Skip to main content

दीपक कुवैत ह्यांच्या बरोबर होणारा १५ जून डोंबोली कट्टा

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 01/06/2015 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
दीपक ह्यांच्याबरोबर कट्टा करायची अजून एक सुवर्णसंधी. कट्टा मध्यवर्ती जागी असल्याने, परीघावरील लोकांची कुचंबणा होवू शकते.पण आता त्याला इलाज नाही. जागा ---> नंदी पॅलेस खाणे-पिणे ---> पक्षी-तीर्थ (ज्यांना पक्षी-तीर्थ नको असेल, त्यांच्या साठी वेगळी व्यवस्था करण्यात येईल.चिंता करू नये.) ठिकाण ---> संध्याकाळी ७:३० वाजता डिस्क्लेमर ======> तारीख कदाचित बदलू शकेल, पण वेळ आणि ठिकाणात बदल नाही.

वाचने 8452
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

In reply to by पिंगू

एक बार नंदी-पॅलेस कट्टा करो, फिर बार-बार आवो. (बाद्वे, मी नंदी पॅलेसचा मालक नाही आणि त्या हॉटेलची जाहीरात करायचा ठेका पण घेतलेला नाही.भरपूर मोकळी जागा, त्रास न देणारे वेटर, कितीही वेळ बसू देणारे मालक आणि बर्‍यापैकी माफक दर, ह्या चौरंगावर पक्षी-तीर्थ कट्टा मस्त साजरा होतो.)

In reply to by मुक्त विहारि

गावकुसाबाहेरची जागा, तेथे चालणार्या मोठ्या आवाजातल्या फालतू गझला, सततचे कोणाचे तरी ह्याप्पी बड्डे यामुळे नंदी लय डोक्यात जाते जेवणहि यथा तथाच आहे

In reply to by स्पा

कट्ट्यासाठी वेगळी जागा दाखवणार आहे. नेस्क्ट कट्टा, टकाच्या मार्गदशना नुसार. (आता आयत्या-वेळी "शुभेच्छा" पाठवू नकोस.)

In reply to by टवाळ कार्टा

नंदी पॅलेसला पंसंती दाखवली होती. ६-७ ता.ला पुणे कट्टा झाला की, उत्सवमुर्तींना विचारून ठिकाण बदलू. हाकानाका.

In reply to by यशोधरा

वाट्टेल ते. (त्यांच्या कडून "शुभेच्छा" घेण्यापेक्षा ठिकाण बदललेले काय वाईट?) दोस्तों के लिये कुछ भी.

आमचे आगमन डिसेंबर मध्ये होणार आहे ह्यावेळी मुलुंड ला न राहता जन्मभूमी डोंबिवलीत डेरा टाकायचा मनसुबा आहे. तेव्हा नंदी मध्ये कट्टा नक्की

In reply to by निनाद मुक्काम …

आणि त्या कट्ट्या नंतर, आमच्या घरात अजून एक कट्टा करू.

१५ ऐवजी आदल्या दिवशी रविवारी १४ तारखेला किंवा पुढच्या विकांताला कट्टा करता येणार नाही का? हापिसातुन घरी यायला रोजचे ८-८:३० होतात. त्यामुळे कट्टयाला यायला ऊशीर होईल. कट्टयाची नक्की तारिख पक्की झाली कि, जमल्यास, हापिसातुन लवकर निघुन कट्टयाला वेळेत येण्याचा प्रयत्न करेन. पण, ऊशीर झाला तरी मी या कट्टयाला नक्की येतोय! ६ आणि १३ तारखेला घरगुती कार्यक्रमात व्यस्त असल्याने पुणा कट्टयाला यायला जमणार नाही आहे.

कट्ट्याची तारीख तीच आहे.... पण ठिकाणाच्या बाबतीत थोडे मत-भेद आहेत. १. नंदी पॅलेस (डोंबिवली-कल्याण-अंबरनाथ, परीसरातील मिपाकरांसाठी उत्त), शिवाय दीपकला, कंजूस ह्यांना भेटायचे असल्याने, कंजूस ह्यांना नंदी पॅलेस, जास्त पसंत पडेल, असे वाटते.) २. टकाने सुचवलेले कळवा-ठाणे परीसरातील हॉटेल. मला कुठलेही टिकाण चालेल. मी १००% येणार आहे.

मला कळवा -मला कळवा पण चालेल.सोमवार असल्याने बाकडं पकडायला नाही लागणार बहुतेक.एखादी आणखी एक पर्यायी जागाही माहित होइल.

Updated


कट्ट्याचा एकच धागा आणि फक्त २७ प्रतिसाद ! पुणेकरांकडून शिका काहीतरी

In reply to by कपिलमुनी

पुणेकरांचे नखरे बघितले हो...पुणेकरांना कट्टा आयोजीत करता येत नै यावर शिकामोर्तब झाले आहे

In reply to by टवाळ कार्टा

पुणेकरांना कट्टा आयोजीत करता येत नै
आयोजक आपण होतात टक्कोजीपंत!! पुणेकर फक्त ठिकाणं सुचवण्यापुरते होते, आपणांस पोच नाही त्यास कोण काय करील. =))

In reply to by सूड

मी "ठिकाण पुणकरांनीच सुचवावे" असे धाग्यातच लिहिले होते...इतकी साधी गोष्ट जमत नै पुणेकरांना

In reply to by टवाळ कार्टा


मयखाने से शराब से साकि से जाम से, अपनी तो जिंदगी शुरु होति है शाम से.. मजा करा. कट्ट्याला शुभेच्छा.

नुकत्याच झालेल्या दिवान-ए-व्हत्सप्प मधल्या गुप्त मसलतींमध्ये "अमित गार्डन, कळवा (पारसिक नगर)" हे १५ जूनच्या कट्ट्याचे ठिकाण ठरले आहे ठिकाण https://www.zomato.com/mumbai/hotel-amit-garden-kalwa ठिकाणाचा नकाशा https://www.google.co.in/maps/place/Amit+Garden/@19.210835,73.015705,15… वेळ संध्याकाळी ६:३० च्या नंतर (मी रविवारी सकाळी त्यांना फोन करून संध्याकाळसाठी "मिसळपाव कट्टा" या नावाने ७-१० जणांसाठी टेबल आरक्षीत करून ठेवेन) आतापर्यंत नक्की झालेले मिपाकर मुवि पनीर शेख मी कंजूस खटपट्या मामलेदारचा पंखा प्रमोद देर्देकर उर्फ सनई चौघडा

In reply to by टवाळ कार्टा

वरच्या यादीत आणखी अ‍ॅडवलेली नावे पिंगू सतीश कुडतरकर

""संध्याकाळी ६:३० च्या नंतर (मी रविवारी सकाळी त्यांना फोन करून संध्याकाळसाठी "मिसळपाव कट्टा" या नावाने ७-१० जणांसाठी टेबल आरक्षीत करून ठेवेन)""-सोमवार संध्याकाळ ना?

In reply to by कंजूस

आय माय स्वारी बर्का...सगळे कट्टे शन्वार आणि रैवारीच होतात म्हणून सवयीने तसे लिल्हे गेले

अरे, ठिकाण बदलण्यात आले आहे. माफ करा! चार दिवस उनाडक्या करून आजच सकाळी आलोय. डोंबलात असते तर अर्ध्याएक तासासाठी MANAGE केले असते.