Skip to main content

नरेंद्र मोदींचे परदेश दौरे ,जनतेच्या पैशांची उधळण??????

लेखक ग्रेटथिंकर यांनी सोमवार, 18/05/2015 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
नरेन्द्र मोदी सध्या दक्षिण् कोरियाच्या दौर्यावर आहेत.गेल्या 365 दिवसांपैकी 56 दिवस ते देशाबाहेर राहीले आहेत.मोदींनी एका वर्शात जवळपास 17 देशांचे दौरे केले आहेत.प्रश्न असा आहे कि या दौर्यातुन देशाला काय फायदा होतोय ?जी काही तुट्पुंजी गुंतवणुक होते आहे ती प्रामुख्याने गुजरातमध्ये होत आहे. या दौर्याम्ध्ये मोदी खैरातीसारखे पैसे वाटत सुटले आहेत,नुकतिच त्यांनी मंगोलिया या सामरीक महत्व शुन्य असलेल्या देशाला एक अब्ज डॉलरची मदद जाहिर केली आहे.या दौर्यावर होणार्या खर्चाची माहीती देशातील जनतेला मिळायला हवी ,परंतु नुकत्याच काळात मन्सुर दार्वेश या RTI कार्यकर्त्याने pmo कडुन या दौर्याची माहीती मागवली असता त्यांना अत्यंत तुट्पुंजी माहीती देन्यात आली,या दौर्यात कितीजण सामील असतात, त्यांचा खर्च कीती येतो यावर् चकार शब्द नाही.या संर्दभातली बातमी मिड् डे या व्रुत्तपत्रात आली आहे. http://www.mid-day.com/articles/pmo-clams-up-about-money-spent-on-modis… An RTI filed by Mumbai resident Mansoor Darvesh about the delegates who accompanied PM Narendra Modi on his foreign visits and the amount of money spent on those tours has opened a Pandora’s box. The Prime Minister’s Office claims it doesn’t have records of the delegates and the financial details are “too wide and vague”. Opposition leaders claim the government is refusing to share information fearing public outcry Prime Minister Narendra Modi’s foreign visits have been the talk of the town ever since he became the country’s PM in May 2014. While he has managed to win over the hearts of a few, there are many who wonder how much of the common man’s hard-earned money has been used to sponsor these trips. Mumbai resident Mansoor Darvesh filed a Right to Information (RTI) plea on December 24, 2014 demanding to know the number of foreign visits Modi has made from May 2014 to November 30, 2014, the delegates who have accompanied him and the amount spent on these trips. The reply that he got from the Prime Minister’s Office (PMO) was far from satisfactory. स्वत्:ची जागतीक नेता अशी ईमेज बनवण्याचा हास्यापद प्रकार मोदी करत आहेत ,व त्यासाठी सर्वसामाण्य जनतेच्या पैशांचा वापर होतो आहे,व जनतेला खर्चाचा तपशिल न देता अंधारात ठेवले जात आहे.

वाचने 76132
प्रतिक्रिया 259

प्रतिक्रिया

In reply to by श्रीरंग_जोशी

"[एक साल पहले तक] आप लोगोंने विदेशों मे रहके कैसा समय बिताया था? 'हिंदूस्तान के हो? '['चला पुढे' अशा अर्थाची अ‍ॅक्शन] ऐसाही होता था |हूं, इन्डिया से हो....[झटकल्याची अ‍ॅक्शन]अरे, चलो, चलो यार.. ऐसाही होता था की नही होता था? कोई पूछने को तयार था क्या? कोई सुनने को तयर था क्या? कोई देखने को तयार था क्या ? एक साल के भीतर भीतर, आप सीना तान के, ऑख मे आँख मिला के दुनिया से बात कर पाते हो यानही कर पाते हो ? दुनिया आप को संभार से देखती है या नही देखती है? आप को स्वयंके भारत के प्रगतीपे गर्व होता है के नही होता है? भाईयों और बहेनो, जनता जनार्दन ईश्वर का रूप होता है | जनता जनार्दन परमात्मा का रूप होता है | जनता जनार्दन को एक तीसरा नेत्र होता है | सामूहिक विलक्षण बुद्धीशक्ति होती है | और वो अपने तत्कालिन निजी हितों को छोडकर के भी, 'सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय' संकल्प लेकर के कदम उठाता है | हिंदूस्तान के कोटीकोटी जनों ने एक सामूहिक शक्ति का परिचय दिया | हिंदूस्तान के कोटीकोटी जनों ने एक सामूहिक इच्छाशक्ति का परिचय दिया |कोटीकोटी जनों ने एक सामूहिक संकल्प का परिचय दिया |और सव्वासो करोड देशवासी अपना भाग्य बदलने कृत्संकल्प हो गये | और तब जा कर के, पोलींगबूथ मे बटन दबा कर के इतना बडा फैसला कर दिया | ....." हा तो भाग असावा का? येथे पहावे [सुमारे ३६:३० पासून ३९:३० पर्यंत] https://www.youtube.com/watch?v=1nAvynK5q8U ह्यात नक्की आक्षेपार्ह काय आहे. मोदींनी परदेशात जाऊन देशाची, किंवा देशातील काहीजणांची निर्भत्सना केली असा एक प्रचार सर्रास केला जात आहे. हे ते सर्व जे सांगत आहेत, ते आपल्या बांधवांसाठीच आहे. त्यांनाही ते सर्व ठाऊक आहेच (कुणाकुणाची वैयक्तिक मते यदाकदाचित भिन्न असू शकतील, तोभाग निराळा). ही विधाने त्यांनी परदेशीयांना संबोधून केलेली नाहीत, आप्तस्वकीयांसाठीच (म्हणजे देशबांधवांसाठीच) केलेली आहेत. ह्यात काही अनौचित आहे असे मलातरी वाटत नाही. आता वर दिलेल्या बातमीतील भाग ह्यात नक्की कसा, कुठे आला हे मलातरी समजत नाही.

In reply to by प्रदीप

"[एक साल पहले तक] आप लोगोंने विदेशों मे रहके कैसा समय बिताया था? 'हिंदूस्तान के हो? '['चला पुढे' अशा अर्थाची अ‍ॅक्शन] ऐसाही होता था |हूं, इन्डिया से हो....[झटकल्याची अ‍ॅक्शन]अरे, चलो, चलो यार.. ऐसाही होता था की नही होता था? कोई पूछने को तयार था क्या? कोई सुनने को तयर था क्या? कोई देखने को तयार था क्या ? यात काहीच खोटे नाही... दुर्दैवाने ! आणि भारतियांना अशी वागणूक देण्यात भारतिय वकिलाती आणि एअर इंडिया सारख्या सरकारी कंपन्या सर्वात पुढे असत (?असतात) यापेक्षा अजून दुर्दैवी ते काय ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एक अवांतर एक्का काकांच्या प्रतिक्रियेस अनुसरुन,
यात काहीच खोटे नाही... दुर्दैवाने ! आणि भारतियांना अशी वागणूक देण्यात भारतिय वकिलाती आणि एअर इंडिया सारख्या सरकारी कंपन्या सर्वात पुढे असत (?असतात) यापेक्षा अजून दुर्दैवी ते काय ?
मग आता असे काही पाहण्यात आहे का की खालील वाक्यास दुजोरा द्यावा ?
एक साल के भीतर भीतर, आप सीना तान के, ऑख मे आँख मिला के दुनिया से बात कर पाते हो यानही कर पाते हो ? दुनिया आप को संभार से देखती है या नही देखती है? आप को स्वयंके भारत के प्रगतीपे गर्व होता है के नही होता है?
माझ्या अनुभव आणि माहितीप्रमाणे वकिलाती व एअर इंडियासारख्या सरकारी कंपन्या यांच्यात तसा काही बदल नाहीय. एका वर्षात याबाबतीत लगेच जादूची अपेक्षा नाही आणि तसे घडलेलेही नाही.

In reply to by हाडक्या

वर उधृत केलेल्या दुसर्‍या पॅर्‍यातील प्रश्न "भारतियांना... (अ) भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेत झालेल्या बदलाबाबत काय वाटते ? आणि (आ) परदेशी नागरिकांशी संवाद साधताना (निदान आंतरराष्ट्रिय घडामोडींबद्दल माहिती असणारे परदेशी नागरीक... कारण परदेशातही भारताइतक्याच टक्केवारीने आंतरराष्ट्रिय घटनांबद्दल अज्ञानी असलेले नागरीक आहेत असा अनुभव आहे ! ;) ) भारताबद्दल किती अभिमान वाटतो, आणि तो प्रकट करताना गैरसोईचा वाटतो का ?" ... असा आहे. आणि त्या प्रश्नांचे उत्तर... "(अ)गेल्या एका वर्षात भारताची जागतिक प्रतिमा बरीच सुधारली आहे आणि (आ) भारतियांना त्यांच्या देशाचे नाव सांगताना अवघडल्यासारखे वाटावे अशी परिस्थिती नक्कीच राहिली नाही." ... असे आहे.

In reply to by सभ्य माणुस

आधीचे पंतप्रधान पण काही कमी फिरलेले नाहीत. त्यांना पण एन आर आय जाहीर करायचे का? त्यांनी नक्की काय साध्य केले ते पहायला हवे... भारत-चीन व्यापार उदीमात, २००१ साली चीन $१ बिलियन ने वरचढ होता. तो २०१४ पर्यंत $३८ बिलियन्स ने झाला. त्याचे कारण काय असावे? आता बातम्यांप्रमाणे मोदींनी $२२ बिलियन्सची गुंतवणूक आणली आहे. बातम्यांमधून आत्तातरी सगळे नीट कळलेले नाही. पण त्याचा (+/-) परीणाम पहाण्यासाठी वेळ देयला हवा. तेथे इतर कोणी असते तरी वेळ द्यावाच लागेल आणि मोदींच्या बाबतीतही वेळ द्यावाच लागेल.

In reply to by विकास

कशाला प्रत्त्युत्तरात वेळ घालवत आहात..? आता बातम्यांप्रमाणे मोदींनी $२२ बिलियन्सची गुंतवणूक आणली आहे. बर्रर्र.. गुंतवणूक आणली. उद्योगधंदे चालू झाले का..? उद्या उद्योगधंदे सुरू झाल्यानंतर मराठी माणसाला फायदा झाला का..?? यावर समजा तुम्ही म्हणालात भारतीयांचा फायदा झाला. भारतीय वगैरे सोडा.. फायदा अंबाने/अडानीचाच झाला. ...आणि सगळ्या प्रश्नांना योग्य उत्तरे दिली तरी २००२ मध्ये गुजरातमध्ये मोदींनी हत्याकांड घडवले आणि १९४८ ला संघाने गांधीजींना मारले असले युक्तीवाद अजुनही होत आहेतच. सोंग घेतलेल्याला किती जागे करणार..??

In reply to by मोदक

सहमत... त्याच्यापेक्षा आपल्या कटोर्‍यात काय पडतं हे बघणे जास्त महत्त्वाचे. हे ट्रोलर्स काही दिवसांचेच सोबती आहेत. शेवटी सगळ्यांनाच या टोमणेबाजीचा आणि निरर्थक गप्पांचा कंटाळा येईल. आणि आपला अमुल्य वेळ देशकार्यात लावतील अशी अपेक्षा आहे. उद्योगधंद्यांसाठी ७५ परवानग्यांची संख्या २५वर का काय आलीये म्हणे. अशा काही सकारात्मक व सामान्य माणसांच्या उपयोगाच्या बातम्या पसरू नये, त्यावर चर्चा होऊ नये म्हणून असले ट्रोल्स सोशल मिडीयावर फिरत आहेत बहुतेक.

In reply to by संदीप डांगे

घंटा २५ वर आलीये परवानगी. ४० परवानग्या मिनिमम लागतात मॅन्युफॅक्चरिंग मधे. लेबर लॉ वगैरे सोडुन.

डांगे साहेब, दुसर्यांना ट्रोल म्हणता म्हणता तुम्ही स्वत:च या धाग्यावर ट्रोलिंग करत आहात.एखाद्याने फॅक्ट्स मांडल्या की तो लगेच ट्रोल ठरतो काय?

In reply to by ग्रेटथिंकर

हैला... मै करू तो साला कॅरेक्टर ढीला है| असो. ती परवानग्यावाली बातमीच शोधतोय अजून. आजकाल हे पत्रकारबी इतले चालू झालेतना... उघड्यावाघड्या पोरी अशा समोर समोर आणि कामाच्या बातम्या बसा शोधत. बाकी तिकडून आली ती गुंतवणूक 'तुटपूंजी' आणि इकडून गेली ती मदत म्हणजे 'खैरात' असं म्हणून आपण फॅक्ट्स मांडताय. चांगलंय. चालू द्या तुमचं फॅक्ट्समांडणींग...

लेख आवडला आणि काही मंडळींची मतं पण आवडले.आणखी एक सांगायचे आहे महाराष्ट्रात गुंतवणूक करतांना फक्त ती "पुणे आणि मुंबई" पुरती मर्यादित नसावी,किती तरी वर्षे झाली नागपूरला "मिहान" प्रकल्प सुरू करून पण काम तसेच रखडलेले आहे.

शेंच्युरी निमीत्त श्री.ग्रेटथिंकर यांचा सत्कार परदेशी दोर्यावर पाठवुन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम ट्रोलभैरव कार्यकर्ते.

In reply to by जेपी

शेंच्युरी निमीत्त श्री.ग्रेटथिंकर यांचा सत्कार परदेशी दोर्यावर पाठवुन करण्यात येत आहे.
नॉर्थ कोरियाच्या

In reply to by होबासराव

मानलं तुला...
परदेशी दोर्यावर पाठवुन
परदेशी दोरी दिल्याबद्दल खा बोलणी आता आणि हो ही दोरी का दोर्या (?) परत द्यायच्या बोलीने आणायच्यात! तसं आधिच सांग वैकुंठ परगमन सुवीधा भांडार एकदा विकलेला माल परत घेत नाही उगीच मंडळाला भुर्दंड नको! लेखा-कारकून अभामिपामांकासमिती अंतर्गत धागासुलभसेवास्तकार्समितीसाठी.

नमोंना नम्र विनंती आहे की यापुढे, परदेशी जाण्यापूर्वी, मिपावरील जाणकार मंडळींचा सल्ला घ्यावा. म्हणजे ते सारखं, "परदेसी, परदेसी जाना नही" हे गाणं म्हणणार नाहीत.

मोदी सरकार आणि ममोच दुसर सरकार सारखेच अपयशी आहेत . फरक इतकाच आहे की आपल्या सरकारच प्रत्येक निर्णय/कृती कसा बरोबर आहे ते अहम्हिकेने सांगणारे भक्त ममो सरकारकडे नव्हते

In reply to by पिंपातला उंदीर

आपण जे काही बोलत आहात त्यात जळजळच जास्त जाणवली. मनमोहन सरकार सलग १० वर्षे सत्तेवर होते. यातील पहिली पाच वर्षे खराब नव्हती (म्हणजे छान होती असे आजकाल काही जण म्हणतात. त्याला फारतर पुढच्या पाच वर्षाच्या मानाने रामराज्यासारखी होती असे म्हणता येइल). पण नंतरची पाच वर्षे मनमोहन सरकारने सर्वात गचाळ कारभाराचा नमुना पेश केला: १. पुर्वी घोटाळ्यांची रक्कम काही कोटींच्या घरात असायची. हळुहळू त्याची व्याप्ती वाढत जाउन ती काही लाखांच्या घरात गेली. २. ममो सरकार बरेच डिनायल मोड मध्ये गेले. त्यात परत सहकारी पक्षांचे दात त्यांच्याच घशात घालण्याच्या घोळात २जी घोटाळा वेळेत निस्तरता नाही आला. वस्तुतः २ जी घोटाळा जितका वाढवुन चढवुन सांगितला गेला तेवढा मोठा तो नव्हताच. सगळा खेळ नॉशनल आकड्यांवर होता. त्यालाही "जनहितार्थ" प्रतिवादाची तोड होतीच. ती नीट कोणीच समजावुन सांगितली नाही. २ जी घोटाळ्यापेक्षा मोठा गोंधळ सगळ्या कंपन्यांचे लायसंस रद्द करुन घातला गेला. यात ज्या कंपन्यांना क्लीन चीट मिळाली होती त्याही आल्या. म्हणजे गोंधळ घातला सरकारने आणि शिक्षा केली कंपन्यांना. यामुळे ममो सरकार कॉर्पोरेट लॉबी आणी परदेशी गुंतवणुकदारांचा विश्वास गमावुन बसली. ३. व्हॉडाफोन केस आणि रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट ने कायद्यात बदल हा तर परदेशी गुंतवणुकदारांचा सर्रास विश्वासघात होता. भारतात गुंतवणूक करण्याची परदेशी गुंतवणुकदारांची इच्छाच मेली. संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आणि त्याचाच परिपाक म्हणुन भारताचे रेटिंग डाउनग्रेड झाली. ४. ममो सरकार काही ठोस परराष्ट्र धोरण ठरवण्यात साफ अपयशी ठरले. काही ठाम धोरण ठरवणे म्हणजे उठसुठ लढाया करणे नाही. पण व्युहात्मक काहिही हालचाली केल्या गेल्या नाहित. देवयानी केससुद्धा यांना धडपणे हाताळता आली नाही. ५. ममो सरकारची ट्रांसपरंसी अजिबातच नव्हती. वेळोवेळी आपल्या कार्याची माहिती लोकांपर्यंत पोचवण्याचे कष्ट त्यांनी कधी घेतलेच नाहित. एवढाला खर्च केला जाहिरातींवर तो फक्त बाईंवर फोकस करुन. आता कुठलीही गोष्ट नमोंनी जाहिर केली की हे लोक ओरडत येतात आम्ही हे आधीच केले आहे (सग्ळेच केले आहे असे नाही). पण जर ते लोकांपर्यंत पोचलेच नसेल तर उपयोग काय त्याचा डोंबलाचा? ६. नमो सरकारने (अजुनतरी) एकही घोटाळा केलेला नाही असे असताना त्यांची आणि ममो २ ची तुलना कशी होउ शकते हेच कळत नाही. ७. ममो २ ने ५ वर्षे पुर्ण केली. ममो सरकारने १० वर्षे. या काळात देश ५० वर्षे मागे गेला. देशाची प्रतिमा खालावली, गुंतवणुकदार दूर झाले, नागरिक संभ्रमित झाले. नमोंनी आत्ताशी १ वर्ष पुर्ण केले आहे. त्यांचा ५ वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाल्यावर काही तुलना करता येइल. ८. कुठलाही देश चालवताना "फील गुड फॅक्टर" अतिशय महत्वाचा असतो. त्याला जर कृतीची जोड मिळाली नाहितर तो इतका इफेक्टिव्ह ठरत नाही. पण तो नसेलच तर सगळे मुसळ केरात जाते. नमोंनी नेमके ते साधले आणि ममो सरकारने निराशेचे वातावरण तयार केले. आहे रे आणि नाहि रे मधला फरक आहे हा. आज देशाची प्रतिम सर्वदूर सुधारली आहे. परदेशातल्या लोकांचे याबाबतीतले अनुभव फार महत्वाचे ठरतील. कामाच्या अनुषंगाने माझी बर्‍याच परदेशी गुंतवणुकदारांशी आणि बँकर्शशी चर्चा होते. त्यावेळेस त्यांचा बदललेला दृष्टिकोन जाणवतो. हा एक फार मोठा फरक आहे. याच्यावर विकासाचे इमले बांधायला वेळ लागेलही. ते जर मोदी सरकारला साधले नाहितर ते फेल. जमले तर पास. पण हे ठरवण्यासाठी त्यांना वेळ देणे भाग आहे. एका वर्षात बदल घडवुन आणायला मोदी काही जादूगार नाहित. अवांतरः मी पुर्वी जे लिहिले होते तेच परत लिहितो. ममो सरकारने लोकांमधली विश्वासच हिरावुन घेतला आणि मोदींनी अवास्तव अपेक्षा निर्माण केल्या. दोन्हीही घातकच. त्या अवास्तव अपेक्षा पुर्ण करणे मोदींना कधीही जमणार नाहिये. काश्मीर मुद्दा, मंदिर हे असेच अनेक वर्षे घोळत राहणार. माझ्या त्या अपेक्षा या सरकारकडुन कधीच नव्हत्या.. त्यामुळे मला फरक पडत नाही. ज्यांनी या अपेक्षा ठेवल्या असतील् ते लोक शिव्या घालतील. मोदी सरकारचे मुल्यमापन करण्यासाठी विकास, परकीय गुंतवणुक, उद्योगजगताची प्रगती, परराष्ट्र धोरण या गोष्टींची सांगोपांग चर्चा होणे गरजेचे आहे. मोदी सरकार केंद्र सरकार आहे, म्युनिसिपाल्टी किंवा नगरपरिषद नाही हे या देशातील लोकांनी समजुन घेणे गरजेचे आहे आणि थोडेसे नागरिकशास्त्र शिकुन कोणाकडुन काय अपेक्षा कराव्यात हे ही समजले पाहिजे. नपेक्षा तुमच्या गल्लीतल्या रस्त्यावरच्या खड्ड्ञांसाठी तुम्ही मोदी सरकारला दोष देणार असाल तर ते तुमचे दुर्दैव, मोदी सरकारचे अपयश नाही.

In reply to by मृत्युन्जय

२जी घोटाळ्यात कंपन्यांचे लाय्संस सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले सरकारने नाही हे मला माहिती आहे. मूळ मुद्दा तो नाही. एकुण प्रकरणात सरकारचे मौन आणि गुळुमुळु भूमिका यामुळे झालेले नुकसान याबद्दल मुद्दा आहे.

In reply to by मृत्युन्जय

अहो, IPC 66A विसरलात का? अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर हल्ला करणारा एवढा मोठा कायदा काँग्रेस्नी आणलेला. कॉंग्रेसभक्तांकडनं कधी विरोध ऐकला का कधी?

In reply to by मृत्युन्जय

अवांतरः मी पुर्वी जे लिहिले होते तेच परत लिहितो. ममो सरकारने लोकांमधली विश्वासच हिरावुन घेतला आणि मोदींनी अवास्तव अपेक्षा निर्माण केल्या. दोन्हीही घातकच. त्या अवास्तव अपेक्षा पुर्ण करणे मोदींना कधीही जमणार नाहिये. काश्मीर मुद्दा, मंदिर हे असेच अनेक वर्षे घोळत राहणार. माझ्या त्या अपेक्षा या सरकारकडुन कधीच नव्हत्या.. त्यामुळे मला फरक पडत नाही. ज्यांनी या अपेक्षा ठेवल्या असतील् ते लोक शिव्या घालतील. मोदी सरकारचे मुल्यमापन करण्यासाठी विकास, परकीय गुंतवणुक, उद्योगजगताची प्रगती, परराष्ट्र धोरण या गोष्टींची सांगोपांग चर्चा होणे गरजेचे आहे. मोदी सरकार केंद्र सरकार आहे, म्युनिसिपाल्टी किंवा नगरपरिषद नाही हे या देशातील लोकांनी समजुन घेणे गरजेचे आहे आणि थोडेसे नागरिकशास्त्र शिकुन कोणाकडुन काय अपेक्षा कराव्यात हे ही समजले पाहिजे. नपेक्षा तुमच्या गल्लीतल्या रस्त्यावरच्या खड्ड्ञांसाठी तुम्ही मोदी सरकारला दोष देणार असाल तर ते तुमचे दुर्दैव, मोदी सरकारचे अपयश नाही. ह्याच्याशी दणकून सहमत . सांगायचा मुद्दा हा होता की कुणी ही आल तर जादूची कांडी फिरणार नाही . आणि किमान भारतात तरी कुठल्याही दोन सरकार मध्ये गुणात्मक फरक फारसा नाही . सीमेवर सैनिक छप्पन इंची सीना वाले सत्तेत असले तरी मरणार ममो असले तरी मरणार . चीनची लुडबुड चालू राहणार . बाकी गडकरींच्या पूर्ती प्रकरणावर बवाल सुरु होऊन आगाज तर झाला आहे . मोदी मंत्रिमंडळात बलात्काराचा आरोप असणारा इसम मंत्री आहे त्यामुळे राजकारणाच्या गुन्हेगारीकारणात त्यांचा पण हातभार आहेच . बाकी अनेक corruption विरुध्द काम करणाऱ्या संस्थाची काम अधिकारी नसल्याने खोळमब्ल्या आहेत आणि त्यांचे काम ठप्प पडले आहेत . मोदी यशस्वी झालेत तर ते हवेच आहेत . शेवटी माझ्या इगो पेक्षा देशहित महत्वाचे . पण इथल्या भक्तांचे वर्तन पाहून वाईट वाटते . रुपयाचा आंतरराष्ट्रीय भाव असो की पेट्रोल दरवाढ असो वा एकूणच दरवाढ उठसुठ ममोना खालच्या पातळीवर जाऊन दोष देणारे लोक मोदी राजवटीत याच गोष्टी होत असताना अळीमिळी चूप आहेत . त्यामुळेच बहुदा भक्त हा तमगा त्यांना मिळाला असेल

In reply to by पिंपातला उंदीर

आणि किमान भारतात तरी कुठल्याही दोन सरकार मध्ये गुणात्मक फरक फारसा नाही आहे गुणात्मक फरक आहेसांगाय्चा८ - १० ओळीत तोच सांगायचा प्रयत्न केला आहे. कदाचित तुमचे त्याकडे दुर्लक्ष झाले असावे. सीमेवर सैनिक छप्पन इंची सीना वाले सत्तेत असले तरी मरणार ममो असले तरी मरणार . चीनची लुडबुड चालू राहणार . सैनिकांच्या मृत्युबद्दल खेद आहे. सामान्य माणूस फक्त तेच करु शकतो. पण सैनिक मरत असताना त्यांना शांती आणि सबूरीचा सल्ला आजकाल द्दिला जात नाही (किमान जाहिररीत्या) याचा आनंद आहे. दूसरी गोष्ट म्हणजे चीनची लुडबुड चालु आहे आणी चालुच राहिल. पण या नविन सरकारने आता चीनबाबत लुडबुड सुरु केली आहे याचा प्रचंड आनंद आहे. नाहितर याच्या आधीच्या लोकांनी फक्त कबुतरे उडवली आणि (स्वतःच्या नाकर्तेपणामुळे) हारल्यावर " वैसे भी वो जमीन बंजर थी" असले अक्कलेचे तारे तोडले. हा फरक तुम्हाला कदाचित लक्षात आला नसावा (चालायचेच) बाकी गडकरींच्या पूर्ती प्रकरणावर बवाल सुरु होऊन आगाज तर झाला आहे . तो आधीपासून सुरु आहे. मला कुठल्याही प्रकारे गडकरींची बाजू घ्यायची नाही. ते दोषी असतील तर शिक्षा होइल. पण नेत्यांवर बवाल सुरु नसलेला पक्ष बरेच दिवस शोधतो आहे. मिळाला तर सांगा. (अगदी कालच्या खास आदमी पार्टी मधल्या नेत्यांबद्दल देखील बवाल सुरु आहेत) पण किमान चांगली गोष्ट अशी की मोदी अविवाहित असल्याने राष्ट्रीय दामाद आता असल्या प्रकरणांमध्ये नसतील किमान. मोदी मंत्रिमंडळात बलात्काराचा आरोप असणारा इसम मंत्री आहे त्यामुळे राजकारणाच्या गुन्हेगारीकारणात त्यांचा पण हातभार आहेच . कोण हा इसम. हे देशाचे दुर्दैव. आधिक माहिती मिळाल्यावर सविस्तर प्रतिक्रिया नक्की देइन. पण अश्या माणसांना सरकारात स्थान दिल्याबद्दल नक्कीच खेद राहिल. पण परत तेच अशी माणसे नसलेला पक्ष दाखवा. अगदी कालच्या खास आदमी पार्टी मधल्या नेत्यांबद्दल देखील बवाल सुरु आहेत. तो पाकुमारवर गेलेला कुमार अश्याच एका प्रकरणात अडकला आहे म्हणे सध्या. बाकी कुठल्या पक्षाचे नाव घेउ नका. सगळ्या पक्षात हेच. त्यातला त्यात मग असा पक्ष शोधावा ज्यात किमान प्रमुख नेता असल्या कुठल्या प्रकरणात नाही. बाकी अनेक corruption विरुध्द काम करणाऱ्या संस्थाची काम अधिकारी नसल्याने खोळमब्ल्या आहेत आणि त्यांचे काम ठप्प पडले आहेत . अच्छा. विदा देता का प्लीज. या त्या स्कॅनर खाली आलेल्या आणी प्राप्तिकराचे विवरण न भरलेल्या संघटना तर नाहित ना? आजकाल स्टिंग सगळे बंद पडले की काय? मोदी यशस्वी झालेत तर ते हवेच आहेत . शेवटी माझ्या इगो पेक्षा देशहित महत्वाचे . मी हा विचार १० वर्षे केला (खरे सांगायचे तर भारतीय जनतेने तब्बल ६० वर्षे केला) पण इथल्या भक्तांचे वर्तन पाहून वाईट वाटते . सगळेच समर्थक भक्त असतात असे नाही. आणि भक्त तसे सगळ्याच पक्षात असतात. मला कुठल्याही पक्षातील प्रचारकी थाटाच्या व्यक्तींची चीड आहे. त्यामुळे आंजावर असले प्रचारकी चाळे बघितले की मी बर्‍याचदा साले काढतो. मोदींना त्यांच्या विरोधकांपेक्षा समर्थकच जास्त गोत्यात आणणार असे दिसते. पण मोदी समर्थक परवडले. ते गुलाम नकोत असे झाले आहे आजकाल. त्यांचे चाळे बघवत, ऐकवत तर नाहितच. मुळात सहनच होत नाहित. कुठल्याही फालतू मुद्यावरुन समर्थन आणि फालतू मुद्द्यावरुन विरोध बघुन चिडचिड होते. त्यापेक्षा भक्त नक्कीच परवडले. रुपयाचा आंतरराष्ट्रीय भाव असो की पेट्रोल दरवाढ असो वा एकूणच दरवाढ उठसुठ ममोना खालच्या पातळीवर जाऊन दोष देणारे लोक मोदी राजवटीत याच गोष्टी होत असताना अळीमिळी चूप आहेत . त्यामुळेच बहुदा भक्त हा तमगा त्यांना मिळाला असेल ममोंना दोष दरवाढीपेक्षा सुद्धा कणाहीन, दिशाहीन सरकार दिल्याबद्दल दिला जातो. सायलेंट मोडवरचे सरकार नको. व्हायब्रेटींग आणि फ्लाइट मोड वरचे चालेल. त्याहुन जास्त म्हणजे प्रत्येक घोटाल सहकारी पक्षांच्या माथी फोडून स्वतः नामानिराळे राहणारे सरकार नको. किमानपक्षी स्वतःची जबाबदारी स्वीकारावी एवढीच अपेक्षा. पंतप्रधान कार्यालय आणि स्वतः पंतप्रधान टेलिकोम आणि कोळश्यासारख्या महत्वाच्या निर्णयांपासुन अनभिज्ञ होते हे अनाकलनीय आहे.. आणि जर ते खरेच तसे होते तर या कणाहीन आणि नियंत्रणविहित सरकारला रामराम ठोकला हे उत्तम झाले.

In reply to by मृत्युन्जय

पण सैनिक मरत असताना त्यांना शांती आणि सबूरीचा सल्ला आजकाल द्दिला जात नाही (किमान जाहिररीत्या) याचा आनंद आहे. असा सल्ला जाहीरपणे कोणी दिला होता सांगू शकाल काय ? मला खरच माहित नाही . बाकी सीमेवर सैनिक मारत असताना शरीफ यांच्या आईला भरजरी साड्या पाठवणे आणि शरीफ यांच्याकडून आलेले आंबे मिटक्या मारत खाणे यामुळे सैन्याच्या मनोधैर्यावर परिणाम होतो याची थोडी पण कल्पना ५६ इंची वाल्यांना नसावी काय ? सरी गोष्ट म्हणजे चीनची लुडबुड चालु आहे आणी चालुच राहिल. पण या नविन सरकारने आता चीनबाबत लुडबुड सुरु केली आहे याचा प्रचंड आनंद आहे. नाहितर याच्या आधीच्या लोकांनी फक्त कबुतरे उडवली आणि (स्वतःच्या नाकर्तेपणामुळे) हारल्यावर " वैसे भी वो जमीन बंजर थी" असले अक्कलेचे तारे तोडले. हा फरक तुम्हाला कदाचित लक्षात आला नसावा (चालायचेच) चीनबाबत आपले हे धोरण पार नरसिंह राव यांच्या काळापासून सुरु आहे . ममो च्या काळात आपण विएतनाम मध्ये तेल उत्खनन सुरु केल होत . वरती खंडेराव यांचा सविस्तर प्रतिसाद आहे तो वाचावा . कारगिल मध्ये अनेक भारतीय सैनिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मुशरफ़ ला भारतात बोलावून त्याची शाही बडदास्त ठेवणार्यांनी काय वेगळ होत ? कारगिल मधला अजून काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे याची तुम्हाला कल्पना नसेलच (चालायचेच ) पण नेत्यांवर बवाल सुरु नसलेला पक्ष बरेच दिवस शोधतो आहे. मिळाला तर सांगा. (अगदी कालच्या खास आदमी पार्टी मधल्या नेत्यांबद्दल देखील बवाल सुरु आहेत) म्हणजे कॉंग्रेस भाजप आप हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत हे तुम्हाला मान्य आहे का ? पण किमान चांगली गोष्ट अशी की मोदी अविवाहित असल्याने राष्ट्रीय दामाद आता असल्या प्रकरणांमध्ये नसतील किमान. माफ करा पण हे विनोदी विधान आहे . जयललिता अविवाहित आहेत . मायावती अविवाहित आहेत . Hope you get the point . कोण हा इसम. हे देशाचे दुर्दैव. आधिक माहिती मिळाल्यावर सविस्तर प्रतिक्रिया नक्की देइन. पण अश्या माणसांना सरकारात स्थान दिल्याबद्दल नक्कीच खेद राहिल. निहाल्चंद मेघवाल नाव आहे त्या महावीराच . महत्वाच मंत्रिपद आहे त्याच्याकडे . http://www.ndtv.com/india-news/2-minutes-with-pm-modi-requests-woman-wh… इतकेच नव्हे तर मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत . याला भाजप च कोन्ग्रेसीकरण पूर्ण झाल अस म्हणता येईल का ? http://in.reuters.com/article/2014/11/10/india-politics-crime-idINKCN0I… अच्छा. विदा देता का प्लीज. हा घ्या . http://www.hindustantimes.com/india-news/govt-delay-in-appointing-chief… मोदींना त्यांच्या विरोधकांपेक्षा समर्थकच जास्त गोत्यात आणणार असे दिसते. मान्य हे विधान इतल्या भक्तांनी पण वाचायला हव . पण मोदी समर्थक परवडले. ते गुलाम नकोत असे झाले आहे आजकाल. त्यांचे चाळे बघवत, ऐकवत तर नाहितच. मुळात सहनच होत नाहित. कुठल्याही फालतू मुद्यावरुन समर्थन आणि फालतू मुद्द्यावरुन विरोध बघुन चिडचिड होते. त्यापेक्षा भक्त नक्कीच परवडले. आम्हाला भक्त आणि गुलाम दोघेही सारखेच वाटतात . Perception . बाकी ममो ची दुसरी कारकीर्द इतकी वाईट होती म्हणून लोकांनी त्यांना पाडलं . पण नमो त्यांच्यापेक्षा काही वेगळे आहेत असे काही दिसले नाही (फक्त जुने पन्प्र मौनी होते तर हे अतीच बडबड करतात तीपण कृतीशून्य हा प्रोब्लेम आहे )

In reply to by पिंपातला उंदीर

असा सल्ला जाहीरपणे कोणी दिला होता सांगू शकाल काय ? मला खरच माहित नाही . बाकी सीमेवर सैनिक मारत असताना शरीफ यांच्या आईला भरजरी साड्या पाठवणे आणि शरीफ यांच्याकडून आलेले आंबे मिटक्या मारत खाणे यामुळे सैन्याच्या मनोधैर्यावर परिणाम होतो याची थोडी पण कल्पना ५६ इंची वाल्यांना नसावी काय ? शांतता काळातली डिप्लॉमसी वेगळी आणि सीमेवरील कुरबुरींचे प्रत्युत्तर वेगळे. भरजरी साड्या पाठवण्याची कृती मलाही अमान्य आहेच पण तरीही तो एक राजनैतिक डिप्लोमसीचा भाग आहे हे देखील मान्य करावे लागेल. चीनबाबत आपले हे धोरण पार नरसिंह राव यांच्या काळापासून सुरु आहे . ममो च्या काळात आपण विएतनाम मध्ये तेल उत्खनन सुरु केल होत . वरती खंडेराव यांचा सविस्तर प्रतिसाद आहे तो वाचावा . या आधी हे धोरण कधीच इतक्या उघडपणे आणि एग्रेसिव्हली राबवले गेले नव्हते. सुरुवातीच्या काळात तर हे धोरण खुपच पुचाट होते. मोदी सरकारचा प्ल्स पॉइंट हाच आहे. शिवाय संपुर्ण कार्यातली ट्रांसपरंसी वाखाणण्याजोगी आहे. जे केले ते लोकांसमोर ठेवले जात आहे. ज्यांना वाकड्यातच शिरायचे आहे त्यांना हेच धोरण वाचाळपणा वाटतो आहे. जास्त बडबड वाटते आहे. मी स्वत: दोन गोष्टींमध्ये फरक करतो. अधुनमधुन व्हॉट्सअ‍ॅप आणि चेपु वर जी ढकलगाडी येते त्याने डोके पिकते. तो प्रचारकी थाट आणि थापेबाजी खटकते आणि मिडियामधुन आणि अधिकृत सरकारी बातम्यांमधुन जी माहिती मिळते त्यामुळे सरकारची धोरणे आवडतात. मोदी सरकार माझ्यातरी पसंतीवर उतरले आहे. प्रचारकी थाटाची जी वाचाळ यंत्रणा उभी आहे ती सरकारी असेल तर त्याला मात्र माझा विरोध आहे. कारगिल मध्ये अनेक भारतीय सैनिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मुशरफ़ ला भारतात बोलावून त्याची शाही बडदास्त ठेवणार्यांनी काय वेगळ होत ? ते वाजपेयी ना? ते तुम्हाला पूज्य आहेत असे तुम्हीच म्हणालात ना? की ते अजुन कोणी? कारगिल मधला अजून काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे याची तुम्हाला कल्पना नसेलच (चालायचेच ) कमाल आहे गेल्या १० वर्षात सरकारने काहिच केले नाही यासाठी? म्हणजे कॉंग्रेस भाजप आप हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत हे तुम्हाला मान्य आहे का ? अच्च जालं. मी खास आदमी पक्षाचा उल्लेख केला ते विसरलात होय तुम्ही. असो. एकाच माळेचे मणी नाहित हे पुढच्याच वाक्यात स्पष्ट केले होते की नाही. उपरोध कळला नाही का तुम्हाला? माफ करा पण हे विनोदी विधान आहे . जयललिता अविवाहित आहेत . मायावती अविवाहित आहेत . Hope you get the point . अर्रे देवा. देशाला आता उपरोध समजावुन सांगायला लागणार तर, की आता आम्ही केजरीवालांच्या मुलीचे लग्न होण्याची वाट बघायची? बाकी नुसते अविवाहित असुन काय उपयोग जर स्वतःवरच भ्रष्ताचाराचे आरोप असतील तर. अर्थात जयललित सुटली म्हणा. कोण हा इसम. हे देशाचे दुर्दैव. आधिक माहिती मिळाल्यावर सविस्तर प्रतिक्रिया नक्की देइन. पण अश्या माणसांना सरकारात स्थान दिल्याबद्दल नक्कीच खेद राहिल. निहाल्चंद मेघवाल नाव आहे त्या महावीराच . महत्वाच मंत्रिपद आहे त्याच्याकडे . http://www.ndtv.com/india-news/2-minutes-with-pm-modi-requests-woman-who... बिचारी महिला. तिच्या नवर्‍यानेच तिला विकले. दुर्दैवी घटना. पण निहालचंदला गेहलोत सरकारच्या काळात निर्दोष ठरवण्यात आले होते ना? कुमार विश्वासला पण क्लीन चीट मिळाली का? इतकेच नव्हे तर मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत . याला भाजप च कोन्ग्रेसीकरण पूर्ण झाल अस म्हणता येईल का ? आपचे कुठले करण पुर्ण झाले म्हणायचे? त्याच्या मंत्र्यावरही फसवणुक, बलात्कार यांचे गुन्हे आहेतच की. सब घोडे बारा टके मध्ये त्यातल्या त्यात चांगला पक्ष निवडावा लागणार. नाहितर तुम्हाला आम्हाला राजकारणात येउन, निवडणुका जिंकुन दाखवायला लागतील. भाजपाला पार्टी विथ डिफरंस म्हणताना त्यातही ब्लॅक शीप्स आहेतच याची कल्पना आहेच. पण संघावर विश्वास आहे आणि मोदींच्या नेतृत्वगुणावर देखील. मध्यवर्ती नेतृत्वामधील नेत्यांच्या गुणावगुणांवर मी पक्षाचे मुल्यमापन करेन. प्रणबदा सक्रीय राजकारणात असेपर्यंत खांग्रेसबद्दल देखील जरा सहानुभूती होती. दुर्दैवाने त्यानंतर बरा म्हणावा असा नेता त्यांच्याकडे उरलेला नाही हे दुर्दैव. माधवराव सिंदिया, सचिन पायलट असताना काँग्रेसचे भवितव्य उज्ज्वल वाटत होते. सध्या आनंदी आनंद आहे. राजिव गांधी आज पंतप्रधान असले असते तर नक्की आनंद झाला असता. असे म्हणताना त्यांच्यावरदेखील भ्रष्टाचाराचे आरोप होते हे मी विसरत नाही आहे पण दुर्दैवाने शास्त्रींनंतर निष्कलंक चारित्र्याचा पंतप्रधान मिळाला कुठे? गुजराल, चंद्रशेखर, देवेगौडा, चरणसिंग, मोरारजी देसाई, व्ही पी सिंगा यांच्याबद्दल तुर्तास काही बोलत नाही. http://www.hindustantimes.com/india-news/govt-delay-in-appointing-chief-... लिंक गंडली आहे बहुधा. अधिकार्‍याचा हुद्दा सांगता का? गुगलुन बघतो. लिकं करेक्ट बातमीकडे हात नाही आहे. मान्य हे विधान इतल्या भक्तांनी पण वाचायला हव . जालीय टीकाकरांच्या दृष्टीने माझी गणनादेखील भक्तांमध्ये होइल कदाचित. हेच तर दुर्दैव आहे. मोदींवर विश्वास दाखवला त्यांची प्रशंसा केली की तुमची गणना लगेच भक्तांमध्ये होते. आम्हाला भक्त आणि गुलाम दोघेही सारखेच वाटतात . Perception . अर्रे मग तुम्हाला आवडते तरी कोण? की कोणावरच विश्वास नाही? बाकी ममो ची दुसरी कारकीर्द इतकी वाईट होती म्हणून लोकांनी त्यांना पाडलं . पण नमो त्यांच्यापेक्षा काही वेगळे आहेत असे काही दिसले नाही (फक्त जुने पन्प्र मौनी होते तर हे अतीच बडबड करतात तीपण कृतीशून्य हा प्रोब्लेम आहे ) वरती पहिल्या पोस्टमध्ये मी बरेच काही लिहिले आहे. त्यामुळे नमोंना सध्या तरी फुल्ल मार्क्स माझ्याकडुन.

In reply to by मृत्युन्जय

http://www.hindustantimes.com/india-news/govt-delay-in-appointing-chief… हा उशीर चुकीचा आहे हे मान्य करतो. मोदी सरकार लवकरच अपॉईंटमेंट करेल अशी आशा करतो.

In reply to by मृत्युन्जय

शांतता काळातली डिप्लॉमसी वेगळी आणि सीमेवरील कुरबुरींचे प्रत्युत्तर वेगळे. भरजरी साड्या पाठवण्याची कृती मलाही अमान्य आहेच पण तरीही तो एक चा भाग आहे हे देखील मान्य करावे लागेल. जाहीर विधान कुणी केल होत सांगितलं नाहीच तुम्ही . असो ! ममोनि भुत्तो याना भारतात आल्यावर बिर्याणी खाऊ घातली तर तो कणा हीन पणा आणि हेच मोदी यांनी केले तर ती राजनैतिक डिप्लोमसी? छान आहे . या आधी हे धोरण कधीच इतक्या उघडपणे आणि एग्रेसिव्हली राबवले गेले नव्हते. सुरुवातीच्या काळात तर हे धोरण खुपच पुचाट होते. मोदी सरकारचा प्ल्स पॉइंट हाच आहे. शिवाय संपुर्ण कार्यातली ट्रांसपरंसी वाखाणण्याजोगी आहे. जे केले ते लोकांसमोर ठेवले जात आहे. ज्यांना वाकड्यातच शिरायचे आहे त्यांना हेच धोरण वाचाळपणा वाटतो आहे. जास्त बडबड वाटते आहे. मी स्वत: दोन गोष्टींमध्ये फरक करतो. अधुनमधुन व्हॉट्सअ‍ॅप आणि चेपु वर जी ढकलगाडी येते त्याने डोके पिकते. तो प्रचारकी थाट आणि थापेबाजी खटकते आणि मिडियामधुन आणि अधिकृत सरकारी बातम्यांमधुन जी माहिती मिळते त्यामुळे सरकारची धोरणे आवडतात. मोदी सरकार माझ्यातरी पसंतीवर उतरले आहे. प्रचारकी थाटाची जी वाचाळ यंत्रणा उभी आहे ती सरकारी असेल तर त्याला मात्र माझा विरोध आहे. अहो चीन आणि विएयेत्नाम च्या वादग्रस्त भागात तेल उत्खनन हे एग्रेसिव्ह नव्हते ? मागचे श्रीरंग जोशी आणि खंडेराव यांनी दिलेले प्रतिसाद पुन्हा वाचा बर . आणि घंटा ट्रांसपरंसी. सतत अध्यादेश काढण , स्थायी समितीला सातत्याने डावालन याला 'भक्तिस्तान ' मध्ये ट्रांसपरंसी म्हणत असावेत . सरकारी दौऱ्यावर जाऊन चमकोगिरी करण आणि विरोधकांना नाव ठेवण हा जर सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग नसेल तर मग राहील . ते वाजपेयी ना? ते तुम्हाला पूज्य आहेत असे तुम्हीच म्हणालात ना? की ते अजुन कोणी? दुर्दैवाने आपल्या 'पुज्यतेच्या ' व्याख्येत फरक आहे .मी पूज्य व्यक्तींना धोरणावरून जज करतो त्यांना देव्हार्यात ठेवून त्याला टीकेच्या पलीकडे नेवून ठेवत नाही . अर्रे देवा. देशाला आता उपरोध समजावुन सांगायला लागणार तर, की आता आम्ही केजरीवालांच्या मुलीचे लग्न होण्याची वाट बघायची? बाकी नुसते अविवाहित असुन काय उपयोग जर स्वतःवरच भ्रष्ताचाराचे आरोप असतील तर. अर्थात जयललित सुटली म्हणा. आता मोदींवर कसले कसले आरोप आहेत हे सांगू का ? ते अविवाहित आहेत आणि त्यांच्यावर अनेक आरोप पण आहेत . बिचारी महिला. तिच्या नवर्‍यानेच तिला विकले. दुर्दैवी घटना. पण निहालचंदला गेहलोत सरकारच्या काळात निर्दोष ठरवण्यात आले होते ना? कुमार विश्वासला पण क्लीन चीट मिळाली का? कुमार विश्वास कुठल्या वैधानिक पदावर नाही हो . बाकी कुमार विश्वासची केस कुठल्या संदर्भात आहे हे तुम्हाला माहित आहे काय ? बाकी असली लोक मोदी यांच्या आजूबाजूला आहेत याचा किमान खेद तुम्हाला वाटला असेल अशी अपेक्षा ? आपचे कुठले करण पुर्ण झाले म्हणायचे? त्याच्या मंत्र्यावरही फसवणुक, बलात्कार यांचे गुन्हे आहेतच की. सब घोडे बारा टके मध्ये त्यातल्या त्यात चांगला पक्ष निवडावा लागणार. नाहितर तुम्हाला आम्हाला राजकारणात येउन, निवडणुका जिंकुन दाखवायला लागतील. भाजपाला पार्टी विथ डिफरंस म्हणताना त्यातही ब्लॅक शीप्स आहेतच याची कल्पना आहेच. पण संघावर विश्वास आहे आणि मोदींच्या नेतृत्वगुणावर देखील. भाजपात ब्लॅक शीप्स आहेत इथपर्यंत तरी तुम्ही कबुली दिलीत हेच नशीब . बाकी येडीयुरप्पा , गडकरी हे पण स्वयंसेवक च होते की . ज्यांची अश्लील सीडी निघाली ते संजय जोशी कोण होते ? बाकी काही वाचाळ लोक म्हणतात त्या सीडी मागे मोदी शहा जोडगोळीचा हात होता . असो . मध्यवर्ती नेतृत्वामधील नेत्यांच्या गुणावगुणांवर मी पक्षाचे मुल्यमापन करेन. प्रणबदा सक्रीय राजकारणात असेपर्यंत खांग्रेसबद्दल देखील जरा सहानुभूती होती. दुर्दैवाने त्यानंतर बरा म्हणावा असा नेता त्यांच्याकडे उरलेला नाही हे दुर्दैव. माधवराव सिंदिया, सचिन पायलट असताना काँग्रेसचे भवितव्य उज्ज्वल वाटत होते. सध्या आनंदी आनंद आहे. राजिव गांधी आज पंतप्रधान असले असते तर नक्की आनंद झाला असता. असे म्हणताना त्यांच्यावरदेखील भ्रष्टाचाराचे आरोप होते हे मी विसरत नाही आहे पण दुर्दैवाने शास्त्रींनंतर निष्कलंक चारित्र्याचा पंतप्रधान मिळाला कुठे? गुजराल, चंद्रशेखर, देवेगौडा, चरणसिंग, मोरारजी देसाई, व्ही पी सिंगा यांच्याबद्दल तुर्तास काही बोलत नाही. काँग्रेस स्वतःच्या गुणांनी गाळात गेली आहे . बाकी अटलजी तुम्हाला निष्कलंक चारित्र्यवान का वाटत नसावेत याचे आश्चर्य वाटले लिंक गंडली आहे बहुधा. अधिकार्‍याचा हुद्दा सांगता का? गुगलुन बघतो. लिकं करेक्ट बातमीकडे हात नाही आहे. इथुन तर उघडत आहे लिंक . अर्रे मग तुम्हाला आवडते तरी कोण? की कोणावरच विश्वास नाही? मी एके काळचा कट्टर सेना -भाजप समर्थक . पण आमच्या जिल्ह्याची जी त्यांनी पुंगी वाजवली आणि एकूणच सर्व देशात जे दिवे लावले ते बघून हे काँग्रेस चेच भावंड आहे याची खात्री पटली . कुठल्या तरी एका पक्षाच 'समर्थक ' असायला हव हा अट्टाहास पटत नाही . त्यामुळे नमोंना सध्या तरी फुल्ल मार्क्स माझ्याकडुन. ते तर तुम्ही काही लिहील नसत तरी पण दिलेच असते . नाही का ?

In reply to by पिंपातला उंदीर

ममोनि भुत्तो याना भारतात आल्यावर बिर्याणी खाऊ घातली तर तो कणा हीन पणा आणि हेच मोदी यांनी केले तर ती राजनैतिक डिप्लोमसी? छान आहे . असे मी म्हटले होते का? मी फक्त मी स्वतः जे काही लिहितो त्यासाठी अकाउंटेबल आहे. आंजावर बोंबलत फिरणार्‍या लाखो लोकांचा ठेका मी घेउ शकत नाही. धन्यवाद. अहो चीन आणि विएयेत्नाम च्या वादग्रस्त भागात तेल उत्खनन हे एग्रेसिव्ह नव्हते ? मागचे श्रीरंग जोशी आणि खंडेराव यांनी दिलेले प्रतिसाद पुन्हा वाचा बर . काही गोष्टी मागील सरकारांनीही चांगल्या केल्याच. त्याला ना नाहिच. बाकिच्यांपेक्षा मोदींना जास्त पसंती का ते आधी दिलेच आहे. परत परत तेच टंकायचा खुप कंटाळा येतो राव. आणि घंटा ट्रांसपरंसी. सतत अध्यादेश काढण , स्थायी समितीला सातत्याने डावालन याला 'भक्तिस्तान ' मध्ये ट्रांसपरंसी म्हणत असावेत . सरकारी दौऱ्यावर जाऊन चमकोगिरी करण आणि विरोधकांना नाव ठेवण हा जर सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग नसेल तर मग राहील . ज्याला तुम्ही चमकोगिरी म्हणत आहात त्याला मी माहिती लोकांपर्यंत पोचवणे असे म्हणतो. आधीच्या सरकारांनी जर ते केले नसेल तर तो त्यांचा करंटेपणा. त्यापायीच ते मेले. त्यासाठी मोदी सरकारला नावे कशाला ठेवायची? दुर्दैवाने आपल्या 'पुज्यतेच्या ' व्याख्येत फरक आहे .मी पूज्य व्यक्तींना धोरणावरून जज करतो त्यांना देव्हार्यात ठेवून त्याला टीकेच्या पलीकडे नेवून ठेवत नाही . उत्तम. मीही कोणाला देव्हार्‍यात नाही बसवले. पण मग तुम्ही मोदी सरकारवर टीका करत असताना आणि आपण त्यांच्याबद्दल चर्चा करत असताना तुम्ही एकदम वाजपेयींवर का घसरलात, किती आउट ऑफ काँटेक्स्ट होते ते. आता मोदींवर कसले कसले आरोप आहेत हे सांगू का ? ते अविवाहित आहेत आणि त्यांच्यावर अनेक आरोप पण आहेत . कृपया सांगा. तेच ते मोदी विरुद्ध मुसलमान टेप नका वाजवु परत म्हणजे झाले. कुमार विश्वास कुठल्या वैधानिक पदावर नाही हो . बाकी कुमार विश्वासची केस कुठल्या संदर्भात आहे हे तुम्हाला माहित आहे काय ? बाकी असली लोक मोदी यांच्या आजूबाजूला आहेत याचा किमान खेद तुम्हाला वाटला असेल अशी अपेक्षा ? त्या घटनेबद्दलचे माझे मत आपण वाचलेले दिसत नाही आहे. परत वाचा म्हणजे मल कशाचा खेद वाटतो ते कळुन येइलच. कुमार विश्वासबद्दल तुम्ही फिरवलेली टोपी मजेशीर आहे भाजपात ब्लॅक शीप्स आहेत इथपर्यंत तरी तुम्ही कबुली दिलीत हेच नशीब . बाकी येडीयुरप्पा , गडकरी हे पण स्वयंसेवक च होते की . कबुली देणारा मी कोण? मी काय भाजपाचा प्रवक्ता थोडाच आहे? जे दिसले ते सांगितले. आंधळेपणाने एकावर टीका करुन दुसर्‍याला झाकायचे नाही जमत आपल्याला. ज्यांची अश्लील सीडी निघाली ते संजय जोशी कोण होते ? बाकी काही वाचाळ लोक म्हणतात त्या सीडी मागे मोदी शहा जोडगोळीचा हात होता . असो . त्या जोश्यांबद्दल तुम्हालाच दुसर्‍या धाग्यावर पुळका आला आहे ना. की तो दुसराच कोणीतरी. बाकी अश्लील सीडी बद्दल नक्की काय मुद्दा आहे. संजय जोशींबद्दल मला काही फार पुळका नाही. पण त्यांनीदेखील चेंबर मध्ये बसुन तसला धिंगाणा घातलाय का? बाकी वाचाळ लोकांकडे काय लक्ष द्यायचे हो. वाचाळ लोक तर असेही म्हणतात की: १. इंदिरा गांधींनीच संजय गांधींना मारले. २. नेहरु लेडी माउंटबॅटनच्या आहारी गेले होते त्याचा फायदा घेउन माउंटबॅटनने फाळणी त्यांच्याकडुन मान्य करवुन घेतली. ३. खासचे मनिष सिसोदियांनीच गजेंद्र सिंगचा खून घडवुन आणला. ४. खासच्या केजरीवालांची अण्णा हजारांचा उपोषणात मृत्यु व्हावा ही इच्छा होती,. काँग्रेस स्वतःच्या गुणांनी गाळात गेली आहे . चल्ला एकातरी मुद्द्यावर एकमत झाले. बाकी अटलजी तुम्हाला निष्कलंक चारित्र्यवान का वाटत नसावेत याचे आश्चर्य वाटले चूक झाली. माफी असावी. तेवढे दुरुस्त करुन घ्या. पण त्यांचे मंत्रिमंडळही काही फार स्वच्छ नव्हते, इथुन तर उघडत आहे लिंक . मी नंतर यावर प्रतिसाद दिला आहे. मी एके काळचा कट्टर सेना -भाजप समर्थक . पण आमच्या जिल्ह्याची जी त्यांनी पुंगी वाजवली आणि एकूणच सर्व देशात जे दिवे लावले ते बघून हे काँग्रेस चेच भावंड आहे याची खात्री पटली . माझी अजुन पटलेली नाही. किंबहुना असे काही अजिबात वाटत नाही. कुठल्या तरी एका पक्षाच 'समर्थक ' असायला हव हा अट्टाहास पटत नाही . ओक्के. मान्य. ते तर तुम्ही काही लिहील नसत तरी पण दिलेच असते . नाही का ? मार्क देण्यासाठी लिहायला कशाला पाहिजे. पण लिहिले नाही तर तुम्हाला कसे कळणार?

In reply to by मृत्युन्जय

वोके . थांबू आपण इथे . मारूतीच शेपूट लांबवण्यात अर्थ नाही . बाकी भक्त असे जेंव्हा मी म्हणायचो तेंव्हा तो निशाणा तुमच्यावर नव्हता . इथले आम्ही कुठलाच चष्मा घालत नाही असे म्हणत भक्ती करणाऱ्या लोकांना उद्देशून तो शब्द होता . पण ते भक्त राहिले बाजूलाच : )

In reply to by पिंपातला उंदीर

अम्मळ मराठीत लिहीले तर बरे होईल. बवाला, आगाज वगैरे शब्दांचे अर्थ कळले नाहीत. कृपया समजावून सांगणे. इत्यलम.

ममों कडे भक्त होते कि नाहि माहित नाहि, पण केजरीवालांनि आपल्या गुलामांचि अवस्था पार नो व्हेअर करुन टाकली. पाच वर्ष करमणुक होणार आहे. इब्तेदा-ए-इश्क है रोता है क्या आगे आगे देखिये होता है क्या

मोदिंनी आपल्या परदेश वारीचे डिटेल्स मिपावर द्यायलाच हवेत. अन्यथा त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात यावा. अवांतरः सरदारजी जर चीनला गेले असताना ड्रॅगनने भारताच्या नकाशात फेरफार करुन टिव्हीवर दाखवला असता तर भाजपेयी त्यांच्यावर केवढे बरसले असते. आता चीनने मोदिंच्या भावी मंगोलीया वारीवर कुरघोडी करायला हा हलकटपणा केला असा कितीही आक्रोश केला तरी यंदा ५६ इंची छातीवर मुक्का बसलाच हे नाकारता येणार नाहि.

पंतप्रधान भारत देशाच्या दौऱ्यावर आले आहेत असे काही कुचाळ नतद्रष्ट लोक बोलत आहेत http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4919299392750200216&S… बातामिखालच्या कॉमेंट्स लई मजेदार आहेत

In reply to by पिंपातला उंदीर

हा गुलामांचा आणि द्वेष्ट्यांचा अजुन एक अपप्रचार. मी आधीच म्हटले होते की परदेश दौरे ही परराष्ट्रनीतीमधील महत्वची बाब आहे. कार्यालयातल्या गुबगुबीत कोचावर बसुन एसीची हवा खात परराष्ट्र नीति आणि विदेशी चलन आणि उद्योगधंदे आणता आले असते तर गोष्ट वेगळी. दुर्दैवाने तसे होत नसते. त्यामुळे पंतप्रधानांना असले दौरे आखावेच लागतात. मोदी पहिल्या वर्षात ५३ दिवस देशाबहेर होते तसेच मनमोहन सिंग युपीए २ मध्ये ४७ दिवस देशाबाहेर होते. म्हणजे फारसा फरक नाही. मग मोदींवर ताशेरे का? गुलाम आणि द्वेष्टे उघडे पडतात ते असे. केवळ विरोधासाठी विरोध नसावा,

In reply to by मृत्युन्जय

मोदी पहिल्या वर्षात ५३ दिवस देशाबहेर होते तसेच मनमोहन सिंग युपीए २ मध्ये ४७ दिवस देशाबाहेर होते. म्हणजे फारसा फरक नाही. तेच म्हणतो आहे ना ? दोघेही एकाच नाण्याच्या बाजू आहेत

In reply to by पिंपातला उंदीर

अहो पण नाण्याची एक बाजू काहीही आवाज न करता परदेशात जायची. इतके शांत की त्यांची पत्नी सोडून कोणाला ते देशाबाहेर आहेत याची कल्पना नसायची. शिवाय ते वापस आल्यावर ," का हो काय आणलं आमच्या देश्यासाठी ? की नुसते पैसे उधळून आलात ?" असे प्रश्न कोणीही विचारत नव्हतं. याउलट नाण्याची दुसरी बाजू जर कुठे निघाली की, मोदी निघाले...मोदी गेले ....मोदी पोहोचले...मोदी हे बोलले..मोदी ते बोलले..मोदी वापस आले..बघा बघा मोदीन्नी काहीच खाऊ नाही आणला..हे खोटं नाणं आहे वैगेरे चालू होतं..

In reply to by चिनार

तेच म्हणतोय ना . आंधळे भक्त ममो सरकारकडे नव्हते ना ? खुद त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते पण त्यांना भाव देत नव्हते मग कोण करणारा गाजावाजा ? मोदी त्याबाबतीत किती नशीबवान आहेत हे इथे मिपा वर बघितलं तरी कळत . बाकी विरोधकांविरुद्ध सोशल मिडीयावर अतिशय खालच्या पातळीची गरळ ओक्ण्याचा ट्रेंड कोणत्या पक्षाने सुरु केला हे सर्वविदित आहे . फक्त आता हे हत्यार त्यांच्यावर उलटले आहे . मोदी विरुध्द अतिशय खालच्या पातळीचा प्रचार सुरु आहे . एक देश म्हणून हि शरमेची बाब आहे आपल्या सर्वांसाठी . पण जे पेरल तेच उगवत आहे

In reply to by पिंपातला उंदीर

पण जे पेरल तेच उगवत आहे हे जर खंर असेल तर आतापर्यान्त्त कोन्ग्रेस ची फाळणी व्हायला हवी होती राव..एक नव्हे १०० पवार जन्माला आले असते अतापार्यान्त्त !

In reply to by पिंपातला उंदीर

ममो सरकार कडे ना आंधळे भक्त होते ना सच्चे कार्यकर्ते ! ...होते ते फक्त गुंठामंत्री ..आणि आंधळ्याचे सोंग घेतलेल्या ममो सरकारने सगळ्यांना पाठीशी घातले. मोदींचे परदेश दौरे म्हणा किंवा त्यांची धोरणं म्हणा, काहीतरी सकारात्मक घडण्याची चिन्ह दिसतायेत. उम्मीद पे दुनिया कायम हैं असा म्हणतात. ममो सरकारच्या काळात मेलेली आमची उम्मीद आता परत जन्माला आली आहे. तुम्ही आम्हाला आंधळे भक्त म्हणा किंवा अजून काही म्हणा... मोदी सरकारला आमचा पूर्ण पाठींबा आहे. हो..पण आमचा देव त्याच्या जागी आणि मोदी त्यांच्या जागी ...खुट्ट काही वाजलं की,"अरे देवा" च्या ऐवजी "अरे मोदी" म्हणायची आम्हाला सवय नाही आणि गरज तर मुळीच नाही. पाच वर्षे पूर्ण झाल्यावर सरकारच्या कामाचे मूल्यमापन आम्ही नक्कीच करू आणि आमचं चुकला असेल तर ती चूक दुरुस्त करू..पण परत एकदा सांगतो ..उम्मीद पे दुनिया कायम हैं..!

In reply to by चिनार

उम्मीद पे दुनिया कायम है . चांगल आहे . Best Luck फक्त लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बहुतेक गुंठेदार आणि स्थानिक सुभेदारांनी भाजपात प्रवेश केला आहे आणि 'बिभीषण ' दर्जा देऊन भाजप ने पण त्यांना पावन करून घेतलं आहे एवढ लक्षात राहू द्या . आणि दस्तुरखुद नमोजी हुकुम यांनी त्यांच्यासाठी सभा घेतल्याचे स्मरते

In reply to by पिंपातला उंदीर

धन्यवाद पिम्पातला उंदीर ! थोडासा अवांतर .. उम्मीद पे दुनिया कायम है..म्हणजेच हे जग आशेवर तरलय ! पण जनतेच्या वाढलेल्या अपेक्षा पाहून असं म्हणावं वाटतंय. "हे जग आशेवर तरणार अन अपेक्षेने मरणार !"

In reply to by पिंपातला उंदीर

तेच म्हणतोय ना . आंधळे भक्त ममो सरकारकडे नव्हते ना ? खुद त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते पण त्यांना भाव देत नव्हते मग कोण करणारा गाजावाजा ? मोदी त्याबाबतीत किती नशीबवान आहेत हे इथे मिपा वर बघितलं तरी कळत . हा प्रॉब्लेम आहे होय. असते एकेकाचे नशीब त्याला कोण काय करणार? बाकी विरोधकांविरुद्ध सोशल मिडीयावर अतिशय खालच्या पातळीची गरळ ओक्ण्याचा ट्रेंड कोणत्या पक्षाने सुरु केला हे सर्वविदित आहे . फक्त आता हे हत्यार त्यांच्यावर उलटले आहे . खालची पातळी म्हणजे नक्की काय ते कळाले नाही. एखाद्या नेत्याला "चायवाला" वगैरे म्हणून हिणवणे वगैरे बद्दल बोलत आहात का तुम्ही? मोदी विरुध्द अतिशय खालच्या पातळीचा प्रचार सुरु आहे . एक देश म्हणून हि शरमेची बाब आहे आपल्या सर्वांसाठी . पण जे पेरल तेच उगवत आहे पेरले दुसर्‍याने भोगतोय दुसराच. काय करणार हाही नशिबाचाच एक भाग आहे.

In reply to by मृत्युन्जय

बस क्या मृत्युंजय राव ? देशाचा राष्ट्रीय मुक प्राणी , नेहरू , गांधीजी , सोनिया -मनमोहन यांचे अतिशय घाणेरड्या पोझ मधले मोर्फेड छायाचित्र किती उदाहरण द्यावीत . खर तर पंतप्रधान पदाचा तरी किमान आदर बाळगला जावा . पण मोदिविरुद्ध सध्या कसला वाईट प्रचार चालू आहे . त्यांचे बायकांकडे पाहत असल्याचे फोटो (त्याला ते बाईचा पाठलाग केल्याचे प्रकरण कारणीभूत असावे ) अतिशय हिडीस पणे सोशल मिडीयावर फिरवले जात आहेत . हे वाईट आहे

In reply to by पिंपातला उंदीर

अपात्री टीका आणि सोनियांचे मॉर्फ्ड फोटो याच्या विरोधात मी देखील होतो. असे फोटो मी लगेच व्हॉट्सअ‍ॅपमधुन उडवुन लावले. विकृत माणसे सगळीकडेच असणार. तसल्या फोटोबद्दल मलाही खेद आहे. पण नाईलाज आहे.

मी तर केंव्हापासून म्हणतोय राहुल गांधींना पंतप्रधान करा. त्यांच खेळून झालं की केजरीवालांना पंतप्रधान करा. त्यांचा तमाशा संपला की श्री रामदास आठवले यांना त्या पदावर बसवा. त्यानंतर अशी काही प्रगती होईल की अजीर्ण व्हायला लागेल. मग पवार साहेबांना सन्मानाने ती खुर्ची देऊन टाका एकदाची. त्यांनी अख्ख्या देशाचा सात बारा स्वत: च्या नावे केला की मग समाजवाद्यांना पंतप्रधानपदाची संधी द्या. विषम समाजात समानतेची पेरणी करून झाली प्रांतीय सलोख्यासाठी जयललिता आणि ममता दीदींना आळीपाळीने पंतप्रधान बनवा. चेन्नई देशाची राजधानी आणि बंगाली राष्ट्रभाषा म्हणून घोषित झाली की आमच्या मराठमोळ्या ठाकरे बंधूंना अटकेपार दिल्लीला झेंडे फडकवू द्या.

In reply to by चिनार

पण याच्या अध्ये मध्ये कधीतरी अर्धा देश पाकिस्तानला विकुन टाकतील, थोडा चीनला जोड्तील आणि उरलेला सदुसष्ट भागात विभागला जाइल त्याचे काय.

In reply to by मृत्युन्जय

हो पण त्याचं काय फारसं? मोदींना तर हरवता येईल ना? मग झालं तर. तसेही आपण सेक्युलरपणाचे पुतळे आहोतच कातडी वाचवायची झालीच तर.

In reply to by चिनार

हे कल्पक, तिरकस पण एकांगी प्रकटन वाचून जवळपास वीस वर्षांपूर्वी पाहिलेल्या एक होता विदूषक चित्रपटातील एक प्रसंग आठवला... चित्रपटाचा नायक (लक्ष्मीकांत बेर्डे) एक प्रसिद्ध नट असतो अन बहुधा तत्कालिन मुख्यमंत्री म्हणजे त्याचा बालपणीचा मित्र. नायकाच्या लोकप्रियतेचा अन प्रतिभेचा राजकीय लाभ घेण्यासाठी मुख्यमंत्री त्याला राजकारणात ओढून आमदार बनवतात. नंतर विधिमंडळात विरोधी पक्षांच्या बेघर नागरिकांच्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी सत्ताधार्‍यांतर्फे लक्ष्याला उभे केले जाते. बेघर अन गरीब लोकांच्या बेफिकीर, बेजबाबदार प्रवृत्तीवर लक्ष्या चारोळीतून टिकेचे आसूड ओढतो. उत्तर लक्ष्याने दिले असल्याने विरोधी आमदार टाळ्या वाजवून दाद देण्यात धन्यता मानतात. तुम्ही काय विचार मांडावे हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. पण कुणी आपली प्रतिभा अशा एकांगी विचारांसाठी वाया घालवत असेल तर माझ्यासारख्या दगडालाही त्याबद्दल वाईट वाटते हे नक्की.

In reply to by श्रीरंग_जोशी

ह्यात तुम्हाला एकांगी काय जाणवलं ते कळला नाही. तरी पण असो. हो..भाजप पंतप्रधानाचे नाव घेतले नाही .पण त्यांचे उणेदुणे काढायला ह्या धाग्यावर बरेच लोक आहेत की ! वरील प्रतिसाद लिहिण्याचा हेतू असा की , लोकसभा निवडणुकीत जेवढे पर्याय डोळ्यासमोर होते त्यात भाजप सरकार हा सर्वोत्तम पर्याय होता हे माझं मत तेंव्हाही होतं आणि आजही आहे.

कोंगो देशाचे सामारिक आणि जागतिक राजकारणातील महत्व कोँगो हा एक प्राचिन व वैभवशाली देश आहे. लुनास्वार श्री.ब्रम्हे याँची आत्या इथेच रहाते ( एलिआत्या, हुलुहुलुची आई ). भारत व कोँगोचे सम्बंध अर्वाचीन काळापासुन आहेत. जगत्प्रवासी हो मीच चिँग याने चौथ्या शतकात कोँगो व भारतातील व्यापाराविषयी लिहिले आहे. यात गुजरातनामे प्रदेशाशी असलेले कोँगोचे सख्य जाहिर होते. काही अभ्यासकाँचे असेही म्ह्णणे आहे की गुजरात प्रदेशातील सिंह हो मीच चिँग याने कोंगोला नेले आणि तेथुन ते पुर्ण आफ्रिकेत पसरले. कोंगोदेशाची राजधानी किंन्शाशा असुन लुम्बुबाशी व बुजिमायी ही इतर मोठी शहरे आहेत. तिथे खुप हिरे आणि कोबाल्ट आहे. कोबाल्ट पासुन दुरोनियम बनते, त्यापासुन फुरोनियम आणि मग युरेनियम. सध्या चिन कोंन्गोतुन कोबाल्ट नेते. भारतासाठी फुरोनियम आणि युरेनियम महत्वाचे आहेत. आता जी बोलणी सुरु आहेत त्यातुन आपल्याला अमेरिकेच्या आणि युरोपियन समुदायाच्या नाकावर टिच्चुन कोबाल्ट आणता येइल. हे गेल्या साठ हजार वर्षात झाले नव्हते. हो मीच चिंग ला ही जे जमले नव्हते ते आज होत आहे.

In reply to by खंडेराव

कोंगो बद्दल जेव्हा मोदी हे विधान करतील त्यानंतर मी तहहयात मोदीविरोधी मतदान करेन. तोपर्यंत या प्रतिसादाची किंमत विनोदी कल्पनाविस्तार यापेक्षा जास्त नाही. अवांतरः हसुन करमणुक झाली हे नक्की. :)

In reply to by मृत्युन्जय

पण ह्या विषयी तुमचे काय मत आहे? A serial planned for television will put Prime Minister Narendra Modi in the league of emperors Chandragupta Maurya and Ashoka, projecting them as men who have done the oil-pressers community proud. Modi belongs to the Ghanchi community of oil-pressers in Gujarat. The muhurat of serial Diye Jalte Hain took place in Gandhinagar Monday with the Prime Minister’s eldest brother Somnath, better known as Sombhai Modi, as guest. The muhurat shot was of a young Teli boy, unsure of his roots. “His mother tells him about the community’s glorious past, its heroes Chandragupta, Ashoka and Modiji,” Maharashtra-based producer Suresh Chaudhari said हे जास्त होत नाहीये आता? यालाही कल्पनाविस्तार म्हणावे ना? http://indianexpress.com/article/india/india-others/tv-serial-on-empero…

In reply to by खंडेराव

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का चंद्रगुप्‍त मौर्य और सम्राट अशोक से क्या रिश्ता हो सकता है? चंद्रगुप्त मौर्य की मृत्यु लगभग 2300 साल पहले हुई ‌थी और सम्राट अशोक की लगभग 2200 साल पहले। ऐसे में प्रधानमंत्री का उन दोनों से क्या संबंध? दूरदर्शन पर जल्द ही एक ऐसा धारावाहिक प्रसारित किया जाएगा, जिसमें प्रधानमंत्री मोदी, मौर्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य और सम्राट अशोक की जीवनियों को दिखाया जाएगा। दरअसल चंद्रगुप्‍त मौर्य, सम्राट अशोक और नरेंद्र मोदी एक ही समुदाय के हैं- घांची समुदाय। घांची गुजरात का समुदाय है और मुख्यतः तेल के कारोबार से जुड़ा है। धारावाहिक में ऐसी शख्सियतों की कहानी दिखाई जाएगी, जिन्होंने घांची समुदाय को गर्व करने का मौका दिया। 'दीये जलते हैं' नाम के धाराव‌ाहिक का मुहूर्त सोमवार को किया गया। नरेंद्र मोदी के बड़े भाई सोमभाई मोदी भी कार्यक्रम में मौजूद थे। हे बरे झाले नंतर दुरदर्शनने नकार दिला. अर्थात अडचण नाही, इतर आहेतच दाखवायला.

In reply to by खंडेराव

दुरदर्शनने नकार दिला\ यातच सगळे आले. असो. आधी लिहिलेल्या प्रतिसादाला ही केवळ पुरवणी आहे. बाकी प्रतिसाद जसाच्या तसा वाचावा,

In reply to by खंडेराव

माफ करा, पण इंडियन एक्स्प्रेस ने इथे खेद व्यक्त केला आहे आणि दूरदर्शन ने हे सांगितले आहे. (ठळक पणा माझा) May 7, 2015: Responding to the report ‘Now, a serial on PM’s community’ (May 5), which stated that Doordarshan had cleared a 128-episode serial Diye Jalte Hain on the oil-pressers community to which Prime Minister Narendra Modi belongs, Doordarshan Additional Director General Deepa Chandra has said “no such project is under consideration or has been approved by Doordarshan for any of its channel”. According to Chandra, the matter had been inquired into on the instructions of the Prasar Bharati CEO. “You may please note that Doordarshan traditionally does not grant approval for 128 episodes at one go and that too for a period of ten years continuously. The reporter has also not cared to check whether any approval letter has been issued by Doordarshan to the Producer or Director. Being a public service broadcaster, Doordarshan is simply being taken for granted through this news story,” Chandra said.

In reply to by सव्यसाची

सरळच लिहिले आहे की माझ्या दुसर्या पोस्ट मधे. प्रश्न तो नाहीये, मृत्युन्जय यांनी जे लिहिलेय, तो जातियवाद वाढु देणे/ वाढु न देणे हे मोदींच्या हातात आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वाचा कल्ट बनवणे, थेट अशोकाशी संबंध जोडणे, हा घोळ आहे. बघुयात कुठे पोहोचतिय ही मालिका आता.

In reply to by खंडेराव

याला मी मुर्खपणा म्हणेन. भारतीय जनतेने असा मुर्खपणा याआधी बर्‍याच वेळा केला आहे. सचिन, अमिताभ, सोनिया आणि मोदींची मंदिरे बांधण्याचा जो दळभद्रीपणा पब्लिक करते त्याची कीव येते (मोदी मंदिर मोदींनी स्वतः बंद करायला लावले असे ज्ञात आहे. बाकिच्यांबद्दल माहिती नाही). मोदींनी जातीने लक्ष घालुन या "जात" प्रकरणातुन स्वतःची सुटका करुन घ्यावी आणि त्यांच्या आरत्या ओवाळणार्‍या लोकांपासुन दूर रहावे असे वाटते. असो. या प्रकरणात मोदींचा सहभाग ते जे लिहिले आहे तिथपर्यंतच मर्यादित असेल अशी अपेक्षा.

In reply to by मृत्युन्जय

या प्रकरणात मोदींचा सहभाग ते जे लिहिले आहे तिथपर्यंतच मर्यादित असेल अशी अपेक्षा.
तोही कमी नाही हो, त्यांचा भाउ उद्घाटण करतोय. एका जिवंत व्यक्तीवर अशी मालिका बनवायला त्या व्यक्तिची परवानगी लागत असेल असा माझा होरा आहे.