मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रंगवलेल्या भिंती !

माझीच मी · · मिपा कलादालन
Hello मिसळपाव….! I Started off as a kid with a head full of ideas, drama and imaginations and what not… लहानपणापासुनच मी माझे old wardrobe, school-bag, fish tanks, rather dresses पण colors , glitters , lace , stickers वापरून थोड हटके look द्यायला try करायचे …. आणी अजूनही करतेय … सो, गूगल वर धडपडताना मी इथे मिसळपाववर आले........almost more than १० months झाले …इतके दिवस फक्त वाचत होते…. आणि मीच नाही तर माझी आई हि मिसळपाव ची fan झालीये... तिच्या tab वर app टाकून दिलाय…enjoy करतेय ती …Thanks to MIPA !! back to topic …इथले सगळेच जण आपापल्या विभागात experts आहेत …now even I am feeling like to show off :)सगळ्यात पहिले मी केलेले wall paintings इथे share करतेय .. …. १) हे आईच्या घरी केलल माझं पहिल wall painting ! 7 २)संगीत प्रेमी असलेल्या माझ्या नवर्यासाठी केलेलं हे ... 1 ३) अजुन एक 3 ४) हा lamp post 4 ५) हे माझ्या मुलासाठी केलेलं 5 ६) थोडं romantic feeling वाल … 6 तळ टीप : मला माहितीये माझ्या painting पेक्षा जास्त comments मला माझ्या मिंग्लिश साठी येणारेत …. पण लिहायचं खूळ डोक्यात घेतल्यावर perfect मराठी typing साठी time spend नाही केला मी … next time better मराठी लिहिणारेय मी …पक्का प्रॉमिस :)

वाचने 9116 वाचनखूण प्रतिक्रिया 75

एस Fri, 05/29/2015 - 22:39
तुमचा टीव्ही फार छान आहे. किती इंची आहे? :-)

मिसळपाववर स्वागत !! कलादालनात लेखन केले असल्याने शब्दांकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे । कला अप्रतिम आहे । एकच नंबर ! :) ह्यावर विषयावर अजुन लेखन अजुन भित्तीचित्रे अपेक्षित आहेत! पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत

श्रीरंग_जोशी Fri, 05/29/2015 - 22:50
भित्तीचित्रे आवडली. कल्पकता अन रसिकता भरली आहे त्यांच्यामध्ये. अस्मादिकात कुठलीच कला नसल्याने अशा गोष्टी मनातच राहून जातात ;-) .

रुपी Fri, 05/29/2015 - 23:06
कला तर छान आहेच, पण दॄष्टी/ कल्पकता आणखी महत्त्वाची. मला इतरांची सजवलेली घरे, त्यातली कल्पकता आवडते, पण तसं काही स्वतःच्या घरी करायला सुचत नाही. त्यातल्या त्यात शोभेच्या वस्तू हलवता तरी येतात, पण रंग वगैरे अशा सहजासहजी न सुधारता येण्यासारख्या गोष्टी करायला मन धजावत नाही.

In reply to by स्पंदना

माझीच मी Sat, 05/30/2015 - 10:07
अक्षर चांगल आहे हो ...पण व्याकरण आणि sentence ची वाट लागते. खूप दिवस झाले मिपा वाचतेय, पण लिहिण्याच daring नव्हतं … आता may be सुधारेल हळू हळू :)

नाखु Sat, 05/30/2015 - 09:09
१ नंबरचे चित्र छान आहे. गणपतीला सजावट म्हणून चार वर्षांमागे अशीच "वारली" चित्रकलेची हौस भागवून घेतली होती त्याची याद आली. वारली चित्र जिवंत असल्यास (फोटो) डकविण्याचा प्रयत्म करू. घरसंसारी नाखु.

स्पा Sat, 05/30/2015 - 10:03
ज ह ब रा ट मस्तच आहेत. ्तुम्ही कुठले कलर वापरता,? हे वाॅशेबल असतं का? तुम्ही याची फ्रिलांस कामे घेता का?

रंगवलेल्या भिंती असे वाचल्यावर वेगळ्याच अपेक्षेने हा धागा उघडला होता. पण हे काहीतरी भलतेच निघाले. रच्याकने फिश टँक असा कोपर्‍यात का ठेवला आहे? पैजारबुवा,

माझीच मी Sat, 05/30/2015 - 10:13
:) हे मी fabric painting चे colors वापरलेत....नाही रे बाबा, फ्रिलांस कामे वैगरे काहीनाही ...हे घरच्या घरी केलेले उद्योग आहेत … माझी दोन घर सोडून २-३ मित्रांच्या भिंती रंगवल्यायेत .

विवेकपटाईत Sat, 05/30/2015 - 20:06
रंगविलेल्या भीती आवडल्या. माझी मुले लहान होती तेंव्हा त्यांनी रंगविलेल्या भीती मला 'फिदा हुसैन' च्या पेंटिंग्ज पेक्षा जास्त आवडायच्या. बाकी भाषा एका नदी सारखी असते आणि नदीत कित्येक प्रकारचे जल प्रवाह येऊन मिळतात. कुणाची पर्वा करू नका, मनाला येईल तसे लिहा. हे मिपाव आहे, अर्थात भाषेची मिसळ इथे स्वादिष्टच लागते.

In reply to by विवेकपटाईत

माझीच मी Mon, 06/01/2015 - 09:44
हो ना ! माझा लेक स्वर … त्यानेही फ्री hand start केलय भिंतींवर …आणि trust me ते मला माझ्या paintings पेक्षा जास्त आवडते !

प्यारे१ Sat, 05/30/2015 - 20:37
paintings छान आहेत. एकदम black रंगाऐवजी you should try military bottle green or navy blue or brown with little shades. त्याचा effect वेगळा आणि positive असतो. चित्रगुप्त swaps वगैरे लोक्स will tell better.

गुलाम Mon, 06/01/2015 - 12:09
भित्तिचित्रे खरंच खुप सुंदर आहेत. दोन नंबर्चे चित्र तर अग्दी अप्रतिम. माझ्या पत्नीनेही असेच काही चित्रे घरी काढ्ले आहेत. टाकण्याचा मोह आवरला नाही.. pic1 pic2 (डिझाईन्स जालावरुन साभार!!!)

In reply to by गुलाम

एस Mon, 06/01/2015 - 15:49
खूपच नेत्रसुखद आहे. पहिल्या चित्रातील नक्षीचा डौलदारपणा आणि अवकाशाचे भान सुंदर जपले आहे. काळ्या आणि लाल रंगांची जुगलबंदीही लक्षवेधक आहे. वहिनींनाही मिपाचे सदस्यत्त्व घेण्याचे आमंत्रण द्या आणि त्यांची अजून चित्रे इत्यादी मिपावर टाकायला लावा. पहायला आवडतील.

In reply to by गुलाम

व्वा व्वा व्वा व्वा व्वा व्वा!!!! क्लासिक रे गुलामा क्लासिक! काय कल्पना आहे त्या स्वीच बोर्ड चित्राची!