आपले गहू-तांदूळही जास्त विषारी असतील याची अचानक खात्री पटायला लागणे व नेसलेचा पुळका येणे आश्चर्यकारक आहे. मॅगीची जागा दुसर्‍या नूडल्स भरुन काढतील; त्यासाठी आपल्या सगळ्याच अन्नपदार्थांना विषारी ठरवण्याची गरज नाही! :-) उलट ही इतर लोकांना संधी आहे; उगाचच कोणत्याही क्षेत्रात ओलिगोपॉली असणे चुकीचेच आहे तसेही.
  • Log in or register to post comments

फंडामेंटल वि. टेक्नीकल या

प्रसाद भागवत
Sat, 06/06/2015 - 20:43 नवीन
फंडामेंटल वि. टेक्नीकल या विषयावर मी आधीच्या लेखात भाष्य केलेच आहे.पण मुख्य मुद्दा शेअर अंडरव्हॅल्यूड आहे की ओव्हरव्हॅल्यूड आहे ते ठरवण्याचा आहे. त्यासाठी कोणती पद्धत वापरावी हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मतलब आम खाने से है.... बाकीचे आपण म्हणता त्याप्रमाणे अनाठायी व दिशाभूल करणारे टेक्नीकल विष्लेषण करतात,..,, आपण जमल्यास फंडामेंटन्ल विष्लेषण करा आम्ही आनंदाने वाचु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न

नगरीनिरंजन
Sat, 06/06/2015 - 21:04 नवीन
सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न असेल तर पब्लिक फोरमवर चर्चा करण्याचे प्रयोजन काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत

'जाहिर सहभागांतुन चर्चा' याचा

प्रसाद भागवत
Sun, 06/07/2015 - 18:34 नवीन
'जाहिर सहभागांतुन चर्चा' याचा अर्थ प्रत्येकाने एखाद्या बाबीवर त्याचा वा त्याला पटणारा दृष्टिकोण मांडणे असाच आहे. अशा बाबीचे सर्व ज्ञात-अज्ञात पैलु जर एखाद्याला मांडता अले तर मग ती 'चर्चा' कसली ?? दुसर्याने काय मांडावे याचा शहाजोगपणाने सल्ला देण्याकरिताच 'पब्लिक फोरम' असतात हा गैरसमज आहे. शिवाय फंडामेण्टल असो वा टेक्नीकल...,त्यांचे उपयोग वेगवेगळ्या परिस्थितीत अधिक परिणामकारक पद्ध्तीने करता येतात कारण दोघांच्याही काही मर्यादा आहेत.फंदामेंटल्स विषेश न बदलुनही भाव दिवसागणिक बदलतातच आणि या वस्तुस्थितीचा अनुकुल वापर करावयाचा असल्यास अपरिहार्यपणे टेक्नीकल्स पहावी लागतात. आणि त्या शास्त्रालाही भक्कम गणिती,सांख्यिकी आधार आहेत तेंव्हा त्याचा अभ्यास करुन काढलेले निष्कर्ष हे अगदीच केराच्या टोपलीत टाकण्याच्या योग्यतेचे नसतात असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

बिंगो. मला वाटतं या चिखल

काळा पहाड
Sat, 06/06/2015 - 23:55 नवीन
बिंगो. मला वाटतं या चिखल उडवणुकीमुळे मॅगीचं नाव इतकं खराब झालं आहे की त्याच्यात आता सुधारणा होणं अवघड आहे. मॅगी हा नेस्लेचा कदाचित सर्वात जास्त खपणारा ब्रँड असावा. आणि त्याचा रेव्हेन्यू बंद होणं नेस्ले च्या शेअरसाठी धोक्याची घंटा असायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

पहाड्साहेब, काश ऐसा होता.....

प्रसाद भागवत
Sun, 06/07/2015 - 18:38 नवीन
पहाड्साहेब, काश ऐसा होता........याच न्यायाने,सल्लुचे संजुबाबाचे पिक्चर्स पहायला कोणा जाणार नाही असे आपल्याला वाटते का?? सिगारेट्च्या पाकिटावरील '---मुळे कॅन्स्र होतो' हा विअधानिक ईशारा व्हाचुन किती जणांनी सिगारेट सोडली असेल ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

हेच जर युरोपातल्या गोर्‍या

नगरीनिरंजन
Sat, 06/06/2015 - 16:05 नवीन
हेच जर युरोपातल्या गोर्‍या मर्कटांनी भारतीय कंपनीच्या उत्पादनावर वा भारतीय आंबे किंवा द्राक्षादिंवर बंदी आणली असती तर लोकांनी हूं का चूं नसतं केलं. कसला हा न्यूनगंड?
  • Log in or register to post comments

फंडामेंटलस रिपोर्ट्स

सुधीर
Sat, 06/06/2015 - 23:44 नवीन
फंडामेंटल्स रिपोर्ट्स ब-याच वेळा फुकट उपलब्ध नसतात. त्यात वेळ द्यावा लागतो. ॲप्रोक्स रेव्हून्यू इंपॅक्टचे भाकीत करणे नक्कीच सोपे नाही. मार्केट शेअर मध्ये काय बदल होतील? कुठल्या प्रतिस्पर्धी कंपनीला फायदा होईल? याचा अंदाज घेणे कठीण आहे (अनुभवी माणसाचे काम आहे. ब्रिटानियाचा स्टॉक मिन टाईम वाढला). तसाही नेस्ले मला खूपच महाग वाटतो अजूनही. ईटी इंटेलिजन्स वगळता मी फॉलो करत असलेल्या कुठल्याच ब्रोकरची रेटींग नव्हती. (ब्रोकरच्या रिपोर्ट्स वर किती विश्वास ठेवायचा हाही प्रश्न आहेच) इटी इंटिलिजन्सचं सब्स्क्रिब्शन नसल्याने नेमकं ॲनालिसिस अजूनही मिळालं नाही वाचायला. सीकींग अल्फा नावाचं संकेतस्थळ आहे पण त्यात खास करून अमेरीकेतल्या स्टॉक्स वरचे रिपोर्ट्स हरहुन्नरी, नवशिखे देत असतात. आपल्याकडे असं कुठलं संकेतस्थळ आहे का याची कल्पना नाही.
  • Log in or register to post comments

रामदेवबाबा नूडल्स आणणार आहे म्हणे.

hitesh
Mon, 06/08/2015 - 02:10 नवीन
म्हणुन नेस्लेला उडवले असेल का ?
  • Log in or register to post comments

तुम्हीच सांगा आता...

संदीप डांगे
Mon, 06/08/2015 - 03:40 नवीन
तुमच्याकडे आला असेल ना गुप्त अहवाल...? रामदेवबाबाकडे असंख्य प्रॉडक्ट्स आहेत. तेवढं निवडून मॅगीला धोपटण्यासारखं काय होतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

नेस्ले शेयरविषयी तज्ञ चर्चा

चिनार
Mon, 06/08/2015 - 10:16 नवीन
नेस्ले शेयरविषयी तज्ञ चर्चा करत आहेतच .. पण एक अवांतर माहिती शेयर करतोय .माझी या आधीची कंपनी नेस्लेला गेल्या ३० वर्षांपासून बॉयलर पुरवठा करते. नेस्लेच्या भारतातील सगळ्याच प्लांट मध्ये त्या कंपनीचा बॉयलर आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. माझ्या एका वरीष्ठांनी सांगीतल्याप्रमाणे देशभरात रोज २५० टन मॅगीचे उत्पादन होते. मॅगी जर तीन-चार महिने बाजारात आली नाही तर नेस्लेचे किती नुकसान होईल याचा जाणकारांनी अंदाज लावावा.
  • Log in or register to post comments

मी जे वाचलं त्यावरून नेस्लेचा

काळा पहाड
Mon, 06/08/2015 - 13:12 नवीन
मी जे वाचलं त्यावरून नेस्लेचा ३०% रेव्हेन्यू मॅगी कडून येतो. साधारण पणे २२०० कोटी रुपये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

नेस्ले ५६६१

सुबोध खरे
Mon, 06/08/2015 - 10:20 नवीन
नेस्ले ५६६१
  • Log in or register to post comments

माझी थोडी घाई झाली असे मान्य

प्रसाद भागवत
Mon, 06/08/2015 - 12:05 नवीन
माझी थोडी घाई झाली असे मान्य केलेच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मी आज नेस्ले ५६७० रूपयांना

श्रीगुरुजी
Mon, 06/08/2015 - 11:41 नवीन
मी आज नेस्ले ५६७० रूपयांना घेतला. बघू अजून किती खाली जातोय ते.
  • Log in or register to post comments

http://www.moneycontrol.com

काळा पहाड
Mon, 06/08/2015 - 13:37 नवीन
http://www.moneycontrol.com/news/buzzing-stocks/will-nestle-lead-againmaggi-how-to-trade-stock-now_1402055.html Goldman Sachs recommends selling it with a target of Rs 4664 per share. Barclays: The brokerage has a target price of Rs 5194 per share.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

४६६४ टारगेट ? सेल ? कसे?

गवि
Mon, 06/08/2015 - 13:43 नवीन
४६६४ टारगेट ? सेल ? कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

शॉर्ट सेल - मंदीत संधी

अन्या दातार
Mon, 06/08/2015 - 15:46 नवीन
शॉर्ट सेल - मंदीत संधी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अरे लोकांनो.. घेऊ की नको..?

गवि
Mon, 06/08/2015 - 13:41 नवीन
अरे लोकांनो.. घेऊ की नको..? ५६०० ला पोचतंय आता. की थोडेथोडे दर आठवड्याला घेऊ? -(उडी टाकण्यासाठी नाक मुठीत धरुन विहिरीच्या काठावर पुढेमागे डोकावत उभा) गवि
  • Log in or register to post comments

हे एक उत्तर आहे: http:/

काळा पहाड
Mon, 06/08/2015 - 13:56 नवीन
हे एक उत्तर आहे: http://economictimes.indiatimes.com/markets/stocks/recos/not-a-good-time-to-buy-nestle-hemindra-hazari/articleshow/47582692.cms पण खरं सांगायचं तर कुणालाही माहीत नाही. हे मॅगी-युद्ध कदाचित किचकट, लांबलचक आणि दमवणारं ठरणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गवि साहेब, दुसर्‍याच्या

आनंदराव
Mon, 06/08/2015 - 14:20 नवीन
गवि साहेब, दुसर्‍याच्या सल्ल्याने शेअर घेतला किंवा विकलात तर नुकसान होण्याचे चान्सेस खूप जास्त असतत. तर, स्वत; अभ्यास करा आणि निर्णय घ्या प्रेमाचा सल्ला ! (अशा प्रकारात हात पोळलेला) आनंद
  • Log in or register to post comments

+१

असंका
Wed, 06/10/2015 - 13:07 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदराव

मोतिलाल ओस्वालचा रिसर्च रिपोर्ट

सुधीर
Mon, 06/08/2015 - 17:34 नवीन
मोतिलाल ओस्वालचा रिसर्च रिपोर्ट इथे पहाता येईल. त्यांच्या मतानुसार नेस्टलेच्या संपूर्ण रेव्हिन्यूपैकी २०% हिस्सा आणि नेट प्रॉफिटचा २५% हिस्सा हा न्यूडल्स मधून येतो. (१/४ हा मोठा आकडा आहे). आणि २०१४ मध्ये याच कॅटेगरीचा सेल्स ग्रोथ सर्वात जास्त होता. मॅगी लहान मुलं खात असल्याने ब्रॅंड इक्विटी वर मोठा फरक पडणार आहे. कारण परत विश्वासार्हता परत मिळवण्यास वेळ जाईल. आणि सर्वांना ज्यात जास्त उत्सुकता आहे त्या प्रश्नाचं उत्तर देताना ("स्टॉक खरेदी करण्याच्या पातळीवर पोहोचला का?" ) रिपोर्ट म्हणतो. अजून त्या पातळीवर आलेला नाही. २०१५ आणि २०१६ च्या एक्सपेक्टेड अर्निंग नुसार स्टॉक (फॉर्वर्ड) पीई रेशो ३७ आणि ३२ आहे. (37x CY15E and 32x CY16E EPS) भविष्यकाळात नेस्टलेच्या डॅमेज कंट्रोल अ‍ॅक्टिव्हीटीनुसार त्यांचे अंदाज बदलू शकतात. २०१६ चा एक्स्पेक्टेड ईपीएस (रु. १९०, त्यांच्या रिसर्च नुसार) च्या साधारण ३३ पट त्यांनी टार्गेट किंमत (रु. ६३००) ठरवली आहे आणि स्टोक्स अजून करेक्ट होईल असे त्यांना वाटते. रिपोर्टच्या डिस्क्लोजर मध्ये "अ‍ॅनालिस्ट कडे स्टॉक्स नाहीत आणि अ‍ॅनालिस्ट नेस्टलेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरवर, वा नेस्टलेचा एम्प्लॉई नाही" असे नमुद केले आहे. ओस्वालखेरीज दुसर्‍या कुणाचा रिपोर्ट मिपाकरांना माहीत असेल तर जरूर शेअर करा.
  • Log in or register to post comments

सिंगापूर टेस्टींग

सुधीर
Tue, 06/09/2015 - 16:04 नवीन
मॅगीची सिंगापूरची टेस्टींग पास झाली. स्टॉक एका दिवसात ९% वर गेला. गुरुंजींना लॉटरी लागली. :) http://www.livemint.com/Money/Pqw3XTnsJq9LUjdOrhA6UI/Nestle-India-shares-rise-after-Maggi-clears-Singapore-safety.html आपल्या (FSSAI) टेस्टींग आणि सिंगापूर टेस्टीग मध्ये फरक का? कुछ तो गडबड है|
  • Log in or register to post comments

भारतात स्थानिक बाजारात

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 06/09/2015 - 18:06 नवीन
भारतात स्थानिक बाजारात विकण्याच्या वस्तू आणि निर्यातिसाठीच्या वस्तू असा भेदभाव आणि त्यांतील फरक नविन नाही. सिंगापूरमध्ये अन्नपदार्थांत भेसळ सापडली तर सीईओ सरळ आत जाईल. नेसलेच्या सीईओने भारतात केले तसे त्या देशात जाऊन त्यानाच उपदेशामृत पाजणे तो स्वप्नातही पाहणार नाही. शिवाय, तेथे त्याच्या वचनांची भलावण करणारी विकाऊ फौजही मिळणे कठीण आहे... कारण त्यांच्यावरही कायद्याचा बडगा पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

पूर्वी कॅडबरी, शीतपेये इ. वर

श्रीगुरुजी
Tue, 06/09/2015 - 20:38 नवीन
पूर्वी कॅडबरी, शीतपेये इ. वर असाच आरडाओरडा झाला होता. त्यांनी सर्व मॅनेज करून आपल्यावरील किटाळ दूर केले. नेस्ले मॅगीच्या बाबतीत तसेच करणार याची खात्री बाळगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

भाजपाच्या राज्यात

सुधीर
Tue, 06/09/2015 - 21:56 नवीन
गुरुजी, भाजपाच्या राज्यात असं होणार नाही असं वाटलं होतं. ;) ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

नेस्ले पुन्हा वर जाणार याची

श्रीगुरुजी
Tue, 06/09/2015 - 20:39 नवीन
नेस्ले पुन्हा वर जाणार याची खात्री होतीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

.

hitesh
Wed, 06/10/2015 - 06:49 नवीन
म्यागीमधले शिसे कुठे गेले ? आधी सापडले... लगेच गेलेही.... मोदी झटपट काम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हितेश भाऊ

सुबोध खरे
Wed, 06/10/2015 - 11:44 नवीन
हितेश भाऊ तुम्ही तुमचा काळा चष्मा काढा. शिशाचे मोदी साहेबांशी काय घेणे देणे आहे? तुमचा मोदी द्वेष समजू शकतो पण तो येथे अनाठायी आहे. उद्या तुम्ही असेही म्हणाल कि पप्पू म्यागी खातो म्हणून मोदी साहेबांनी त्याच्या वर बंदी आणली. जाता जाता- केजरीवाल साहेबांच्या दिल्लीत किंवा अखिलेश रावांच्या उत्तर प्रदेशात पण म्यागीवर बंदी आणली यालाही मोदी साहेबच जबाबदार आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

अनुल्लेख डॉक्टर अनुल्लेख..

प्रसाद भागवत
Wed, 06/10/2015 - 11:47 नवीन
अनुल्लेख डॉक्टर अनुल्लेख...हेच कदाचित जास्त प्रभावी उत्तर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ते यडंय. लक्ष देउ नका.

काळा पहाड
Wed, 06/10/2015 - 12:46 नवीन
ते यडंय. लक्ष देउ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हितेशच बरोबर आहे...राहुल

चिनार
Wed, 06/10/2015 - 11:56 नवीन
हितेशच बरोबर आहे...राहुल गांधीला पंतप्रधान करा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा