✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कोल्हापूर कट्टा . .

अ
अद्द्या यांनी
Wed, 04/22/2015 - 21:52  ·  लेख
लेख
तर मंडळी . . येत्या मे महिन्यातल्या १० तारखेला कोल्हापुरात कट्टा करणेचे योजिले आहे . . सध्या मी , अन्या दातार, स्नेहांकिता, कंफ्युज्ड अकौंटंट हि एवढी मंडळी तयार आहोत . . ३०० किमी च्या परिघातल्या सर्वाना हे जाहीर निमंत्रण . ४-५ तासाच्या प्रवासात कट्टा होऊन जैल आरामात त्या बाहेरचे लोक येणार असतील तर अति उत्तम . . कोण कोण येतंय . आणि येत असल्यास कसं . कोल्हापुरात कुठे, कधी भेटायचं . इत्यादी समदं हिक्डीच बोलू . . कट्टा १० तारखेला साधारण ११ वाजता सुरु होईल . सध्या ताराबाई पार्कात भेटण्याचं ठरलं आहे . ज्यांचं यायचं नक्की आहे त्यांनी तसं कळवावं . म्हणजे त्यानुसार इतर गोष्टींची तयारी करता येईल . काही प्रश्न असल्यास खालील पैकी कोणालाहि इथेच किंवा व्यनि करून किंवा फोनावून विचारू शकता . आदित्य (म्हणजे मी ) = ९७४३१८६६५९ अन्या दातार = ९८९०८९७४०७

पूर्ण पत्ता : सर विश्वेश्वरय्या हॉल, आर.एम.मोहिते हाउससमोर, किरण बंगल्याजवळ, ताराबाई पार्क कोल्हापूर. सदर हॉलमध्ये खालच्या मजल्यावर अन्य कार्यक्रम असून आपली व्यवस्था टेरेसमध्ये आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि येताना फोनवावे. तसेच जेवण आधी ऑर्डर करायचे असल्याने येणार्‍यांनी कृपया व्हेज/नॉनव्हेज कन्फर्म करावे, ही विनंती.

चालू हो जाव
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
56467 वाचन

💬 प्रतिसाद (305)

प्रतिक्रिया

हम्म्! अर्धवट वाचनाचा परिणाम.*

एस
Mon, 04/27/2015 - 17:37 नवीन
पिं.चिं. चं व्याकरण खडकी-दापोडी#च आहे नाही तरी. असो. (तळटीप * : सिलेक्टिव रीडिंग.) (तळटीप # : हे पुण्यातील प्रसिद्ध 'विशेषण' आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

@(तळटीप # : हे पुण्यातील

अत्रुप्त आत्मा
Mon, 04/27/2015 - 18:13 नवीन
@(तळटीप # : हे पुण्यातील प्रसिद्ध 'विशेषण' आहे.)>>> ह्हा! ह्हा! ह्हा! एकदा यावरच धागा काढावा म्हंन्तो! पण त्यासाठी फेसबुक सारखं मिपावर सिलेक्टीव्ह शेअरींग आणावं लागेल.. नै का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

कोल्हापूर असलेने प्रयत्न करु,

सूड
Mon, 04/27/2015 - 15:30 नवीन
कोल्हापूर असलेने प्रयत्न करु, पण सांच्याला पुण्यात हजर व्हावं लागेल. नऊ तारखेला संध्याकाळी आणि दहा तारखेला सकाळी असा अर्धा अर्धा कट्टा करता येईल का? ;)
  • Log in or register to post comments

दुपारी २ च्या गाडीने जरी

अन्या दातार
Mon, 04/27/2015 - 16:06 नवीन
दुपारी २ च्या गाडीने जरी पुण्यास निघालास तरी सांजकाळी ७ वाजेस्तोवर पोचशील. ९ तारखेस मी असेनच कोल्हापुरात. भेटू आपण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

चालतंय!! सांगतो कसं काय ते.

सूड
Mon, 04/27/2015 - 16:12 नवीन
चालतंय!! सांगतो कसं काय ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

मी पण हाय

अद्द्या
Mon, 04/27/2015 - 17:02 नवीन
मी पण हाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

व्हय जी!! एकदा बैजवार प्लान

सूड
Mon, 04/27/2015 - 17:22 नवीन
व्हय जी!! एकदा बैजवार प्लान टाका काय तो, म्हंजे नक्की करायला बरं. ताराबाई पार्कात भेटायचं खरं, पर म्होरला प्लान काय!! पुण्यावरनं येणार्‍यांनी आपापला डबा आणायचा असेल तर तसं सांगा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

पुणेकरांना डबा आणायला

सस्नेह
Mon, 04/27/2015 - 17:34 नवीन
पुणेकरांना डबा आणायला सांगायला आम्हाला वशाडी नाय आली ! डबा ही आयड्या पुणेकरांच्या डोक्यातच येणार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

समदी एवस्था लावण्यात येईल . .

अद्द्या
Mon, 04/27/2015 - 17:36 नवीन
समदी एवस्था लावण्यात येईल . . सोमवारी / मंगळवारी पूर्ण प्लान सांगू . . तुम्ही शंवारचा प्लान करा . काय खायचं प्यायचं असेल तर तसं सांगा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ए आता कोल्लापूर कट्टा क्यानसल

रेवती
Mon, 04/27/2015 - 17:16 नवीन
ए आता कोल्लापूर कट्टा क्यानसल करू नका हां. आमाला लै आशा आहे वृत्तांताची! सारखा पुण्यातच कट्टा कश्याला करायला हवा म्हणते मी! ते काही नाही, यशो, तू जायलाच हवस. शेवटी न राहवून मी काल तूनळीवर कोल्लापूरची चित्रफित पाहून घेतली. तेवढेच समाधान.
  • Log in or register to post comments

जमवायचा पुरेपूर प्रयत्न करते

यशोधरा
Mon, 04/27/2015 - 17:25 नवीन
जमवायचा पुरेपूर प्रयत्न करते गं आज्जी. आता तुझीच आज्ञा म्हटल्यावर मी नाही तरी कसं म्हणणार ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

माझी गुणाची बाळ ती! :)

रेवती
Mon, 04/27/2015 - 17:31 नवीन
माझी गुणाची बाळ ती! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अय्या, इश्श! पण मला भ्या

यशोधरा
Mon, 04/27/2015 - 18:30 नवीन
अय्या, इश्श! पण मला भ्या वाटतंय गं आज्जे! काहीकाही कोल्लापूरकर पुण्यावर आणि पुणेकरांवर इतका खार खाऊन आहेत असं दिसतंय की कोल्लापुरात उतरल्यावर हातात तलवार घेऊन तुटून पडतील की काय असं वाटतंय! मंग जावं का नाही? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

जा मुली, काळजी करू नकोस, देवी

रेवती
Mon, 04/27/2015 - 18:35 नवीन
जा मुली, काळजी करू नकोस, देवी अंबाबाई तुझं रक्षण करेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हां, मग हरकत नाही! :)

यशोधरा
Mon, 04/27/2015 - 18:38 नवीन
हां, मग हरकत नाही! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

;-)

श्रीरंग_जोशी
Mon, 04/27/2015 - 19:47 नवीन
अशा पाहुण्यांची जास्तच सरबराई केली जाते असे निरिक्षण आहे. मुशर्रफची नाही का जोरदार सरबराई झाली होती आग्रा परिषदेच्या वेळी :-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

विनोद जाऊ द्या, पण निरीक्षण

असंका
Tue, 04/28/2015 - 11:23 नवीन
विनोद जाऊ द्या, पण निरीक्षण अगदी फारच आवडलं आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

काहीकाही कोल्लापूरकर पुण्यावर

सस्नेह
Tue, 04/28/2015 - 10:43 नवीन
काहीकाही कोल्लापूरकर पुण्यावर आणि पुणेकरांवर इतका खार खाऊन आहेत
कोल्लापूरकर खार खात बसत नाहीत, थेट कोथळाच काढतात, हा: हा: पण यशो, तुला घाबरायचे काहीच कारण नाही, तू कोकणची ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

खार खात बसत नाहीत, थेट कोथळाच

यशोधरा
Tue, 04/28/2015 - 11:43 नवीन
खार खात बसत नाहीत, थेट कोथळाच काढतात >> इतके भुकेले असतात? :D तू कोकणची ना ? > जितकी कोकणची, तितकीच पुण्याची पण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

इश्श !

सस्नेह
Tue, 04/28/2015 - 11:49 नवीन
कोथळ्याचा अन भुकेचा काय संबंध ? बादवे, तुझं फायनल झालं का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

खाराचा आणि कोथळ्याचा आहे तोच!

यशोधरा
Tue, 04/28/2015 - 11:52 नवीन
खाराचा आणि कोथळ्याचा आहे तोच! नाही अजून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

अगदी बरोब्र. खार एवढीशी, तिला

बॅटमॅन
Mon, 05/11/2015 - 14:54 नवीन
अगदी बरोब्र. खार एवढीशी, तिला खाऊन काय भूक भागणारे थोडीच? कोल्लापुरकरांचा अपमान हाय ह्यो....किमाण बोकड किंवा ग्येलाबाजार येखांदी कोमडी तर म्हणशिला का काय वो? (ह्ये त्या खार खाऊन हैत म्हन्नार्‍यास्नी, तुमास्नी न्हवं.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

ही काय काडी म्हणावी की कॉय?

यशोधरा
Mon, 05/11/2015 - 17:09 नवीन
ही काय काडी म्हणावी की कॉय? ..पळाऽऽ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ही काय काडी म्हणावी की कॉय?

बॅटमॅन
Mon, 05/11/2015 - 17:57 नवीन
ही काय काडी म्हणावी की कॉय?
हम्म....शक्यता नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

काडीपेक्षा हाडुकतुकडा वाटतोय

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 05/11/2015 - 22:42 नवीन
काडीपेक्षा हाडुकतुकडा वाटतोय ;) हाडुकमॅन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

=))

यशोधरा
Mon, 05/11/2015 - 22:46 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

जल्ला काय कल्ला लावलाय

जेपी
Mon, 04/27/2015 - 17:22 नवीन
जल्ला काय कल्ला लावलाय ,कल्लापुर कल्लापुर कट्टा. करा की शांतपणे. स्वगत-जळजळ कमी झाली.
  • Log in or register to post comments

कट्ट्याला

सस्नेह
Mon, 04/27/2015 - 17:36 नवीन
येवा अन जेवा म्हणजे बंदच हुईल जळजळ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

अजून २ आठवडे जळजळ थांबायची

अद्द्या
Mon, 04/27/2015 - 17:37 नवीन
अजून २ आठवडे जळजळ थांबायची न्हाय . . दमानं घेवा =]]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

200 निमीत्त सगल्या कल्लापुर

जेपी
Mon, 04/27/2015 - 19:39 नवीन
200 निमीत्त सगल्या कल्लापुर करांचा सत्कार फक्त शुभेच्छा देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी
  • Log in or register to post comments

सध्या हि ९ नावे नक्की आहेत .

अद्द्या
Tue, 04/28/2015 - 14:44 नवीन
अन्या दातार रावसाहेब स्नेहातै अकौंटंट साहेब जिनेन्द्र, मितान वेताळ यमगर्निकर पैसातै सध्या हि ९ नावे नक्की आहेत . अजुनी कोणी येणार असल्यास ह्या लिस्ट मध्ये आपलं नाव वाढवा . आणि त्यापुढे जेवणासाठी वेज कि नॉनवेज हे सुद्धा लिहा . म्हणजे तशी व्यवस्था करण्यास स्नेहांकिता ताई मोकळ्या होतील . आणि बस / ट्रेन ने येणार असतील त्यांनी धाग्यात दिलेले नंबर नोट करून घ्या . म्हणजे बस स्टेन्ड / स्टेशन हून पिक करता येईल करता येईल
  • Log in or register to post comments

मी नक्की येतेय.

अनन्न्या
Fri, 05/01/2015 - 18:06 नवीन
माझे नाव घ्या लिस्टमध्ये!
  • Log in or register to post comments

येवा येवा कट्टा आपलाच आसा

सस्नेह
Fri, 05/01/2015 - 19:36 नवीन
येवा येवा कट्टा आपलाच आसा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या

मी ही कन्फर्म ।

प्रसाद गोडबोले
Sat, 05/02/2015 - 13:27 नवीन
मी ही कन्फर्म । टू डू लिस्ट : अंबाबाई दर्शन , राजाभाऊञ्चि भेळ , फडतरे मिसळ , ऑथेंटिक कल्लापुरी (शुध्द शाकाहारी बोकडाचे) मटन , रंकाळ्यावर गफ्फा आणि खिद्रापुर । तटी : परतीच्या वाटेवर वाट वाकडी केल्यास सातारी कंदी पढ़े भेट करण्यात येतील । लहानास दोन आणि मोठ्यांस एक ह्या हिशोबाने :D नवपुणेकर प्रगो :D
  • Log in or register to post comments

मी सतिश गावडे, प्रगो आणि नाद

प्रचेतस
Sat, 05/02/2015 - 13:34 नवीन
मी सतिश गावडे, प्रगो आणि नाद खुळा असे ४ जण शनिवारी ९ तारखेला भल्या सकाळी येथून निघून खिद्रापूरला साधारण १२/१ वाजेपर्यंत पोहोचत आहोत. खिद्रापूर चे कोपेश्वर आणि लगतचे जैन मंदिर पाहून कोल्हापूरास संध्याकाळी ६ च्या आसपास पोहोचू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मी पण पोचेन संध्याकाळी तिथे

अद्द्या
Sat, 05/02/2015 - 14:41 नवीन
मी पण पोचेन संध्याकाळी तिथे त्यावेळेस १० तारखेला पण आहात नं ?/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हो :)

सतिश गावडे
Sat, 05/02/2015 - 14:42 नवीन
हो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

कट्टा करुनच जाणार की राव.

प्रचेतस
Sat, 05/02/2015 - 14:44 नवीन
कट्टा करुनच जाणार की राव. बाकी कोल्हापुरात महालक्ष्मी सोडून इतर कुठली प्राचीन मंदिरे आहेत? पंचगंगेच्या काठावर एक तसे बरेच जुने मंदिर पाहिल्याचे आठवते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

ते तुम्हाला अन्या किंवा अतुल

अद्द्या
Sat, 05/02/2015 - 14:48 नवीन
ते तुम्हाला अन्या किंवा अतुल सांगू शकेल . किंवा स्नेहांकिता ताई . . मी तिथे फक्त हॉटेल्स आणि वाइन शॉप्स बघून ठेवलेत . =))) अजुनी महालक्ष्मी ला गेलेलो नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अतुल कोण?

प्रचेतस
Sat, 05/02/2015 - 14:49 नवीन
अतुल कोण? बाकी संध्याकाळचा पण कट्टा करुन टाकू की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

कन्फ्युज्ड अकौंटंट = अतुल

अद्द्या
Sat, 05/02/2015 - 14:54 नवीन
कन्फ्युज्ड अकौंटंट = अतुल तो तर करूच . धाग्यात नंबर आहेत आमचे . सेव करून ठेवा . ऐनवेळी उपयोगी येतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

दातरूचा नंबर आहेच. तुमचाही

प्रचेतस
Sat, 05/02/2015 - 14:59 नवीन
दातरूचा नंबर आहेच. तुमचाही सेव्ह करुन ठेवला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

वोक्के सर .

अद्द्या
Sat, 05/02/2015 - 15:03 नवीन
वोक्के सर . एक मिस कॉल किंवा मेसेज करून ठेवा . . माझ्या कडे हि येईल आणि यापुढे "तुझा" वापर प्लीज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

व्हय रे. करतो लगेच.

प्रचेतस
Sat, 05/02/2015 - 15:04 नवीन
व्हय रे. करतो लगेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

मिळाला

अद्द्या
Sat, 05/02/2015 - 15:30 नवीन
मिळाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मी.

असंका
Sat, 05/02/2015 - 14:56 नवीन
मी. पंचगंगेच्या काठावर अनेक मंदिरं आहेत खरी. त्यात एक अनेक मंदिरांचं बनलेलं संकुल आहे. ते म्हणत असताल तर मी असं ऐकलंय की ती छत्रपतींची खाजगी समाधीस्थळं आहेत. बाकी बरीच लहान सहान मंदिरं नदिच्या पात्रात आहेत. पण नदीला पाणी असतं त्यात ती बुडलेली असतात. मी तिथनं जवळच रहातो...जर जाणार असताल तर आठवण ठेवावी ही विनंती...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नाही नाही. शिवकालीन स्थळं

प्रचेतस
Sat, 05/02/2015 - 15:01 नवीन
नाही नाही. शिवकालीन स्थळं नाही म्हणत मी. शिलाहारकालीन काही मंदिरं आहेत अजून. नक्की कुठे आहेत ते माहित नाही. त्यातले एक पंचगंगेकाठी नक्कीच आहे (लहानसे आहे). पन्हा़ळ्याला जाताना पुलावरुन दिसत्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

इतर- टेंबलाई, बिन्खांबी गणेश,

असंका
Sat, 05/02/2015 - 15:02 नवीन
इतर- टेंबलाई, बिन्खांबी गणेश, ऋणमुक्तेश्वर, खोल्खंडोबा, इ. झालंच तर जैन मठ. लांबची झाली तर, जोतिबा, कात्यायनी. मीही कोल्हापूरचा मुळात नाही. ऐकीव माहिती देत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

जवळपास असतील तर बघता येतील ही

प्रचेतस
Sat, 05/02/2015 - 15:08 नवीन
जवळपास असतील तर बघता येतील ही मंदिरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

पंचगंगेच्या घाटावर शिवमंदिर

सस्नेह
Sat, 05/02/2015 - 15:14 नवीन
पंचगंगेच्या घाटावर शिवमंदिर आहे. महलक्ष्मि मंदिराजवळ कार्तिकेय मंदिर आहे, ते माहिती असेलच. रंकाळ्यातला संध्यामठ आत्ता पाहता येईल. मंडपांतलम भवानी मंदिर कात्यायनी, टेम्बलाई. पण इकडे शिल्पे वगैरे नाहीत. आणि इतर काही असली तर चौकशी करते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा