Skip to main content

कारसाठी अ‍ॅक्सेसरीज कोणत्या घ्याव्यात?

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 28/05/2015 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
कारसाठी अ‍ॅक्सेसरीज कोणत्या घ्याव्यात? नुकतीच एक सेकंडहँड Wagon-R Lxi कार विकत घेतली आहे...माझी पहिलीच कार :) त्यामुळे शिकणे सुरु आहे. कार घेतल्यानंतर नातेवाईकांनी + मित्रांनी बरेच सल्ले दिले...त्यातले बरेचसे कार अ‍ॅक्सेसरीजसाठी होते. कोणी म्हणाले बंपर प्रोटेक्टर लाव...तर कोणी म्हणाले लॅमिनेशन करून घे...कोणी म्हणाले फॉग लँप लाव, कारच्या बॅटरीवर चालणारा व्हॅक्युम क्लीनर घे,...ई. मी स्वत: www.amezon.in (Amezon fulfilled only) वर बर्याच अ‍ॅक्सेसरीज बघीतल्या आहेत आणि त्यातल्या काही घ्याव्याश्या वाटल्या त्या इथे लिहित आहे. बर्याच मिपाकरांकडे स्वत:च्या कार असल्याने तुमचे मत कळवावे अशी विनंती... डॉ.खरेंनी आधीच whatsapp वर बरेच उपयोगी सल्ले दिले आहेत त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार :) कार कव्हर http://www.amazon.in/Dios-Body-Cover-Maruti-Estilo/dp/B00SVCTTBA/ref=sr… फुट मॅट http://www.amazon.in/Vheelocity-73911-Premium-Rubber-Maruti/dp/B00QIS25… सन शेड http://www.amazon.in/Raaisin-Car-sunshade-Set-4/dp/B00J2SV532/ref=sr_1_… ऑटोमॅटिक टायर इंफ्लेटर http://www.amazon.in/Coido-Electric-Inflator-Compressor-Tyres/dp/B00K7B… किंवा मॅन्युअल टायर इंफ्लेटर http://www.amazon.in/Heavy-Compressor-Cylinder-Cycles-vehicles/dp/B00KQ… रॅट गार्ड http://www.amazon.in/Release-On-Rat-Guard-400-g/dp/B00U0ZTIV2/ref=sr_1_…

वाचने 41747
प्रतिक्रिया 115

प्रतिक्रिया

हाफशेंच्युरी निमीत्त श्री.टवाळ कार्टा यांचा सत्कार तिन हिरव्या मिरच्या ,दोन लिंबु आणी एक बिब्बा देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम बाइक कार्यकर्ते.

मामोऑ- नै मी काय म्हणते. अ‍ॅक्सेसरीजवर एवढे पैसे उडवण्यापेक्षा आधी ड्रायव्हर लायसन काढ हो टका. आणि गाडीही शिकुन घे हो चिमणकडुन. ;) मामोऑ

शीडी Rear View Mirror ला टान्गुन घ्या ! झालेच तर "हीच माझी BMW / Mercedes / [आपला लाडका Brand ] असे रेडीयम स्टीकर लावून घ्या!

१. पाठीमागे "बग्तुस काय रागानं, वरटेक केलंया वागानं" असं लिवा. २. नंबरप्लेटला घड्याळ किंवा कमळ चिक्टवा (हाताची व्हॅल्यू घसरलेली आहे). ३. काळ्या किट्ट सन फिल्म लावा. त्यावर दोन पैलवान लढतायतचा स्टिकर आणि "पैलवान" लिहिलेला स्टीकर लावा. ४. पुढे बंपरच्या पुढे "उपसरपंच - मुणगे बुद्रूक" असा काहितरी अर्ध वर्तुळाकार लिहिलेला बोर्ड (फक्त पितळेचा) लावा. त्याला हार पण घाला. ५. एक किलोमीटर अंतरावर ऐकू येणारे दोन स्पीकर बसवा. शिवाय तमाशा गाण्यांची एक आणि ढाकचिक ढाकचिक वाली एक अशा दोन सीडी खरेदी करा.

In reply to by टवाळ कार्टा

आमच्या गाडीला असलं बसवता येत नाही. उगीच काही लोक भारतात त्या मेक्सिकन हॅट घालून फिरतात तसं वाटेल. पण साधारण पणे सगळ्या महिंद्राच्य गाड्यांना, सुमो, इंडिका, व्हिस्टा, पजेरो, एंडेव्हर, क्वालीस आदी गाड्यांना आणि आल्टो व सॅन्ट्रो ला हे सगळं चालेल. वॅगन आर, आय टेन, आय ट्वेन्टी, पोलो आदी गाड्यांना नाही चालणार विचित्र वाटेल.

In reply to by काळा पहाड

हे म्हैत न्हव्हते...मला वाटायचे आत बसणार्याच्या मर्जीमुळे गाडीला बाहेरना असे सगळे लावावे लागते

In reply to by टवाळ कार्टा

त्यांना गावगुंड आणि गुंठामंत्र्यांच्या आवडीनिवडीविषयी बोलायचय रे. सर ब्लॅकमाउंटन त्याला असलं काही झेपत नाही.

सर्वप्रथम ट्का यांचे गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन, वर वेल्लाभट यांनी फ्लोअर लॅमीनेशन करुन घ्यायला सांगीतले आहे. ते करताना जास्त सुळ्सुळीत मटेरीअल वापरु नका. कारण त्यावरुन पाय्/मॅट घसरते आणी कालांतराने ते लॅमीनेशन फाटते. आणी मग लॅमीनेशनच्या आतमधे गेलेली माती काढताना खूप त्रास होतो. मी एक मोठे पाय पुसणे स्क्वेअर फुटाच्या भावाने खरेदी करुन ते हव्या त्या आकारात कापुन त्याचा मॅट म्हणून वापर करतोय.. खूप स्वच्छ वाटते.

टका यांचे गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन... बर्‍याच जणांनी सल्ले दिले आहेत त्यामुळे मी वेगळा सल्ला काय देणार..? रिवर्स सेन्सर आणि कॅमेरा, मोबाईल स्टॅड आणि चार्जर ह्याच मला उपयोगी पडलेल्या अ‍ॅक्सेसरीज आहेत. मी left blind spot mirror पण वापरतो. पण याचा उपयोग wagan-R ला होणार नाही कारण tall boy design असल्याने डाव्या बाजूला ब्लाईंड स्पॉट तुम्हाला जाणवत नसावा. बाकी कबूतरांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणी अ‍ॅक्सेसरीज सुचवाल काय? एक धागा ह्यावर काढावा म्हणतो.

In reply to by योगी९००

बाकी कबूतरांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणी अ‍ॅक्सेसरीज सुचवाल काय? एक धागा ह्यावर काढावा म्हणतो.
गाडी झाडाखाली पार्क करु नये. कारण बाकीचा कचरा साफ करता येतो पण कावळे,कबुतर आणि इतर पक्षांनी केलेली घाण साफ करताना खूप त्रास होतो. निघता निघत नाहीत ते डाग.

In reply to by खटपट्या

गाडी झाडाखाली पार्क करु नये.
हा एकच उपाय आहे...माझी कार मोकळ्या जागेत आहे...ती स्वच्छ असते पण बाईक मात्र रंगून गेलेली असते

In reply to by खटपट्या

गाडी झाडाखाली पार्क करु नये दुसरी जागाच नाही हो...सोसायटीत तिच जागा आहे..!! ज्यांच्या गाड्या झाडाखाली नाहीत त्यांवर देखील थोड्याफार प्रमाणात रंगरंगोटी केलेली असते. कव्हर टाकून उपयोग नाही कारण कव्हर टाकले तर गाडी वाचेल पण कव्हर खराब होईल. आणि कव्हर टाकले तर उंदीर आतमध्ये जाण्याची शक्यता वाढते. कबुतरांना घाबरवायला एखादे बुजगावणे चालेल काय?

In reply to by टवाळ कार्टा

हाच विचार मनात आला होता. गाडीच्या टपावर बुजगावण्याचे चित्र काढू शकतो. :) पण जे पक्षी झाडावर बसुन हवाई हल्ला करतात, त्यांना प्रतिबंध करणे निव्वळ अशक्य आहे. असेही कबुतरांचा त्रास दीवसेंदीवस वाढत चालला आहे. कबुतरांना दाणे टाकल्यामुळे पुण्य मिळते अशी गुजराती लोकांची अंधश्रध्दा आहे. खिडकी उघडी ठेवु शकत नाही एवढा त्रास आहे.

In reply to by खटपट्या

माझ्या सोसायटीमध्येच भरपूर (घरटी १ कबुतराचे जोडपे) झाली आहेत....झाडांच्या कुंडीत आत्तापर्यंत कबुतरांची २-३ बाळंतपणे झाली आहेत...एकदा कबुतराचे अंडे दिसले की ते फेकून देववत नै म्हणून मग कैच नै कर्ता येत

व्ह्याकुम क्लियर ऐवजी प्रेशर ने हवा मारता यॆईल ज्यामुळे गाडीतील धुळ काढता येईल असं एसी व्होल्टवर असलेलं मशीन मिळतं का ?? आणि कोणतं चांगलं ??? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रेशर ने हवा मारली तर ती पसरायचा धोका जास्त असेल...त्यापेक्षा व्ह्याकुम क्लिनर बरा..

या "लाडी गाडी"ने शंभर पार केल्या बद्दल एक आत लटकवायची बाहुली,एक झेंडा,"येतीस का जाऊ" हा स्टीकर आणि एक चांगला डस्टर कपडा देऊन सत्कार करण्यात येत आहे. सत्कारार्थी जेपी आणि मित्रपरीवार. स्वगत :जेप्या माझ्या गळ्यात ही जबाबदारी टाकून कुठे गेलाय ते कळेना आणि चिमण त्याला बोल्वायला जातो सांगून दोन दिवस गायब आहे

टक्याचे अभिनंदन व पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा. अनेक प्रतिसाद माहितीपूर्ण अन रोचक आहेत.

तर मिनी फ्रिज घ्या. १२ वोल्ट वर चालतो. मध्ये गोदरेज चा छोटु कूल नावाचा आला होता.

हे अ‍ॅक्सेसरीज घेणं म्हणजे वेळकाढू लोक्ससाठी गाडीचे लाड पुरवणे. गरजेच्या सगळ्या सोई गाडीच्या उत्पादकांनी केलेल्या असतात. पण नवीन नवीन गाडीवानांसाठी गाडीचे सुख अनुभवण्यात हा प्रकार जरा मजा आणतो. गरज म्हणून गाडी घेणारे काहीही घेत नाहीत. पण हौस म्हणून गाडी घेणारे बर्‍याच गोष्टी घेतात. आपली हौस म्हणून घेतलेली गाडी सजवण्यात प्रचंड मानसिक समाधान असते. दर दोन तीन महीन्यांनी परफ्यूम बदला. आणि पेन ड्राईव्हला मूड प्रमाणे गाणी वर्गवारी करून भरून घ्या. कितीही ट्राफिक लागलं तरी चीडचीड होत नाही.