✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कारसाठी अ‍ॅक्सेसरीज कोणत्या घ्याव्यात?

ट
टवाळ कार्टा यांनी
गुरुवार, 05/28/2015 - 12:12  ·  लेख
लेख
कारसाठी अ‍ॅक्सेसरीज कोणत्या घ्याव्यात? नुकतीच एक सेकंडहँड Wagon-R Lxi कार विकत घेतली आहे...माझी पहिलीच कार :) त्यामुळे शिकणे सुरु आहे. कार घेतल्यानंतर नातेवाईकांनी + मित्रांनी बरेच सल्ले दिले...त्यातले बरेचसे कार अ‍ॅक्सेसरीजसाठी होते. कोणी म्हणाले बंपर प्रोटेक्टर लाव...तर कोणी म्हणाले लॅमिनेशन करून घे...कोणी म्हणाले फॉग लँप लाव, कारच्या बॅटरीवर चालणारा व्हॅक्युम क्लीनर घे,...ई. मी स्वत: www.amezon.in (Amezon fulfilled only) वर बर्याच अ‍ॅक्सेसरीज बघीतल्या आहेत आणि त्यातल्या काही घ्याव्याश्या वाटल्या त्या इथे लिहित आहे. बर्याच मिपाकरांकडे स्वत:च्या कार असल्याने तुमचे मत कळवावे अशी विनंती... डॉ.खरेंनी आधीच whatsapp वर बरेच उपयोगी सल्ले दिले आहेत त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार :) कार कव्हर http://www.amazon.in/Dios-Body-Cover-Maruti-Estilo/dp/B00SVCTTBA/ref=sr_1_3?s=automotive&ie=UTF8&qid=1432792933&sr=1-3 फुट मॅट http://www.amazon.in/Vheelocity-73911-Premium-Rubber-Maruti/dp/B00QIS25RO/ref=sr_1_6?s=automotive&ie=UTF8&qid=1432793108&sr=1-6 सन शेड http://www.amazon.in/Raaisin-Car-sunshade-Set-4/dp/B00J2SV532/ref=sr_1_1?s=automotive&ie=UTF8&qid=1432793540&sr=1-1 ऑटोमॅटिक टायर इंफ्लेटर http://www.amazon.in/Coido-Electric-Inflator-Compressor-Tyres/dp/B00K7B3T5A/ref=sr_1_3?s=automotive&ie=UTF8&qid=1432793608&sr=1-3 किंवा मॅन्युअल टायर इंफ्लेटर http://www.amazon.in/Heavy-Compressor-Cylinder-Cycles-vehicles/dp/B00KQUQZI0/ref=sr_1_7?ie=UTF8&qid=1432794010&sr=8-7&keywords=air+pump रॅट गार्ड http://www.amazon.in/Release-On-Rat-Guard-400-g/dp/B00U0ZTIV2/ref=sr_1_7?s=automotive&ie=UTF8&qid=1432793768&sr=1-7
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
41492 वाचन

💬 प्रतिसाद (115)

प्रतिक्रिया

बोराट ह्या चित्रपटा मध्ये

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 05/28/2015 - 12:20 नवीन
बोराट ह्या चित्रपटा मध्ये बोराटला त्याच्या गाडीला एक अ‍ॅक्सेसरी बसवुन हवी असते ती , अ‍ॅक्सेसरी सर्वात महत्वाची ! तुम्हाला मिळाली तर मलाही कळवा ;) अवांतर : अधिक माहीती करिता चित्रपट पहावा .
  • Log in or register to post comments

हाहाहा हाहाहाहहाहाह

वेल्लाभट
गुरुवार, 05/28/2015 - 12:50 नवीन
हाहाहा हाहाहाहहाहाह हाहाहाहाहाहहा बोराट _/_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

चायला....त्यासाठी सोन्याची

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/28/2015 - 20:52 नवीन
चायला....त्यासाठी सोन्याची गाडी बनवून घे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

कुठली अ‍ॅक्सेसरी?

सतिश गावडे
Sat, 05/30/2015 - 11:31 नवीन
कुठली अ‍ॅक्सेसरी? चित्रपट खुप पूर्वी पाहिला असल्यामुळे आता विसरल्या गेल्या आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मांजरीचे लवचुंबक =))

टवाळ कार्टा
Sat, 05/30/2015 - 11:38 नवीन
मांजरीचे लवचुंबक =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अभिनंदन!

सुनील
गुरुवार, 05/28/2015 - 12:25 नवीन
सर्वप्रथम अभिनंदन! माझे (फुकटचे) सल्ले - कार कव्हर - जर गाडी दिवसेंदिवस पडिक राहणार असेल तर कवर घेण्यात अर्थ आहे. अन्यथा सुरुवातीचे काही दिवस वापरले जाईल नंतर रोज काढण्या-घालण्याचा कंटाळा येईल. फुट मॅट - जनरली गाडीसहित येते. परंतु, सेकंड हॅन्ड असल्यामुळे मिळाले नसेल तर घेणे. सन शेड - मी घेतलेले नाही तरीही एसीचा परिणाम जाणवण्यासाठी उपयोगी पडू शकेल. ऑटोमॅटिक टायर इंफ्लेटर / मॅन्युअल टायर इंफ्लेटर - गरज नाही. शहरात तरी प्रत्येक ठेचेला 'पंचरवाले' आहेत. रॅट गार्ड - माझ्याकडे नाही. तरीही प्रकार उपयोगी दिसतोय. तुमच्या घराच्या आसपास उंदीर्/घुशी असतील तर घ्या. अन्य बाबतीत सवडीने लिहीन.
  • Log in or register to post comments

Mobile चार्गेर घ्या सगळ्यात पहिला.

पाटील हो
गुरुवार, 05/28/2015 - 12:30 नवीन
Mobile चार्गेर घ्या सगळ्यात पहिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

हो तो घेणारच आहे...त्याबद्दल

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/28/2015 - 12:42 नवीन
हो तो घेणारच आहे...त्याबद्दल दुमत नै म्हणून इथे लिहिले नै :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटील हो

ग्यारेज घ्या

सदस्यनाम
गुरुवार, 05/28/2015 - 12:38 नवीन
ग्यारेज घ्या (संदर्भ काळ्या पहाडाला इचारावा)
  • Log in or register to post comments

चार्जर, मोबाईल होल्डर आणि मला

गिरकी
गुरुवार, 05/28/2015 - 12:42 नवीन
चार्जर, मोबाईल होल्डर आणि मला फार उपयोगी पडलेली गोष्ट म्हणजे रीअर पार्किंग क्यामेरा. नवशिके असाल तर त्या क्यामेराचा फारच उपयोग होतो आणि गाडी एकदाही न ठोकता नीट पार्क करता येते.
  • Log in or register to post comments

रिअर पर्किंग सेंसर्स आधीच

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/28/2015 - 12:44 नवीन
रिअर पर्किंग सेंसर्स आधीच लावलेले आहेत...अंतराचे आकडे दाखवतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गिरकी

अधिकृत विक्रेत्याकडे काहीही

सुबोध खरे
गुरुवार, 05/28/2015 - 12:48 नवीन
अधिकृत विक्रेत्याकडे काहीही घेऊ नका कारण ते तिप्पट भावाने मिळते. माझ्या माहितीच्या अधिकृत विक्रेत्याने मला हे सांगितले होते कि गाडी विकून जितका नफा मिळतो तितका किंवा त्यापेक्षा जास्त नफा आम्हाला अ‍ॅक्सेसरीज विकून मिळतो. मुंबईत सायन कोळीवाडा येथे गेलात तर अ‍ॅक्सेसरीज अजून स्वस्त मिळतील. आणि तेथे न लाजता चार दुकानात त्याच वस्तूंची किंमत विचारायची आणि जेथे जे स्वस्त असेल तेथे ते घ्यायचे. कार घेतल्यावर बर्यच लोकाना "असं कसं करायचं" म्हणून भीड पडते. लक्षात ठेवा भीड भिकेची बहिण हि म्हण आहे.
  • Log in or register to post comments

सायन कोळीवाड्याजवळचे मार्केट

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/28/2015 - 13:02 नवीन
सायन कोळीवाड्याजवळचे मार्केट नै माहित पण बीकेसीच्या बाजूला जे मार्केट आहे तिथे चक्कर टाकायचीच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

>>बीकेसीच्या बाजूला जे

नितिन थत्ते
Sat, 05/30/2015 - 06:13 नवीन
>>बीकेसीच्या बाजूला जे मार्केट आहे तिथे चक्कर टाकायचीच आहे तिथे चक्कर टाका पण कार तिथे नेऊ नका. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खिक्क...ब्येश्टने जाणार आहे..

टवाळ कार्टा
Sat, 05/30/2015 - 10:56 नवीन
खिक्क...ब्येश्टने जाणार आहे...तिथे स्वतःची कार्/बाईक नेली तर स्वतःच्याच गाडीचे पार्ट दुकानात टांगलेले दिसू शकतात असे ऐकून आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

कार

खंडेराव
गुरुवार, 05/28/2015 - 12:56 नवीन
टायर इनफ्लेटर ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. पंचरवाल्यांवर विश्वास ठेवणे म्हणजे मुर्खपणा ( मिपावरच एक धागा आहे ) लिंक बघता येत नाहीये, पण मी कोइडो चा हवामापक वापरतो, अमेझोन वर मिळतो, ३०० -४०० ला असेल, अचुक आहे. हवा भरण्यासाठी एक पायपंप घेतका आहे लोकल मार्केट मधुन, ६०० ला, तो निट काम करतो. गेल्या १२ महिण्यात कोणत्याही वाहनाला पंचर झालेले नाही, हवा घरीच भरतो. कवर शोपक्लुस वर स्वस्त मिळतात.
  • Log in or register to post comments

फोटो टाकता का? अथवा लेखात जी

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/28/2015 - 13:02 नवीन
फोटो टाकता का? अथवा लेखात जी लिंक दिली आहे ती चेक करता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

लिंक

खंडेराव
गुरुवार, 05/28/2015 - 13:41 नवीन
ओफ्फिस मधुन चालत नाहीत https://www.google.co.in/search?q=coido+tyre+pressure&ie=utf-8&oe=utf-8&gws_rd=cr&ei=Pc1mVcDsEoS-ggSE8IGwDA यातला तिसरा फोटो जो आहे ना पेटीम चा, तो. तिथे कॅशबॅक ही असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

पायपंपाचा फोटो हवा होता

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/28/2015 - 13:45 नवीन
पायपंपाचा फोटो हवा होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

हा घ्या

खंडेराव
गुरुवार, 05/28/2015 - 13:52 नवीन
https://www.google.co.in/search?q=manual+tyre+inflator&source=lnms&tbm=isch&sa=X&ei=KdBmVfmoDtOzuATu_4P4Ag&ved=0CAgQ_AUoAg&biw=1366&bih=608 पुन्हा तिसरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ब्रोब्र...तोच घ्यायचा विचार

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/28/2015 - 13:59 नवीन
ब्रोब्र...तोच घ्यायचा विचार आहे पण प्रेशर मीटर ३५० आणि पंप ६०० मिळून ९५०...त्यापेक्षा कार बॅटरीवर चालणारा पंप १००० ला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

माझी

खंडेराव
गुरुवार, 05/28/2015 - 14:27 नवीन
ऐकिव माहिती अशी आहे की बॅटरीवर चालणार्याने वेळ जास्त लागतो. आणि बॅटरीही डिस्चार्ज होत रहाते. मेकॅनिकल जास्त भरवशाचा.. दोन्ही मिळुन ७०० मधे यायला पाहिजे, सध्य्या असलेले डिस्काउंट बघुन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बॅटरीवर चालणारा म्हणजे

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/28/2015 - 14:41 नवीन
बॅटरीवर चालणारा म्हणजे कारच्या बॅटरीवर चालणारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

मी तोच

खंडेराव
गुरुवार, 05/28/2015 - 14:58 नवीन
म्हणतोय..गाडी जर कमी चालणार असेल, तर बॅटरी चार्ज कमी होते, अशात हे डिवायसेस खेळ करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ओह्ह...समजले...पायपंपच चांगला

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/28/2015 - 15:03 नवीन
ओह्ह...समजले...पायपंपच चांगला आहे मग...४०० मध्ये मिळतोय :) http://www.amazon.in/Heavy-Compressor-Cylinder-Cycles-vehicles/dp/B00KQUQZI0/ref=sr_1_7?ie=UTF8&qid=1432805544&sr=8-7&keywords=air+pump
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

चाकात नायट्रोजन भरून घ्या ...

अत्रन्गि पाउस
Fri, 05/29/2015 - 14:29 नवीन
सारखी सारखी हवा भरावी लागत नाही...मी ३ पेट्रोल पंपापाशी भरतो ...पण बर्याच ठिकाणी आहे ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

http://www.flipkart.com/coido

टवाळ कार्टा
Fri, 05/29/2015 - 15:23 नवीन
http://www.flipkart.com/coido-kd-98-twin-cylinder-foot-operated-air-pumps/p/itme7djyvjujzfwh?pid=TAIE7DJYW4HWE7UF&ref=L%3A-6438057815297473883&srno=p_13&query=air+pump&otracker=from-search शोधाशोध करताना हे सापडले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

मूषक प्रतिबंधक औषध मुळीच घेऊ

सुबोध खरे
गुरुवार, 05/28/2015 - 13:00 नवीन
मूषक प्रतिबंधक औषध मुळीच घेऊ नका. ते सारखे चार दिवसांनी फवारत बसावे लागते. आणि इंजिन चा भाग गरम झाल्याने ते उडून जाते. मुळात हे उग्र वासाचे द्रव्य असते ज्यामुळे उंदीर त्यापासून लांब राहतात. यापेक्षा साधे ओडोनिल (बाथरूम मध्ये वापरतो ते) किंवा डांबराच्या गोळ्या जास्त दिवस टिकतात. पावसाळ्यात/ हिवाळ्यात आपण परत आलात कि बाहेर थंडी असते पण कार चे इंजिन गरम असते त्या उबेला उंदीर येतात किंवा पाण्यापासून दूर म्हणून तेथे चढून बसतात. आणि मग सवयीने तेथील वायरी कुरतडतात. एकतर कार च्या खालच्या बाजूला मिळणारी लोखंडी जाळी तेथे बसवा किंवा ratol सारखे मूषक नाशक विष वापरा. आणि मधून मधून डांबराच्या गोळ्या चुरा करून टाका. (अक्खी गोळी कार बाहेर काढली कि घरंगळून खाली पडून जाते.)
  • Log in or register to post comments

उंदरांचा प्रतिबंध करायला

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/28/2015 - 13:04 नवीन
उंदरांचा प्रतिबंध करायला बर्याच लोकांनी इंजिनाच्या आजूबाजूला तंबाखूच्या पुड्या बांधायला सांगितल्या आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

SMARTPHONE MOUNT

कपिलमुनी
गुरुवार, 05/28/2015 - 13:04 नवीन
Image removed. SMARTPHONE MOUNT विकत घे . जीपीएस चालू असताना फार उपयोगी पडतो . डॅशबोर्ड किंवा काचेवर लावता येतो .
  • Log in or register to post comments

+१

वेल्लाभट
गुरुवार, 05/28/2015 - 13:15 नवीन
येस !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

मुनिवर SMARTPHONE MOUNT मला

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/28/2015 - 13:34 नवीन
मुनिवर SMARTPHONE MOUNT मला सध्ध्यातरी उपयोगाचे नै...मला गाडी चालवत असताना फोन वापरायला नै आवडत...जीपीएसचे म्हणाल तर पान-टपरीवरसुध्धा पत्ता विचारू शकतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

फुरसुंगी

कपिलमुनी
गुरुवार, 05/28/2015 - 14:10 नवीन
अशामुळेच फुरसुंगीला पोचतोस ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ऐला...किती वेळा ऐकवणार हे

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/28/2015 - 14:42 नवीन
ऐला...किती वेळा ऐकवणार हे lllllluuuuuuulllllluuuuuu
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

+१

gogglya
Fri, 05/29/2015 - 12:31 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

फुरसुंगी तरी खरा पत्ता का

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 05/30/2015 - 11:56 नवीन
फुरसुंगी तरी खरा पत्ता का नाही हे देवालाचं ठाउक. नाहीतर जायचं असायचं आळंदीला आणि सांगायचा धनकवडीला (धनकवडी आयबीएम :P) आणि निघायचा फुरसुंगीला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

:P

टवाळ कार्टा
Sat, 05/30/2015 - 12:14 नवीन
:P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ते घ्याच घ्या. मोबाईल बदलून

काळा पहाड
गुरुवार, 05/28/2015 - 14:31 नवीन
ते घ्याच घ्या. मोबाईल बदलून स्मार्ट फोन घ्या आणि त्यावर मॅप्स टाका. प्रवास करते समय मोबाईल पॅक भी डालो. पान-टपरीवरसुध्धा पत्ता विचारू शकतो वगैरे ठिकाय, पण रात्री प्रवास करताना (विशेषतः कोकणात वगैरे) अंतर्गत रस्ता चुकलात तर समोर माणूस दिसायची पण मारामार असते. त्यावेळी फायदा होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

पण शक्यतो ऑनलाईन नको

वेल्लाभट
गुरुवार, 05/28/2015 - 14:07 नवीन
वैयक्तिक अनुभव. पहिली वस्तू तुटकी आली. परत पाठवली. पुढची वस्तू वेगळ्याच मेक ची. तकलादू. कसेबसे सहा महिने चालली. टाकून दिली. त्यामुळे शक्यतो बघून घ्या प्रत्यक्ष. ऑनलाईन नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

...अभिनंदन......!!!

विनोद१८
गुरुवार, 05/28/2015 - 13:09 नवीन
अगदी अत्यावश्यक त्याच अ‍ॅक्सेसरीज घ्याव्यात, काही दुकानदार गरज नसतान अनावश्यक गोष्टी गळ्यात मारतात गाडी बरोबर काय मिळालेय हे जर कळले तर काही सांगता येइल.
  • Log in or register to post comments

काय असायला हवे ते लिहा...आधीच

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/28/2015 - 13:35 नवीन
काय असायला हवे ते लिहा...आधीच मिळालेले असेल तर लिहिनच तसे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८

व्हेरी हॅपी टू सजेस्ट

वेल्लाभट
गुरुवार, 05/28/2015 - 13:13 नवीन
कव्हर - नव्याची नवलाई. काही दिवसांनी कंटाळा येतो. कव्हर घालूनही सोसायटीत जेंव्हा गाडीवर चरा येतो (येऊ नये; पण) तेंव्हा रागाने ते कव्हर कायमचं डिकीत टाकलं जातं. मोबाईल चार्जर - १२व्ही सॉकेट असेल तर घ्याच. अतिशय उपयोगी. फूट मॅट - घ्या. गाडी स्वच्छ रहायला मदतीची. पण चांगली घ्या. काळी रबरी नको. एक आणखी पर्याय म्हणजे गाडीचा फ्लोअर व टॉप (आतून) लॅमिनेट करून मिळतो आफ्टरमर्र्केट शॉप्स मधे. रॅट्गार्ड कुचकामी सनशेड शिवाय काही अडणार नाही. इन्फ्लेटर ठीक आहे घ्या; पण मुळात स्टेपनीसकट बाकी सर्व चाकं ठणठणीत असली की विशेष अडू नये. वर नमूद न केलेल्या अ‍ॅक्सेसरी कार परफ्यूम - चांगलासा तुम्हाला आवडेल असा. अँबी प्युअर वैयक्तिक मला खूप उग्र वाटले. गोदरेज एअर ठीक्ठाक. जेल्/हँगिंग मला अधिक आवडतात. किंवा सरळ स्प्रे. अपहोल्स्ट्री स्प्रे सुधा मिळतो. जीपीएस - महागडी अ‍ॅक्सेसरी. आजकाल मोबाईल मधे मॅप्स अस्तात. पण कधीकधी हवंहवंसं वाटतं ते जीपीएस. फ्रंट गार्ड / स्टिकर / एलईडी इत्यादी गोष्टी लावून मूळ गाडीची ग्रेस जाते असं माझं तुम्हाला सांगणं आहे. (अवांतर - झेन च्या दारांवर भलं मोठं ४*४ लिहिलं म्हणजे झेन डोंगर चढत नाही. काय एक एक करतील ना माणसं मानसिक समाधानासाठी !) डॅक बद्द्ल कुणी कसं बोललं नाही? एलेक्साय ला डेक येत नाही. तो आफ्टरमार्केट घेत असाल तर वेगळा धागा काढा. मोठा विषय आहे. अ‍ॅलॉय व्हील्स - आणखी एक महागडी अ‍ॅक्सेसरी. पण नीट शोभेल असे अ‍ॅलोयज लावले तर चार चांद लागतात गाडीला. फॉग लँप्स - उपयोगी. धुकं बिकं जात नाही जे गाडीसोबत येतात त्या फॉगलँप्स नी. ते वेगळे असावे लागतात. पण असेही, इट्स अ गुड कॉस्मेटिक अ‍ॅक्सेसरी टू हॅव. नेक रेस्ट - नेक सपोर्ट - हा उपयोगी ठरतो. डॅशबोर्डवर देवाची मूर्ती - श्रद्धेनुसार. स्टिअरिंग कव्हर - केंव्हाही चांगलं. स्टिअरिंग नॉब (ते जात्यासारखं फिरवायला) - युसलेस एकदा टेफलॉन पॉलिश, डेशबोर्ड पॉलिश करून घेतलंत तर उत्तम. सुरुवातीला इतकं पुरेसं ठरू शकतं. पुढे घ्यालच अजून.
  • Log in or register to post comments

कव्हर घालूनही सोसायटीत

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/28/2015 - 13:44 नवीन
कव्हर घालूनही सोसायटीत जेंव्हा गाडीवर चरा येतो (येऊ नये; पण)
दोनच दिवसांपूर्वी एका आरश्याची काच फुटलेली दिसली...आणि मागच्या बाजूचा पार्किंग सेंसर बाहेर आलेला
फ्लोअर व टॉप (आतून) लॅमिनेट करून मिळतो आफ्टरमर्र्केट शॉप्स मधे.
येस्स...हे करणारच आहे
कार परफ्यूम - चांगलासा तुम्हाला आवडेल असा. अँबी प्युअर वैयक्तिक मला खूप उग्र वाटले. गोदरेज एअर ठीक्ठाक. जेल्/हँगिंग मला अधिक आवडतात. किंवा सरळ स्प्रे. अपहोल्स्ट्री स्प्रे सुधा मिळतो.
हे घेणारच्च...ब्रँड सुचवावेत :)
फ्रंट गार्ड / स्टिकर / एलईडी इत्यादी गोष्टी लावून मूळ गाडीची ग्रेस जाते असं माझं तुम्हाला सांगणं आहे. (अवांतर - झेन च्या दारांवर भलं मोठं ४*४ लिहिलं म्हणजे झेन डोंगर चढत नाही. काय एक एक करतील ना माणसं मानसिक समाधानासाठी !)
असले कै करणार नाहीये...कारण ही गाडी शिकायला घेतली आहे...
डॅक बद्द्ल कुणी कसं बोललं नाही? एलेक्साय ला डेक येत नाही. तो आफ्टरमार्केट घेत असाल तर वेगळा धागा काढा. मोठा विषय आहे.
डॅक??? अ‍ॅलॉय व्हील्स - आणखी एक महागडी अ‍ॅक्सेसरी. पण नीट शोभेल असे अ‍ॅलोयज लावले तर चार चांद लागतात गाडीला.
फॉग लँप्स - उपयोगी. धुकं बिकं जात नाही जे गाडीसोबत येतात त्या फॉगलँप्स नी. ते वेगळे असावे लागतात. पण असेही, इट्स अ गुड कॉस्मेटिक अ‍ॅक्सेसरी टू हॅव.
कॉस्मेटिक अ‍ॅक्सेसरी वगैरे नवीन गाडी घेतानाचे चोचले :) नेक रेस्ट - नेक सपोर्ट - हा उपयोगी ठरतो.
डॅशबोर्डवर देवाची मूर्ती - श्रद्धेनुसार. स्टिअरिंग कव्हर - केंव्हाही चांगलं.
आधीच आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

डॅक म्हणजे ढिश्चिक ढिश्चिक रे

वेल्लाभट
गुरुवार, 05/28/2015 - 14:17 नवीन
डॅक म्हणजे ढिश्चिक ढिश्चिक रे ! स्टिरियो. स्पीकर, स्तिरियो इत्यादी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सध्ध्यातरी आधीच्या मालकाने

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/28/2015 - 14:43 नवीन
सध्ध्यातरी आधीच्या मालकाने लावलेलाच डेक वापरणार....नवीन गाडी घेतल्यावर मग नवीन डेकचा विचार केला जाईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

डेकचा विचार केला नाहीतरच बारा होईल .

पाटील हो
गुरुवार, 05/28/2015 - 14:58 नवीन
डेकचा विचार केला नाहीतरच बारा होईल . मी बसवलेला माज्या गाडीमध्ये JBL चा दोन बेस & अम्प्लीफायार लावून . चांगला वाजविला ३ महिने आणि कडून ठेवलो . करणे : १) घराचे असतील तर आवाज वाडवू देत नाहीत. २) ३ महिन्यात गाडीच्या काचा सगळ्या खुलाखुल्या झाल्या .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

डेकच नाही? सुवर्णमध्य काढायचा

वेल्लाभट
गुरुवार, 05/28/2015 - 15:29 नवीन
डेकच नाही? सुवर्णमध्य काढायचा त्यापेक्षा. काय तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटील हो

परफ्यूम चे ब्रँड

वेल्लाभट
गुरुवार, 05/28/2015 - 14:28 नवीन
असे ब्रँड नाही सांगता येणार. अँबी युअर, गोदरेज एअर हे वर नमूद केले. पण ते मला तरी फार जमले नाहीत. तुझं मत वेगळं असू शकतं. हँगिंग मधे लिटिल ट्रीज आहे. जेल मधे माय शेल्डन आहे, लिबोनि आहे एरिऑन आहे. अनेक आहेत अनेक. वापरो और ठरवो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

त्यापेक्षा गुर्जींना विचारतो

टवाळ कार्टा
गुरुवार, 05/28/2015 - 14:44 नवीन
त्यापेक्षा गुर्जींना विचारतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

कार परफ्युम पेक्षा

अत्रन्गि पाउस
Fri, 05/29/2015 - 14:32 नवीन
उत्तम प्रतीचा कापूर (१० १२ गोळ्या गाडीत पसरून) ठेवा .... सकाळी सकाळी दरवाजा उघडला कि फार मस्त वाटते ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा