Skip to main content

कोल्हापूर कट्टा . .

लेखक अद्द्या यांनी बुधवार, 22/04/2015 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी . . येत्या मे महिन्यातल्या १० तारखेला कोल्हापुरात कट्टा करणेचे योजिले आहे . . सध्या मी , अन्या दातार, स्नेहांकिता, कंफ्युज्ड अकौंटंट हि एवढी मंडळी तयार आहोत . . ३०० किमी च्या परिघातल्या सर्वाना हे जाहीर निमंत्रण . ४-५ तासाच्या प्रवासात कट्टा होऊन जैल आरामात त्या बाहेरचे लोक येणार असतील तर अति उत्तम . . कोण कोण येतंय . आणि येत असल्यास कसं . कोल्हापुरात कुठे, कधी भेटायचं . इत्यादी समदं हिक्डीच बोलू . . कट्टा १० तारखेला साधारण ११ वाजता सुरु होईल . सध्या ताराबाई पार्कात भेटण्याचं ठरलं आहे . ज्यांचं यायचं नक्की आहे त्यांनी तसं कळवावं . म्हणजे त्यानुसार इतर गोष्टींची तयारी करता येईल . काही प्रश्न असल्यास खालील पैकी कोणालाहि इथेच किंवा व्यनि करून किंवा फोनावून विचारू शकता . आदित्य (म्हणजे मी ) = ९७४३१८६६५९ अन्या दातार = ९८९०८९७४०७

पूर्ण पत्ता : सर विश्वेश्वरय्या हॉल, आर.एम.मोहिते हाउससमोर, किरण बंगल्याजवळ, ताराबाई पार्क कोल्हापूर. सदर हॉलमध्ये खालच्या मजल्यावर अन्य कार्यक्रम असून आपली व्यवस्था टेरेसमध्ये आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि येताना फोनवावे. तसेच जेवण आधी ऑर्डर करायचे असल्याने येणार्‍यांनी कृपया व्हेज/नॉनव्हेज कन्फर्म करावे, ही विनंती.

चालू हो जाव

वाचने 56779
प्रतिक्रिया 305

प्रतिक्रिया

In reply to by रेवती

जमवायचा पुरेपूर प्रयत्न करते गं आज्जी. आता तुझीच आज्ञा म्हटल्यावर मी नाही तरी कसं म्हणणार ;)

In reply to by रेवती

अय्या, इश्श! पण मला भ्या वाटतंय गं आज्जे! काहीकाही कोल्लापूरकर पुण्यावर आणि पुणेकरांवर इतका खार खाऊन आहेत असं दिसतंय की कोल्लापुरात उतरल्यावर हातात तलवार घेऊन तुटून पडतील की काय असं वाटतंय! मंग जावं का नाही? ;)

In reply to by यशोधरा

अशा पाहुण्यांची जास्तच सरबराई केली जाते असे निरिक्षण आहे. मुशर्रफची नाही का जोरदार सरबराई झाली होती आग्रा परिषदेच्या वेळी :-) .

In reply to by यशोधरा

काहीकाही कोल्लापूरकर पुण्यावर आणि पुणेकरांवर इतका खार खाऊन आहेत
कोल्लापूरकर खार खात बसत नाहीत, थेट कोथळाच काढतात, हा: हा: पण यशो, तुला घाबरायचे काहीच कारण नाही, तू कोकणची ना ?

In reply to by सस्नेह

खार खात बसत नाहीत, थेट कोथळाच काढतात >> इतके भुकेले असतात? :D तू कोकणची ना ? > जितकी कोकणची, तितकीच पुण्याची पण आहे.

In reply to by सस्नेह

अगदी बरोब्र. खार एवढीशी, तिला खाऊन काय भूक भागणारे थोडीच? कोल्लापुरकरांचा अपमान हाय ह्यो....किमाण बोकड किंवा ग्येलाबाजार येखांदी कोमडी तर म्हणशिला का काय वो? (ह्ये त्या खार खाऊन हैत म्हन्नार्‍यास्नी, तुमास्नी न्हवं.)

अन्या दातार रावसाहेब स्नेहातै अकौंटंट साहेब जिनेन्द्र, मितान वेताळ यमगर्निकर पैसातै सध्या हि ९ नावे नक्की आहेत . अजुनी कोणी येणार असल्यास ह्या लिस्ट मध्ये आपलं नाव वाढवा . आणि त्यापुढे जेवणासाठी वेज कि नॉनवेज हे सुद्धा लिहा . म्हणजे तशी व्यवस्था करण्यास स्नेहांकिता ताई मोकळ्या होतील . आणि बस / ट्रेन ने येणार असतील त्यांनी धाग्यात दिलेले नंबर नोट करून घ्या . म्हणजे बस स्टेन्ड / स्टेशन हून पिक करता येईल करता येईल

मी ही कन्फर्म । टू डू लिस्ट : अंबाबाई दर्शन , राजाभाऊञ्चि भेळ , फडतरे मिसळ , ऑथेंटिक कल्लापुरी (शुध्द शाकाहारी बोकडाचे) मटन , रंकाळ्यावर गफ्फा आणि खिद्रापुर । तटी : परतीच्या वाटेवर वाट वाकडी केल्यास सातारी कंदी पढ़े भेट करण्यात येतील । लहानास दोन आणि मोठ्यांस एक ह्या हिशोबाने :D नवपुणेकर प्रगो :D

In reply to by प्रसाद गोडबोले

मी सतिश गावडे, प्रगो आणि नाद खुळा असे ४ जण शनिवारी ९ तारखेला भल्या सकाळी येथून निघून खिद्रापूरला साधारण १२/१ वाजेपर्यंत पोहोचत आहोत. खिद्रापूर चे कोपेश्वर आणि लगतचे जैन मंदिर पाहून कोल्हापूरास संध्याकाळी ६ च्या आसपास पोहोचू.

In reply to by अद्द्या

कट्टा करुनच जाणार की राव. बाकी कोल्हापुरात महालक्ष्मी सोडून इतर कुठली प्राचीन मंदिरे आहेत? पंचगंगेच्या काठावर एक तसे बरेच जुने मंदिर पाहिल्याचे आठवते आहे.

In reply to by प्रचेतस

ते तुम्हाला अन्या किंवा अतुल सांगू शकेल . किंवा स्नेहांकिता ताई . . मी तिथे फक्त हॉटेल्स आणि वाइन शॉप्स बघून ठेवलेत . =))) अजुनी महालक्ष्मी ला गेलेलो नाही

In reply to by प्रचेतस

मी. पंचगंगेच्या काठावर अनेक मंदिरं आहेत खरी. त्यात एक अनेक मंदिरांचं बनलेलं संकुल आहे. ते म्हणत असताल तर मी असं ऐकलंय की ती छत्रपतींची खाजगी समाधीस्थळं आहेत. बाकी बरीच लहान सहान मंदिरं नदिच्या पात्रात आहेत. पण नदीला पाणी असतं त्यात ती बुडलेली असतात. मी तिथनं जवळच रहातो...जर जाणार असताल तर आठवण ठेवावी ही विनंती...

In reply to by असंका

नाही नाही. शिवकालीन स्थळं नाही म्हणत मी. शिलाहारकालीन काही मंदिरं आहेत अजून. नक्की कुठे आहेत ते माहित नाही. त्यातले एक पंचगंगेकाठी नक्कीच आहे (लहानसे आहे). पन्हा़ळ्याला जाताना पुलावरुन दिसत्ये.

In reply to by असंका

इतर- टेंबलाई, बिन्खांबी गणेश, ऋणमुक्तेश्वर, खोल्खंडोबा, इ. झालंच तर जैन मठ. लांबची झाली तर, जोतिबा, कात्यायनी. मीही कोल्हापूरचा मुळात नाही. ऐकीव माहिती देत आहे.

In reply to by प्रचेतस

पंचगंगेच्या घाटावर शिवमंदिर आहे. महलक्ष्मि मंदिराजवळ कार्तिकेय मंदिर आहे, ते माहिती असेलच. रंकाळ्यातला संध्यामठ आत्ता पाहता येईल. मंडपांतलम भवानी मंदिर कात्यायनी, टेम्बलाई. पण इकडे शिल्पे वगैरे नाहीत. आणि इतर काही असली तर चौकशी करते

अन्या दातार रावसाहेब (अद्द्या ) स्नेहातै अकौंटंट साहेब जिनेन्द्र, मितान वेताळ यमगर्निकर पैसातै अनन्या सतीश गावडे प्रगो नाद खुळा वल्ली हे १४ आणि ३ मेम्बर अजून नक्की सांगतील १-२ दिवसात

In reply to by यसवायजी

प्रोब्लेम इल्ला . हाफ डे हाक्तेनी शनिवार . . नाक - नाकुवारी बरतेन . वल्ली ६ घंटेग बरातार . आ टाईम वळग मुट्टतेवी

In reply to by अद्द्या

:(... एक दिवस एका कट्ट्याला नक्की.. तूर्त उद्याचा दिवस लेखाचा राहिलेला भाग लिहिण्यात घालवतो. उदर मेरे नाम से पब्लिक बोंबाबोंब करेले हय. :-)

मी ताराबाई पार्कातच राहतो.पण आपल्या कोल्हापुरातील मंडळी कोण-कोण येणार आहेत कट्ट्याला ? बाकी ! काय मदत लागली तर सांगा कुठच्याही बाबतीत :-)

वर आहे. तिथे जरी फिरायचे म्हटले तरी जावु शकतो आपण.कोल्हापुरात अंबाबाई मंदीर व दैवद्य्न बोर्डिग जवळ एक हेमाडपंथी मंदिर आहे.

In reply to by वेताळ

दैवद्य्न बोर्डिग जवळ एक हेमाडपंथी मंदिर आहे.
नूतन मराठी विद्यालय हायस्कूलमध्ये. मंदीर शाळेच्या आवारात का शाळा मंदिराच्या आवारात हे आजही कळलेलं नाही. हे एक मस्त शिवमंदिर आहे. जाम मजा यायची तिथे खेळायला वगैरे.

आतापर्यंत ही माहिती मिळाली. खिद्रापूरहून कोल्हापूरला येताना रुई हे गाव लागते. तिथे एक प्राचीन असे मूळ व्यंकटेश मंदिर आहे. ते पाहण्यालायक आहे. कोल्हापुरातील अन्य मंदिरे : विठ्ठल मंदिर – मिरजकर तिकटी त्रावणेश्वर मंदिर : मिरजकर तिकटी ते भवानी मंडप रस्ता. येथेच अंबाबाईची पालखी येते. रंकोबा मंदिर : बिनखांबी गणेश मंदिर शेजारी, महाद्वार रोड. हे काहीसे दुर्लक्षित आहे पण पाहण्यायोग्य. शिवमंदिर : कणेरीमठ. हेही प्राचीन असून प्रेक्षणीय आहे. याशिवाय पंचगंगा घाटावर पन्हाळा रोडला शिवमंदिर व अनेक जुनी मंदिरे आहेत. कोल्हापूरचे वैशिष्ट्य म्हणजे नवदुर्गा मंदिरे. ही मंदिरे कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरात विखुरलेली आहेत. नवरात्रात यांच्या दर्शनाला झुंबड असते. कात्यायनी, टेंबलाई, फिरंगाई, अनुकामिनी इ. नावे आहेत. रिक्षावाले याबाबत परफेक्ट माहिती देतील. यापैकी फिरंगाई मंदिरात एक गमतीदार गोष्ट म्हणजे कानोबा आणि खोकलोबा या देवांच्या मूर्ती. फार दिवस बरे न होणारी कानदुखी आणि खोकला, या देवांना दहीभाताचा नैवेद्य दाखवल्यास बरे होतात असा समज आहे. ..चला मिपाकरांना संधी आहे, अंधश्रद्धा निर्मूलनाला !!

In reply to by सस्नेह

उपयुक्त माहिती. कोल्हापूर भेटीत ह्यातील शक्य तितक्या मंदिरांना भेटी द्यायचा अवश्य प्रयत्न करेन. खोकलोबा नावावरून आमचे एक ओळखीचे कवी सूर्यकांत खोकले यांची आठवण झाली.

अन्या दातार रावसाहेब (अद्द्या ) स्नेहातै अकौंटंट साहेब जिनेन्द्र, मितान वेताळ यमगर्निकर पैसातै (बहुदा विथ परिवार ) अनन्या सतीश गावडे प्रगो नाद खुळा वल्ली सूड यस वाय जी भिंगरीताई हे १७ सध्या कन्फर्म मेम्ब्रं आणखी कोणी येणार असल्यास कळवणे .

In reply to by प्रचेतस

तो कट्टा ठरवावा लागणार नाही हो . . संध्याकाळी येणाऱ्या लोकांना काय खायचं आहे काय प्यायचं आहे हे समजलं तर बास . जागा ठरेल २-५ मिनटात :D

In reply to by अद्द्या

वरील लिस्ट मधील लोकांनी . . आणि लिस्ट मध्ये नसलेल्या तरी ऐन वेळी येणाऱ्या लोकांनी . आपल्या बरोबर चिल्ली-पिल्ली असतील तर ती किती . आणि सध्या असलेली अनो सोबत येणारी बायको (किंवा होणारी बायको येत असल्यास ) तसं कळवावं . जेवणासाठी नक्की आकडा सांगावा लागणार आहे . . आणि . वेज कि नोंवेज हे सुद्धा कळवावे . म्हणजे त्यानुसार व्यवस्था करता येईल

लोकहो . . संध्याकाळी वल्ली , प्रगो , नाखू (सूड पण?? ) मंडळी येत आहेत कोल्हापुरात . मी , यस वाय जी , अन्या आणि अकौंटंट असूच तिथे . . ( कोण कधी कसं यासाठी फोनाफोनी होईलच ) उद्या जे येत आहेत त्यांनी धाग्यात दिलेले नंबर नोट करून ठेवा , म्हणजे उद्या आणि आज संपर्क साधायला सोप्पं पडेल . . आणि हो . कोणी ऐनवेळी धडक देणार असल्यास स्वागत आहेच . . भेटेंगे

In reply to by अद्द्या

(सूड पण?? )
सकाळी साडेपाचच्या आसपास निघेन, कट्ट्याच्या वेळेपर्यंत पोचतो. अन्या, तुम्ही आणि यसवायजीचा नंबर नोटवलेला आहे. गरज पडल्यास तिघांपैकी कोणासही फोनवणेत येईल तस्मात् फोन आपल्याजवळ ठेवावा किंवा आपण फोनजवळ राहावे किंवा कसेही!! ;)