✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

क्षणभंगुरता

म — माम्लेदारचा पन्खा, Wed, 05/06/2015 - 14:57
आज तूही जगात आहेस आज मीही जगात आहे आपल्यात काहीतरी बिनसलंय हे दोघांनाही ज्ञात आहे कधीकाळी जुळली होती आपली मने मग दिसू लागले फक्त एकमेकांचे उणे वाढत्या अंतराने दुरावतच गेलो आयुष्याच्या प्रवाहात वहावतच गेलो आज मागे वळून पाहताना वाटतंय की नसतं झालं असं तर बरं झालं असतं दबलेल्या अगणित भावनांचं ओझं इथपर्यंत वागवावं लागलं नसतं उद्या कदाचित तूही नसशील …. किंवा मीही नसेन तरीही असंच अव्याहत चालू असेल जग क्षणभंगुर आयुष्य आहे हे आपलं हे राग लोभ कशाला हवेत मग? सगळं सोडून देऊन बघू एकदाच जसं काही झालंच नाहीये मी तयार आहे विसरायला मागचं पण दोन पावलं तूही पुढे ये !!

प्रतिक्रिया द्या
2646 वाचन

💬 प्रतिसाद (14)

मस्त...पण च्यायला वास्तव आहे

टवाळ कार्टा
Wed, 05/06/2015 - 15:43 नवीन
मस्त...पण च्यायला वास्तव आहे हे
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो...

सतिश गावडे
Sun, 05/10/2015 - 16:35 नवीन
कवितेची लय चुकल्यासारखी वाटते मात्र आशय लाखमोलाचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

चांगली आहे

एक एकटा एकटाच
Wed, 05/06/2015 - 15:52 नवीन
नकारात्मक सुरु झालेल्या कवितेचा सकारात्मक शेवट आवडला.
  • Log in or register to post comments

क्षणभंगुर आयुष्यात ही.. त्या

गणेशा
Wed, 05/06/2015 - 16:57 नवीन
क्षणभंगुर आयुष्यात ही.. त्या दोन पावलांनी असंख्य आनंदी क्षण येतील ही अपेक्षा आवडली.. कविता छान .. एकदम सरळ...
  • Log in or register to post comments

मस्त कविता

सौन्दर्य
गुरुवार, 05/07/2015 - 00:46 नवीन
छान कविता. वामनाने तीन पावलात तिन्ही लोक व्यापले, तुम्ही दोन पावलात अमर्याद अंतर पुसून टाकण्याची इच्छा दर्शवता आहात. सुंदर.
  • Log in or register to post comments

छान , आवडली!

चुकलामाकला
गुरुवार, 05/07/2015 - 08:08 नवीन
छान , आवडली!
  • Log in or register to post comments

आवडली!

बहुगुणी
गुरुवार, 05/07/2015 - 08:21 नवीन
नकारात्मक सुरु झालेल्या कवितेचा सकारात्मक शेवट आवडला. +१
  • Log in or register to post comments

+++१११

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/07/2015 - 17:33 नवीन
+++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

भारी !!!

प्रसाद_कुलकर्णी
गुरुवार, 05/07/2015 - 13:16 नवीन
मी तयार आहे विसरायला मागचं पण दोन पावलं तूही पुढे ये
  • Log in or register to post comments

भापो !

सस्नेह
गुरुवार, 05/07/2015 - 13:21 नवीन
आवडली कविता !
  • Log in or register to post comments

छान कविता.

वेल्लाभट
गुरुवार, 05/07/2015 - 18:17 नवीन
छान कविता. वाचताना मेहदी हसन साहेबांची ही गज़ल मनात येत होती. अबके हम बिछडे तो शायद कभी ख़ाबों में मिले जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले आणि त्यातला हा आवडता शेर.... तू ख़ुदा है न मेरा इश्क़ फरिश्तों जैसा दोनो इन्सां है तो क्यूं इतने हिजाबो में मिले
  • Log in or register to post comments

सगळ्या मान्यवरांचे आभार !

माम्लेदारचा पन्खा
Sun, 05/10/2015 - 15:43 नवीन
खूप आभारी आहे …… हो… ती पावलं उचलणं ही क्रिया सोपी असते पण हातून घडत मात्र नाही… अनेक कारणं आहेत… मीपणा ,संकोच ,भीती …. पण त्यावर मात केली तर त्यासारखा दुसरा आनंद नाही
  • Log in or register to post comments

आवडले

श्रीरंग_जोशी
Mon, 05/11/2015 - 06:56 नवीन
हे विचार अन कवितेचा आशय, दोन्हीही आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

छान आहे.

सांजसंध्या
Mon, 05/11/2015 - 00:13 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा