हं ! ते तुला कधी जमणारच नाही
प्रस्तावना: कविता आजकाल सुचत नसली तरी परम मित्र वल्ली यामुळे काही तरी लिहिले आहे.. नविन काव्य असे होत नसते म्हणुन काल आवडलेल्या कवितेला (धानजीरावांच्या) कवितेतुन उत्तर देत आहे
मुळ कविता : तू ये...
अरे द्यायचेच असेल तर दे
आभाळालाही कवेत घेवु पाहणारे ते हात
हं ! ते तुला कधी जमणारच नाही
तोडलेल्या पाशावरती, कशास कुंपण अन भिंती
शब्दांच्याच वादळांची कसली आहे कोणास भिती
अरे गायचेच असेल तर गा
ते स्वर बंदिशी मिलनाचे...
हं ! ते तुला कधी जमणारच नाही
हळव्या कोपर्याचे .. असेच हे हळवेच गाणे
अर्थ न पुसता फक्त याचे ओझेच वाहने
वाह्यचेच असेन फुल तरी
समर्पणाचे भाव वाह तु
हं ! ते तुला कधी जमणारच नाही
न ला एक काना , ह ला दुसरी वेलांटी
हे ही बोलण्याचे सामर्थ्य तुझ्यात नाही
तु दास भावनांचा .. ओंजळीत भीक वाही
द्यायचेच असेल तर दे
ललाटी चांदण्यांचे गोंदन
हं ! ते तुला कधी जमणारच नाही
--- शब्दमेघ ( २९/०४/२०१५)
आयला...भारी आवडेश :)
जबरीच रे गणेशा.
द्येवा मी जातो दुरून … ची आठवण झाली....
छान लिहिली कविता गणेशा.
सर्वांचे आभार !
धन्यासारखेच म्हणतो. कविता
सुंदर कविता
सुरेख कविता
जे ब्बात
कविता तशी साधीच आहे, आणि मुळ
catching up
मस्तं!
सुंदर कविता