(सैनिक हो,तुमच्यासाठी ह्या गाण्याचा आधार घेऊन)
आज जणू झालो आम्ही सचीन तेंडूलकर
दोन शतके लेखनाची लिहूनी मिपावर
येती हे शब्द तुम्हा सांगण्या अमुच्या ओठी
वाचक हो, तुमच्यासाठी
लिहीत लिहीत आम्ही नित्यकर्म अवघे करतो
वाचतो अपुल्या क्षेत्री लेखनाची स्फुर्ती घेतो
परी आठव येता तुमची प्रेरणा स्फुरतसे बोटी
वाचक हो, तुमच्यासाठी
आराम विसरलो आम्ही आळसा मुळी न थारा
राहूनी पश्चिम देशी लक्ष अमुचा मायदेशा सारा
आठवणी तिकडच्या येऊनी डोळ्यात होतसे दाटी
वाचक हो, तुमच्यासाठी
उगवला दिवस मावळतो अंधार दाटतो रात्री
विषय अनेक जमती काय लिहू याची नसे खात्री
स्वपनात येऊनी कविता काळजा खुलविते देठी
वाचक हो, तुमच्यासाठी
रक्षिता लेखन स्वातंत्र्या कायदा घेऊनी हाता
तुमच्यास्तव आमुची लेखने तुमच्यास्तव कविता
एकट्या लेखकासाठी वाचने अनंत होती
वाचक हो, तुमच्यासाठी
वाचक होss तुमच्याssसाठीsss
आज २४ नो.२००८ रोजी आम्हाला मिपा वर लेखन करून २२ आठ्वडे ६ दिवस(१६०दिवस) झाले.
आमच्या २०० लेखनानंतर हे २०१ वं लेखन आहे.
दोनशे लेखनांची,
एकूण ४५,००० वाचनं झाली.
एकूण १,१६० प्रतिक्रिया दिल्या गेल्या.
एकूण १४८ लेखनावर प्रतिक्रिया होत्या.
त्याची ३५,००० वाचनं झाली
एकूण ५२ लेखनावर एकही प्रतिक्रिया दिली गेली नाही.
त्याची १०,००० वाचनं झाली.
प्रतिक्रियेच्या काही गमती आणि जमती----
अनुवादीत कवितेवर एक दोन वाचकांच्या खरमरीत टिका झाल्या.अनुवाद करूच नका इतपर्यंत.अशी प्रतिक्रिया वाचून वाईट वाटलं.बहुतेक कविता हिंदी गाण्याच्या होत्या.
अनुवादावर प्रशंसनीय प्रतिक्रियाही झाल्या.माहित नसलेल्या एक दोन मुळ कविता वाचायला आग्रह झाला.वाचून झाल्यावर
"आपली अनुवादीत कविताच जास्त आवडली "
अशी प्रतिक्रिया दिली गेली.हे वाचून अर्थात बरं वाटलं.
" मनुष्यप्राणी हा मुलतः शाकाहारी"
ह्या लेखनावर सर्वात जास्त वाचनं होती-१२०१ आणि सर्वात जास्त प्रतिक्रिया होत्या -७२
"आमची पन्नासावी लग्नगाठ"
ह्या लेखावर वाचने होती ----७१२
आणि प्रतिक्रिया होत्या---५९
बहुतेक वाचकानी खूप प्रेम केलं.खूप प्रेरणा दिल्या. त्यामुळे अधिक लेखन करायला हूरूप आला.
प्रशंसनीय प्रतिक्रिया बर्याच असतात.कारण कुणाची ही निर्मिती योग्य वाटल्यास प्रशंसा करणं हे चांगलं काम आहे.म्हणून चांगलं करणारे जगात नेहमीच बहूमतात असतात.
माझे सर्व वाचक आणि अन्य सर्व लेखक माझे "मायबाप " आहेत अशी माझी धारणा आहे.त्यामुळे त्यानी केलेल्या प्रशंसनीय किंवा अप्रशंसनीय प्रतिक्रियेचा मी सारखाच आदर करतो.प्रशंसनीय प्रतिक्रिया मला आनंद देतेच पण त्याबरोबरीने माझी पुढील लेखनं त्यांना अशीच आवडत राहावी यासाठी लिहिण्याची माझी जबाबदारी वाढते असं नेहमीच मी मनात आणित असतो.
आणि अप्रशंसनीय प्रतिक्रिया मला माझ्या पुढील लेखनात सुधारणा करायला आव्हान देते.ही पण दुसर्या प्रकारची जबाबदारी आहे असं समजून मी माझ्या दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया देणार्या वाचकाबद्दल मनात आदर बाळगून असतो.
मला मिळालेल्या प्रतिक्रियेत जो टिकेचा भाग असतो,त्याला माझ्या दृष्टीने समर्पक उत्तर द्दायला मी नेहमीच प्रयत्न करतो.कधीकधी माझ्याकडून ही अवास्तव लिहलं जात असेल. पण माझे वाचक एव्हडे प्रेमळ आहेत की ते मला समजून घेतात.आणि प्रेमापोटी मला माफ करतात.हा त्यांचा मनाचा मोठेपणा असावा.
जे माझ्या लेखाला प्रतिसाद देतात ते प्रेमापोटी वेळात वेळ काढून तसं करतात.असा त्यांच्या जागी जाऊन मी विचार करतो.त्यामुळे त्यांच्या प्रतिसादाला मी प्रतिसाद दिला नाही तर मी माझ्या कर्तव्याला चूकेन आणि ती माझी त्यांच्या बद्दल बेपर्वाई होईल ह्याची मनात भिती ठेऊन तसं करतो.
मी पण इतर लेखकांच वाचन वाचतो.आणि मनस्वी लेखन आवडल्यास माझा प्रतिसाद देतो.
निव्वळ शब्दाचं वाचन बरेच वेळा अनर्थाला आमंत्रण देतं.हे चांगलं लक्षात ठेवून राहणं ही संस्थळाच्या वाचनाची क्लृप्ती आहे.
एकंदरीत जे मनात आलं ते निःशंकोच लिहिलं एव्हडंच.
मला मिपावर एव्हडं लेखन करूं दिलं त्या मिपाकारांचे मी जर आभार मानले नाहीत तर ते माझं पाप होईल.
आणि प्रा.डॉ. दिलीप बिरुट्यांनीच मला इथे लिहायला शिफारस केली त्यांना विसरून कसं चालेल.?
सूर समाधानाचा आहे,पण उत्साह स्वस्थ बसू देईल का सांगता येत नाही
श्रीकृष्ण सामंत
वाचने
9451
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन
अभिनंदन
सहमत आणि अभिनंदनही
In reply to अभिनंदन by सहज
आभार
In reply to सहमत आणि अभिनंदनही by ३_१४ विक्षिप्त अदिती
आकडे बोलले
असेच म्हणतो...
In reply to आकडे बोलले by कपिल काळे
पहिले तीन
कुतुहल
In reply to पहिले तीन by कपिल काळे
सामंतकाका,
एक विनंती -
In reply to सामंतकाका, by चित्रा
अभिनंदन
In reply to एक विनंती - by विसोबा खेचर
+२
In reply to अभिनंदन by बिपिन कार्यकर्ते
आभार
In reply to +२ by टारझन
नाममात्र
In reply to एक विनंती - by विसोबा खेचर
+१
In reply to सामंतकाका, by चित्रा
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
In reply to सामंतकाका, by चित्रा
+१
In reply to सामंतकाका, by चित्रा
आभार
In reply to +१ by धनंजय
आभार
In reply to सामंतकाका, by चित्रा
एका
आवडती कविता
In reply to एका by अवलिया
या द्विशतकवीराला मानाचा मुजरा!!!
अभिनंदन
असेच म्हणतो
In reply to अभिनंदन by अभिरत भिरभि-या
अभिनंदन++
आभार
In reply to अभिनंदन++ by परिकथेतील राजकुमार
सामंतकाका त्रिशतक पायजे !!
आव्हान
In reply to सामंतकाका त्रिशतक पायजे !! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अभिनंदन !!!
आकडेवारीबद्दल
In reply to अभिनंदन !!! by छोटा डॉन
खर्म समर्थन
In reply to आकडेवारीबद्दल by ३_१४ विक्षिप्त अदिती
मनोरंजक आकडेवारी
In reply to अभिनंदन !!! by छोटा डॉन
असेच म्हणतो
आणि
In reply to असेच म्हणतो by घाटावरचे भट
सामंतकाका,
अभिनंदन !!
आभार
In reply to अभिनंदन !! by अनिल हटेला
अभिनंदन !!
१+
In reply to अभिनंदन !! by जयवी
अभिनंदन!
सामंतकाका,
वा सांमत काका
सामंतकाका,
सामन्त
सर्वांचे आभार
शुभेच्छा!
आभार
In reply to शुभेच्छा! by मनस्वी
अभीनंदन
२०१ वे लेखन...
४८+
In reply to २०१ वे लेखन... by नि३
सामंत साहेब
५०!
आभार
In reply to ५०! by कवटी
आभार
सामन्त साहेब
सामन्त साहेब
सामंत साहेब
अभिनंदन आणि अभिवादन