मला उमजलेले बॉलीवूड

शशांक कोणो जनातलं, मनातलं
नमस्कार मंडळी, सुप्रभात. गेले अनेक दिवस फेसबुक वर वावरताना अनेक जण आपापल्या परीने बॉलीवूड म्हणजेच आपली चित्रपटसृष्टी आणि त्यातील चित्रपट, गाणी याविषयी लिहिताना दिसतात. प्रत्येकाची आपापली शैली, दृष्टी यामुळे नकळत आपल्याला ही या गोष्टीकडे पाहण्याची एक दृष्टी मिळते. मी ही लहानपणापासून चित्रपट गीतांचा वेडा आहे. अर्थात वयानुसार आवड बदलत गेली कारण तशी संगत होती. नव्वदीच्या दशकात कॉलेज मध्ये असताना ओपी , आर डी , किशोर , आशा आवडत. अनेक वर्षांनी काही दर्दी चित्रपटशौकिनांच्या संपर्कात आल्यामुळे मग ती आवड थोडी मागे सरकत रफी, लता, मदनमोहन, मुकेश इथपर्यंत बदलली. जसजसे थोडे खोलात शिरायला लागलो तसे मग नूरजहां, शमशाद, तलत अशा मंडळींची भुरळ पडली. अनिल विश्वास, नौशाद, सी रामचंद्र यांच्याबद्दल जिव्हाळा वाटायला लागला. खूप शिकवले यांच्या गाण्यांनी. माझ्याकडे जमलेला हा गाण्यांचा आणि माहितीचा खजिना इथे थोडा थोडा करत वाटून टाकावा असे अनेक दिवस मनात होतेच. पण कशा तऱ्हेने लिहावे ते समजत नव्हते. आज सकाळी डोक्यात अचानक एक विचार आला. आणि ठरले. मला आवडलेल्या चित्रसृष्टीतील एक एक व्यक्तीबद्दल लिहित जाईन. त्यांच्या काही मला अतिशय आवडणाऱ्या गाण्यांसोबत माझे विचार संलग्न करून एक माला गुंफत जाईन. यापुढे माझ्या आगामी कार्यव्यस्ततेमुळे कदाचित मला सातत्य ठेवणे जमणार नाही पण जसे जमेल तसे मी एक एक व्यक्तिमत्व माझ्यानजरेतून उलगडेन. आपण सर्वजण मला नक्की प्रतिसाद द्याल याची खात्री आहे.
वर्गीकरण
लेखनप्रकार

32 टिप्पण्या 6,072 दृश्ये

Comments

जेपी नवीन

लेख खुपच त्रोटक वाटला. उल्लेख केलेल्या कार्याबद्दल कुठलाच उल्लेख नाही त्यामुळे धागा अन्नुलेखाने मरेल.असो लिहीत रहा. पुढील लेखनास शुभेच्छा. आ.मि.स्वा.सा.अ.-जेपी

शशांक कोणो नवीन

In reply to by जेपी

जेपी सुरवात करतोय संगीतकारांपासून. माझे आवडते संगीतकार याचे 12 भाग सुरवातीला. मग जमेल तसे इतर ही गोष्टी आहेत. वाचून अभिप्राय द्यावा हि विनंती ......

जयन्त बा शिम्पि नवीन

नेमके एका गोष्टीवर फक्त लिहा . एकतर फक्त गाणी नाहीतर माहीती . गाण्यात सुद्धा गाण्यात नेमके काय भावले म्हणुन गाणे आवडले ते लिहा.त्याचा नुसता अनुवाद नको , तर रसास्वाद अनुभवुन दाखवा . लिखाणासाठी शुभेच्छा.

शशांक कोणो नवीन

In reply to by जयन्त बा शिम्पि

जयंत सर आधी सुरवात संगीतकारांपासून, पण त्यात नौशाद ओपी वगैरे नसतील. थोडेसे अप्रकाशित पण गुणी त्यांच्याबद्दल काही अप्रकाशित गोष्टी व किस्से. सुरवात तर होऊ द्या.

सतिश गावडे नवीन

In reply to by जेपी

त्याची ही गाणी माझी एकेकाळी खूप आवडती होती: 1. सदाबहार "तुम तो ठेहरे परदेसी" 2. आवारा हवा का झोंका हू 3. यारो मैने पंगा ले लिया 4. पेहले तो कभी कभी गम था 5. आंख ही ना रोयी हैं

शशांक कोणो नवीन

In reply to by द-बाहुबली

सॉरी बॉस......... अल्ताफ राजा बद्दल मलाच काही माहिती नाही. माझी आवड फक्त जुनी गाणी स्पेशल १९४५-१९६० दरम्यानची.

सस्नेह नवीन

लेखमालेचा विषय रोचक आणि आवडीचा असल्यामुळे उत्सुकतेने वाट पहात आहे. याच लेखात का नाही सुरुवात केली ?

बॅटमॅन नवीन

In reply to by पिंपातला उंदीर

खी खी खी, सेम हिअर. ;) पिच्चर कितीही भंगार असोत, गाण्यांना काय बोलायचं काम नाय. साला बघावं तेव्हा त्या तथाकथित सुवर्णकाळाच्या नावाने उसासे सोडणार्‍यांचं बघून अती झालं नि हसू आलं असंच वाटायलंय आजकाल. तुमचं सुवर्णयुग असेल तर आमचं प्लॅटिनमयुग आहे म्हणावं. ;)

संदीप डांगे नवीन

In reply to by पिंपातला उंदीर

या प्रतिसादाला आणि याच्या उपप्रतिसादांना समर्थन... धागाकर्ते हलकेच घ्या...

नाखु नवीन

In reply to by आदूबाळ

पंख लागले. जाताना ते म्हणाले "मला वेड लागले उडून जाण्याचे" आगामी टाईमपास ६ मध्ये हे गीत पाठवायचा विचार आहे आपले अनुमोदन अपेक्षीत आहे. बिना मर्जीतला नाखु