Skip to main content

पुष्पांजली २

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 24/05/2015 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी येथे टाकलेली पुष्पांजली वाचकांना आवडली होती. म्हणून या उन्हाळ्यात तिच्यात पडलेली भर वाटून घेत आहे... १. मे फ्लॉवर : गृहबागिच्यातली ही या वर्षीची नविन भर. दूरून सूर्यासारखा दिसणारा एक वेगळाच पुष्पगुच्छ...      .  .  . २. केशरी-गुलाबी जास्वंद :  . ३. लाल जास्वंद :  . ४. महाराष्ट्राचा लाडका झेंडू :  . ५. डच लिली : या वर्षी आमच्या लाडक्या डच लिलीच्या मनात काय आले कोण जाणे... नेहमीसारखे एका मागोमाग एक ताटवे फुलवण्याऐवजी प्रेम ऊतू गेल्यासारखा एकदम सहा ताटव्यांचा (एका ताटव्यात चार फुले) नजराणा देऊन चकीत केले !  .  . ६. अजून काही...  .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9074
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

In reply to by स्रुजा

धन्यवाद ! मोगर्‍याला आताशी इवल्या इवल्या कळ्या यायला लागल्या आहेत. बहर आला की जरूर फोटो टाकेन.

अशी लालेंलाल फुलं पाहिली की, डोळे सुखावतात. लई भारी रांव...

सुंदरच फुले आहेत. या असल्या उन्हाळ्यात फुले बघून काय ते बरं वाटतं.

आज सकाळी बागेत हे आक्रित उमलले. अशक्य गोष्ट नसली तरी मिपाकरांशी वाटून घ्यावी इतकी अनवट नक्की आहे असे वाटले. म्हणून वरच्या लेखात इथे ही अजून एका फोटोची भर...