Skip to main content

साजणी आली बघ बहार

लेखक कवटी यांनी बुधवार, 26/11/2008 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवाद. कवी-जावेद अख्तर) एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नउ दहा अकरा बारा तेरा तुझा करतोय दिवस मोजून इंतजार ये ग साजणी आली बघ बहार. चवदाला मी जेंव्हा म्हणालो होतो पंधराला येइन , मी आलो होतो तुला न पाहुन मी घाबरलो सोळाला सुध्धा होतो मी बेचैन फार ये ग साजणी आली बघ बहार. सतराला झोपलो नाही रात्रभर अठरालासुध्धा आली नाहिस नजर एकोणीसला मी वेडा झालो वीसला घरातून रवाना झालो गल्लीतून उठतात वेड्याच्या हाका फार ये ग साजणी आली बघ बहार. एकवीसला आली नाहीस ना बावीसला तू जेंव्हा नाही भेटलीस तेवीस चोवीसला तू पंचवीसला समजावल सगळ्यानी मला जीव नको देउस तू सव्वीसला या जगात आता माझे दिवस राहीलेत चार ये ग साजणी आली बघ बहार. दिवसाचे झाले आठवडे, आठवड्याचे महिने महिन्याचे बघता बघता वर्ष झालं. येउन जरा तू बघुन जा काय चाललेत माझे हाल. वेडा बनून मी फिरतोय जगतोय ना मी मरतोय एकटेपणाची रात्र छळतेय ये आता दिवस मोजत बसलोय. एक दोन तीन चार पाच.................. कवटी
लेखनविषय:

वाचने 2247
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

सुंदरच! मी माझ्या "सुंदर" आवाजात हे गाणं गाऊनही पाहिलं, आणि मलाही जमलं ते! अतिउत्तम.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

१३_१३ व्यस्त अदिती जी, आपणास ही कविता आवडल्याचे ऐकून बरे वाटले. आपण ते गाऊन पाहिलेत याचे विशेष कौतूक वाटले. आपल्या प्रतिक्रीयेबद्दल आभार. कवटी http://www.misalpav.com/user/765

In reply to by टारझन

कुणीसे म्हटलेच आहे की "देर इज नथिंग न्यु अंडर द सन". टारझन तुमच्या प्रतिसादाबद्दल आभार. कवटी http://www.misalpav.com/user/765

व्वा. चांगला प्रयत्न आहे.;) अभिज्ञ.

व्वा. कवटी महाराज उत्तम चालु आहे !!! :) मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर