खंत
मैफिली सजल्या तुझ्या पण
मी तिथे वळलोच नाही
चांदणे खुणवीत होते
चंद्र मी झालोच नाही
वेदना त्या जीवघेण्या
क्षीण ना कण्हलो कधी
वार तू केले जिव्हारी
मी तरी हरलोच नाही
भोवताली गाव सारे
मी तरीही एकटा
तुटलो तुजसाठी असा की
मी पुन्हा वसलोच नाही
सागराच्या मी किनारी
दूर तू क्षितिजाकडे
हरवूनी बसलो तुला अन
मी मला दिसलोच नाही
उध्वस्त मी झालो तरीही
दु:ख ना त्याचे मला
खंत ही की मी तुला
किंचितही कळलोच नाही
दिवाळी अंक वर्ष
वाचने
7614
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
__/\__!!
केवळ सुंदर ! बस !!
अप्रतिम सुंदर!
मस्त...
मनाला भिडणारी कविता.
टोपी काढलेली आहे. सलाम.
थोड्या शब्दांत इतके थेट
फारच सुंदर रचना. आवडली.
अरे वा!
उत्कृष्ट रचना .... फार आवडली.
___/\___!!
In reply to ___/\___!! by स्पंदना
आमचापण
मस्त सुंदर कविता.
अप्रतिम कविता.......
सुरेख!
उ त्क ट ...!
In reply to उ त्क ट ...! by उत्खनक
या उत्खनकाचे आभारच मानायला हवेत!
सुर्रेखच.