Skip to main content

कृष्णधवल छायाचित्रे......मिपा स्पर्धा-१० निकाल

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 07/06/2015 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
मी हा निकाल कसा लावला याबद्दल प्रथम थोडेसे... मी कोणाचे फोटो आहेत हे न बघता एका फोल्डरमधे सेव्ह केले. ते फोल्डर नंतर Adobe Bridge मधे ओपेन केले व त्याचे १ ते पाच असे मानांकित केले. ज्याला पाच स्टार होते ते एकत्र केले व ते परत १-५ या स्केलवर मानांकित केले. त्यातून तीन फोटो निवडले ते क्रमांकानुसार खालील प्रमाणे. क्रमांक एक : सर्वसाक्षी क्र्मांक दोन : मोहनराव क्रमांक तीन : अभिदेश व स्पा (दरवाजा) काम अवघड होते. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे बर्‍याच जणांचे जे फोटो स्पर्धेसाठी टाकले नव्हते ते अधिक चांगले होते. दुर्दैवाने रंग काढून घेतल्यावर ज्या इतर बाबींकडे लक्ष पुरवायला पाहिजे होते त्याकडे स्पर्धकांनी लक्ष पुरवले नव्हते. असो. विजेत्यांचे अभिनंदन व भाग घेणार्‍यांचे आभार...... पुढच्या स्पर्धेत थोडे सिरियसली फोटो टाकावेत ही सर्वांना विनंती.... मूळ धाग्यावर एक दोन दिवसात प्रत्येक फोटो खाली कॉमेंट टाकण्याचा विचार आहे. शेवटी काय एकमेकांवर टीका करुन व ती समजून घेऊन आपली कला जास्तीत जास्त प्रगल्भ करणे हेच आपले ध्येय असते हो ना ? जयंत कुलकर्णी. ता. क.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5228
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

जयंतरावांचे आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन. पैजारबुवा,

क्रमांक १ सर्वसाक्षी - तल्लिन कमांक २ मोहनराव - वेनिस येथील मास्क वेनिस येथील मास्क क्रमांक ३/१ - अभिदेश - ऊन पावसाचा खेळ... अभिदेश - ऊन पावसाचा खेळ... क्र. ३/२ - स्पा - दरवाजा दरवाजा

आणि परीक्षकांचे खास अभिनंदन.एका-पेक्षा एक सुंदर प्रकाश-चित्रे असतांना, त्यातून सर्वोत्क्रुष्ट प्र.चि. निवडतांना , परीक्षकांची नक्कीच तारांबळ उडाली असेल.

प्रथम विजेत्य्यांस सलाम .पहिल्या व् तीसरा जास्त आवडले.स्पर्धकाना व जकुना दं ड व् त !!!!!!!

सर्वसांक्षी यांची प्रवेशिका पाहताच प्रथम क्रमांक याच फोटोला मिळणार असे मला वाटले होते. त्यानंतर येणार्‍या प्रवेशिकांनाही हा फोटो पुरुन उरेल हा विश्वास होता. सर्व विजेत्यांचे अन स्पर्धकांचे अभिनंदन. जयंत कुलकर्णी यांना मनःपूर्वक धन्यवाद.त्यांच्या विश्लेषणाची प्रतीक्षा आहे.

अभिनंदन !! चान्गला विषय आणि सुन्दर सहभाग...

सर्व विजेत्यांचे अभिनंदन ... तो धागा मी मध्ये विसरलोच होतो .. स्पा चा फोटो येथेच पाहिला काय मस्त फोटो आहे ना .. मला सर्वात आवडला आणि तो तुंग जवळचा फोटो पण मस्त.. सेम फोटो माझ्याकडे आहे.. थोड्याश्या वेगळ्या अँगल ने.. जयंत सरांना धन्यवाद

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि जयंतकाकांचे विशेष आभार.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन! सर्वसाक्षी यांनी दिलेला फोटो मलाही खूप आवडला होता. मोहनराव, अभिदेश आणि स्पा यांचेही फोटो खूप छान होते. मूळ धागा पुन्हा वाचत आहे, विशेषतः इतर सर्व चित्रांना जयंत कुलकर्णी यांनी दिलेल्या प्रतिक्रिया!