मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

किणारा अन् लाट

यल्लप्पा सट्वजी कोकणे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
किणारा अन् लाट अजब मैत्री आहे किणारा अन् लाटेची, काय जादू आहे निसर्गाच्या या किमयेची? स्पर्शून हळूच जाते लाट हि किणार्‍याला, विलीन होत सागरात खुणावित जाते वार्‍याला! काय उपमा द्यावी दोघांच्या या नात्याला? यात कसे विसरता येईल नटखट वेड्या वार्‍याला? यल्लप्पा सटवाजी कोकणे १८ एप्रिल २०१५ ९८९२५६७२६४

वाचने 3339 वाचनखूण प्रतिक्रिया 27

In reply to by टवाळ कार्टा

नाव आडनाव Sat, 05/23/2015 - 19:42
त्यांच्या कवितेच्या चाहत्यांनी इतक्या वेळात त्यांना मेजर वैताग दिला असेल. मी "किणारा" ऐवजी चुकून "किराणा" वाचलं होतं.

In reply to by नाव आडनाव

काळा पहाड Sun, 05/24/2015 - 09:55
मी पण. बाकी मोबाईल नंबर दिल्याबद्दल थँक्यू. जबरदस्तीनं हॉलिडे पॅकेज विकणार्‍यांना कोणता नंबर द्यावा हा प्रश्न मिटला.

In reply to by काळा पहाड

जबरदस्तीनं हॉलिडे पॅकेज विकणार्‍यांना कोणता नंबर द्यावा हा प्रश्न मिटला. कसं काय सुचतं हे असं ???!!!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

काळा पहाड Sun, 05/24/2015 - 16:02
बिग बाझारात गेल्यावर सगळ्या पैल्यांदा हे लोक जवळ जमा होतात. आणि दर पाच मिनिटानी नवीनच माणूस येवून विचारतो, "सर नाम और फोन नंबर लिखिये. हॉलीडे पॅकेज मिल सक्ता है".

In reply to by नाव आडनाव

कहर Mon, 05/25/2015 - 18:04
मी सुद्धा 'किराणा आणि लाट' असे वाचून कॉमेडी समजून आलो वाचायला… मोकालाया आठवले। रच्यकने तो धागाहि आज वर आलाय पुन्हा

नाखु Tue, 05/26/2015 - 14:04
खरे किणारा घराण्याचे कवी !!!! कट्ट्यावर सटीप काव्यवाचनाचा कारेक्रम झालाच पाहिजे. मिपाचे त्रयी (सूडेश पापड्गांवकर - जॅक आपट-प्रगो धुरंध्रीकर )

चित्रगुप्त Tue, 05/26/2015 - 20:17
दुर्दैवाने 'किणारा' या शब्दातले गूढ माधुर्य, सौदर्य कुणाला जाणवलेले दिसत नाही. नाजुक लाट तटावरील रेतीला हळुवार, मृदु स्पर्श करून नटखट वेड्या वार्‍याला खुणावीत सागरात विलीन होते, तेंव्हा संवेदनशील, कविमनाच्या व्यक्तीला अतिशय कोमल अशी किणकिण ऐकू येते, ती अनुभूति 'किणारा' या शब्दातून नेमकी व्यक्त होते. होय ना यल्लप्पा सायेब ?