Skip to main content

प्रेम

लेखक परी१२३४५ यांनी शुक्रवार, 22/05/2015 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे एक आस प्रेम म्हणजे एक ध्यास प्रेम म्हणजे एक श्वास प्रेम म्हणजे तुझा हवाहवासा सहवास. प्रेम म्हणजे गर्दीतला एकटेपणा प्रेम म्हणजे एक आंतरिक वेदना प्रेम म्हणजे एक गोड संवेदना प्रेम म्हणजे हुरहूर लावणारी मनाची दशा प्रेम म्हणजे चढलेली एक नशा. प्रेम म्हणजे माझ तुझी वाट पहाण प्रेम म्हणजे तुझ न येण प्रेम म्हणजे मी तुझी वाट पाहून थकून जाण प्रेम म्हणजे तू येणार नाहीस हे माहित असूनही रोज तुझीच वाट पहाण. येशील कधी तू माहित नाही तरीही रोज वाट तुझी पाहीन अखेरच्या श्वासापर्यंत फक्त तुझीच राहीन फक्त तुझीच राहीन.
लेखनविषय:

वाचने 1959
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

In reply to by अजया

का दुखर्या दातांवर बोट ठेवता आता त्यांना "पेन्-लिकर-किलर" घ्यावी लागेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी !!! सरळ धोपट नामा निराळे

"प्रेम म्हणजे एक श्वास"... तर मग "अखेरच्या श्वासापर्यंत फक्त तुझीच" हे कसेकाय, ते बरीक कळले नाही. "प्रेम म्हणजे एक वास" असे तर म्हणायचे नव्हते ?

सदर कवितेमधे "प्रेम" या शब्दा ऐवजी "तांब्या" हा शब्द घातला तर ती कविता जास्त प्रगल्भ व अर्थवाही होईल असे मला वाटते. पैजारबुवा,