प्रभूजी
हे भीषण आहे. कोणत्याही घरात घडू शकते.
मिपावरच्या पालकांना जागे करण्याचे काम असेच चालू राहू दे त.
तुमचे आभार कसे मानू?
http://kalekapil.blogspot.com/
प्रभु साहेब.. एकाच लेखात किती गोष्टी सांगाल ...
सहज उपलब्ध होणारं पॉर्न, सोळा सतराव्या वर्षात वाटणार्या आकर्षणांची/प्रश्नांची पॉर्न मधुन मिळणारी उत्तरं आणि त्याचा झालेला विस्फोट ..यातली प्रातिनिधिकता खूप वास्तविक आहे. तुम्ही मराठीत हे विषय मांडताय याबद्दल धन्यवाद.
लैंगिक शिक्षण देणं हाच एक उपाय यावर आहे.
आता ते कसं द्यायचं हा सध्या मोठाच वादाचा मुद्दा आहे पण वादाच्या आडुन काहीही न करता शांत बसण्याची किंमत या बाबतीत खूप मोठी आहे.
अवांतर - 'दाम' आणि 'काम' या दोन मुलभूत गरजांचं शिक्षण आपल्या शालेय शिक्षणात नसते. व्यवहारी जगात हेच दोन प्रश्न प्रत्येका(की)ला सोडवावे लागतात. जितक्या लवकर आपण याबाबतीत सजग होउ तितकं चांगलं.
- अभिजीत
अहो प्रभु सर ही तर फक्त सुरुवात आहे !! पॉर्न चा पसारा वाढतच जाणार आहे..
लोक पॉर्न ऍडिक्ट होत चालली आहेत्..मुव्हीज्,क्लीप्स्,एमएमएस्,,वेब कॅम्,सांगावे तितके प्रकार कमी..बर हा प्रकार मुले तर पाहतातच पण मुली सुध्दा हे प्रकार पाहण्यात मागे नाहित.
१)माझ्या एका मित्राच्या ओळखीच्याचा सायबर कॅफे होता(आता तो बंद झाला आहे)तिथे कोपर्यात एक कॉप्युटर होता..दोन मुली बर्याच वेळा त्या कॅफे मधे येत्...आणि तोच कोने वाला पिसी धरत्..कॅफेच्या बाहेर पडताना वेगळेच भाव चेहर्यावर असत !!!
मित्राला आधी वाटले असेल यांच्या कोणितरी बॉय फ्रेंड असेल ...करत असतील त्याच्या बरोबर चॅट्...पण त्या मुली नक्की काय बघतात हे त्याचे कुतुहल वाढले व एक दिवस त्याने त्या मुली येण्याच्या आधी सर्व हिस्ट्री क्लीयर करुन टाकली (इंटरनेट एक्स्प्लोररची)..व त्या मुली गेल्या नंतर हिस्ट्री चेक केली तर सापडल्या सर्व पॉर्न साईट्स !!!
२) हे वाचा :--http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowpics/3478918.cms
आणि
३) हे ही वाचा :--http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3402588.cms
वाचल्या नंतर परत त्या मुलाने (प्रभु सरांनी सांगितलेली केस)नक्की काय पाहिले असेल याचा अंदाजा सुध्दा लावण्याचा प्रयत्न करु नका !!!
तुम्हाला शीमेल ही काय भानगड असते ते माहित आहे काय?
काय प्रभु सर अहो नावातच उत्तर हाय !!
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
प्रभूसर,
एखाद दुसर्या कथेतून कुठल्याही निर्णयाप्रत पोहोचता येत नाही.
इंटरनेटवर चॅट हा प्रकार उपलब्ध असल्याने, आणि पॉर्नची मुबलक उपलब्धी असल्याने, लैंगिक अत्याचार कमी झाले आहेत, असे कळते. (आकड्यांतून कळते, एखाद्या कथेतून नव्हे.)
लाखाचे नव्वद हजार झाले, हे कळले, तर त्याच्या तेवढा परिणाम जाणवत नाही.
त्या दहा हजारांतली एखादी कथा आली, की "भयंकर, भयंकर" असे प्रतिसाद येतात, खरे की नाही ?
एकच सांगतो. हे आधीही होत होते, लाखांत. आता होते आहे हजारांत. पण व्यक्त होत आहे पांचांत. त्यामुळे अजाणत्या लोकांना कळते आहे.
कसे ?
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
एखाद दुसरी कथा?
दहा हजारातली एक कथा असे म्हटले आहे. नीट वाचा की राव..
आणि त्यावर लाखाचे नव्वद हजार झाले असेही म्हटले आहे..
जरा स्पष्ट लिहिलेले समजून घ्या ना राव !
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
ही कथा कट्ट्यावर कथाकथनात झालेल्या अनेकापैकी एक होती हे डिसक्लेमर लिहीण्याचं विसरलात का ?
ही एक कथा असून "एक" कहाणी /कथा /किस्सा या स्वरुपात वाचावी. सरसकट निर्णयाप्रत येण्यासाठी सांख्यीकी विदा(?) म्हणून याचा उपयोग नाही.असा स्पष्ट खुलासा करावा
असो.
ही एक कथा असून "एक" कहाणी /कथा /किस्सा या स्वरुपात वाचावी. सरसकट निर्णयाप्रत येण्यासाठी सांख्यीकी विदा(?) म्हणून याचा उपयोग नाही.असा स्पष्ट खुलासा करावा
हेच तर मी पण म्हणतो.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
खरं सांगायचं तर आम्ही हे असे अनुभव वाचून घाबरून जातो.
असं आपल्या मुलाच्या/मुलीच्या बाबतीत व्हायला नको असं वाटत असतं.
एखादा अनुभव सांगितल्यावर जर आपण थोडे मार्गदर्शनपर लिहिलेत तर
माझ्यासारख्या गोंधळून गेलेल्या पालकांसाठी ती मोठीच मदत होईल.
रेवती
वाचून मला प्रखर वास्तवाची पुन्हा एकदा जाणीव झाली. मात्र पोर्न च्या उपलब्धतेबद्दल भयंकर आश्चर्य वाटले नाही. मीदेखील ८० च्या दशकात पौगंडावस्थेत होतो. " त्या काहीशा मागासलेल्या काळात जर इतके तर आताच्या इन्फोर्मेशन सुपरहायवे च्या काळात किती ?" याचे त्रैराशिक मी मांडू शकतो. त्यामुळे याचा प्रादुर्भाव प्रचंड असणार यात शंका नाही.
आता मी जे लिहीतो आहे ते थोडे संवेदनाविरहित वाटेल. ज्या मुलाची ही "केस" झाली त्याबद्दल मला एक प्रौढ माणूस म्हणून मला सहानुभूती वाटली. त्याला मदतीची गरज आहे हे निर्विवादपणे वाटाले. पण मी त्याच्या वयाच्या मुलाच्या दृष्टीने विचार करतो ; आणि तेव्हा माझ्या मनात काही शिव्यांसमवेत विचार येतो की, "साला अंड्यात आहे. असे काय वागतो ? सगळेच बघतात की. यानेच असे कशाला वागावयाचे ? यांच्यासारख्यामुळे आता हा पार्लर बंद होणार. थोडक्यात , दुसरे शोधणे आले !"
अर्थात असे म्हणणे चुकीचे , समस्येला नाकारणारे ठरेलच. पण ही गोष्ट शिल्लक रहाते की, पौगंडावस्थेतल्या मुलांना हे मार्ग उपलब्ध आहेत. आणि ते आज नाहीत. काही मुद्द्यांचा जास्त खोलवर परामर्श घेता येईल :
१. "बर्डस् अँड बीज्" : मुलांना नक्की कुठल्या वयात लैंगिक मामल्याची कल्पना द्यावी ? की त्यांना इतरांकडूनच हे मिळायला हवे ?
२. "पोर्न" : हा कठीण मामला आहे. थोडासा पुराच्या पाण्यासारखा - किंवा प्रदूषित हवेसारखा . म्हणजे ही गोष्ट अस्तित्वात आहे इतकेच नव्हे तर दारा-खिडक्यांच्या फटीतून ती आत शिरते आहे. तिला कसे थांबवायचे ? थांबविण्याच्या प्रयत्नात मुलांचा श्वास घुसमटेल का ? घुसमटण्याच्या भितीने मग आत येऊ द्यायचे का ? का युगानुयुगे जे होत आले आहे तेच : म्हणजे हे असे काही अस्तित्त्वात नाही असे समजणे ; आपल्या मुलांना त्याची बाधा होणार नाही असे समजणे आणि या आणि असल्या विश्वासाखाली जगत रहाणे.
(मला वाटते क्र. २ चा मुद्दा सर्वसाधारण पातळीवर नेऊन ठेवता येईल : पोर्न हा एक भाग झाला . व्यसने वगैरे इतर बाबीही यात येतील.)
३. सर्कीट यांनी मांडालेला मुद्दा : विदा : पोर्नमुळे बलात्कार कमी होत असतील असे मानायचे का ? (हाच प्रश्न वेश्याव्यवसायालाबद्दलही लागू होईल.) म्हणजे या घटकाने आपले सामाजिक पोत (सोशल फ्याब्रिक ) नक्की कसकसे बदलले आहे ? त्यात ज्याप्रमाणे वाईट असे काही आहे त्याप्रमाणे काही चांगले आहे का ? एक समुपदेशक म्हणून याचा विदा लेखकाला मिळाला का ?
एक समुपदेशक म्हणून याचा विदा लेखकाला मिळाला का ?
मास्तर,
मुक्तसुनीतांच्या मूळ प्रश्नाला बगल दिलीत !
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
ग्रास रूट लेवलवर काम करणारे विदा तपासत बसत नाही. समोर आलेला प्रष्न सोडवतात.
मी समोर आलेला प्रष्न सोडवला. कट्ट्यावर काय चर्चा झाली ह्या इतर सदस्यांच्या मागणीला मान दिला, व इथे मांडला.
हा प्रष्न जर एखाद दुसरी कथा असेल तर सर्वात जास्त मला खूप आनंद होईल.देव करो तसेच असो.
प्रभुकाका,
तुमच्या कामाबद्दल आदर अनेक वेळेला व्यक्त केला आहे. पुन्हा एकदा करतो !
पण काही गोष्टी या नकळत घडत असतात ; कमीत कमी अशा घटनांची शक्यता आपण विचारात घ्यायला नको का ? पोर्नमुळे बलात्कार कमी होतात असे मी छातेठोकपणे सुचविलेले नाही. पण अशी एक (तुमच्या दृष्टीने शून्य !) शक्यता आहे ना ? माझा मुद्दा तितकाच होता.
तुमच्या कामाबदल आणि ज्ञानाबद्दलही अनादर नाही.
मला बोलण्याचा कितपत अधिकार ते समजत नाही, कारण यासंदर्भात प्रत्यक्ष कार्य मी केलेले नाही.
"..शक्यता आहे ना?"
यावर असा प्रश्न मनात आला की, बलात्कार कमी होण्याची शक्यता असावी म्हणून पॉर्न योग्य का? वेश्याव्यवसायामुळे इतर स्त्रीयांवर अत्याचार कमी होतात म्हणून ते योग्य का? आपण त्यांचे समर्थन करता आहात असे मी म्हणतोय, असा गैरसमज कृपया करून घेऊ नये. मला फक्त समस्येच्या मुळापर्यंत जावेसे वाटले म्हणून असा प्रश्न पडला. माझ्यामते समाजात कामवासनेचा वारू अनिर्बंध मोकाट सुटलेला आहे अन् यामुळे त्याला पोषणच मिळेल. पॉर्न भरपुर झालेय अन् वाईट असले तरी एक चांगली बाजू ही सुद्धा की बलात्कारासारखे अत्याचार कमी होऊ शकतात हा विचार जरी झाला, तरी पायाच मुळात अयोग्य असल्यामुळे डोलारा पडणारच.
मला एक शंका आहे. पॉर्न मुळे मुलगा बिघडला, असे वरील लेखात म्हटलेले आहे.
पण पॉर्न हे तर केवळ निमित्त होते. स्वतःच्या घरातील स्त्रियांविषयी मुलाला आपुलकीची, आदराची भावना नव्हती, हे मूळ कारण, असे मला वाटते.
अनिर्बंध मोकाट सुटलेला समाज मी तरी कुठेही पाहिलेला नाही, म्हणून मला ही शंका आली.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
कालाय तस्मै नम:..! दुसरं काय?
मी त्या आईच्या किंवा बहिणीच्या जागी असतो तर 'खिडकीतली आहेस का?' वगैरे भाषा वापरणार्या त्या मुलाला आधी बेदम मारला असता..! साला, पुढचं पुढे..!
प्रभूसर, दोन सणसणीत कानशीलात भडकावल्याने बरेचसे प्रश्न सुटतात असा माझा विश्वाश्व आहे..तेच सर्वात उत्तम समुपदेशन आहे! :)
साला, आम्ही आमच्या बापाच्या हातचा मरेस्तोवर मार खाल्ला. काय वाईट झालं आमचं? तेव्हा बाप मारायचा त्याचा राग यायचा पण तोच उपाय उत्तम होता/आहे असं आता वाटतं!
तात्या.
साला, आम्ही आमच्या बापाच्या हातचा मरेस्तोवर मार खाल्ला. काय वाईट झालं आमचं? तेव्हा बाप मारायचा त्याचा राग यायचा पण तोच उपाय उत्तम होता/आहे असं आता वाटतं!
सहमत
उगाच नको त्या लोकांना मानवाधिकार दिल्याने फुकट डोक्याला त्रास होतो.
उगाच नको त्या लोकांना मानवाधिकार दिल्याने फुकट डोक्याला त्रास होतो.
ह्म्म.. कुठे आहेत रे ते एन्जीओ वाले ?? इकडे जरा बघा...
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
>>>तेव्हा बाप मारायचा त्याचा राग यायचा पण तोच उपाय उत्तम होता/आहे असं आता वाटतं!
आम्ही बी हेच म्हणतो... धोबीघाटावर जसे कपडे धुतात तसा धुतला मला लहानपणी नेहमीच ;) पण त्याच्यामुळेच माझ्या अंगी एक गुण लागला... चिकाटी... त्यांनी मारणे थांबवले नाही व मी मारखाने =))
पण मी त्यांचे आभार देखील मानु शकलो नाही जिवनात कधी हीच खंत !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
तीन एक वर्षामागे डिपीएस स्कॅन्डल दिल्ली झालेलं आठवतं का प्रभु ?
मी तर दंग झालो होतो !
त्यावेळी माझे जितके क्लाईन्ट होते (घरगुती) त्याच्या घरात व्यक्तीशः जाऊन मी संगणक चेक केले होते... व ज्यांची मुलं / मुली तरुण होणाच्या मार्गावर आहेत त्या आई-वडीलांना समजावून बेवसाईट ब्लाकर घालून दिलेले... व कशी काळजी घ्यावी ह्या बद्दल देखील प्रशिक्षण दिले !
आज काल लोकं आपल्या मुलाचे अकांऊट ओर्कुट वर आहे.. याहू वर आहे हे पाहून खुष होतात... एक महाशय असेच खुषीने मला आपल्या १२-१३ वर्षाच्या मुलीचे ओर्कुट वरील अकांऊट दाखवत होते.. ती प्रोफाईल पाहून मी दंग झालो... ! मग त्या महाशयांना मी जरा ओर्कुटची काळी बाजू दाखवली ..... त्याचा धक्काच बसला.... व ते तडकाफडकी मुलीला महाजाला पासून दुर रहा अशी तंबी देऊ लागले तेव्हा मी त्यांना संमजावले व त्यामुलीचे ऑर्कुट प्रोफाईल पुन्हा तयार करुन दिले... ! शक्य होईल तेवढी आपली व्यक्तीगत माहिती महाजालापासून लपवावीच !
मागील काही वर्षापासून एक नवीन मनोरोग चालू झाला आहे.. कोणी मुलगी नाही म्हणाली.. नकार दिला म्हणून तीचे फ्रॉड प्रोफाईल महाजालावर चढवायचे व तीचा नंबर द्यायचा.... बापरे विचार करा त्या मुलीला व तीच्या फॅमेलीला काय त्रास भोगावा लागला असेल ! का किस्सा नसुन अनुभव आहे.... ! त्यामुळे प्लीज आपली माहीती जपा !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
प्रभु !
मी पण दिड एक वर्ष कॅफे चालवला आहे ... दिल्लीच्या पॉश येरियात.... !
असले अनुभव पाहून तर डोक्यात राख घालून बसलो होतो एक दिवस पुर्ण !
माझ्या जवळच्या मित्राच्या घरात कलह निर्माण झाला होता फक्त एका प्रिंन्ट मुळे व त्या मुळे मुलाच्या वडीलांना हॉस्पिटल मध्ये घेऊन जावे लागले होते .. खुप वाईट अनुभव !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
आमच्या इथं एका माणसाने सायबर कॅफे टाकला होता ,,,पण त्याचा कॅफे काही दिवसातच बंद पडणार हे आम्ही मित्रांनी तेव्हाच ओळखले होते कारण ..त्याने पॉर्न साईट बॅन करणारी सॉफ्टवेअर टाकली होती !!! कसा होणार बरं त्याचा धंदा??
शेवटी कॅफे बंद पडला !!!
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
मागचा शहाणा!
अनुभव वाचला. चर्चाही वाचली. दहा हजारात एक अनुभव असेल किंवा दहा लाखात! पण आहे हे निर्विवाद.
(आणि ज्याचे जळते त्यालाच कळते!)
त्या 'अमुक इतक्यातला एक' आपला पाल्य नसावा ही काळजी घेणे जरूरीचे आहे हा संदेश मिळाला.
आणि न जाणो, तसे झालेच तर ओळखायचे कसे? काय करायला हवे? या प्रश्नांची थोडी कल्पना आली हेही नसे थोडके!
प्रभूजी, अशी अपवादात्मक(?) उदाहरणे जरूर लिहित रहावे.
नक्की अडचणीची सुरवात कुठे आहे?
१. मुलाने पोर्न पाहीले?
२. आई-बहीनीला वाईट बोलला?
३. आई-बाबा नी मुलाला चांगल्या सवयी लावल्या नाहीत?
४. कि बेभान तारुण्य अडचण?
नाही, पुर्वी ही वाईट गोष्टी होत्या, भविष्यातही राहतील.
मुळ सुरवात कुठुन झाली? हे महत्वाचे.
उगाच लक्षणावर उपचार करण्यापेक्षा मुळ रोगाचा शोध कधीही चांगला.
प्रभुजी की जय हो
एक चांगला विषय पण तुम्ही जितकी समजता तितकी ही समस्या भयानक नाही असे मी तुमच्या वयाचा, ज्ञानाचा व अनुभवाचा आदर ठेवुन सांगु इच्छितो. तथाकथित साईटस जेव्हा नव्हत्या तेव्हा असे नव्हते का? होतेच की. व्हीसीआर वगैरे होते. तत्पुर्वी प्लेबॉय किंवा पिवळ्या वेष्टनाची पुस्तके गल्लोगल्ली मिळायची. आजही मिळतात. पुस्तके नव्हती तेव्हा चर्चा व्हायच्या. आजही तुम्ही नीट विचार करा केवळ एकाच वयोगटातले आणि एकाच लिंगाचे व्यक्ती एकत्र असतात तेव्हा काय ते अद्वैतवादावर गप्पा मारतात का? नाही. (घरी सज्जन असणारे कॉलेजातली पोरे लाईन न देणा-या पोरीबद्दल काय उद्गार काढतात हे ऐका किंवा आठवा.) अहो म्हातारे गेलेल्या अन तरणे येणा-या दिवसांबद्दल तर बायका 'गेलेल्या' दिवसांबद्दल बोलतात...
आज मिडीयामुळे इकडे बलात्कार तिकडे विनयभंग अशा बातम्या येत आहेत. पण न येणा-या बातम्या किती आहेत? तसेच जेव्हा मिडीया नव्हते तेव्हा काय हे नव्हते का? होतेच की. अन प्रत्येक घराघरातुन नातेवाईकांचा होणारा त्रास खास करुन ३ ते ८ वयोगटातील मुलांना आणि मुलींना? मागील शतकातील न्हाव्यांचे अन विधवांचे किस्से तर सुपरिचित आहेत. तेव्हा त्याबद्दल बोलायलाच नको.
पोर्न साईटवर बंदी घालुन काही होणार नाही. उलट समस्या वाढेल. निदान मृगजळ तर मृगजळ पाहु द्या... अहो मृगजळाने तहान भागत नाही हे कितीही खरे असले तरी आपल्याला तहान लागते की नाही हे मृगजळाने कळते तरी. काय झाले आहे की आपल्यावर असलेल्या पुर्वापार संस्काराने आपण काही गोष्टींकडे एका विशिष्ट चष्म्याने बघतो. तो चष्मा निधाला की सगळे स्वच्छ दिसते.
१०० मधे ५-१० असे असणारच. अहो काहीही माहीती नसणारे पण असतात की. चांगले द्विपदवीधर असतात. नंतर डॉक्टरचे खिसे भरतात. आपल्या देशात लैगिंक बाबींबद्दल चर्चा करणे हे तितकेसे प्रशस्त समजले जात नाही जरी त्यातील क्रियांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उल्लेख आपल्या नेहमीच्या बोलण्यात होत असतो. असो.
यावर अधिक लिहिणे हा आपल्या अधिकारात अधिक्षेप होतो. येथेच थांबतो.
आपलाच,
(माहितगार) नाना
धन्यवाद नाना,
परिस्थिती एवढी वाईट नसेल तर चांगले आहे. मी कुठे म्हटले आहे पॉर्न साईट वर बंदी घाला. पण २००५ नंतर मुलांचे सोडा, मोठ्याची डोकी पण ठिकाणावर रहात नाही. प्लेबॉय मी पण बघितलेले आहे. पण त्यात पर्वर्जन नव्हते. निदान मी बघितले त्यांत नव्हते.
पर्वर्जन सोडा, लग्न झालेले पॉर्न बघुन मॉडेल बरोबर स्वःत ची तुलना करुन वैवाहिक जिवनाची वाट लावतात. काहीही फिजिकल प्रॉब्लेम नसतो. असतो तो तुलनेने होणारा मानसिक त्रास. असल्या पेशंट मधे खुप वाढ झाल्याचे माझे ह्या क्षेत्रातील ३० वर्षाचा अनुभव असलेले सांगतात.२००५ नंतर.
प्लेबॉय मी पण बघितलेले आहे. पण त्यात पर्वर्जन नव्हते. निदान मी बघितले त्यांत नव्हते.
खरे आहे. प्लेबॉय मधले लेखही विचारप्रवर्तक असतात.
मूळ मुद्दा असा आहे, की पॉर्नचे वर्गीकरण व्हायला हवे. एकगठ्ठा पॉर्नवर दोष ढकलणे मला तरी पटत नाही. मुलाने "किळसवाणे" काहीतरी पाहिले, असे प्रभूसरांकडून कळते. सर्वसाधारण शरीरसंबंध किळसवाणे नसतात.
प्रभूसरांच्या प्रतिसादातून २००५ हे वर्ष भारतीय समाजातील लैंगिक "विकृती"च्या दृष्टिकोनातून "टर्निंग प्वाईंट" होते, असे दिसते. ह्याबद्दल उहापोह व्हावा.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
प्लेबॉय मी पण बघितलेले आहे. पण त्यात पर्वर्जन नव्हते.
पर्वर्जन ची व्याख्या एक्स्पोजर नुसार आणि काळा नुसार बदलते आहे असं नाही का वाटत तुम्हाला. पुर्वी लोकं हेलन चे नाच बघून उत्तेजीत होत असत, बाहोंमें चले आओ ह्या गाण्यावर (सुसंस्क्रुतांकडून) नाकं मुरडली गेली होती आणि आज कुठल्याही चॅनवर 'अग बाई हे तरी का घातलंयस' असं वाटायला लावणारे कपडे घालून उफाड्याच्या मॉडेल्स नाच करताना दिसतात. आम्ही ते जेवता जेवता बघत असतो. काहिही वाटत नाही.
पोर्न पुर्वीही होतंच. आमच्या लहानपणी प्लेबॉय, पेंटहाऊस सारखी इंगर्जी मासिकं तसंच हैदोस, करमचंद, गुलाब सारखी मराठी पुस्तकं होतीच की. पुर्वी वि. सि. आर. होते आज सिडीज आल्या आहेत. आणि पुर्वी मधे जे दाखवायचे तेच आजही दाखवतात.
पुर्वीच्या मुलांना दारू, सिगारेट, पोर्न चं आकर्षण नव्हतं असं थोडीच आहे. ते असणारंच. पण पालकांचा धाकच इतका असायचा की चांगलं वाईट सोडा, बापाचं ऐकलं नाही तर तो घराबाहेर कढायलाही कमी करणार नाही ही भिती माझ्या वडिलांच्या पिढी पर्यंत तरी होती.
आज-काल चा बाप गोगल गाय झालाय. आई-बाबांच्या करियर पायी मुलांकडे दुर्लक्ष होण्याचं प्रमाण आज-काल वाढलंय. मुलाला वेळ देता येत नाही ह्याचं शल्य, नोकरी तर करायलाच हवी ह्याचा मानसीक ताण पुर्वीच्या बापांपेक्षा आत्ताच्या बापांवर जास्त आहे. त्याची भरपाई मग भरमसाठ पॉकेट मनी तून होते. नी त्यावयात सगळेच जे करतात तेच ही मुलं करतात. सद्सद विवेकबुद्धी असण्याचं हे वय नसल्याने मुलं वाया जाण्याचा संभव असतो. आम्हाला निदान घरी गेल्यावर बाप झोडेल ही भिती असायची. आता तिही नाही. झोडायला बापच घरी नसतो.
केस विषयी - पहिल्यांदा शिवी दिल्यावर आई ने कचकचीत कानाखाली वाजवली असती तर मुलगा ताळ्यावर आला असता. त्या वयात अक्कल नसते आणि ती नाहिये हे त्याहून मान्य नसतं. तेव्हा अशावेळी आमच्या आई-बाबांनी केलेली हुकूमशाहीच योग्य आहे असं वाटायला लागतं.
काळानुसार त्याचे व्यक्त होणारे स्वरुप आणि ते आकर्षण शमवण्याचे मार्ग बदलत जाणे अटळ आहे.
पूर्वी फक्त मासिका पुस्तकातून दिसणारी चित्र एवढेच स्वरुप प्रामुख्याने होते. विडीओ कॅसेट्स आणि प्लेअर्स असले तरी किती जणांकडे असतील?
मुलांना धाक होताच. आम्ही ठराविक वेळानंतर घरी आलो नाही की चौकशी व्हायची आणि फालतू उत्तरांना व्यवस्थित फटके पडायचे!
दिवेलागणीला घरात येण्याचे दिवस संपलेत हे खरे.
आजच्या पिढीला मागल्या पिढीसारखे मारणे शक्य नाही आणि ते योग्यही नाही पण मुलांना योग्य तो धाकही हवाच. वाटेल तसे बोलले वागलेले चालत नाही त्याला योग्य ती शिक्षा होते ही जाणीव असणे फार महत्त्वाचे. मारलेच पाहिजे असे नाही पण गरज असेल तर एखाद दुसरा फटका जरुर मारावा! आई-वडील हे योग्य कारणाने नाराज आहेत आणि त्यांचा असहकार हा आपल्याला त्रासदायक ठरतो आहे इतपत जिव्हाळ्याचे संबंध मुलांशी निर्माण होणे हे फार महत्त्वाचे आहे!
मारता येत नाही म्हणून प्रश्न तसेच ठेवता येत नाहीत ते सोडवायला तर हवेच. पालकांनी हे प्रश्न प्रेमाने आणि योग्य मार्गदर्शनाने सोडवायला हवेत. मुला-मुलींच्या वागण्यातले बदल दुर्लक्षू नका. त्याकडे संवेदनशीलतेने पहाणे फारच गरजेचे असते. कित्येकवेळा त्यांनी काय पाहिले किंवा त्याचा अर्थ काय, योग्य-अयोग्य काय, हेही त्यांना माहीत नसते अशावेळी ओरडण्यापेक्षा, समजावून घेणे आणि सांगणे महत्त्वाचे असते. मुला-मुलींना कळत्या वयात किती पालक लैंगिक संबंधांबद्दल माहिती देऊ शकतात?
तुम्हाला देता येत नसेल तर डॉ. आहेत ना? त्यांच्याकडे घेऊन गेलात तर ते नक्की मार्गदर्शन करतील. त्रयस्थ माणसाकडून ही माहिती द्यायला आणि घ्यायला, तेही त्याच्या व्यवसायाचा भाग म्हणून, संकोच निश्चितच कमी वाटतो. आकर्षण हे असणार, त्यात अनैसर्गिक असे काही नाही, ओशाळून जाण्यासारखेही काही नाही पण त्याचे व्यवस्थापन त्या त्या वयानुसार करत जाणे महत्त्वाचे.
मुख्य म्हणजे आई-वडील-मुले हा त्रीकोण/चौकोन व्यवस्थित संतुलित असणे फार महत्त्वाचे. वडील आईला फक्त ऑर्डरी सोडतात किंवा आई वडील सतत घराबाहेरच असतात. मुलांना फक्त पैसे, खाऊ देऊन प्रश्न सोडवण्याकडे कल असला तर भावनिक बंध जुळायचे कधीच जमत नाही.
आई-बाप काय काम करतात, घरात येणारा पैसा कुठून कसा येतो त्याचे महत्त्व काय, त्याची मर्यादा काय ही जाणीव लहान वयातच त्यांना समजेल अशा भाषेत मुलांना द्यावी. त्यांना समजते आणि पैसा गैरमार्गाने वापरला जाण्याची शक्यता खूप कमी होते.
आपल्या समस्यांसाठी घरात माणसे आहेत आणि त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू शकण्याइतके थेट संबंध निर्माण होणे महत्त्वाचे. मुलांबर जबाबदारी टाका. त्यांना त्यांचे छोटे छोटे निर्णय स्वतः घेऊद्या. चुकीचा निर्णय घेत असतील तर त्याच्या परिणामांची कल्पना द्या आणि त्यालाच जबाबदारी द्या. उदा. थंडीच्या दिवसात आईस्क्रीम खायला मागतोय. घेऊद्या पण खोकला झाला तर तू जबाबदार आहेस हे सांगा. खोकला झाला तर त्याला बरोबर कळते. पुढच्यावेळी तो ती चूक करत नाही! लहानपणी मिळालेले हे धडे पुढे नको त्या चुका करण्याला निश्चीतच पायबंद घालू शकतात. आपल्या कृतीला आपणच जबाबदार आहोत ह्याची जाणीव निर्माण करा. मागता क्षणीच सगळे मिळणे ह्यातही त्या गोष्टीची किंमत रहात नाही. एखादी गोष्ट अति सहजसाध्य कधीच असू नये. थोडा तरी प्रयत्न त्यासाठी करायला लागला पाहिजे. मग तो कोणत्याही प्रकारे असू दे. ह्या परिच्छेदात उल्लेखलेल्या गोष्टींचा लैंगिक गोष्टींशी काय संबंध असे वाटण्याची शक्यता आहे पण कृती-परिणाम-जबाबदारी ही शृंखला त्यातून सिद्ध होते, ठसते.
ह्या प्रश्नाची दुसरीही बाजू आहे. कित्येकदा पालकच ह्या असल्या पोर्नच्या जाळ्यात अडकलेले असतात. लैंगिक सुखातला तोचतोचपणा काढून टाकणे ह्या नावाखाली तेच असली मासिके, सिडीज आणि वेबसाईट्स सर्च करत असले तर मुलांवर काय वचक ठेवणार!
चतुरंग
काही दिवसांपुर्वी वडील मला म्हणाले "आज कालच्या पोरांना काय झालयं कळतच नाही. जावं त्याच्या घरी भिंतीवर रंगीत पेनाच्या रेघोट्या. तुमच्या वेळेस पेनं नव्हती का काय! पण एकदाही कधी तुम्ही भिंतीवर रेघोट्या नाही मारल्या. भिंती कश्या स्वच्छ होत्या. आता.........."
मी म्हणालो "इतर पोरांची गोष्ट सोडा. माझं पोरगं सव्वा वर्षाचं झालं नाही तर त्याच्या हातात पेन आहे. मी तिसरी पास होई पर्यंत मला पेन सोडा शिसपेन्सील मिळाली नव्हती. आपसुकच हातात पेन येई पर्यंत 'पेन फक्त कागदावर चालवावा, भिंतीवर नाही' येवढी अक्कल आली होती".
************************************
घरात एकदा टी-टाइम चर्चा करताना बहीण भडकून म्हणाली "काय गरज आहे सरकारला ड्रायव्हरचं वय बघण्याची? गाडी चालवता येते की नाही एवढंच पहावं आणि लायसन्स द्यावं."
तिला समजावता समजावता नाकी नऊ आले. बाई गं १८ वर्षाच्या आधीची वर्ष - १२ ते १६,१७ - पौगंडावस्थेची वर्षे असतात. या काळात स्त्री आणि पुरुषात बरेच शारीरीक आणि मानसीक बदल होत असतात. त्यातील एक मानसीक स्थित्यंतर म्हणजे हार्मोनल बदलांमुळे भावनांवर नियंत्रण न रहाणे. बर्याच प्रयत्नानंतर तिला समजलं योग्यवेळी हे बदल स्थिरावतात.
************************************
दोन्ही ठिकाणी बलप्रयोग कामाला नक्कीच येणार नाही. "१८ वर्षाच्या आत गाडीची चावी हातात घेतलीस तर फोडून काढेन!" या दटावणीनं काय होईल याची कल्पनाच केलेली बरी. हातात पेन घेणंही चुकीचं नाही आणि गाडी घेणंही. फक्त योग्य वेळ येई पर्यंत कळ न काढणं अवघड. दोघांसाठीही - पेन देणारा आणि घेणारा.
प्रभुसर तुम्ही म्हणालात पॉर्न ला सर्वाना केव्हाना केव्हा सामोरे जावे लागते. मी पण गेलोय. पण आधी ते एवढे सुलभ नव्हते, स्वस्त तर नव्हतेच नव्हते. यातच या समस्येचं उत्तर आहे. तुमच्या माझ्या बाबतीत ही योग्य वेळ अपोआपच पाळली गेली.
मला वाटतं पालक आणि पाल्य यांच्यातला सुसंवाद हेच यावरचं एकमेव उत्तर आहे. पाल्याला समजलं पाहिजे, आपल्याला का नाही म्हणताहेत. शिवाय अफाट उत्साहावरही नियंत्रण हवच. आणि सरांनी इथं तेच केलेलं आहे. हर्मोनल इंब्यालंस (आठवतं - अड्रेन्यालिन!) मुळं तयार झालेल्या आफाट उत्साहाला क्रिकेट आणि अभ्यासाच्या माध्यमातून वाट करून दिली. सर्कीट काका आठवतं का "अक्टिविजम".
पण पॉर्न हे तर केवळ निमित्त होते. स्वतःच्या घरातील स्त्रियांविषयी मुलाला आपुलकीची, आदराची भावना नव्हती, हे मूळ कारण, असे मला वाटते.
मुलगा मनोकायिक स्थित्यंतरातून (psycho-somatic trasition) जातो आहे. फक्त येवढंच पहायला हवं की हे परीणाम कायमस्वरूपी नसावेत.
महेश हतोळकर
सेफ्टी व्हॉल्व्ह खराब झाला, उघडत नसेल तर प्रेशर कुकरसुद्धा हवेत उडतो आणि त्याची जाणीव करुन देतो. इथे तर जिवंत माणूस आहे.
नैसर्गिक गोष्टींवर वाईट, खराब, समाजाच्या आरोग्यासाठी वाईट असे शिक्के मारून माणसाच्या मूळ इच्छा दाबून ठेवल्या की काय होणार? या मुलाच्या बाबतीत त्या दिवसाआधीपर्यंत त्याला कितपत शिक्षण दिलं होतं हा प्रश्न मला पडलाय. त्याला आधीच या गोष्टींची थोडी-फार कल्पना होती का, कोणत्या माध्यमातून मिळाली होती, घरी किती मुक्त वातावरण होतं हे प्रश्न तेवढेच महत्त्वाचे नाहीत का? किंवा उलटपक्षी दर दुसर्या घरात ही गोष्ट दिसते का हजारांमधे एक?
अर्थात विसुनानांचा मुद्दा, ज्याचं जळतं त्यालाच कळतं हेही मान्य आहे, पण मुळात आग लागण्याची वेळच का येते याचा विचार पालकांनी केला का? मुलाला त्याच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं, ठीक आहे; पण ते आधीच का झालं नाही? योग्य वयात अनेक गोष्टींची कल्पना पालकांनी का दिली नाही? आणि या योग्य गोष्टींमधे फक्त काम हा एकच मुद्दा नाही, तर अर्थ आणि स्वयंशासन या दोन गोष्टी येतात का?
पण मुळात आग लागण्याची वेळच का येते याचा विचार पालकांनी केला का?
मुलाला योग्य वयात लैंगिक गोष्टींबद्दल माहिती करून देणे आणि ज्या वस्तूचा (निदान मलातरी) विचार करता येत नाही अशी वस्तू प्रजननमार्गातून बाहेर येताना फिल्ममध्ये दाखवणे या दोन्ही गोष्टी एकाच पातळीवर आहेत असे (निदान मलातरी) मुळीच वाटत नाही.
नैसर्गिक गोष्टींवर वाईट, खराब, समाजाच्या आरोग्यासाठी वाईट असे शिक्के मारून माणसाच्या मूळ इच्छा दाबून ठेऊ नयेत हे ठीक.
पण त्यालाही योग्य वेळ यायला हवी. नाहीतर मुली दहा ते सोळा आणि मुले पंधरा ते आठरा वर्षे वयातच सर्व नैसर्गिक गोष्टी करू शकतात. या वयात माणसाच्या मूळ इच्छांना दाबून ठेऊ नये असे म्हणता येईल काय?
पण इथे नैसर्गिक असे काय होते? असा प्रश्न पडतो. (मुलाने पहिल्या तीन डीव्हीडी पाहिल्या पण चौथी पाहताना त्याला जबरदस्त घृणा आली याचा अर्थ मुलगा सोवळा तर नक्कीच नव्हता.)
आपल्या पाल्या(डबल ल) ला 'लैगिक विचारही मनात आणू नकोस' असे सांगणे किंवा 'चल, ट्रिपल एक्स डीव्हीडी बघू या' असेही सांगणे हे दोन्ही विकृत मार्ग आहेत.
असली आग लागण्याची पाळी का येते?
तर समाजात या दोन्ही प्रकारच्या विकृत गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत.
आजकाल 'अरे... तू हे केलं नाहीस?!' असे सखेदाश्चर्याने काढलेले उद्गार फारच टोकाच्या गोष्टींसाठी असतात. प्रेशर टाकणारे पियर्स भलतेच पुढे गेलेले असतात. 'गेमिंग झोन' च्या नावाखाली सायबर कॅफेमध्ये पाचवीपासूनची मुले सर्रास पोर्न पाहतात हे माहित आहे. चांगल्या घरातली मुले वहावत गेलेली दिसतात. (चांगले घर - सुशिक्षित आईबाप, मध्यमवर्गीय कुटुंब इ.इ.)
पाल्या(डबल ल)वर नियंत्रण ठेवणे म्हणजे त्याच्या इच्छा दाबून ठेवणे नव्हे, किंवा त्याचा सेफ्टी व्हॉल्व बंद करून टाकणे नव्हे. पण भरधाव जाणार्या गाडीला ऍक्सलरेटरप्रमाणे स्टियरिंग, क्लच, ब्रेक, आणि कधी हँडब्रेकचीही गरज असते.
लाड करावेत, कौतुक करावे, स्वातंत्र्य द्यावे याबरोबरच लक्ष द्यावे, नियंत्रण ठेवावे हेही पालकांचे कर्तव्यच आहे.
योग्य त्या भूमिकेत शिरल्यावर आपसुकच असं शहाणपण येतं. ;)
प्रतिक्रिया
शीर्षक.
भीषण
पालकांचा अंकुश हवाच
प्रभूजी, वाचलेले केवळ भीषण आहे!
लैंगिक शिक्षण
प्रकोआ
काय लिहू?
अहो प्रभु
एखाद दुसरी कथा
हो का?
ता क.
प्रभूसर
+१ !
एकदा का अनेकदा
प्रभूसर,
वास्तव
कमी
टँजंट
विदा ?
विदा
तथास्तु
विदा
मला
एक शंका
अंदाज
कालाय
खरे आहे
साला,
क्या बात है !!!!!!
>>>तेव्हा
तीन एक
प्रभु ! मी
अरेच्चा
कॅफे
पुढच्याच ठेच...
धन्यवाद
कलियुग चालु आहे...
नक्की
प्रभुजी की जय हो
नाना
हम्म मी
खरे आहे
.
लैंगिक आकर्षण ही आदिम भावना आहे.
काही
टाळ्या
धन्यवाद राजे!
मलाही पटलं
प्रेशर हँडलिंग
विषय वेगळा आहे.