(अनुवाद. कवी-जावेद अख्तर)
एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नउ दहा अकरा बारा तेरा
तुझा करतोय दिवस मोजून इंतजार
ये ग साजणी आली बघ बहार.
चवदाला मी जेंव्हा म्हणालो होतो
पंधराला येइन , मी आलो होतो
तुला न पाहुन मी घाबरलो
सोळाला सुध्धा होतो मी बेचैन फार
ये ग साजणी आली बघ बहार.
सतराला झोपलो नाही रात्रभर
अठरालासुध्धा आली नाहिस नजर
एकोणीसला मी वेडा झालो
वीसला घरातून रवाना झालो
गल्लीतून उठतात वेड्याच्या हाका फार
ये ग साजणी आली बघ बहार.
एकवीसला आली नाहीस ना बावीसला तू
जेंव्हा नाही भेटलीस तेवीस चोवीसला तू
पंचवीसला समजावल सगळ्यानी मला
जीव नको देउस तू सव्वीसला
या जगात आता माझे दिवस राहीलेत चार
ये ग साजणी आली बघ बहार.
दिवसाचे झाले आठवडे, आठवड्याचे महिने
महिन्याचे बघता बघता वर्ष झालं.
येउन जरा तू बघुन जा
काय चाललेत माझे हाल.
वेडा बनून मी फिरतोय
जगतोय ना मी मरतोय
एकटेपणाची रात्र छळतेय
ये आता दिवस मोजत बसलोय.
एक दोन तीन चार पाच..................
कवटी
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2247
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिउत्तम.
१३_१३
In reply to अतिउत्तम. by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रतिसादाला उत्तर देण्याची इष्टाईल
In reply to १३_१३ by कवटी
कुणीसे
In reply to प्रतिसादाला उत्तर देण्याची इष्टाईल by टारझन
व्वा. चांगल
अभिज्ञ
In reply to व्वा. चांगल by अभिज्ञ
व्वा. कवटी
मदनबाण
In reply to व्वा. कवटी by मदनबाण