रिटर्न गिफ्ट
लेखनविषय:
कातरवेळ कधी रिकाम्या हाती येत नाही
आठवणींच्या सुंदरशा कव्हर मध्ये गु्ंडाळलेले खूप सारे प्रश्न आणते ती..
मी काही उघडून पहातो
तर काही तसेच ठेवून देतो
येऊ घातलेल्या रात्रीला भेट देण्यासाठी.
न उघडलेल्या गिफ्टस् दुसऱ्यांना देण्याची पद्धतच आहे हल्ली...
मग लाजत मुरकत पहाट येते,
पाठोपाठ सकाळ... दुपार ...दोघी कामात बुडलेल्या...
आणि नंतर पुन्हा कातरवेळ....
कातरवेळ कधीच रिकाम्या हाती येत नाही,
मी रात्रीकडे पुढवलेले प्रश्न नव्या वेष्टनात पुन्हा मलाच गिफ्ट मिळतात....
वाचने
4013
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
बहोत खूब! क्या बात है!
In reply to बहोत खूब! क्या बात है! by बहुगुणी
हेच मनात आले
मस्त मस्त मस्त!!!!!!
क्या बात है!मस्तच.
व्वाह...! व्वाह...! व्वाह...
साधी
मस्तच
गुलाबासारखी कविता. पाकळ्या
चांगली कल्पना. पुढवलेली
In reply to चांगली कल्पना. पुढवलेली by अंतरा आनंद
Forward केलेली
अचूक!!
बहोत खूब!
सुंदर. अर्थवाही.
छान!
धन्यवाद!
मस्तच !!
खूप सुरेख कल्पना जी कवीलाच
In reply to खूप सुरेख कल्पना जी कवीलाच by नूतन सावंत
धन्यवाद!
खूप छान जमलीय...
खूपच मस्तं कॉन्सेप्ट. कविता
वाह