Skip to main content

एक अविस्मरणीय क्षण

लेखक परी१२३४५ यांनी गुरुवार, 21/05/2015 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
ही गोष्ट आहे साधारणपणे ४ - ५ वर्षांपूर्वीची. त्यावेळी मी १२ वी मध्ये होते. नवीन वर्षाच्या स्वागताची सर्वत्र धामधूम चालली होती. माझ्या घरापासून काही अंतरावर एक नावाजलेली शैक्षणिक संस्था आहे. तिथेही दरवर्षी नवीन वर्षाच स्वागत खूप धुमधडाक्यात होत असत. त्या शैक्षणिक संस्थेची नववर्षाच्या स्वागताची एक आगळीवेगळी पद्धत आहे आणि ती म्हणजे २९,३०,३१ डिसेंबर या तीन रात्री तिथे गाजलेल्या व नावाजलेल्या कलाकारांना, मान्यवरांना निमंत्रित केले जाते. आणि एरवी फक्त टी.व्ही. वर दिसणारी त्यांची कला प्रत्यक्षात पहावयास मिळते. त्या वर्षीही असच संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकाराना बोलावण्यात आलेले होत. परंतु नेमकी माझी बारावीची पूर्व परीक्षा चालू होती दुसरया दिवशी म्हणजे १ जानेवारी रोजी माझा अर्थशास्त्राचा पेपर होता. अभ्यास पूर्ण झाला असल्यामुळे तास मला काही टेन्शन नव्हत. परंतु स्कोरिंग साठी अभ्यासाची माझी धडपड चालू होती. पण ज्यावेळी मला समजले कि आज प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध संतूर वादक आदरणीय पंडित शिवकुमार शर्माजी येणार आहेत तेंव्हा परीक्षेचा कसलाही विचार न करता मी त्या कार्यक्रमाला जाण्याचे ठरविले कारण संतूर हे माझ खूप आवडते वाद्य आहे आणि पंडित शिवकुमार शर्माजी हि माझी संगीत क्षेत्रातील आवडती व्यक्ती आहे. आणि त्यांचा कार्यक्रम एवडा जवळ आणि मी जाणार नाही अस तर होऊ शकत नाही. त्यामुळे मी आवर्जून त्या कार्यक्रमासाठी गेले. कार्यक्रम साधारणता ६ वाजेपर्यंत चालू झाला सुरुवातीला काही मान्यवरांचे कार्यक्रम झाले. परंतु त्यावेळी पंडित शिवकुमार शर्माजी आलेले नव्हते. अचानक एकदम गोधळ झाला कि मकरंद अनासपुरे आले म्हणून सौरभभैय्या, मोनिकाताई, व मी पळत गर्दीच्या ठिकाणी गेलो व खूप आटापिटा करून मकरंद अनासपुरे सरांचा ऑटोग्राफ घेतला आणि आनंदाने जागेवर येऊन बसले. काही वेळ कार्यक्रम पहिला आणि थोड्याच वेळात पंडित शिवकुमार शर्माजी आले म्हणून एकाच गोंधळ उडाला. आणि ते एकता क्षणी मी सर्व काही विसरून त्यांना भेटण्यासाठी धावत त्यांच्या गाडीजवळ पोहचले. गर्दीतून वाट काढत मी त्यांच्याजवळ पोहचले आणि त्यांच्या पाया पडले तसे ते माझ्याकडे बघून प्रसन्न हसले. त्यांच्या चेहऱ्यावर एक निराळेच तेज होते अगदी सिरीयल मध्ये देवी देवतांच्या चेहऱ्यावर असते तसेच. क्षणभर मी त्यांच्याकडे पाहताच राहिले. मी माझ्याजवळचा कागद आणि पेन ऑटोग्राफ साठी त्यांच्यासमोर धरला आणि ज्याची मी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती अशी गोष्ट घडली. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि ते मला म्हणाले कि “ बेटा आप कभी भी किसीसे ऑटोग्राफ मत मांगना बल्की आप इतनी बडी हो जावो कि सारी दुनिया आपसे ऑटोग्राफ मांगे ”. तो क्षण माझ्या आयुष्यातल्या काही अविस्मरणीय क्षणांपैकी एक होता. जो कि मी कधीही विसरणार नाही. त्यानंतर खूप कलाकारांशी जवळून बोलन झाल परंतु मी कधीही कोणाला ऑटोग्राफ मागितला नाही. आज हि गोष्ट सर्वांशी शेअर करताना मला खूप आनंद होत आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 12116
प्रतिक्रिया 82

प्रतिक्रिया

In reply to by अत्रन्गि पाउस

नवलेखिकेला नाऊमेद करण्याचा प्रयत्न केल्या बद्दल अत्रंगी पाऊस यांचा त्रिवार निषेध.. -जेपी

छान लेख, आवडला. लिहीत रहा. अश्याच मोठ्या व्यक्तिंच्या आशिर्वादाने आपल्या पुढील आयुष्याचे सोने होते. (संपादित)

“ बेटा आप कभी भी किसीसे ऑटोग्राफ मत मांगना बल्की आप इतनी बडी हो जावो कि सारी दुनिया आपसे ऑटोग्राफ मांगे ”. डोळे भरुन आले. थांबतच नै ये डोळ्यातलं पाणी.बाकी, सौरभ भैया अन मोनिका तैचं काय चाललंय सध्या ? माझा त्यांना नमस्कार सांगा हं !!! -दिलीप बिरुटे (ऑटोग्राफचा नाद नसलेला)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्हाला काही वेळा ऑटो लवकर मिळत नाही तर नोकरीत+शाळेत कधी ग्राफ मिळाला नाही दोन्ही एकत्र मिळणे तर फारच दुरापास्त!! स्वगतः मुपी लेखांसाठी स्वतंत्र "बाल्य" विभाग चालू करावा काय

In reply to by खेडूत

झालेला आनंद त्यांनी अनेक ठिकाणी यापूर्वी शेअर केलाय आज मिपाची वेळ होती. बाकी वरील प्रसंगाने तुम्ही भारावला की नाही ? -दिलीप बिरुटे

बिरुटे डॉ साहब आप ( आपकु "बेटे" तो नै बोल सक्ता ना.) किसीसेभे मयत्री मत मांगना बल्की आप इतने बॅड हॉ जान्ना की सारी दुणिया आपसे मयत्री मांगेगे

In reply to by विजुभाऊ

=)) बस ऐसी ही दुवा करो भगवान से, मुझे दोस्त और प्यार के लिये किसी के सामने हाथ न करना पड़े. मेरे लाईफ का अंगन सदा दोस्त और प्यार से भरा रहे. बाय द वे, विजुभाऊ पण अशा स्वाक्ष-या आणि थोरा मोठ्याना भेटण्याचा प्रसंग सुखावून जातो. मला एकदा सई ताम्हनकरला भेटायचं आहे, आणि तिच्याशी मस्त गप्पा मारायच्या आहेत. :) -दिलीप बिरुटे (स्वप्नाळु)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला एकदा सई ताम्हनकरला भेटायचं आहे, आणि तिच्याशी मस्त गप्पा मारायच्या आहेत. :) फक्त गप्पा :ऑ

In reply to by इरसाल

चायला माझा अस्ला चानस हुकला...एकदा सण्णी वैनी ठाण्यात आलेल्या...मला म्हैतच नव्हते :(

छान लेख..तुमच्या अनुभवलिखाणामुळे डोळ्यात पाणी उभे राहीले. परंतु नेमकी माझी बारावीची पूर्व परीक्षा चालू होती दुसरया दिवशी म्हणजे १ जानेवारी रोजी माझा अर्थशास्त्राचा पेपर होता. अभ्यास पूर्ण झाला असल्यामुळे तास मला काही टेन्शन नव्हत. परंतु स्कोरिंग साठी अभ्यासाची माझी धडपड चालू होती. पुर्व परीक्षेत ही स्कोरिंग करता? कमाल आहे. या स्कोरिंगमुळे फायनलच्या स्कोरिंग वर परीणाम होतो का?

In reply to by योगी९००

पुर्व परीक्षेत ही स्कोरिंग करता? हो कारण आमचा ११ जणांचा ग्रुप होता त्यामुळे चडाओढ असायची अभ्यासात

In reply to by परी१२३४५

अभ्यासात चढ़ाओढ़ असलीच पाहिजे, बाकीचे ते अकराजन काय करतात हल्ली. आम्हीही असेच मित्र घरुन अभ्यासाला जायचो आणि जमलो की नुसत्या तास दोन तास गप्पा व्हायच्या आणि पुन्हा घरी यायचो. असा अभ्यास करणारे माझ्याच गावात दोघांचे किराना दूकान, एक मोबाइल दुरुस्तीच्या कामात एक कपड्यावाला मोठा सेठ झाला, डा दैवं बलवत्तर होतं म्हणून आम्ही दोनचारजन वाचलो...... -दिलीप बिरुटे

In reply to by परी१२३४५

बालपण, शिक्षण, लग्न मग ती मुलं बाळ मग मुलांकडून अपेक्षा सुनेकडून अपेक्षा आणि आपलं म्हातारपण सुखाचं जावं असं स्वप्न.. खरं म्हणजे हा आखून दिलेला मार्ग... काही यशस्वी होतात काही अपयशी ठरतात.... पण आयुष्यात काही थ्रील पाहिजे, कुछ हटके पाहिजे, असं मला वाटतं अर्थात सर्व सुख असलं की माणूस असा विचार करतो... आपण काय विचार करता अशा रूटीन आयुष्याबद्दल ??? -दिलीप बिरुटे (गप्पाड्या)

In reply to by परी१२३४५

ओक्के ! मग ती नावाजलेली शैक्षणिक संस्था कोणती तेही सांगा म्हणजे दरवर्षी आम्ही पण लाभ घेऊ म्हणतो! (फुकट्या ) खेडूत

नवलेखिकेला नाऊमेद करण्याच्या जुण्या जाणत्या मिपाकरांचा त्रिवार गुणीले 8 वेळेस निषेध.. -जेपी

ह्रिदय भरून आलंय.... डोल्यापुध्चे सगळेच धूसर होत गेले, कानात फक्त शिवजींचा अहिर भैरव गुंजतोय - स्पा५३२,७/८,भिकार सावकार,रमी

In reply to by स्पा

"स्पा ५३२,७/८,भिकार सावकार,रमी..." हा हा हा :)) बाकी 'एक है अनार यहां कितने बिमार यहां' ही परिस्थिती मिपावर (ही) प्रत्यक्ष पाहून .. मन भरून आले, डोळे पाणावले इ.इ..

In reply to by स्पा

ह्रिदय भरून आलंय.... डोल्यापुध्चे सगळेच धूसर होत गेले, कानात फक्त शिवजींचा अहिर भैरव गुंजतोय - स्पा५३२,७/८,भिकार सावकार,रमी
http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif

In reply to by परी१२३४५

इथे पहा किंवा नक्की काय बदल करायचाय ते सांगा . किंवा 'संपादक मंडळ' आयडीला लिहा …

In reply to by परी१२३४५

ते वरच्या प्रतिसादांमध्ये गप्पोत्सुक दिसणारे प्राध्यापक डॉक्टर दिलीपचंद्ररावजी बिरूटेसाहेब "संपादक" आहेत. त्यांना संपर्क साधा.

In reply to by मोदक

सर्व संपादक मंडळ विश्रांती अवस्थेत आहे, आणि मी आता संपादक नाही. काही दिवसात नवे +जूने असे संपादक मंडळ येईल. आता मी केवळ एक सदस्य म्हणून मिपा इंजॉय करू इच्छितो.. :) -दिलीप बिरुटे

In reply to by परी१२३४५

सोप्पय! फोटोसाठी
इतर माहिती बदलणे
तुमच्या स्वतःच्या नावावर टिचकी मारा- खात्याच्या पानावर जाउन 'संपादन' मध्ये हवे ते बदल करा ! हाकानाका.

In reply to by परी१२३४५

आमच्या माहितीप्रमाणे मिपावर 'एक्स' कॅटेगरीचे फोटो अपलोडवणे व त्याविषयी माहिती add करणे वर्जित आहे.

एवढ्या कमी वेळात मिळालेल्या प्रतिसादांची संख्या बघुनच कळाले की एकतर धागाकर्त्याला यावर्षीचा भारतरत्न जाहीर झाला असावा त्यामुळे लोकांनी अभिनंदनाची रीघ लावली असावी किंवा आज दंगल होणार. ;) असो. पुलेशु आणि हो अत्रंगी पाऊस यांचे सजेशन विचारात घेण्याजोगे आहे. धागाकर्त्याने याबद्दल शिरीयशली विचार करावा.

In reply to by मृत्युन्जय

इतक्या प्रतिसादांचं खरं कारण हे आहे
ही गोष्ट आहे साधारणपणे ४ - ५ वर्षांपूर्वीची. त्यावेळी मी १२ वी मध्ये होते.

In reply to by काळा पहाड

ह.ह.पु.वा. बर्‍याच दिवसांनी अशा उत्तम दर्जा चा लेख आणि अत्यंत अभ्यासु प्रतिसाद बघायला मिळाले. बरं वाटलं.

In reply to by खेडूत

हाफशेंच्युरी निमीत्त धागाकर्ती कु.परी 12345 आणी श्री.प्रा.डॉ चां सत्कार एक एक स्क्रॅपबुक आणी घड्याळ देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम अविस्मरणीय कार्यकर्ते

In reply to by जेपी

गजराचे असावे अशी प्रेक्षकांतून सूचना आली आहे. आसन क्र १७ बुवांचे शेजारी आणि टक्याचे पाठीमागची लाईन रांग.

In reply to by टवाळ कार्टा

सल्ल्यापेक्षा कृती करा. मग धुवून देणे, ही नम्र विनंती.

In reply to by सूड

ज्याने करावे त्यानेच धूवावे (किंवा पुसावे...पुसावे वरून आठवले....कुठे गेल्या त्या तै?)

मकरंद अनासपुरे सरांचा अनासपुरे सर कधी झाले? मुक्त॑पीठ मोड ऑन - हलकेच घेणे. पंडित शिवकुमार शर्माजी यांच्या डायरीतले एक पान - (सर्वाना कळावे म्हणून मराठीत भाषांतर करून लिहीतोय). दि. ३१ डिसेंबर- च्यायला आज सकाळपासून कायतरी पनौती लागली होती. ३१ डिसेंबर साजरा करावा म्हणून प्लान केला होता पण नेमके कुठल्यातरी शिक्षण संस्थेत बोलावणे होते. सकाळीच उठून सेक्रेटरीला हे निमंत्रण घेतल्याबद्दल झा॑ड झाड झाडला. ही शैक्षणिक संस्था दरवर्षी मान्यवरांना बोलावते आणि आम्हाला मानधन न देता उलट आमच्याकडूनच देणगीची अपेक्षा करते.आता शैक्षणिक संस्थेत कार्यक्रम म्हणजे चांगले कपडे घालणे आलेच. आधीच माझी संतूर काही दिवसांपुर्वी प्रवासात गहाळ झाली तो एक खर्च आहेच आता नवीन कपड्यांवर खर्च. गेलो मग नवीन कपडे घालून. थोडाफार मेकप केला आणि चेहर्‍यावर तेज आणले. अतिशय वैतागलो होतो. मुद्दामून उशीराच गेलो थोडासा. जसा कार्यक्रमाला गेलो तर ही गर्दी माझ्या मागे. नुसताच गोंधळ. एकदम एका मुलीने पायावर डोके ठेवले आणि नंतर भूत बघीतल्याचे भाव आणून माझ्याकडे पहात राहीली. काही क्षणांनी अचानक पेन आणि कागद माझ्यापुढे ऑटोग्राफसाठी धरले. नुसता कागद पाहून डोक्यात तिडीक गेली. निदान चांगली डायरी तरी आणायची ना सही घेण्यासाठी. हल्लीच्या पिढीला काहीच कळत नाही. हा कागद नंतर माझ्या सहीसकट कोठेतरी गहाळ नक्कीच होणार. त्यापेक्षा ठरवले की काही झाले तरी सही नाही द्यायची. उगाच बळे-बळे चेहर्‍यावर हसू आणले आणि त्यामुलीला बाजूला करण्याच्या निमित्ताने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि मारला एक काहीतरी डॉयलॉग. त्या मुलीच्या डोळ्यातून पाणी यायचे बाकी होते. कार्यक्रम केला मग . मध्ये हळूच एकदोनदा त्या मुलीकडे पाहीले तर तिला माझी सही मिळाली नाही याचे काहीच न वाटता उगाच आजूबाजूच्या लोकांना मी काय सांगितले ते सांगत असावी असे वाटत होते. आता ह्यानंतर कोठल्याही सेलेब्रीटीला आटोग्राफ मागण्यासाठी ही कधीच छळणार नाही हे मात्र पक्के... मुक्त॑पीठ मोड ऑफ - हलकेच घेणे.

In reply to by योगी९००

अग बाई, अस्स झाल होय.बर झाल तुमी सांगितलं.नाहीतर इतके वर्ष मी उगीचच भलत्याच भ्रमात होते कि हो. योगी९०० तुमच्या कल्पना शक्तीला मनापासून दाद.

In reply to by परी१२३४५

तुमच्या कल्पना शक्तीला मनापासून दाद. आभारी आहे. हलकेच घेतल्याबद्दल धन्यवाद. सहज गंमत म्हणून लिहीले आहे. बाकी तुम्ही अजुन बर्‍याच कलाकारांना भेटला हे वाचून थोडी जळजळ झाली. त्या जळजळीतूनच वरील प्रतिसाद आला आहे असे समजा.

In reply to by योगी९००

सहज गंमत म्हणून लिहीले आहे. पण खरच तुमच हे लेखन विचार करण्याच्या पलीकडचे आहे.असा कधीच कुणी विचारच केला नसेल.मलाही वाटल नव्हत.या लेखाला असाही प्रतिसाद येईल. पण छानच आहे

In reply to by परी१२३४५

आहो हे काहीच नाही. माझ्यापेक्षाही शतपटीने चांगला विस्तार करू शकतील असे लोकं मिसळपाववर आहेत्... मि.पा.वर तुमचे स्वागत - हे लिहीण्यास विसरलो.