✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य
Main navigation
• मुख्य पान
• पाककृती
• कविता
• भटकंती
• नवीन लेखन
चला जुजबी एचटीएमएल शिकुया
श
श्रीरंग_जोशी यांनी
Wed, 05/27/2015 - 06:23  ·  लेख
लेख
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
नमस्कार मंडळी, बऱ्याच वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये असताना मी एचटीएमएल शिकलो. कामाच्या ठिकाणी कधी याचा उपयोग करावा लागला नसला तरी मिपावर याचा थोडाफार उपयोग लेख व प्रतिसाद प्रकाशित करताना करत असतो. मिपाचा टेक्स्ट इडिटींग टूलबार आपल्याला बरेच पर्याय उपलब्ध करून देतो. तसेच त्यातले कुठलेही बटन क्लिक केल्यास संबंधीत फॉरमॅटींगसाठी वापरले जाणारे एचटीएमएल कोड आपल्याला दिसू शकते. या कोडमध्ये काही किंचितसे बदल केल्यास आपण आपल्या लेखाच्या व प्रतिसादाच्या सादरीकरणाला अधिक आकर्षक बनवू शकतो. त्याखेरीज काही साधे एचटीएमएल कोड वापरून आपण मजकुराला अधिक फॉरमॅट करू शकतो जे या टेक्स्ट एडिटर टूलबारच्या मदतीने करणे शक्य नाही.
फॉन्ट साइझ व फॉन्ट कलर हे अक्षर निळ्या रंगात आहे. यासाठी खालील एचटीएमएल कोडचा वापर केला आहे. हे अक्षर निळ्या रंगात आहे.
हा फॉन्ट साइझ ७ आहे. हा फॉन्ट साइझ १ आहे. यासाठी खालील एचटीएमएल कोडचा वापर केला आहे. हा फॉन्ट साइझ ७ आहे.  हा फॉन्ट साइझ १ आहे.
अनऑर्डर्ड लिस्टची बुलेटींग स्टाइल बदलणे
• नवे लेखन
• माझे लेखन
• वाचनखुणा
यासाठी वापरलेले कोड खालीलप्रमाणे
नवे लेखन
माझे लेखन
वाचनखुणा
• नवे लेखन
• माझे लेखन
• वाचनखुणा
यासाठी वापरलेले कोड खालीलप्रमाणे
नवे लेखन
माझे लेखन
वाचनखुणा
अलाइनमेंटची दिशा बदलणे लेफ्ट अलाइनमेंट
सेन्टर अलाइनमेंट
राइट अलाइनमेंट
यासाठी वापरलेले कोड खालीलप्रमाणे लेफ्ट अलाइनमेंट
सेन्टर अलाइनमेंट
राइट अलाइनमेंट
ही सर्व एचटीएमएलच्या मूलभूत वापराची उदाहरणे आहेत. यापासून सुरुवात करून तुम्ही स्वतःच पुढे शिकू शकता. इतर कशापेक्षाही एचटीएमएल शिकणे सोपे आहे कारण कुठल्याही वेबपेजचे एचटीएमएल कोड आपण ब्राउझरचा View source पर्याय वापरून बघू शकतो. याखेरीज एचटीएमएल शिकण्यासाठी मला सर्वाधिक आवडणारी वेबसाइट म्हणजे w3schools.com. एचटीएमएलचे प्रयोग करताना तुम्ही पूर्वपरिक्षणाद्वारे खात्री करू शकता की तुम्हाला हवा तो इफेक्ट मिळतोय की नाही. मिपावर लेख व मूळ प्रतिसादात चित्राची कमाल रुंदी ६४० असू द्या. उप-प्रतिसाद असल्यास ६४० पेक्षाही कमी ठेवा. असे न केल्यास ते चित्र उजवीकडच्या दुव्यांवर अतिक्रमण करते. या धाग्यात मी सुचवलेले पर्याय वापरून तुम्ही स्पेशल इफेक्ट असलेल्या प्रतिक्रिया देऊ शकता. त्याखेरीज स्वतः वेगळे काहीतरी करून बघू शकता. हे करताना काही प्रश्न असल्यास कृपया प्रतिक्रियेद्वारे विचारा. आपण सगळे मिळून मिपावरचे सादरीकरण अधिक आकर्षक व शिस्तबद्ध करूया.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
प्रतिक्रिया द्या
74180 वाचन
💬 प्रतिसाद (104)
प्रतिक्रिया
खिक्क
टवाळ कार्टा
Wed, 05/27/2015 - 14:56 नवीन
खिक्क
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
लै भारी
मोहनराव
Wed, 05/27/2015 - 16:38 नवीन
लै भारी
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
कपिलमुनी
Wed, 05/27/2015 - 15:02 नवीन
Image removed.
• Log in or register to post comments
त्ये बाळ रिवर्स का मारतय..
टवाळ कार्टा
Wed, 05/27/2015 - 15:13 नवीन
त्ये बाळ रिवर्स का मारतय...मिरर करून वळव त्याला :)
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ते भावी फुटबॉलपटू असेल.......
जयंत कुलकर्णी
Wed, 05/27/2015 - 16:30 नवीन
ते भावी फुटबॉलपटू असेल........
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
बॅकला खेळणारं
जयंत कुलकर्णी
Wed, 05/27/2015 - 16:30 नवीन
बॅकला खेळणारं
• Log in or register to post comments
अरे वा !!
नीलमोहर
Wed, 05/27/2015 - 16:38 नवीन
आठवणी ताज्या झाल्या !! ते html, flash कोडिंग वगैरे खूप किचकट वाटलं म्हणून जास्त पाठपुरावा केला नाही. वेबचा कोर्स करतांना html झालं होतं पण पुढे जॉब ग्राफिक्स मध्येच केले आणि वेब मध्ये काही करायचं राहिलं ते राहिलंच. येऊ द्या अजून..
• Log in or register to post comments
ट्रायल ट्रायल. हॅल्लो चेक्क.
यसवायजी
Wed, 05/27/2015 - 16:52 नवीन
ट्रायल ट्रायल. हॅल्लो चेक्क. १ २ ३. १ २ ३. फ्फू फ्फू फ्फू. यसवायजी यसवायजी यसवायजी
यसवायजी
यसवायजी यसवायजी यसवायजी यसवायजी य
स
वा
य
जी
Image removed.
• Log in or register to post comments
+१११ S Y G
पाटील हो
Wed, 05/27/2015 - 17:10 नवीन
पहिल्याच चेंडूवर चौकार ___A ___
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 05/27/2015 - 17:27 नवीन
_/\_ पायाचा फोटो पाठवं. आणि कुरियरनी तीर्थ दिलस तरी चालेलं.
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
+१
पॉइंट ब्लँक
Wed, 05/27/2015 - 17:36 नवीन
+१
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
एकदम सोपं करून सांगितलं आहे.
पॉइंट ब्लँक
Wed, 05/27/2015 - 17:37 नवीन
एकदम सोपं करून सांगितलं आहे.
• Log in or register to post comments
एचटीएमेलच्या नावाने चांगभलं…
विनीत संखे
Wed, 05/27/2015 - 17:56 नवीन
एचटीएमेलच्या नावाने चांगभलं… पण प्रतिक्रियाकर्त्यांनी आई बहिण करून टाकलीये ….
• Log in or register to post comments
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद
श्रीरंग_जोशी
Wed, 05/27/2015 - 19:18 नवीन
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद. बरेच प्रतिसाद वाचून समाधान लाभले. प्रतिसादांमध्ये उपस्थित झालेल्या मुद्द्यांवर सवडीने लिहितो. marquee चा उल्लेख जाणूनच टाळला होता. १६ वर्षांपूर्वी जेव्हा प्रथमच एचटीएमएल शिकलो होतो तेव्हा प्रत्येक पेजवर किमान एक marquee वापरायचो. पण शिक्षकांनी समजावून सांगितलं की त्याच्या वापरात गंमत वाटत असली तरी त्यामुळे वाचकांचे लक्ष विचलीत होते अन एवढेच नव्हे तर आजूबाजूला असणार्‍यांचेही लक्ष एखाद्याच्या ब्राउझिंगकडे वेधले जाते. आज जालावरही marquee चा वापर क्वचितच आढळतो. मिपावरही marquee चा वापर टाळावा ही सर्वांना विनंती. बरेच मिपाकर अन मिपावाचक हापिसातून मिपा उघडतात. त्यांची उगाचच गैरसोय होऊ शकते.
• Log in or register to post comments
मलाही एचटीएमेल शिकायची आहे.
सतिश गावडे
Wed, 05/27/2015 - 22:52 नवीन
मलाही एचटीएमेल शिकायची आहे. आता उद्यापासून यातल्या एकेक गोष्टी शिकेन म्हणतो. एखादे बिगिनरसाठीचे पुस्तक सुचवा ना.
• Log in or register to post comments
चित्राच्या बाजूस मजकूर
बहुगुणी
गुरुवार, 05/28/2015 - 01:34 नवीन
वरती कंजूस यांनी म्हंटल्याप्रमाणे चित्राच्या बाजूस मजकूर देता येणं हेही HTML code ने करता येतं. (table) (tr) (td)(img ...)(/td) (td)text(/td) (/tr) (/table) वरच्या कोडमध्ये फक्त ( आणि ) च्या जागी HTML चे कंस टाकायचे. एक उदाहरण खाली: Image removed. Birds (class Aves) are feathered, winged, two-legged, warm-blooded, egg-laying vertebrates. Birds are characterised by feathers, a beak with no teeth, the laying of hard-shelled eggs, a high metabolic rate, a four-chambered heart, and a lightweight but strong skeleton. Birds have more or less developed wings; the only known species without wings was the moa, which is generally considered to have become extinct in the 16th century. Wings are evolved forelimbs, and most bird species can fly. Flightless birds include ratites, penguins, and diverse endemic island species. Some species of birds, particularly penguins and members of the duck family, are adapted for swimming.
• Log in or register to post comments
सहमत
श्रीरंग_जोशी
गुरुवार, 05/28/2015 - 01:51 नवीन
एचटीएमएल टेबल्स हे खूपच उपयुक्त असतात. चित्रे व मजकूर एकत्रितरित्या बसवता येतो. मिपावर टेबल्सचा वापर करताना एक समस्या आहे. टेबल वापरला की मिपाच्या डिफॉल्ट स्टाइलशीटमुळे टेबलच्या जागेत पार्श्वरंग दिसतो. संपूर्ण पान पांढरे शुभ्र असताना हा पार्श्वरंग वाचकांचा रसभंग करू शकतो. तसेच टेबलची बॉर्डर शून्य करूनही ती डिफॉल्ट स्टाइलशीटमुळे घालवता येत नाही. वेबपेजेसवर प्रत्यक्षात टेबल्सचा भरपूर वापर करूनही वाचकाला जाणवणार पण नाही अशा प्रकारे टेबल्सचे अस्तित्व लपवले जात असते. सद्यपरिस्थितीमध्ये मिपावर ते शक्य नाही. माझ्या लेखमालिकेतील पहिल्या तीन भागांत मी टेबल्सचा वापर केला आहे. तसेच या प्रतिसादातही केला आहे. वर यसवायजी यांच्या प्रतिसादातही टेबल्सचा वापर आहे. एखाद्या सोप्या उपायाने टेबलसाठी असणार्‍या मिपावरील डिफॉल्ट प्रॉपर्टीज लोकली ओव्हरराईड करता आल्या असत्या तर मी जागोजाग टेबल्सचा वापर केला असता :-) . जालावर जे ही उपाय दिसले ते बरेच क्लिष्ट होते.
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
लेखातच "शेवटी जा" , "वरती
कंजूस
गुरुवार, 05/28/2015 - 07:03 नवीन
लेखातच "शेवटी जा" , "वरती/सरुवातीला जा" ,"अमुक ठिकाणी जा" यासाठी &lt a href="LINK?????" &gt इथे जा &lt/a &gt मध्ये #LINK ची योजना कशी करायची ? हे फार उपयुक्त आहे परंतू कोणी वापरलेले पाहिले नाही.
• Log in or register to post comments
id चा वापर करून
श्रीरंग_जोशी
गुरुवार, 05/28/2015 - 07:35 नवीन
त्या लेखामध्ये विविध भागांना id द्यायचे. id चे नाव # ने सुरू करायचे. नंतर दुवा देताना हे #आयडीनाम href म्हणून वापरायचे . उदा.
लेखाची सुरुवात: १ २ लेखाचा मध्य ३ लेखाचा शेवट ४
लेखाचा मध्य: १ लेखाची सुरुवात २ लेखाचा शेवट ३
लेखाचा शेव:: १ लेखाची सुरुवात २ लेखाचा मध्य
जर दुसर्‍या पेजवरच्या id चा थेट दुवा द्यायचा असल्यास दुव्याच्या कोडमध्ये त्या पेजच्या दुव्याला #आयडीनाम जोडायचे. या प्रश्नासाठी खरंच धन्यवाद. खूप उपयुक्त सोय आहे ही खासकरून लेख फार मोठा असतो तेव्हा.
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
धन्यवाद श्रीरंग.आता करून
कंजूस
गुरुवार, 05/28/2015 - 09:05 नवीन
धन्यवाद श्रीरंग.आता करून पाहतो.ही सोय पयर्यटनाचे धागे लिहितंना वापरायला हवी. ठिकाण १)काय पाहावे २)कसे जावे ३)काय मनोरंजन ४)हॅाटेल(राहाणे) ५)हॅाटेल(खाणे) ६)काय काळजी घ्यावी सुचना असे वर लिहून हव्या असलेल्या माहितीसाठी झटकन जाता आले पाहिजे. वल्लीचे लेण्यांचे धागे मोठे आहेत आणि ते सहज बदल करूही शकतील. आपण जसे पर्यटन धागे लिहून काढतो तसे इतर ठिकाणी नसते .त्यांना सुघडstructured लागतात.उदा० holidayiq dot com , virtualtourist dot com.
• Log in or register to post comments
चांगली गोष्ट आहे
श्रीरंग_जोशी
गुरुवार, 05/28/2015 - 09:11 नवीन
चांगली गोष्ट आहे. ही पद्धत मिपावर रुळल्यास वाचकांची खूपच सोय होईल. अवांतर - आपल्या मिपावर प्रत्येक प्रतिसादाला आयडी दिला जातो. अन प्रतिसादाचा दुवा पाहिला असता त्यात #आयडीनाम दिसते. http://www.misalpav.com/comment/700195#comment-700195
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
अतिशय उपयुक्त माहिती
चित्रगुप्त
गुरुवार, 05/28/2015 - 11:48 नवीन
अतिशय उपयुक्त माहिती परंतु मला याबद्दल अगदी प्राथमिक माहिती सुद्धा नसल्याने मुळात सुरुवात कशी करायची हे समजले नाही. म्हणजे समजा आत्ता टाईप करताना 'येवढा मजकूर' रंगीत करायचाय, आणी 'या मजकुराचा' आकार मोठा करायचाय, तर नेमके काय करायचे ?
• Log in or register to post comments
हे असे
श्रीरंग_जोशी
गुरुवार, 05/28/2015 - 16:29 नवीन
चित्रगुप्त यासाठी वापरलेले कोड चित्रगुप्त
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
मस्त माहिती
अभिरुप
गुरुवार, 05/28/2015 - 17:34 नवीन
मस्त माहिती
• Log in or register to post comments
अभिरुप
अभिरुप
गुरुवार, 05/28/2015 - 17:38 नवीन
अभिरुप
• Log in or register to post comments
चित्रगुप्त साहेब
चौकटराजा
गुरुवार, 05/28/2015 - 18:16 नवीन
आता तुम्हाला इथे एखादे चित्र स्पेशल कॅरॅक्टर वापरून रंगीत असे काढता येईल.
• Log in or register to post comments
रंगा ,
चौकटराजा
गुरुवार, 05/28/2015 - 18:20 नवीन
हा लेख अपुरा आहे. पंण इथल्या लोकानी एच टी एम एल शिकावी ही कल्पना फारच उपयुक्त आहे. याने मालकाना ही आनंद होईल. आठ ते दहा धड्यात शिकविल्यास सर्वानाच फायदा होईल. तर मग कर सुरूवात ..... कमल नमन कर ....
• Log in or register to post comments
अतिषय छान.
सभ्य माणुस
गुरुवार, 05/28/2015 - 20:08 नवीन
HTML बद्दल बेसिक माहिती 12 वी मध्ये अस्ताना झाली होती आणि मला programming बर्यापैकी जमत पण होते(interest पण होताच). पुढ ऐकले की इकडे स्कोप नाही.मग राहू दीले. बाकी VB, Java पण आवडीचे होतेच.
• Log in or register to post comments
उत्तम माहितीपूर्ण लेख.
सानिकास्वप्निल
Fri, 05/29/2015 - 00:27 नवीन
उत्तम माहितीपूर्ण लेख. धन्यवाद.
• Log in or register to post comments
छान माहिती..
रुपी
Fri, 05/29/2015 - 01:07 नवीन
उपयुक्त धागा!
• Log in or register to post comments
बढीया...
ज्ञानोबाचे पैजार
Fri, 05/29/2015 - 10:47 नवीन
धन्यवाद जोशीसर, फारच उपयूक्त आणि माहितीपूर्ण धागा. वाखु साठवली आहे. पैजारबुवा,
• Log in or register to post comments
फारच उपयुक्त लेख. सवड मिळताच
पिलीयन रायडर
Fri, 05/29/2015 - 12:56 नवीन
फारच उपयुक्त लेख. सवड मिळताच प्रयोग करुन बघेनच!
• Log in or register to post comments
नवीनमी आंबा खाल्ला नाही.
कंजूस
Fri, 05/29/2015 - 13:18 नवीन
नवीन मी आंबा खाल्ला नाही. =[mark]मी[/mark] आंबा खाल्ला नाही. इथे [ [ ] ] हे कंस काढून HTMLचे कंस टाकायचे.
• Log in or register to post comments
मी आंबा खाल्ला नाही. मी बाठे
डॉ सुहास म्हात्रे
Mon, 06/01/2015 - 00:14 नवीन
मी आंबा खाल्ला नाही. मी बाठे उचलणार नाही. जमलं ! :)
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
मस्त .. निवांत वाचतो हा धागा
गणेशा
Fri, 05/29/2015 - 13:33 नवीन
मस्त .. निवांत वाचतो हा धागा एकदा... खुप उशिरा पाहिला हा धागा.. आधी पाहिला पाहिजे होता
• Log in or register to post comments
आपल्याला एखाद्या प्रतिसादातील
कंजूस
Fri, 05/29/2015 - 13:37 नवीन
आपल्याला एखाद्या प्रतिसादातील काही मजकूर दाखवून त्याबद्दल लिहायचे आहे तर त्यासाठी एक तयार मसुदा (=templet) करून ठेवू शकतो.- वरच्या एकाप्रतिसादात [mark]+++[/mark]लिहिले आहे मलाही हेच म्हणायचे आहे. हे वापरताना हवा असलेला मजकूर +++च्या जागी कॅापपेस्ट करायचा.उदा० चौकटराजा यांचा केला- चौकटराजा - Thu, 28/05/2015 - 18:20 हा लेख अपुरा आहे. पंण इथल्या लोकानी एच टी एम एल शिकावी ही कल्पना फारच उपयुक्त आहे. याने मालकाना ही आनंद होईल. आठ ते दहा धड्यात शिकविल्यास सर्वानाच फायदा होईल. तर मग कर सुरूवात ..... कमल नमन कर ....मला ही हेच म्हणायचे आहे.
• Log in or register to post comments
टेम्प्लेट
श्रीरंग_जोशी
Fri, 06/05/2015 - 08:30 नवीन
एचटीएमएल कोडचे टेम्प्लेट बनवून ठेवण्याची कल्पना एकदम उपयुक्त वाटली. target = "_blank" हे जवळपास अडीच तीन वर्षांपासून माझ्या जीमेलच्या ड्राफ्ट इमेलमध्ये विराजमान आहे. ड्राफ्ट इमेल अशासाठी की हा मजकूर (ड्राफ्ट फोल्डरमध्ये) नेहमी वर राहू शकतो. मिपावर मराठीत टंकत असताना दुवे देताना केवळ कॉपी पेस्ट करणे सोपे जाते. त्या ड्राफ्ट इमेलमध्ये काही काळापासून type = "circle" अन ₹ हे पण विराजमान झाले आहेत.
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
उपयुक्त लेख
सुधांशुनूलकर
Sun, 05/31/2015 - 20:00 नवीन
धन्यवाद. अतिशय उपयुक्त लेख. मी आजच लिहिलेल्या लेखात काही गोष्टींचा वापर केला आहे. थोडा अभ्यासही सुरू केला आहे.
• Log in or register to post comments
रंगाशेठ वर वापरलेले सर्व
प्रमोद देर्देकर
Tue, 06/02/2015 - 16:59 नवीन
रंगाशेठ वर वापरलेले सर्व प्रकारा व्यतिरिक्त अजुन एक ऑनमाउसओव्हर आणि ऑनमाउसआउट हे दोन प्रकार मला मिपावर अजुन वापरता आलेले नाहियेत की ज्यामुळे लेखाची जागा वाचेल. सं.पं.ना यासाठी विचारणा केली होती पण काही एचटीएमएल पॉलोसी धोरणा वगैरे कारणामुळे करु शकत नाही असे कळले.
• Log in or register to post comments
ऑनमाउसओव्हर
श्रीरंग_जोशी
गुरुवार, 06/04/2015 - 06:07 नवीन
या प्रश्नासाठी धन्यवाद. मिपाच्या डीफॉल्ट सिएसएसमुळे आपल्याला असे इफेक्ट्स मिळवणे तांत्रिकदॄष्ट्या शक्य होणार नाही.
ज्यामुळे लेखाची जागा वाचेल.
हे इफेक्ट्स देऊन लेखाची जागा कशी वाचेल याबाबत कुतूहल आहे. एकाच जागेत दोन चित्रे दाखवता येतील हा माझा एक अंदाज. बादवे मिपाच्या हेडरमधील दुव्यांवर ऑनमाउसओव्हर आणि ऑनमाउसआउटवर फॉन्टकलर बदलाचे इफेक्ट्स दिसत आहेत. अर्थात ते सिएसएसद्वारे नियंत्रित केलेले दिसत आहे.
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
अहो रंगाशेठ जर मुळ चित्र समजा
प्रमोद देर्देकर
Fri, 06/05/2015 - 08:47 नवीन
अहो रंगाशेठ जर मुळ चित्र समजा ५०*५० अशा आकारात दिले ऑनमाऊसओवर ने ५००*५०० होवुन जाईल म्हणजे ज्याला पाहिजे तो ते मोठे करुन पाहु शकतो. आणि ऑनमाऊस ऑऊटने पुन्हा पहिल्या आकारात येईल. ज्यामुळे लेखाची जागा नाही का वाचली.
• Log in or register to post comments
कल्पक आहे क्लृप्ती
श्रीरंग_जोशी
Fri, 06/05/2015 - 08:54 नवीन
आता आलं लक्षात. अ‍ॅमेझॉनवर हा प्रकार पाहिला आहे. सध्या तरी याला सहज जमणारा पण तेवढाही उपयुक्त नसणारा पर्याय म्हणजे चित्र लहान आकारात दाखवायचे अन त्यावर त्याच चित्राचा दुवा द्यायचा ज्यावर वाचाकांनी क्लिक केल्यास चित्र नव्या टॅबमध्ये मूळ आकारमानात उघडेल. वर लेखातले चित्राचे क्र. ३ चे उदाहरण याच प्रकाराचे आहे.
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
target = "_blank"
श्रीरंग_जोशी
Sat, 06/06/2015 - 20:29 नवीन
वर लेखात target = "_blank" विषयी फारच थोडक्यात लिहिल्यामुळे त्याची उपयुक्तता नेमकेपणाने बर्‍याच वाचकांपर्यंत पोचली नाही असे दिसत आहे. फायदा असा की दुवा नव्या टॅबमध्ये आपोआप उघडतो. सध्याच्या टॅबमधले पेज तसेच राहते. संगणकावरून मिपावर येणार्‍यांना दुव्यावर राइट क्लिक करून ओपन लिंक इन अ न्यु टॅब हा पर्याय असतो. टचस्क्रीन डिव्हायसेसवरून मिपावर येणार्‍यांना हा पर्याय सहजपणे उपलब्ध असण्याची शक्यता कमी असते. उदा टंकलेखन साहाय्य यावर केवळ नेहमीसारखा दुवा दिल्यास टंकलेखन साहाय्य ते पान सध्याच्या टॅबवर उघडले जाईल अन सध्याचा धागा बदलला जाईल. संगणकावरून मिपावर येणार्‍यांना दुव्यावर राइट क्लिक करून ओपन लिंक इन अ न्यु टॅब हा पर्याय असतो. टचस्क्रीन डिव्हायसेसवरून मिपावर येणार्‍यांना हा पर्याय सहजपणे उपलब्ध असण्याची शक्यता कमी असते. त्याऐवजी टंकलेखन साहाय्य दुव्याच्या कोडमध्ये वरीलप्रमाणे target = "_blank" जोडल्यास दुव्याचे पान नव्या टॅबमध्ये उघडेल. ही पद्धत फेसबुकवर युझर्सनी शेअर केलेल्या दुव्यांसाठी व जीमेलसारख्या इमेल सुविधांमध्ये इमेलच्या मजकुरातील दुव्यांसाठी वापरली जाते.
• Log in or register to post comments
नवीन टॅबमध्ये दुवा उघडणे-
कंजूस
Sat, 06/06/2015 - 22:42 नवीन
नवीन टॅबमध्ये दुवा उघडणे- target=_blank द्यावे लागत नाही मोबाइलमध्ये- कारण ओपरा ब्राउजर आणि युसी ब्राएजर तुम्हाला नवीन टॅबमध्ये(foreground अथवा background मध्ये अथवा त्याच पेजमध्ये)पेज उघडायचा पर्याय देतात. blank न देण्याचा फायदा असा की तो दुवा पाहून झाला की backबटण दाबले की लेखातल्या मूळजागी झटकन येतो.मात्र target_blankवापरल्यास पुन्हा परत मागे येतांना लेख पुन्हा लोड होतो. ओडियो व्हिडियोसाठी हा पर्याय चांगला आहे कारण जो काही प्लेअर असेल तो सुरू होतो.(ओडियो फाइल ऐकणे अजून वाचक/श्रोते यांच्या कानी उतरले नाही ते अलाहिदा).आता e books प्रमाणे audio booksचा प्रसार वाढेल तेव्हा बघू.
• Log in or register to post comments
ओक्के
श्रीरंग_जोशी
Sun, 06/07/2015 - 03:35 नवीन
मी सुचवलेला पर्याय हा बहुतांश डिव्हाइसेसवरील डिफॉल्ट ब्राउझर्सचे बिहेविअर पाहून सुचवला आहे. आपोआप नव्या टॅबमध्ये ओपन होण्याचा फायदा असा की युझर मूळ पेजवर जिथे आहे किंवा जे काही करत आहे ते तसेच राहते अन संदर्भासाठी पाहिजे तितके वेळा दुसर्‍या टॅबमध्ये डोकावून पाहता येते. उदा. मी एखाद्या प्रतिक्रियेला उप-प्रतिक्रिया देत आहे. ती टंकता टंकता माझ्या लक्षात आले की वरच्या प्रतिक्रियेत एक दुवा आहे. तो दुवा आपोआप नव्या टॅबमध्ये उघडला गेला तर मी सध्याच्या टॅबमधली टंकनक्रिया तशीच सोडून टॅब बदलून संदर्भासाठी दुव्याच्या पेजवरची माहिती वाचू शकतो. पुन्हा टॅब बदलून मूळ प्रतिक्रिया टंकण्याचे काम करू शकतो. कधी क्लिष्ट विषय असल्यास ही क्रिया पुन्हा पुन्हा करावी लागू शकते. ज्या पेजवर प्रतिक्रिया टंकणे सुरू आहे तेथील मजकुरही स्क्रोल करून वाचला जाऊ शकतोच. कदाचित माझी ही design philosophy मी हा विषय ज्या काळात शिकलो (१५ वर्षांपूर्वी) तेव्हा मिळालेल्या मार्गदर्शनावर आधारीत आहे. कदाचित आज हे शिकणारे किंवा या विषयातले व्यावसायिक खूप वेगळ्या design philosophy चा पुरस्कार करत असावेत. बाकी फेसबुक व जीमेल बाय डिफॉल्ट 'ओपन इन अ न्यु टॅब'चा वापर करतात.
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
एक प्रश्न: आपण जेव्हा फोटो
कंजूस
Sat, 06/06/2015 - 22:51 नवीन
एक प्रश्न: आपण जेव्हा फोटो दुसरीकडे अपलोड करून img srcवगैरे लिंक देतो तशी पेपरमधल्या लिखाणाचा फोटो काढून लिंक दिल्यास त्यातील लिखाण वाचता येत नाही.scan apps,scan to pdf वगैरे अॅपस वापरून काही सुधारणा होते का?विशेषत: मराठी लिखाणात?(थोडे अवांतर आहे).
• Log in or register to post comments
फोटोतले मराठी
श्रीरंग_जोशी
Sun, 06/07/2015 - 03:54 नवीन
देवनागरी लिपीतल्या छापील मजकूराच्या फोटोमधली अक्षरे सहजपणे वाचता न येणे हे मी पण अनुभवले आहे. तुलनेत रोमन लिपीतील मजकुर वाचायला सोपा जातो. याची काही कारणे:
• वर्तमानपत्रातला मजकूर असल्यास कागदाच्या दर्जामुळे पार्श्वरंग तेवढा शुभ्र नसतो
• फोटो काढताना कॅमेरा किंवा फोन यांची सावली त्या मजकूरावर पडल्यामुळे उजेड कमी असतो
• वर्तमानपत्रातली फॉन्ट साइझ बरीच कमी असू शकते
• जवळून फोटो काढल्यामुळे कॅमेर्‍याचे थोडेसेही थरथरणे अक्षरांचा शार्पनेस कमी करते
माझ्या मते तरी मूळ फोटो अधिक काळजी घेऊन काढणेच अधिक इष्ट. स्कॅनर यंत्र वापरून फोटोपेक्षा चांगला दर्जा मिळवता येत असला तरी तो पर्याय सुटसुटीत नसतो. या संबंधीचे अ‍ॅप्स मी वापरले नसल्याने त्याविषयी काही बोलू शकत नाही. इतर कुणी अनुभवी व्यक्तिने त्याबद्दल लिहिल्यास उत्तम. अवांतर - चित्र अन लिखित मजकूर असलेले पत्रक डिझाइन करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट पब्लिशर हे एक उत्तम टूल आहे. मला हे मिपाकर अभ्याने सुचवले होते.
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
खूप छान माहीती.
अजो
Sun, 06/07/2015 - 03:06 नवीन
खूप छान माहीती.
• Log in or register to post comments
ओपन_इन _न्यु_टॅब चा उपयोग
कंजूस
Sun, 06/07/2015 - 05:14 नवीन
ओपन_इन _न्यु_टॅब चा उपयोग पटला.मल्टिटास्किंग करता येऊ शकणाय्रा फोनमध्ये सोपे आहे.----फोटो मोठा केल्यावरही अक्षरे सुस्पष्ट दिसणे हे फोकसिंग चांगले झाल्याचे लक्षण आहे. आपण मागे चर्चा केली--लेखातच वरती /शेवटी जा याचा कोड देण्याबद्दल -तर अशी किमान दोन रेडिमेड बटन्स लेखनाच्या चौकटीवर लेखकांच्या सोयीसाठी देता आली तर---------!
• Log in or register to post comments
रेडिमेड बटन्स
श्रीरंग_जोशी
Sun, 06/07/2015 - 08:33 नवीन
लेखाच्या आत नेव्हिगेट करण्यासाठी जे कोड लागते त्यासाठी रेडिमेड बटन्सची कल्पना चांगली आहे. मालकांकडे मांडून पाहूया. कुठल्या एखाद्या लेखात प्रथम वापरून बघुया. या सुविधेची उपयुक्तता मिपाकरांपर्यंत पोचली पाहीजे.
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
• 1
• 2
• 3
मिसळपाव वर स्वागत आहे.
प्रवेश करा
• नवीन खाते बनवा
• Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
• 1आम्ही कोण?
• 2Disclaimer
• 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
• 1सदस्य व्हा
• 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
• 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
• 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
• 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
• 2अभिप्राय द्या
• 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा