Skip to main content

रिटर्न गिफ्ट

लेखक चुकलामाकला यांनी गुरुवार, 07/05/2015 07:53 या दिवशी प्रकाशित केले.
कातरवेळ कधी रिकाम्या हाती येत नाही आठवणींच्या सुंदरशा कव्हर मध्ये गु्ंडाळलेले खूप सारे प्रश्न आणते ती.. मी काही उघडून पहातो तर काही तसेच ठेवून देतो येऊ घातलेल्या रात्रीला भेट देण्यासाठी. न उघडलेल्या गिफ्टस् दुसऱ्यांना देण्याची पद्धतच आहे हल्ली... मग लाजत मुरकत पहाट येते, पाठोपाठ सकाळ... दुपार ...दोघी कामात बुडलेल्या... आणि नंतर पुन्हा कातरवेळ.... कातरवेळ कधीच रिकाम्या हाती येत नाही, मी रात्रीकडे पुढवलेले प्रश्न नव्या वेष्टनात पुन्हा मलाच गिफ्ट मिळतात....
लेखनविषय:

वाचने 4020
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

व्वाह...! व्वाह...! व्वाह...! व्वा!!! क्या लपेट लपेट के खोला है रे!!! मान गये उस्ताद!

सोपी, सुबक तरी अर्थवाही. आवडली

कल्पना आवडली..

"कातरवेळ कधी रिकाम्या हाती येत नाही" अगदी बरोबर..

मस्तच.