Skip to main content

दि. ७ जून रोजी पुण्यात होणारा कट्टा

लेखक विशाखा पाटील यांनी बुधवार, 03/06/2015 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यातल्या आगामी कट्ट्यांवर जोरदार चर्वण होऊनही घोळ काही मिटेना, म्हणून पुनश्च धागा. हा धागा फक्त दि. ७ जून, रविवार रोजी होणाऱ्या कट्ट्यासाठी आहे. ६ जूनच्या कट्ट्याचे कबाब इथे भाजू नयेत, ही नम्र विनंती. तर, ७ जूनला कट्टा करायचा हे ठरले आहे. १. आधीच्या द्वि की त्रिशतकी धाग्यात आनंदी डायनिंग हॉलचे नाव फायनल झाले आहे. तिथल्या थाळीबद्दल शंका असली तरी तेच नाव फायनल करायचे का? तिथे जवळपास भेटण्यासाठी उद्यान असेल तर उत्तम. साधारण ११ वाजता भेटून १२.३० ला जेवायला जायचे, हा एक पर्याय आहे. २. ११ वाजता पातळेश्वराला भेटून राजधानी, सुकांता, वाडेश्वर यापैकी एकाच ठिकाणी जेवायला जायचे. (पाताळेश्वर बघितले आहे की नाही, हा मुद्दा नसून ते एक भेटण्याचे ठिकाण समजावे.) हजर राहणाऱ्यांनी यातला योग्य तो पर्याय निवडावा. इथेच हजेरी होईल आणि बहुमताने कार्यक्रम फायनली फायनल होईल.

वाचने 10048
प्रतिक्रिया 58

प्रतिक्रिया

@ हजर राहणाऱ्यांनी यातला योग्य तो पर्याय निवडावा. इथेच हजेरी होईल आणि बहुमताने कार्यक्रम फायनली फायनल होईल.>> ज्जे ब्बात! याला म्हणतात कट्ट्याचे आयोजन! एका झटक्यात विषय निकाली!

पाताळेश्वर ब्येष्ट. नविन-जुने, पुणेकर-अपुणेकर सर्वांना माहीत असलेले ठिकाण. जेवणासाठी जवळपास अनेक ठिकाणे आहेत... त्यापैकी कोणतेही चालेल... अगोदर ठरवा किंवा भेटल्यावर एकमताने ठरवा, पर्वा इल्ले !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अश्या स्वरूपाचा कट्टा करण्याची बीजे इथे आहेत. सुस्पष्ट रूपरेषाr धागा गदारोळानंतरही सर्वांचे सहकार्य्-सहभागाने हाही कट्टा संस्मरणीय आणी जोषात होईल हे नक्की. नेमस्त नाखु

In reply to by बहारिन् चा खलिफा

पाताळेश्वरच्या कुंपणाबाहेर. रस्त्यावर. शेजारच्या पार्किंग लॉटमध्ये पैसे देऊन.

एवढेच प्रतिसाद हॅ.... ह्या पुणेकरांना एक काम नाय धड करवत. ! ;) ४ तारीख आली म्हटलं !

In reply to by बिपिन कार्यकर्ते

जे एम रोडवर जंगली महाराजा चे मंदिर आहे त्याच्या जवळ च पाताळेश्वर मंदिर

सात तारखेचा पाताळेश्वर आणि राजधानी नक्की समजून अस्मादिक ११ वाजता पाताळेश्वर ला हजर असतील. (पाताळेश्वर च्या मुख्य दरवाज्यापाशी एखादा वेंधळा मुलगा उभा दिसल्यास तो मीच आहे असे मिपाकरांनी ओळखावे !)

मला यायचे होते, पण नेमके मित्राचे लग्न भोर ला असल्याने, जमत नाही... तुम्ही मज्जा करा.. कट्ट्याला शुभेच्छा ..

In reply to by त्रिवेणी

तू ये णा र आ हे स का ? पा ता ळे श्व रा ला

११ वा ज ता

भे ट ल्या व र ठ र वू.

मी उद्या सांगते. दुसरा एक कार्यक्रम आधी ठरला आहे. तो रद्द करता आला तर येता येईल.

In reply to by प्रियाजी

तुमचा आयडी एका जुन्या आयडीसारखा असल्याने बर्‍याचदा घोळ होतो. (प्रियाली कशी काय मिपावर परत येईल!) :-) असो.

In reply to by त्रिवेणी

हे अ सा प्र ति सा द ने ह मी च का म्ह णे? जोक्स अपार्ट, मोबाईलवरून प्रतिसाद देत असाल(युसी, क्रोम वापरून)तर, आगिनकोल्हा वापरा त्यासाठी..

अकरा सव्वा अकराच्या दरम्यान पोहोचतोय पण कुणाचाच भ्रमणध्वनी नसल्याने गोंधळ होऊ नये इतकंच.. जमलेल्यांपैकी कुणी शक्य झालं आणि फोन केला तर बरं होईल... ९५९४४४४७५४ पाताळेश्वराहून राजधानी नक्की असं धरुन चाल्लोय.. - उपास

अरे वृत्तांत टाका रे कोणीतरी... पाहिजे तर मी फोटो टाकतो त्यावर. इतरांनीही त्यांचे फोटो टाकावेत.

In reply to by टवाळ कार्टा

अच्छा, टेंपोत... आपलं रिक्षात... सुरन्गीतैंना ही अट सागितली होती काय ?! ;)

In reply to by खटपट्या

त्याची स्पेसिफिकेशनवाली मुलगी मिळाली तर.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्म्म, एकदा डीटेलात स्पेसीफिकेशन जाणून घ्यायला आवडेल...