तारे वेचू तूझियासाठी,
म्हणून निघालो रात्रप्रवासि...
सूर्याला माघारी ठेवून,
मंद वाहत्या चंद्रपाशी...
गळ टाकुनी, अगाध-आकाशी,
याचक बनूनी,
अनंत-अधाशि...
तुटले तारे वेचत फिरलो,
ध्रुव ताऱ्यासाठी मी झुरलो.
'ध्रुव' बांधण्या वेशी तुझिया,
क्षण क्षण माझे, विकत राहिलो.
माथी चढवून अखंड देणे,
'तारा' बनूनी देत राहिलो...
तुटत राहिलो..
मिटत राहिलो...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1054
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
correction last line :
कल्पना आवडल्या
नक्की
In reply to कल्पना आवडल्या by पैसा
अप्रतिम कविता .. आवडली
गुड वन !