Skip to main content

ओढ वादळी ...(लवंगलता छंद)

लेखक मनीषा यांनी सोमवार, 24/11/2008 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
नको मज हे विसावे शुभ्र चांदण्याचे साद देती मार्ग मला तप्त या धुळीचे | पाउलांना ओढ माझ्या निळ्या आभाळाची नजरेत सामावली रेघ क्षितिजाची | घोंघावती दरीतूनी अनावर वारे तेजाळती त्या गगनी लक्ष लक्ष तारे | नभास या गवसणी गिरीशिखरांची सौदामिनी उजळती कडा काजळीची | उधाणल्या या वार्‍याची गाज मनी राही वादळी ही ओढ अशी उमलते देही | गुंजन हे गोड नको भोगी भ्रमरांचे साद द्यावी त्याने, ज्याचे पंख गरुडाचे |
लेखनविषय:

वाचने 1733
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

अरे वा ! कविता आवडली. >>गुंजन हे गोड नको भोगी भ्रमरांचे भ्रमरांची ओळ छानच.. -- लिखाळ.

सहमत.

गुंजन हे गोड नको भोगी भ्रमरांचे साद द्यावी त्याने, ज्याचे पंख गरुडाचे | हे विशेष आवडले :) मुमुक्षु