आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार मुंबईत ताज हॉटेलच्या परिसरात गोळीबार सुरू आहे...
हा अतिरेकी हल्ला असल्याचे समजते व अद्यापही पोलिस आणि अतिरेकी यांच्यात ताज परिसरात प्रचंड गोळीबार सुरू आहे..
नरीमन पॉईंट येथील ओबेरॉय हॉटेलात व ताजमध्ये अद्यापही अतिरेकी लपल्याची खबर आहे व तिथेही प्रचंड गोळीबात सुरू आहे...
सी एस टी, कामा रुग्णालय आणि विलेपार्ले येथे बॉम्बस्फोट झाले आहेत व जखमींची व मृतांची संख्या ३० च्या वर आहे...
महाराष्ट्रात हाय ऍलर्ट लागू झाले असून मुंबईत कमांडो ऍक्शन सुरू आहे...
या अतिरेकी हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लौकरात लौकर सुधारणा होवो हीच इच्छा. या हल्ल्यात बळी पडलेल्या सर्वसामान्य नागरीकांना मिपा परिवाराची विनम्र आदरांजली..
तसेच या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना मिपा परिवाराची मानवंदना..
तात्या.
वाचने
23246
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
प्रतिक्रिया
मान गये..
In reply to आत्ता by विसोबा खेचर
कृती करुया!