मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खंत

पद्मश्री चित्रे · · दिवाळी अंक
मैफिली सजल्या तुझ्या पण मी तिथे वळलोच नाही चांदणे खुणवीत होते चंद्र मी झालोच नाही वेदना त्या जीवघेण्या क्षीण ना कण्हलो कधी वार तू केले जिव्हारी मी तरी हरलोच नाही भोवताली गाव सारे मी तरीही एकटा तुटलो तुजसाठी असा की मी पुन्हा वसलोच नाही सागराच्या मी किनारी दूर तू क्षितिजाकडे हरवूनी बसलो तुला अन मी मला दिसलोच नाही उध्वस्त मी झालो तरीही दु:ख ना त्याचे मला खंत ही की मी तुला किंचितही कळलोच नाही
दिवाळी अंक वर्ष

वाचने 7614 वाचनखूण प्रतिक्रिया 18

मुक्त विहारि Sat, 11/02/2013 - 09:17
"उध्वस्त मी झालो तरीही दु:ख ना त्याचे मला खंत ही की मी तुला किंचितही कळलोच नाही" हे तर निव्वळ अप्रतिम...

In reply to by उत्खनक

बहुगुणी Sat, 05/30/2015 - 02:08
बरेच वाचायचे राहून गेलेले चांगले लेख/ कविता वरती येताहेत, धन्यवाद! ही कविताही आवडली. अवांतरः 'पद्मश्री चित्रे' म्हणजेच 'फुलवा' हे आताच कळतंय. तसं असेल तर 'फुलवा' यांच्या कविता आधीही आवडल्या होत्या.