Skip to main content

आंतरजातीय/धर्मिय विवाह ,एक जनुकीय (genetic) गरज!!!

लेखक ग्रेटथिंकर यांनी गुरुवार, 04/06/2015 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे ,मात्र अजूनही आंतरजातीय विवाहांकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्वग्रहदुषीत आहे. आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहे.परंतु जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात.या पाठीमागच्या जनुकीय विज्ञानाचा अर्थ समजावून घेतला तर अडचण येणार नाही . मनुष्याकडे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्या(pair)असतात,पैकी सेक्स क्रोमोझोमची तेविसावी जोडी फक्त विभिन्न असते, बाकीच्या जोड्या या सारख्या असतात(Identical).मनुष्याच्या DNAमध्ये अनेक जनुकं ही बाधीत असतात (Deleterious mutations).अशी म्युटेशन्स सर्व समाज आणि वंशात आहेत .यातील बहुतांश बाधीत जीन म्युटेशन्स ही रिसेसीव्ह पॅटर्नची आहेत. रिसेसीव्ह गुणधर्म(trait) तेव्हाच मनुष्यामध्ये व्यक्त/एक्स्प्रेस होतात जेव्हा बाधीत जनुके ही जोडीत (pair) असतात. याचा अर्थ एखाद्या फॉल्टी जनुकाच्या दोन कॉपीज जर एकत्र आल्या तर तो जनुक आपला प्रभाव दाखवु शकतो. वरती लिहल्याप्रमाणे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्यामध्ये जनुकांच्या दोन प्रती (Copies)असतात, जर दोन वेगवेगळ्या जनुकांची जोडी जर गुणसुत्रात जमली तर तो जेनेटीक अँडव्हांटेज समजला जातो व होणारे अपत्य सुदृढ जन्माला येते . आता या सर्व विज्ञानाचा जातीव्यवस्थेशी काय संबंध असा प्रश्न पडणे साहजीक आहे.आपल्या कडे जातीव्यवस्था असल्याने आपला जैविक साठा(Gene pool)मर्यादीत होतो.यासाठी एक उदाहरण बघु, मनुष्यात उंची ठरवणारी 150 पेक्षा जास्त जनुके आहेत, आपल्याकडच्या जाती/ धर्म प्रकाराने कुठल्याही जातीत ही सर्व आवश्यक जनुके सापडणार नाहीत, प्रत्येक जातीत ती विभागली गेली असणार. याचाच अर्थ प्रत्येक जातीत उंची हा गुणधर्म ठरवणारी जनुकं वेगवेगळी व मर्यादीत आहेत व एकाच जातीतल्या विवाहाच्या प्रथेमुळे तीच तीच जनुकं पुढच्या पीढीत पास होत आहेत.यामुळे जेनेटीक फिटनेसला मर्यादा पडतात. उंची हा फक्त उदाहरणाचा भाग झाला ईम्युनीटी ,बुद्धीमत्ता,शाररीक सदृढता ईत्यादी अनेक मानवी गुणधर्मांना अनेक जनुकं कारणीभूत असतात जी आपल्या जातीव्यवस्थेने आपण सिमीत करुन ठेवली आहेत.इम्युनीटी ठरवणारी जनुकं जर एखाद्या जातीत मर्यादीत असतील, तर त्या जातीत जन्माला येणार्याँची रोगप्रतिकारक शक्तीदेखील ठराविक पातळीवरच मर्यादीत राहते. ,कारण इम्युनीटी ठरवणार्या अनेकाविध जनुकांचा अभाव असणे.तेच बुद्धीमत्ता व इतर शारीरीक लक्षणांना लागू होते. परत एकाच जातीत बाधित जनुकं असतील तर ती व्यक्त होण्याचा संभव जास्त असतो,एकाच जातीतल्या जोडप्यांना होणार्‍या अपत्यात बाधीत जनुकाच्या दोन प्रती एकत्र येऊन बाधीत गुणधर्म व्यक्त होण्याची शक्यता जास्त असते, कारण आपली जनुकीय विविधता जातींमुळे मर्यादीत झालेली आहे. जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आंतारजातिय विवाहांना चालना देणे. आंतरजातिय विवाहांमुळे मिळणारे फायदे हे जनुकीय विज्ञानाच्या अनुषंगाने खुप जास्त आहेत. आंतरजातीय विवाह झाल्यास आपल्या भारतीय समाजाची जनुकीय विविधता वाढेल, भारतीय समाजाचा जनुकीय साठा(diverse gene pool) मोठ्या प्रमाणात वाढेल. आंतरजातिय/वंशिय विवाहाचे खालील फायदे होऊ शकतात. 1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल. 2.विविध गुणधर्मासाठी अनेकविध जनुके उपलब्ध झाल्याने,रिसेसीव व डॉमिनंट पॅटर्नने इनहेरिट होणार्या जेनेटीक डीसॉर्डर कमी होतील व एक सुदृढ समाज तयार होईल 3.भारतीय समाज विविधांगी गुणधर्माचा एकजिनसी समाज होईल. 4.जनुकीय विविधता असलेला सदृढ समाज हा मानव वंशास फायद्याचाच ठरेल. आंतरजातीय /वंशीय विवाहाचे विज्ञानाच्या अनुषंगाने केलेले हे चिंतन आहे. काही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी लिंक दिलेल्या आहेत . तर आंतरजातिय व आंतरधर्मिय विवाहाला खुल्या मनाने मान्यता देणारा समाज निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे व त्याला वैज्ञानिक आधारही आहे .धन्यवाद http://www.bionews.org.uk/page_51579.asp http://assoc.garden.org/courseweb/course2/week2/page18.htm

वाचने 58127
प्रतिक्रिया 243

प्रतिक्रिया

In reply to by ग्रेटथिंकर

नानासाहेब, तुमच्याच वर दिलेल्या प्रतिसादातील खालील मुद्द्यावर हे उपप्रतिसाद आहेत हो. "दक्षिण आशियायी एका पायावर तयार होतील पण गोरे लोकही तयार झाले पाहिजेत हो. असे झाले तर मग दीपाली अँडर्सन,प्राजक्ता हॅरिसन,कॅथरीन कुलकर्णी,क्रिस्तिना पवार,अँजेला चितळे,जॅकलीन खोब्रागडे अशी नामावली तयार."

In reply to by नाखु

त्यावरून एक जोक आठवला.... एक माणूस देवाची प्रार्थना करतो, "हे देवा, मला जगातली सर्वांत सुंदर स्त्री पत्नी म्हणून दे". देव प्रसन्न होतो आणि म्हणतो, "वा भक्ता! तुझ्यावर मी प्रसन्न आहे. तू जर हिंदू असलास तर ऐश्वर्या, मुसलमान असलास तर कॅटरिना, आणि ख्रिश्चन असलास तर केट विन्सलेट देतो. आता सांग बघू तुझं नाव!" माणूसः (पुरेपूर हावरेपणाने) "अब्दुल विजय फर्नांडिस". देवः "लै शाणा बन्तो का बे, तुला तर आता राखी सावंतच मिळेल."

आंतरराष्ट्रीय डी.एन.ए. मिलापाचे राष्ट्रीय पातळीवरचं फसलेलं उदाहरण देउ काय? उगीचं आयडीला पंख लागायचे म्हणुन मोह आवरतो.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

हा हा चिमणराव... लय म्होटा सिक्सर... थे येक्दम 'व्हाट इफ माय ब्युटी युवर ब्रेन?' चं मूर्तिमंत उत्तर हाय बरंका... उगाच नाय ज्यूपीटरच्या येलोशीट्टी स्पीडने ब्रेनचालत तेंचा...

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

>>> आंतरराष्ट्रीय डी.एन.ए. मिलापाचे राष्ट्रीय पातळीवरचं फसलेलं उदाहरण देउ काय? ते उदाहरण सगळ्यांना माहिती आहे हो. अजून एक दुसरं उदाहरण म्हणजे "चार्ल्स शोभराज".

एक्का काका आणि बाकी जाणकारांना एक नम्र विनंती आहे - गूळवाटप आणि गीतापठण यांचा इफेक्ट सर्व ठिकाणी होईल असे नसते. :)

In reply to by बॅटमॅन

गाढवासमोर वाचली गीता आणि नंतर प्रसाद वाटप म्हणुन त्याच गाढवाल गुळाचा नैवद्य. मजाय बॉ गाढवाची. =))

In reply to by बॅटमॅन

काय आहे ना बॅटमॅनभाऊ, धागाकर्त्यांच्या 'गंभीर चर्चा करा' या आव्हानाने प्रेरित होऊन आम्ही भयंकर प्रयत्न करतोय पण चामारी, सर्व चर्चा धमाल इनोदी होत जात आहे.

सुरवातीला हा धागा माहितीपूर्ण वाटला होता पण एक्का काकांच्या प्रतिसादानंतर त्यातला फोलपणा जाणवला. एवढं झाल्यावर धागा कर्ता अजूनही लढतोय याचे आश्चर्य वाटते. अरे अजून मिपाकरांचेच यावर एकमत नाही तर केंव्हा सुरु होणार आंतरदेशीय/आंतरधर्मीय/आंतरखंडीय विवाह ??? केंव्हा होणार जनुकांचा विकास ? केंव्हा जन्म घेतील ते आर्यभ्हट्ट, आइन्ष्टाआइन ,शेक्सपियर, अलेक्झांदर, नेपोलियन पार्ट २

In reply to by चिनार

केंव्हा जन्म घेतील ते आर्यभ्हट्ट, आइन्ष्टाआइन ,शेक्सपियर, अलेक्झांदर, नेपोलियन पार्ट २ आसं नाय काय.... त्यानला आर्यपियर, अलेक्भट्ट, शेक्सक्झांदर, अलेस्टाईन, नेपोलाईन, आसं कायबाय पायजेल, तेबी आख्ख्या होल जगाच्या कल्याणासाठी आणि जबरदस्तीने !

पण आंतरभाषीय जनुक मिश्रणाची सर्व परिचित उदाहरणे कसे विसरून चालतील १. हिंग्लिश = हिंदी जनुक + इंग्लिश जनुक (उदा . रतनसिंग वाशिंग्टन ) २. हिम्मराठी = हिंदी जनुक + मराठी जनुक ( गजोधर शृंगारपुरे ) ३ मिंग्लिश = मराठी जनुक + इंग्लिश जनुक ( लक्ष्मिबाइ टेलर ) and so on …

ही अजुन एक लिंक नीट् वाचा http://www.wikipedia.org/wiki/Population_bottleneck population bottleneck (or genetic bottleneck) is a sharp reduction in the size of a population due to environmental events (such as earthquakes, floods, fires, disease, or droughts) or human activities (such as genocide ). Such events can reduce the variation in the gene pool of a population; thereafter, a smaller population (of animals/ people) with a correspondingly smaller genetic diversity, remains to pass on genes to future generations of offspring. Genetic diversity remains lower, only slowly increasing with time as random mutations occur. [1] In consequence of such population size reductions and the loss of genetic variation, the robustness of the population is reduced and its ability to survive selecting environmental changes, like climate change or a shift in available resources, is reduced. Conversely, depending upon the causes of the bottleneck, the survivors may have been the fittest individuals, hence improving the traits within the gene pool while shrinking it. This genetic drift can change the proportional distribution of an allele by chance and even lead to fixation or loss of alleles. Due to the smaller population size after a bottleneck event, the chance of inbreeding and genetic homogeneity increases and unfavoured alleles can accumulate.