आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे ,मात्र अजूनही आंतरजातीय विवाहांकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्वग्रहदुषीत आहे. आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहे.परंतु जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात.या पाठीमागच्या जनुकीय विज्ञानाचा अर्थ समजावून घेतला तर अडचण येणार नाही .
मनुष्याकडे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्या(pair)असतात,पैकी सेक्स क्रोमोझोमची तेविसावी जोडी फक्त विभिन्न असते, बाकीच्या जोड्या या सारख्या असतात(Identical).मनुष्याच्या DNAमध्ये अनेक जनुकं ही बाधीत असतात (Deleterious mutations).अशी म्युटेशन्स सर्व समाज आणि वंशात आहेत .यातील बहुतांश बाधीत जीन म्युटेशन्स ही रिसेसीव्ह पॅटर्नची आहेत. रिसेसीव्ह गुणधर्म(trait) तेव्हाच मनुष्यामध्ये व्यक्त/एक्स्प्रेस होतात जेव्हा बाधीत जनुके ही जोडीत (pair) असतात. याचा अर्थ एखाद्या फॉल्टी जनुकाच्या दोन कॉपीज जर एकत्र आल्या तर तो जनुक आपला प्रभाव दाखवु शकतो. वरती लिहल्याप्रमाणे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्यामध्ये जनुकांच्या दोन प्रती (Copies)असतात, जर दोन वेगवेगळ्या जनुकांची जोडी जर गुणसुत्रात जमली तर तो जेनेटीक अँडव्हांटेज समजला जातो व होणारे अपत्य सुदृढ जन्माला येते .
आता या सर्व विज्ञानाचा जातीव्यवस्थेशी काय संबंध असा प्रश्न पडणे साहजीक आहे.आपल्या कडे जातीव्यवस्था असल्याने आपला जैविक साठा(Gene pool)मर्यादीत होतो.यासाठी एक उदाहरण बघु,
मनुष्यात उंची ठरवणारी 150 पेक्षा जास्त जनुके आहेत, आपल्याकडच्या जाती/ धर्म प्रकाराने कुठल्याही जातीत ही सर्व आवश्यक जनुके सापडणार नाहीत, प्रत्येक जातीत ती विभागली गेली असणार. याचाच अर्थ प्रत्येक जातीत उंची हा गुणधर्म ठरवणारी जनुकं वेगवेगळी व मर्यादीत आहेत व एकाच जातीतल्या विवाहाच्या प्रथेमुळे तीच तीच जनुकं पुढच्या पीढीत पास होत आहेत.यामुळे जेनेटीक फिटनेसला मर्यादा पडतात.
उंची हा फक्त उदाहरणाचा भाग झाला ईम्युनीटी ,बुद्धीमत्ता,शाररीक सदृढता ईत्यादी अनेक मानवी गुणधर्मांना अनेक जनुकं कारणीभूत असतात जी आपल्या जातीव्यवस्थेने आपण सिमीत करुन ठेवली आहेत.इम्युनीटी ठरवणारी जनुकं जर एखाद्या जातीत मर्यादीत असतील, तर त्या जातीत जन्माला येणार्याँची रोगप्रतिकारक शक्तीदेखील ठराविक पातळीवरच मर्यादीत राहते. ,कारण इम्युनीटी ठरवणार्या अनेकाविध जनुकांचा अभाव असणे.तेच बुद्धीमत्ता व इतर शारीरीक लक्षणांना लागू होते.
परत एकाच जातीत बाधित जनुकं असतील तर ती व्यक्त होण्याचा संभव जास्त असतो,एकाच जातीतल्या जोडप्यांना होणार्या अपत्यात बाधीत जनुकाच्या दोन प्रती एकत्र येऊन बाधीत गुणधर्म व्यक्त होण्याची शक्यता जास्त असते, कारण आपली जनुकीय विविधता जातींमुळे मर्यादीत झालेली आहे.
जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आंतारजातिय विवाहांना चालना देणे. आंतरजातिय विवाहांमुळे मिळणारे फायदे हे जनुकीय विज्ञानाच्या अनुषंगाने खुप जास्त आहेत.
आंतरजातीय विवाह झाल्यास आपल्या भारतीय समाजाची जनुकीय विविधता वाढेल, भारतीय समाजाचा जनुकीय साठा(diverse gene pool) मोठ्या प्रमाणात वाढेल.
आंतरजातिय/वंशिय विवाहाचे खालील फायदे होऊ शकतात.
1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल.
2.विविध गुणधर्मासाठी अनेकविध जनुके उपलब्ध झाल्याने,रिसेसीव व डॉमिनंट पॅटर्नने इनहेरिट होणार्या जेनेटीक डीसॉर्डर कमी होतील व एक सुदृढ समाज तयार होईल
3.भारतीय समाज विविधांगी गुणधर्माचा एकजिनसी समाज होईल.
4.जनुकीय विविधता असलेला सदृढ समाज हा मानव वंशास फायद्याचाच ठरेल.
आंतरजातीय /वंशीय विवाहाचे विज्ञानाच्या अनुषंगाने केलेले हे चिंतन आहे. काही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी लिंक दिलेल्या आहेत . तर आंतरजातिय व आंतरधर्मिय विवाहाला खुल्या मनाने मान्यता देणारा समाज निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे व त्याला वैज्ञानिक आधारही आहे .धन्यवाद
http://www.bionews.org.uk/page_51579.asp
http://assoc.garden.org/courseweb/course2/week2/page18.htm
वाचने
58128
प्रतिक्रिया
243
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज्यांना विवाह विषयात अधिक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूकचर्चा
तुमच्या या थिअर्या जाट,
In reply to चर्चा by तिमा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूकवाट चुकलेला लेख...
1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल.हे लेखाच्या सारातले पहिले विधानच प्रचंड विरोधाभासाने भरलेले आहे ! १. सद्या, जगात जाती, धर्म, वंश, देश इत्यादीं गट आहेत आणि त्या गटांतले संकर अभावाने/कमी होतात म्हणून तर आजच्या घडीला गटागटात फरक (डाव्हर्सिटी) आहे !!! २. जाती, धर्म, वंश, देश इत्यादींच्या सीमा न बाळगता जगातील सर्व मानवांचा संकर होत राहीला तर अनेक पिढ्यांनी सर्व मानवसमाजाच्या जीन पूलचे एकत्रिकरण (युनिफॉर्मिटी) होईल आणि अर्थातच डायव्हर्सिटी नष्ट होईल !!! ३. "एकत्रिकरणाने जनुकीय सदृढता वाढीस लागेल" या विधानातला फोलपणा येथे विशद केला आहेच. भिन्न गटांतील संकराला, तो जर एकमेकाच्या संमत्तीने झाला तर त्याला माझा अजिबात विरोध नाही. केवळ, लेखाच्या गमकातला विरोधाभास स्पष्ट करण्यासाठीच मी वरचे शास्त्रिय सत्य सांगत आहे, इतकेच. ====== हा लेख एकतर केवळ वाचकांचे पाय खेचण्यासाठी लिहीलेला आहे किंवा युजेनेटिक्स या शास्त्रावरून तयार केलेली शास्त्रीय भासणारी (स्युडो सायंटिफिक) व फार पूर्वी कालबाह्य झालेली लोकवदंता (anecdotal) तत्वे वापरून अज्ञानाने लिहीलेला आहे. वसाहतवादाच्या काळात गोर्या (कॉकेशियन) लोकांचा जनुकीय वरचढपणा सिद्ध करण्यासाठी अशी वंशश्रेठतेची तत्वे मोठ्या हिरीरीने पुढे आणली गेली आणि शतक-दीडशतक अरेरावीने खपवली गेली. नाझी नरसंहार हे "निगेटीव्ह युजेनेटिक्स"चे (नको असलेली जनुके असणारे लोक कायमचे नष्ट करा) न विसरणारे उदाहरण. तर, ऑस्ट्रेलियन अॅबओरिजीनल्सनधील मुलींची लग्ने गोर्यांबरोबर लावून मग त्यांच्या संतत्तीची लग्ने इतर गोर्यांबरोबर लावून... अनेक पिढ्यांनंतर "सुधारित" लोक तयार करण्याच्या कल्पनेने पछाडलेले ऑस्ट्रेलियन पाद्री हे "पॉझीटीव्ह युजेनेटिक्स"चे (उत्तम प्रतिची जनुके असलेले लोक तयार करा) उदाहरण. बलवान गोरी जनुके दर पिढीमागे कमी प्रतिची अॅबओरिजीनल जनुके जीन पूलमधून काढून शेवटी पूर्ण नष्ट करतील, असा त्यांचा दावा होता. हा क्रूर प्रयोग करताना मुलांना लहानपणीच आईवडीलांपासून दूर करून खास मिशन्समध्ये ठेवत असत आणि त्यांची लग्ने चर्चच्या मर्जीने करत असत. या जुलुमी कारवायांसाठी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानाला अॅबओरिजीनल्सची उघड माफी मागावी लागली आहे. (अ) वर दिलेल्या उदाहरणांप्रमाणे युजेनेटिक्स तत्वावर आधारलेल्या वाटणार्या पण अशास्त्रिय असलेल्या कल्पनांना आणि (आ) एक मानववंश दुसर्या मानववंशापेक्षा जनुकीयरित्या श्रेष्ठ असतो या अशास्त्रिय कल्पनेलाही; गेल्या काही दशकांत झालेल्या जनुकशास्त्राच्या विकासामुळे सुरुंग लागला आहे. ====== जनुकशास्त्रिय सत्ये... १. मानवाच्या जाती, धर्म, वंश, देश इत्यादींवर आधारलेल्या गटांमध्ये फार लक्षणिय जनुकीय फरक नाहीत. २. निरोगी जनुके असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या विकासात त्याच्या आजूबाजूच्या कौटुंबिक-सामाजिक-धार्मिक-आर्थिक-राजकिय परिस्थितीचा सर्वात मोठा प्रभाव असतो. ३. सर्व मानवांची जनुके तंतोतंत एकसारखी नसल्याने आणि व्यक्तीची जडणघडण होताना आस्तित्वात असलेल्या आजूबाजूच्या परिस्थितील फरकामुळे आपल्यातला प्रत्येकजण अनन्य (unique) बनतो. ====== "लोकवदंता (anecdotal)" युजेनेटीक्सला चपखल चपराक देणारी व्यावहारीक सत्ये... १. तथाकथीत निम्नस्तरातून येऊन वरचढ होऊन, तथाकथीत उच्चस्तरातून आलेल्या धनदांडग्यांना, राजकारण्यांना व नोकरशहांना आपल्या मुठीत ठेवण्याचे कसब असलेल्या व्यक्तींची उदाहरणे जगभर आहेत आणि भारतातही कमी नाहीत... अगदी चंद्रगुप्त मौर्याच्या आधीपासून ते आजच्या राजकारणी, उद्योगधुरीण, शास्त्रज्ञ, कलाकार, इ पर्यंत ! २. जगभरच्या शात्रज्ञांत निम्नस्तरातून वर आलेल्या व्यक्तींची उदाहरणे काही विरळ नाहीत. नोबेल पारितोषिक अथवा तत्सम पारितोषिके मिळविणार्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांमध्ये भारतातून परदेशात जाणारेच आहेत यामागे केवळ जनुके आहेत की परिस्थितीतील बदल आहे, हे सांगायला हवेच का ? त्यांच्या इतकी उत्तम किंवा अधिक चांगली किती जनुके इथे गाईगुरांमागे धावत असतील बरे ? ३. अगदी व्यावहारीक दृष्ट्या पाहिले तरीही, केवळ उत्तम बौद्धीक काम करणार्यांपेक्षा, बौद्धीक काम करणार्यांना काबूत ठेऊन त्यांच्याकडून काम करवून घेणारा; जास्त सत्ता, संपत्ती आणि महत्व मिळवतो हेच दिसते. समान संधी जेवढ्या जास्त प्रमाणात आस्तित्वात असतात तेवढ्या जास्त प्रमाणात असे घडते, इतकेच.उत्तम प्रतिसाद
In reply to वाट चुकलेला लेख... by डॉ सुहास म्हात्रे
अर्रे देवा म्हणजे इतकावेळ
In reply to वाट चुकलेला लेख... by डॉ सुहास म्हात्रे
१. मानवाच्या जाती, धर्म, वंश,
In reply to अर्रे देवा म्हणजे इतकावेळ by मृत्युन्जय
बघा ना. सग्ळेच चुकले. आता काय
In reply to १. मानवाच्या जाती, धर्म, वंश, by नाव आडनाव
एक्का साहेब
In reply to वाट चुकलेला लेख... by डॉ सुहास म्हात्रे
एक्कासाहेबांना दंडवत,
In reply to वाट चुकलेला लेख... by डॉ सुहास म्हात्रे
शास्त्रोक्त प्रतिसाद एक्का
In reply to वाट चुकलेला लेख... by डॉ सुहास म्हात्रे
लिंक्स धाग्यात दिलेल्या आहेत,
In reply to शास्त्रोक्त प्रतिसाद एक्का by चिनार
विश्वासू संदर्भ म्हणजे काय ?
In reply to लिंक्स धाग्यात दिलेल्या आहेत, by ग्रेटथिंकर
थोडक्यात, तुम्ही ते सगळे दुवे
In reply to विश्वासू संदर्भ म्हणजे काय ? by डॉ सुहास म्हात्रे
त्याच दुव्यामध्ये मिक्सड रेस
In reply to विश्वासू संदर्भ म्हणजे काय ? by डॉ सुहास म्हात्रे
मग पप्पू???
In reply to त्याच दुव्यामध्ये मिक्सड रेस by ग्रेटथिंकर
परवाच कट्ट्यावर या विषयावर
In reply to मग पप्पू??? by टवाळ कार्टा
म्यागी
In reply to परवाच कट्ट्यावर या विषयावर by चिनार
भारताबद्दल आपले काय मत आहे?
In reply to त्याच दुव्यामध्ये मिक्सड रेस by ग्रेटथिंकर
भारतामध्ये वांशिक मिश्रण
In reply to भारताबद्दल आपले काय मत आहे? by संदीप डांगे
खिक्क
In reply to भारतामध्ये वांशिक मिश्रण by ग्रेटथिंकर
मग आता कसले मिश्रण करायचे?
In reply to भारतामध्ये वांशिक मिश्रण by ग्रेटथिंकर
मिश्रा
In reply to भारतामध्ये वांशिक मिश्रण by ग्रेटथिंकर
वाचन वाढवा !
In reply to भारतामध्ये वांशिक मिश्रण by ग्रेटथिंकर
भारतामध्ये वांशिक मिश्रण झालेले नाही.वाचन वाढवा ! थिंकिंग ग्रेट करा !! अनेकानेक शुभेच्छांचा स्विकार करा !!!त्या दुव्याच्या (नसलेल्या)
In reply to त्याच दुव्यामध्ये मिक्सड रेस by ग्रेटथिंकर
ग्रेट थिंकर साहेब
In reply to त्या दुव्याच्या (नसलेल्या) by डॉ सुहास म्हात्रे
बाजीरावाची शेंडी अहमदशहा
In reply to ग्रेट थिंकर साहेब by सुबोध खरे
बाजीरावाची शेंडी अहमदशहा अब्दालीला लावणे सोडून द्या.हे 'खरे' ग्रेट थिंकिंग आहे ! =))एक्का साहेब
In reply to बाजीरावाची शेंडी अहमदशहा by डॉ सुहास म्हात्रे
अगदी अगदी.
In reply to ग्रेट थिंकर साहेब by सुबोध खरे
दोन डॉक्टरांनी मिळुन
In reply to ग्रेट थिंकर साहेब by सुबोध खरे
चीन जपान जर्मनीमध्ये जातीपाती
In reply to ग्रेट थिंकर साहेब by सुबोध खरे
हि लोणकढी कुठनं आणलीत. काही
In reply to चीन जपान जर्मनीमध्ये जातीपाती by ग्रेटथिंकर
जर्मनी जपान चीनमध्ये
In reply to हि लोणकढी कुठनं आणलीत. काही by सुबोध खरे
ग्रेटथिंकर,
In reply to जर्मनी जपान चीनमध्ये by ग्रेटथिंकर
मांडलेले आहे नीट वाचल्यास
In reply to ग्रेटथिंकर, by संदीप डांगे
मांडलेले नीटच वाचले.
In reply to मांडलेले आहे नीट वाचल्यास by ग्रेटथिंकर
जर्मनी जपान चीनमध्ये
In reply to जर्मनी जपान चीनमध्ये by ग्रेटथिंकर
विरोधाभासाचा कळस !
In reply to चीन जपान जर्मनीमध्ये जातीपाती by ग्रेटथिंकर
वरील लेख व प्रतिसाद वाचून
शेम दंतकथा अभ्राम लिंकन आणि
In reply to वरील लेख व प्रतिसाद वाचून by श्रीगुरुजी
लग्नाच्या धाग्यावर
तुमचे लग्न झाले तर तुम्ही
In reply to लग्नाच्या धाग्यावर by कॅप्टन जॅक स्पॅरो
सीतेच्या पावलांची गोष्ट ऐकली
In reply to तुमचे लग्न झाले तर तुम्ही by यमगर्निकर
केवळ पाय बघून
In reply to सीतेच्या पावलांची गोष्ट ऐकली by कॅप्टन जॅक स्पॅरो
इथे हल्ली जातीतल्या जातीत
जनुकीय गरज
पिंडा काका भारतियांचा जनुकीय
कसा काय? भारतात हजारो जाती
In reply to पिंडा काका भारतियांचा जनुकीय by ग्रेटथिंकर
आमच्याच जातीत (कुठली ती
In reply to कसा काय? भारतात हजारो जाती by संदीप डांगे
जातींमुळे जीन पूल मर्यादित होईल का
In reply to आमच्याच जातीत (कुठली ती by संदीप डांगे
आपल्या इथे जातीसुद्धा बेटा
In reply to जातींमुळे जीन पूल मर्यादित होईल का by शब्दबम्बाळ
आपण एकदम डिनायल मोड मध्येच
In reply to आपल्या इथे जातीसुद्धा बेटा by संदीप डांगे
तुम्ही हा धागा किंवा
In reply to आपण एकदम डिनायल मोड मध्येच by शब्दबम्बाळ
सद्ध्या ४० साइजच्या डेनिम
पेपे ची की लेव्हाईज? इथे
In reply to सद्ध्या ४० साइजच्या डेनिम by कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्यावरुन एक झॅक विनोद आठवला.
In reply to पेपे ची की लेव्हाईज? इथे by काळा पहाड
व्यनी कर
In reply to ह्यावरुन एक झॅक विनोद आठवला. by कॅप्टन जॅक स्पॅरो
क्रुपया सेन्सिबल चर्चा करावी.
त्याआधी सेन्सिबल लेख टाकावे.
In reply to क्रुपया सेन्सिबल चर्चा करावी. by ग्रेटथिंकर
खिक्क .......
In reply to त्याआधी सेन्सिबल लेख टाकावे. by संदीप डांगे
ह्म्म
माईसाहेब, नावाचे संकर तर लय
In reply to ह्म्म by माईसाहेब कुरसूंदीकर
सॅम्युअल पाटील, जॉन गायकवाड,
In reply to ह्म्म by माईसाहेब कुरसूंदीकर
ही म्हणजे केळ्याचं आमिष
In reply to सॅम्युअल पाटील, जॉन गायकवाड, by बॅटमॅन
ह्या
In reply to ही म्हणजे केळ्याचं आमिष by कॅप्टन जॅक स्पॅरो
आशिष विन्स्टन् झैदी या नावाचा
In reply to ह्या by नाखु
श्रीगुरुजी, धाग्याच्या
In reply to आशिष विन्स्टन् झैदी या नावाचा by श्रीगुरुजी
धाग्यामधे मुद्दा दाखवा आम्ही
In reply to श्रीगुरुजी, धाग्याच्या by ग्रेटथिंकर
धाग्याचा हेडर 'नीट' वाचल्यास
In reply to धाग्यामधे मुद्दा दाखवा आम्ही by कॅप्टन जॅक स्पॅरो
५-६ वेळा वाचला. मुद्दा सापडला
In reply to धाग्याचा हेडर 'नीट' वाचल्यास by ग्रेटथिंकर