Skip to main content

मिपाचे धोरण..

लेखक सरपंच यांनी शनिवार, 22/03/2008 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम, मिसळपाव ह्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे! :) आपल्याला कोणतीही अडचण आल्यास ती कृपया या पत्त्यावर लिहून कळवावी. अडचण कळवण्यापूर्वी कृपया हे एकदा वाचून पाहावे. येथे लेखन करण्यापूर्वी मिसळपावचे (मिपाचे) खालील धोरण ध्यानात घ्यावे व सहकार्य करावे, ही नम्र विनंती..
  1. लिहिणार्‍या प्रत्येक माणसाबद्दल व त्याच्या लेखनाबद्दल मिपाला अत्यंत आदर आहे परंतु मिपा सभासदांव्यतिरिक्त इतर कुणाचेही लेखन, तसेच पुढे ढकललेली इपत्रे इत्यादी लेखन मिपावर प्रसिद्ध करण्यास बंदी आहे.
  2. एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून अन्य ठिकाणच्या दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद देण्यास हरकत नाही.
  3. इतरत्र प्रसिद्ध झालेले लेखन जर मिपाकरांनी वाचावे व त्याच्यावर चर्चा घडवून आणावी असे जर एखाद्याला/एखादीला वाटत असेल तर त्याने/तिने संबंधित लेखनाचा दुवा (लिंक) द्यावा...
  4. जर काही आस्वादात्मक, कलात्मक, अनुवादात्मक भाष्य करायचे असेल तरच मिपाव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रसिद्ध झालेली एखादी कविता/गझल/लेख/ संदर्भाकरता म्हणून मिपावर प्रसिद्ध करण्यास हरकत नाही....
  5. मिपा हे केवळ अन् केवळ मिपाच्या सभासदांना त्यांनी स्वत:नी केलेले लेखन प्रसिद्ध करण्याकरता बनवले गेलेले संस्थळ आहे, याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे ही विनंती...
सरपंच , मिसळपाव. कॉम
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 137098
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

येथे कुठला फॉन्ट वापरला आहे, याची माहीती आहे मिळेल का?

तुम्ही जे कराल ते मिपा साटी च क् राल हे क्ळ्त् य आनी प् ट्त्य

तात्या ,आपण कर्तव्यकठोर होऊन घेतलेल्या निर्णयाबद्दल धन्यवाद! तसेच आपण व्य . नि.बाबत असेच धोरण स्वीकाराल ही अपेक्षा व आग्रहाची विनंती.

नमस्कार मी आजच नविन आले आहे. छान आहे ही जाग.

मिपा च्या सर्व मंड्ळीना माझा नमस्कार.

मी मिपा चे धोरण वाचले नव्हते..माफ करा.आपला हुकूम मान्य...

सर्वांना सादर प्रणाम, मी नव्यानेच मिपा वर दाखल झालो आहे. आय लीप वापरणार्यांना इथे लिहायला खूप सोप्प आहे. मला असलेलि माहिती लोकाना देता आली तर खूप बरं वाटेल. मराठी गाणी संगीत क्षेत्रातले कलाकार - कार्यक्रम कोकण पर्यटन इंजिनियरींग इ. विषयांबद्दल मला जरूर लिहा..... कळावे लोभ आहेच तो व्रुद्धींगत व्हावा ही विनंती आपला आशिष

एकुणच वातावरण बघुन महाविद्यालयाची आठवण झाली. मिपाचे सगळे नियम मान्य. - चिखलू आउटलूकचे सेण्ड/ रीसीव बटन जर मेकनिकल असते तर आतापर्यन्त तुटले असते.

सर्व सभासदांना माझा नमस्कार !!!!!!!!!!!!

:P कोल्हापुर च्या बन्याबापू चा जनरल डायर साहेबासनी राम्,राम ! मुझे आपकी शर्त मजुंर है ! -कळावे आपला नम्र, बन्याबापू.

राम राम, विद्युत बालक आता आला आहे.....

मला मिपाचा सद्श्य झाल्याबद्दल आनन्द होत आहे

मराठी माणसांसाठी योग्य दालन म्हणजे मिसळपाव

u r not allowed to post असे येत आहे , काय करु ? प्रतिसाद देता येत नाही आहे, मदत करा

आदर्निय तात्या, मराथित लिहिन्यासाथि काहि कि-बोर्द ची माहिति मिलाली तर बर होइल. म्हन्जे मल पन माझे विचार कल्वाय्ला सोपे जाईल. धन्यवाद..! तुम्हा सगल्यान्चा नवा मित्र - राजेश्वर

सदस्यत्व दिल्याबद्दल धन्यवाद! :)

राम राम मिपाकर सद्स्य आनि आदर्निय तात्या आम्हि पन नविनच आहोत दोन चार दिस झाल मिपाचा सभासद होउन म्हटल चला इथ बि डोकुन बघु तसि आम्हाला डोकायचि सवयच? व लिहायचि सवय नाहिच मुळि पन मराठि मानसासाठि चागल सकेत स्थळ वाटल खुप गमतिदार खुप मजेदार आनि खुपच गम्भिर विशय आसतात इथ आनन्द तर आम्हाला आहेच घ्या साभाळुन आपला (जगाला-ताप)नव्हे जगताप

तात्या, तुमचे रोशनी बद्दलचे लेख वाचले. खुप आवडले. मला तुमच्या लेखनात व्.पु. काळेची मनाची पकड घेणारी सहजता आढळ्ली. धन्यवाद. नितिन.

In reply to by नितिनभालेराव

आयला... तात्याची नवी खरडवही..... --आंबोळी

वाऱकरी म्हणज अन्यायावर वार करणारा, 'war' म्हण्जे युध्द अन्याया विरुध्द युध्द पुकारणारा. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस..! असे नसुनन 'नामदेवे रचिला पाया, तुका झालासे कळ्स..! असे आहे. कारण वारकरि धर्माची स्थापना सन्त नामदेवाने केलेली आहे. ज्ञानेश्वराचे कर्मठ ब्राम्हणापासुन संरक्षन केले आहे.

खरडवहीमधे खरड लिहुन सुपूर्त केल्यावर ती कुठे जाते? खरड्फळ्यावर लिहिण्याची परवानगी किती दिवसांनी मिळते?

मी एक दोन लेख लिहिले आहेत. हे मिसळपाववर कसे प्रसिद्ध करावे ह्याचा कृपया खुलासा करावा ही विनन्ती.

In reply to by गावरान

आवागमन या उजवीकडच्या विभागात लेखन करा हा पर्याय आहे. त्यावर क्लिक केल्यास जे पान उघडेल त्यावर तपशीलवार सूचना आहेत. मिपावरच्या प्रथम प्रकाशनासाठी शुभेच्छा.

खूप दिवसापासून मराठीतुन वेगवेगळ्या विषयावर व वेगवेगळ्या शैलीतील आवडणारे साहित्य मोबाईल वर सहजरित्या वाचायला मिळालंय, आधाश्या सारखा वाचत सुटलोय, मिपास अनेक धन्यवाद,,