✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक आठवण - उन्हाळ्याच्या तो दिवस

व
विवेकपटाईत यांनी
Tue, 05/05/2015 - 13:53  ·  लेख
लेख
गेल्या १०-१२ वर्षांपासून दिल्लीत ही नागपूर सारखा उन्हाळा पडू लागला आहे. मे महिन्यातच तापमान ४५ अंशापर्यंत जाते. सोफ्यावर बसून विजय वर्तमान पत्र वाचत होता, लू लागून मरणार्यांच्या आंकड्यांवर त्याची नजर गेली. वाचता-वाचता, अतुलचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर तरळला. पाच वर्षांपूर्वीचीच मे महिन्यात असाच उन्हाळा होता. आकाशात सर्वत्र पसरलेली राजस्थान मधून येणारी लाल धूळ आणि प्रचंड गरम वारे, दिवसाकाठी घर बाहेर निघणे दुष्कर होते. त्या दिवशी शनिवार होता, विजय काही कामानिमित्त, आर के पुरम येथे स्थित भिकाजीकामा पेलेस येथे गेला होता. काम संपवून, दीड एक वाजेच्या सुमारास बस घेण्यासाठी तो बस स्थानकावर आला. बाहेर प्रचंड तापलेले होते, जोराचे गरम वारे ही चालत होते. तेवढ्यात विजयला अतुल पायी-पायी येताना दिसला. अतुल, विजयचा लंगोटी यार होता. दोघांचे बालपण जुन्या दिल्लीत गेले होते. दोघांचे शिक्षण ही एकाच शाळेत झालेले. पुढे विजय सरकारी नौकरीत लागला आणि अतुल एका कंपनीत सेल्समन. त्याला कामानिम्मित बाहेर हिंडावे-फिरावे लागायचे. तरी महिन्याकाठी ते एक दोनदा तरी ते भेटायचेच. कुठले ही काम एका दुसर्याचा सल्ला घेतल्याशिवाय ते करायचे नहीं. सात-आठ महिन्यापूर्वी अतुलचे लग्न झाले होते. बायको मुंबईकर होती. लग्नानंतर घरी पटले नाही, म्हणून बायको सोबत जनकपुरी येथे भाड्याच्या फ्लेट घेऊन वेगळा राहू लागला होता. त्याला पाहताच विजयने विचारले, कुठून येतो आहे. अतुल म्हणाला, सेक्टर १२ पासून येतो आहे, इथे भिकाजी कामात काही काम आहे. विजय ने विचारले, अतुल, बस का नाही घेतली. अतुल, एक-दीड किलोमीटर अंतर साठी बस काय घ्यायची. जेवढा वेळ बसची वाट पहावी लागणार, तेवढ्या वेळात तर आपण पायी पोहोचतो सुद्धा. विजय, अरे ते ठीक आहे, पण उघड्या डोक्स्यानी का फिरतो आहे, डोक्स्यावर काहीतरी घालायला पाहिजे होते, उगाच लू लागेल. अतुल हसत म्हणाला, यार, माझ्या कामात उन्हातान्हात फिरावेच लागते. आता उन्हाची सवय झाली आहे. लू काय बिगाडेल आपल्या सारख्यांचे. विजयला त्याच्या बोलण्याचा रागच आला, दिवसाचे दीड वाजले आहे, बाहेर भयंकर तापलेले आहे, प्रचंड गरम वारे चालत आहे आणि या गाढवाला त्याची काही फिक्र नाही, कमीत-कमी रुमाल तरी त्याने डोक्यावर बांधायचा होता. तो रागातच म्हणाला, लेका गाढवा तुझ्या लग्नाला वर्ष ही झाले नाही आहे, कशाला वर जाण्याचा खटाटोप करतो आहे. वहिनीचा तरी जरा विचार कर. असाच नंग्या डोक्स्याने उन्हातान्हात फिरेल तर, गाढवा तू लू लागून वर जाशील, तिथे वर गेल्या वर विचार यमराजाला, लू क्या बिगाडेगी. अतुल जोरात हसत म्हणाला, जिसके लंगोटिया यार मरने की दुआ देते हों, उसे दुश्मनों की क्या जरुरत. काळजी करू नको, तुझी इच्छा पूर्ण होणार नाही. तेवढ्यात उत्तम नगरची बस येताना दिसली, दोघांचे बोलणे तुटले, अतुलला टाटा करून विजय घरी परतला. दुसर्या दिवशी अर्थात रविवारी सकाळचे सातचा वाजले असेल, फोनची घंटी वाजली. सकाळी-सकाळी कुणाचा फोन आला, हा विचार करत विजयने फोन उचलला. फोनवर दिनेश होता, तो म्हणाला, विजय, एक वाईट बातमी, काल रात्री अतुल गेला. विजय सुन्न झाला रिसीवर त्याच्या हातून खाली पडले, काही क्षण काय करावे त्याला सुचेनासे झाले, सर्वांग घामाने डबडबले. कालची भेट आठवली, अतुलला आपण म्हटलेल डायलॉग गाढवा तू लू लागून वर जाशील ही आठवला. झाले असे होते, कामावरून अतुल चार वाजेच्या सुमारास घरी पोहचला. थोड्या तापासारखे वाटले म्हणून, चहा सोबत, PCMची गोळी घेतली आणि पलंगावर जाऊन झोपला. नवरा इतक्या उन्हात थकून भागून आला आहे. त्याल शांत झोपू द्या, हा विचार तिने केला. उन्हाळ्यात अचानक ताप येण्याचा अर्थ काय आणि ताप आल्यावर काय केले पाहिजे, त्या बिचार्या मुंबईकर नववधूला कळणे शक्य नव्हते. संध्याकाळी जनकपुरीतल्या शनी बाजारातून भाजी-पाला आणला. स्वैपाक केला. होता-होता रात्रीचे ९ वाजले, तरी ही नवरा का उठत नाही. तिच्या मनात पाल चुकचुकली. नवर्याला उठवायला ती बेडरूम मध्ये आली. अतुल तापाने फणफणत होता. त्याची शुद्ध हरपली होती, ताप डोक्यात पोहचला होता. ती घाबरली, रात्री अतुलला हॉस्पिटलमध्ये भर्ती केले. पण तो वाचला नाही. उन्हाळ्यात लू ने मरणार्यांच्या बातम्या वाचताना, विजयला नेहमीच अतुलची आठवण येते. अतुलची आठवण येताच, तोंडातून न कळत निघालेले, पण खरे ठरलेले शब्द गाढवा तू लू लागून वर जाशील, सतत कानांत वाजतात. अपराधीपणाची भावना त्याला जाणवते. त्या दिवशी जर त्याने तोंडावर ताबा ठेवला असता तर कदाचित्, अतुल आज ही जिवंत असता.....
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
3777 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

अरेरे

एक एकटा एकटाच
Tue, 05/05/2015 - 14:08 नवीन
:-(
  • Log in or register to post comments

लू

कपिलमुनी
Tue, 05/05/2015 - 15:05 नवीन
लू म्हणजे उष्माघात का ?
  • Log in or register to post comments

लू म्हणजे खूप उष्ण असलेला

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 05/06/2015 - 11:46 नवीन
लू म्हणजे खूप उष्ण आणि कोरडा असलेला वारा. लूमध्ये फार काळ फिरल्यास उष्माघात नावाचा शारिरीक रोग होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

अतीउष्ण वातावरणात खूप काळ

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 05/06/2015 - 11:58 नवीन
अतीउष्ण वातावरणात खूप काळ राहिल्यास शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवणारी यंत्रणा बिघडून शरीराचे तापमान धोकादायरित्या खूप वाढते; याला उष्माघात (सन/हीट स्ट्रोक) म्हणतात. त्वरीत इलाज न केल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद

कपिलमुनी
Wed, 05/06/2015 - 14:48 नवीन
आभारी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

......

मोहनराव
Tue, 05/05/2015 - 18:59 नवीन
......
  • Log in or register to post comments

वाईट झाले.

सौंदाळा
Tue, 05/05/2015 - 19:07 नवीन
वाईट झाले. पण
त्या दिवशी जर त्याने तोंडावर ताबा ठेवला असता तर कदाचित्, अतुल आज ही जिवंत असता
याचा काही संबंध नाही. उलट त्याला चांगला सल्ला दिला होता. अपराधीपणा वाटण्याचे काही कारण नाही. बाकी या धाग्याच्या निमित्ताने उष्माघातामधे तातडीचे प्रथमोपचार काय असतात हे कोणी सांगेल का?
  • Log in or register to post comments

उष्माघातापासून जपा

रुस्तम
Tue, 05/05/2015 - 19:13 नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/edit/column/heat/articleshow/47155623.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

लू म्हणजे उष्माघात. पण

विवेकपटाईत
Tue, 05/05/2015 - 19:36 नवीन
लू म्हणजे उष्माघात. पण साधारण लू शब्द हा प्रचलित आहे. नागपूर आणि दिल्लीतही. बाकी लू पासून वाचण्या साठी डोक्यावर कमीत कमी रुमाल तरी बांधला पाहिजे. उपाशी राहिले नाही पाहिजे. ताप आला तर तो कमी करण्याच उपाय योजना केली पाहिजे. इत्यादी.
  • Log in or register to post comments

अरेरे..

रुपी
Wed, 05/06/2015 - 01:28 नवीन
..
  • Log in or register to post comments

वाईट वाटले

श्रीरंग_जोशी
Wed, 05/06/2015 - 03:03 नवीन
ही सत्यकथा असेल का ते ठाऊक नाही पण दर वर्षी बरेच लोक उष्माघाताने मरतात. फाजिल आत्मविश्वास हे कारण बरेचदा असते. गोरगरीब कष्टकरी त्यांना जमेल तितकी काळजी घेताना दिसतात. काही वेळा पैसे नसल्यानेही त्यांच्याकडून गरजेपुरती काळजी घेतली जात नाही जसे उपाशीपोटी न हिंडणे फिरणे.
  • Log in or register to post comments

ही शंभर टक्के सत्य कथा आहे,

विवेकपटाईत
Wed, 05/06/2015 - 19:39 नवीन
ही शंभर टक्के सत्य कथा आहे, फक्त काळ वेळ आणि पात्रे बदलली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

http://en.wikipedia.org/wiki

सुबोध खरे
Wed, 05/06/2015 - 10:18 नवीन
http://en.wikipedia.org/wiki/Heat_stroke
  • Log in or register to post comments

हे "कावळा बसला आणि फांदी

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 05/06/2015 - 11:49 नवीन
हे "कावळा बसला आणि फांदी मोडली" या म्हणीचे उदाहरण झाले ! बिचार्‍या विजयच्या मनाला मात्र रुखरुख लागून राहणार :(
  • Log in or register to post comments

वाईट वाटले वाचुन ...

गणेशा
Wed, 05/06/2015 - 12:58 नवीन
वाईट वाटले वाचुन ...
  • Log in or register to post comments

तुम्ही अप्रत्यक्षरित्या चांगला सल्ला दिलात.

सौन्दर्य
Wed, 05/06/2015 - 23:40 नवीन
तुम्ही अप्रत्यक्षरित्या चांगला सल्ला दिलात, त्यामुळे त्याच्या जाण्यात तुमचा काहीएक दोष नाही, त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका. मी आठ वर्षे बडोद्याला काढली आहेत. तेथे देखील एप्रिल-जुलै दरम्यान तापमान ४५ डिग्रीपर्यंत जाते. दुपारी सहसा बाहेर लोकं निघत नाहीत. जुनी घरे धाब्याची असल्यामुळे दुपारी त्यावर पाणी मारतात, घरासमोरही पाण्याचा शिडकावा केला जातो. एका मे महिन्यात मुंबईहून बहिण आणि तिची आठ वर्षाची मुलगी आली होती. सकाळी दहाच्या सुमारास घरातच खेळता खेळता भाचीच्या नाकातून, नळ वाहावा तसे रक्त वाहू लागले. घरमालकांनी लगेच कांदा ठेचून त्याचा रस, तिच्या कपाळाला, कानाच्या मागे चोळला. क्षणार्धात रक्त वाहायचे थांबले. लु/उष्माघात ह्यावर कांद्याचा रस उपयोगी ठरू शकतो, त्यामुळे अश्या उष्ण शहरात दुपारी बाहेर पडावेच लागले तर कमीतकमी टोपी घालणे, बरोबर पाणी आणि कांदा ठेवणे, अश्या गोष्टी कराव्यात. नक्कीच उपयोग होईल.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा