करकरे आणि इतर ज्येष्ठ अधिकार्यांचे मृत्यू झाल्याचं ऐकून मला आयुष्यात पहिल्यांदा, शॉक बसून स्पीचलेस होणं म्हणजे काय हे कळलं... शब्दश:
अतिशय वाईट मनःस्थिती आहे.
आता शिवराज पाटिल साहेब किती वेळा कपडे बदलतात ते बघायचं. आपले तमाम मंत्री संत्री या लोकांना कसा हाग्या दम देतात ते बघायचं. उद्या सकाळी मुंबईकर कसे धावून आले त्याच्या गोड गोड आणि अलंकारिक भाषेतल्या बातम्या वाचायच्या. मग आंघोळ करून डबा घेऊन कामावर जायचं आणि मग सगळं कसं शांत होईल, मन हलकं होईल.... पुढच्या हल्ल्यापर्यंत.
बिपिन कार्यकर्ते
वर फ्लॅश दाखवत आहेत की "विश्वास नांगरे पाटील" जखमी ...
देव करो की त्यांना काही न होवो, ते सुरक्षीत रहावेत ही प्रार्थना ...
काय होते आहे तेच कळत नाही ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
दुहेरी मॅगझिन्स असलेल्या ए.के ४७ आहेत. त्यामुळे अखंडपणे गोळ्यांचा वर्षाव चालू ठेवता येतो. एकाआड एक बदलत रहायचे!!
ताज मधे आता एनकाऊंटर चालू आहे!!
चतुरंग
करकरेंच्या छातीत तीन गोळ्या...
म्हणजे त्याना नीट ओळखून टार्गेट करून मारण्यात आलं आहे का? सांगता येत नाही. धक्का म्हणजे एवढे सिनिअर ऑफिसर्स शहीद झाले.
बिपिन कार्यकर्ते
http://idesitv.com/nepal.php वर अगोदर दाखवत होते तेह्वा ते जॅकेट्सदृश काही आणि हेल्मेट घालताना दाखवले होते.. मग ते जे काही घालतात ते बुलेट प्रूफ नसते का?
विश्वास नांगरे-पाटील हेही जखमी झाल्याची बातमी आहे.
महाराष्ट्र पोलिसांचे एकसे एक मोहरे अगदी जीवावर उदार होउन लढताहेत.
हे एक मिनी युद्ध आहे. हे अतिरेकी अगदी प्रोफेशनल आहेत हे नक्की.
- अभिजीत
आत्ता आम्ही तीनचार मित्र मुंबईला जे जे रुग्णालयात जायला निघालो आहोत. तिथे रक्ताची बरीच गरज आहे... जवळपासच्या मिपाकरांनी जेजे किंवा जीटीला रुग्णालयात रक्तदानाकरता पोहोचावे ही विनंती...
ठाणा-मुलुंड-डोंबिवलीची काही मंडळी ऑलरेडी तिथेच निघाली आहेत..
तात्या.
माझ्या मनात एक विचार आला आहे तो मी आपणा सर्वांसमोर मांडत आहे. अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्वांबद्दल आपल्या मनात आदराची भावना आहे. मात्र आता वेळ आहे ती प्रत्यक्ष कृती करण्याची, या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस वा अन्य खात्यातील कर्मचारी असोत की निरपराध नागरिक त्यांच्या कुटुंबियांना आणि जखमींच्या कुटुंबियांना अशावेळी कोरड्या सहानुभूतीपेक्षा प्रत्यक्ष मदतीची गरज असते त्या करिता आपण सर्व मिसळपाववरील सदस्यांनी यथाशक्ती एक निधी जमवावा व त्या गरजूंना शक्य असेल ती मदत करावी. आपण आपल्या मित्रमंडळींनाही या निधी संकलनात सहभागी करून घ्यावे. या कामी तात्या अभ्यंकर यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती आहे. आपणा सर्वांचे मत मांडावे.
प्रतिक्रिया
.......
स्पीचलेस...
स्पीचलेस....
"...उद्या सकाळी मुंबईकर कसे धावून आले त्याच्या गोड गोड आणि
सलाम मुंबै
बिपिनदा
आय बी एन लोकमत
अतिरेक्यांकडची शस्त्रे अत्यंत आधुनिक
करकरेंच्य
मला नेहेमी आश्चर्य वाटत आलेलं आहे की एवढ्या
http://idesitv.com/nepal.php
साधारण २००
लष्कर
बोटीने आले
विश्वास नांगरे-पाटील
लीडींग
२ अतिरेकी मारले, ९ पकडले!!
आत्ता
तात्या.... __/\__
+१
मान गये..
कृती करुया!