Skip to main content

इंदूर - भाग ३ - सराफा

लेखक मोदक यांनी बुधवार, 29/04/2015 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
इंदूर - भाग १ - पूर्वतयारी आणि पुणे ते शिर्डी इंदूर - भाग २ - रावेरखेडी >>>"भिया फ्रेश हो जाओ, अभी सराफा निकलना है!" भुषणचा भाऊ चेतन टिपीकल इंदोरी भाषेत वदला.... या पूर्वी एकदा कोणतीही माहिती नसताना आपल्या यकुने दिलेल्या सूचनांनुसार सराफा भेट झाली होती. त्यावेळी सराफा भन्नाट आवडला होता. त्यामुळे दिवसभराचा प्रवासाचा शीण विसरून सराफ्याला जाण्यास सज्ज झालो. भुषणच्या घरच्यांसोबत थोड्या गप्पा मारून आम्ही सराफ्याकडे कूच केले. रात्री १०:३० नंतरही सराफा असा फुलला होता.. . . सराफा बाजार हा दिवसा (सोनेचांदीवाल्या) सराफ्यांचा बाजार आहे आणि संध्याकाळी त्यांची दुकाने बंद झाल्यानंतर दुकानांच्या पायर्‍यांवरती खाऊपिवूचे ठेले लागतात . आम्ही सुरूवात गराडू पासून केली . हे एक वाफवलेले कंदमुळ आहे आणि खाण्याच्या आधी तेलात तळून व त्यावर गराडू मसाला घालून देतात. गराडू मसाला चाट मसाल्यापेक्षा फार वेगळ्या चवीचा परंतु एकदम चटकदार प्रकार होता. भुट्टे का कीस.. . गुलाबजाम . "मालपुये" . मूंग दाल हलवा.. . "लच्छेवाली रबडी" . हा एक स्पेशल जिलबीवाला होता... आपण किती लोक आहोत ते पाहून आणि "कितना खाओगे" असे विचारून सर्वांना पुरेशी होईल या आकाराची एकच जिलबी गरमागरम आपल्या समोर करून देत होता. . इंदूरात जावून पानीपतासे कसे चुकवणार... . थोडे थोडे हे सगळे (आणि फोटोत न आलेले समोसे, कचोरी आणि "जोशीजी का दहीबडा") हादडून पोट तुडुंब भरले होते. शेवटी आग्रहाची एक कुल्फी आणि फालूदा झाला.. . या सर्व इंदूरी खासीयत सोबत बाकीही खाद्यपदार्थांचे स्टॉल होतेच.. . . चायनीज, मंचुरीयन, वगैरे वगैरे.. तुडुंब खादाडी करून आणि एक भन्नाट पान खावून रात्री उशीरा घरी परतलो. उद्याचा दिवस संपूर्ण रिकामा होता आणि "आपल्याला दिवसभर कुठे ना कुठे खादाडी करायची आहे!" असे भुषणने बजावून ठेवले होते. सकाळी उठून आवरले व सर्वांसाठी "पोहा जलेबी" आणण्यासाठी चेतन सोबत पुन्हा मार्केटमध्ये आलो.. . "भिया आप कुछ खाते नही हो.. चलो आपको और चीजे खिलवाता हूं" असे म्हणून चेतन दोन तीन ठिकाणी घेवून गेला. त्यामुळे उपवासाची कचोरी आणि साबुदाणा खिचडी ही हादडून झाली. घरी येवून थोडी विश्रांती / गप्पा / कॅरम आणि असे बरेच काही करून एक मस्त झोप काढली. संध्याकाळी पुन्हा सराफ्याला भेट देवून काल आवडलेले प्रकार आणखी एकदा हादडून झाले व एका प्रसिद्ध ठिकाणाहून भरपूर नमकीन्स खरेदी केले.. चॉकलेट शेव, पाईनॅपल शेव, पुदीना बुंदी असे अनेक अनवट प्रकार मिळाले.. नमकीन्सच्या दुकानात गिर्‍हाईकाच्या बाजुने उघडणारे मोठाले ट्रे होते. हवे ते नमकीन चाखा आणि ऑर्डर द्या.. असा प्रकार. . . आजही चेतनने आणखी एका प्रसिद्ध ठिकाणी नेवून एक मस्त पान खाऊ घातले. (कोल्हापूरला "राजाबाळ" कडे एक वाळा फ्लेवरचे हैद्राबादी मसाला पान मिळते. त्याच्यासारखी चव होती!) इंदूरला येताना भूषणच्या डोळ्यात धूळसदृश काहीतरी गेले होते. त्यामुळे तो दिवसभर आय इन्फेक्शनने त्रस्त होता. त्यामुळे मी पुण्याला एकटा गाडी चालवत येणार व तो रविवारी सावकाश बसने येणार असेही ठरले. एक चविष्ट दिवस बघता बघता संपला होता. (क्रमशः)

वाचने 35445
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

अप्रकाशित करु का धागा. ;) मानसिक छळ करणारे छायाचित्र देवा, मोदकाला क्षमा कर. -दिलीप बिरुटे

सराफा बिराफा असे काही नसते, ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. संपादक मंडळाला विनंती की असे धागे अप्रकाशित करावे आणि अंधश्रद्धा पसरवल्याबद्दल सदस्यावर कारवाई करण्यात यावी. २ दिवस सराफा :( मजा आहे तुमची

In reply to by टीपीके

खरय... फक्त भास आहे.. आत्ता माझ्या पोटात खवळलेली भुक सुद्धा मोहमायाच...

In reply to by टवाळ कार्टा

तु मुलगी बघायला गेल्यावर तिच्या काकाकडे बघत बसतोस का रे? ;) नै म्हणजे एवढे भक्कम खादाडी फोटो आहेत आणि ह्याला बैकचं पडलयं. ;)... पहिले दोन भाग बघ :P

करून टाका अप्रकाशित च्यामारी टोपी... पानाची बोळवण तीन वाक्यांत केल्याबद्दल निषेध. अजून डीटेल हवेत. चटणी कोणती, जर्दा कुठला वगैरे.

In reply to by आदूबाळ

नाय ब्वा, मला निकोटीनची जबरदस्त अ‍ॅलर्जी आहे. त्यामुळे जर्दा वगैरे लै मोठे प्रकार झाले.. साधा किमाम पण झेपत नाही. त्यामुळे त्या बाबतीत पास. सध्या मसाला पानमध्ये अनेक प्रयोग करून "रामप्यारी" वर सेटल झालो आहे. (रामप्यारीचे डिटेल्स कोणाला माहिती असतील तर जरूर सांगा.)

अप्रतिम. गुलाबजाम चा फोटो तर कातिल. कधी येणार योग इन्दूराला जायचा? तो पर्यंत दुधाची तहान ताकाच्या फोटोवर भागवून घ्यावी लागणार :(

फोटो छान आहेत. एकदम. माझे इंदूरातले दिवस आठवले. रूम पार्टनरचे नातेवाईक सुदामा नगरला असल्याने तेथे जाणे झाले की सराफा बाजारात वरचेवर चक्कर व्ह्यायची. ऑफीस छोट्या ग्वालटोलीत होते. तो भाग मध्यवर्ती अन भरपूर वर्दळीचा आहे. तेथूनच राजवाडा परीसरात भरपूर पायी चक्कर व्ह्यायचे. म्हणजे मी करायचो. ऑफीसातला बॉय समवयस्क असल्याने आम्ही एकत्रच फिरायचो. दिवसा आम्ही दोघे वेगवेगळी हॉटेले धुंडाळून नाश्टा करायचो. त्या काळी दुपारचे भरपेट जेवण क्वचितच केलेले आठवते. सारा दिवस फुटकळ खाणे पोटात ढकलून पुर्ण व्ह्यायचा. ऑफीसात कामे नसल्याने (!) दिवसभर परीसरात भटकंती व्ह्यायची. रेल्वे स्टेशन, तेली गल्ली, जेल रोड, छत्री, सरवटे बस स्टँड, राजवाडा, बडा गणपती, स्टेडीयम, मधू मिलन टोकीज, लायब्ररी, स्टेडीयम, दवा बाजार, ५६ दुकान आदी परीसर तर मी कोळून प्यायलो आहे. माझ्या आधीचे बाहेरून आलेले मेडीकल रिप्रेंझ्टेटिव्ह नोकरीत असलेल्या मुलांनी जेवढे इंदूर पाहीले नाही तेवढे इंदूर मी त्या कमी कालावधीत पाहीले. तेथे राहत असतांना मी जाणीवपुर्वक पायी फिरत असे. कारण सीटी बस उशीरा निघत अन तेवढ्या वेळात आपण इच्छीत स्थळी पोहचत असू. बाकी नोकरीत जेव्हा फिल्ड व्हिजीट असायची ती पिथमपूरला असायची अन तेव्हा मात्र जेवणाचे फार हाल व्हायचे. हाल असे की सकाळच्या नाश्ट्याचा डबा करून सोबत न्यावा लागत असे अन दिवसभर तेवढ्यावरच समाधान मानावे लागे. अर्थात त्याची भरपाई इतर दिवशी इंदूर ऑफीसात राहून करावी लागे अन आम्ही ती करत असू.

हलकट मोदक! मी हा धागा वाचला नै आणि फटु त्याहून बघितले नैत!

In reply to by पैसा

कुठे फेडशील रे हि पापं?? हे देवा मोदकला माफ करं. त्याला माहित नाहि त्यानी हे फोटो दाखवून किती जणांचा रोष पत्करला आहे. प्रचंड चलबीचल झालेय मनाची.

छान. कोल्हापुरात दुधदुभते,कडधान्ये तेल याची रेलचेल असून अशी प्रसिद्धि का नाही? लाल पांढरा रस्सा आणि मिसळ?

मोदक, तिन्ही धागे एकाच बैठकीत वाचून काढले.ऐकीव माहिती खूप होती साराफ्याबद्दल.पण प्रेक्षणीय महिती तुझ्यामुळे मिळाली.माहितीपूर्ण लेख.त्यातथोरल्या बाजीराव पेशव्यांची समाधी अनपेक्षितपाने समोर आली.त्याबद्दल तर तुला दंडवतच.समाधीचे दर्धन घेण्याची ओढ जीवाला लागावी इतके कातर वर्णन.

२०१५ च्या ऊत्तरार्धात इंदुरास जाण्याचा योग असल्याने आपली काई जळजळ झाली नाही. पोहा जलेबी या विचित्र कॉम्बोबद्दल जोरूके भाईकी तोंडसे सुना है .

In reply to by चौकटराजा

चौरा साहेब, इंदुरात खादाडी करा, पण रोज सकाळी एक ग्लास ज्यूस जरूर प्या, म्हणजे खादाडी बाधणार नाही. रात्रीचे खाणे टाळायचे असेल, तर दिवसा 'छप्पन दुकान' मधे सराफावाले सर्व तेच पदार्थ मिळतील. साठीत जरा जपावे लागते हो.

In reply to by चित्रगुप्त

नर्मदेचे पाणी प्यायल्यावर कुठे काय बाधते काका? जगातील सर्वोत्तम पाणी

तिन्ही धागे आजच पाहिले व वाचले.. फोटो पाहून आत्ताच्या आत्ता तिथे जाऊन खादाडी कराविशी वाटते आहे.. स्वाती

व्वा. मस्त. अजून इंदुरात असाल, तर 'छप्पन दुकान' मधे जाऊन 'एग बेंजो' किंवा 'मटन बेंजो' हा प्रकार पण चाखा. मात्र तिथला व्हेज बेंजो काही खास नसतो.

In reply to by चित्रगुप्त

'छप्पन दुकान' मधे काल 'एग बेंजो' खाल्ला - ठीक वाटला. मसाला ऑम्लेट आणि ब्रेड + चटपटा मसाला असा प्रकार वाटला. इंद्राणी नामक एक मिठाई आणि "रसमलाई+पेठा" असाही एक प्रकार खाल्ला. . नेहमीप्रमाणे सराफा भेटही झाली. आणखी काही नवीन प्रकार असल्यास जरूर कळवावेत.

मोदकशेठ, धाग्याचं नाव बघूनच 'भरपेट जेवण झाल्याशिवाय हा धागा उघडायचा नाय' असं ठरवल्यामुळं फार जळजळ / छळ होण्यापासून वाचलो :) धागा नेहमीप्रमाणेच झकास..

एक नंबर जमले हो मोदक भाऊ!!!, सराफा म्हणा किंवा ५६ दुकान इथली खासियत म्हणजे पांढरेशुभ्र कुर्ता पायजामा घातलेले दुकानदार अन स्वच्छ्ता , गराडू म्हणजे आपण इंग्लिश मधे जे "यॅम" म्हणतो ते कंदमुळ आहे, मस्त प्रकार असतो, इंदौरी खास मसाला म्हणला तर तो म्हणजे "जिरावन" असतो! वाह परत एकदा सराफा सफ़र घडविले बद्दल आभारी आहोत! *सराफा किंवा छप्पन दुकान भागाला जियोटॅगिंग केले आहे काय? नसल्यास ह्या मुद्द्याचा पाठपुरावा केला पाहिजे!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

नाय वो, "जिरावन" नाय त्यो. मी मसाले विकत घेताना गराडू मसाला हवा असेही विचारले, पण गराडू मसाला तो दुकादार स्वत: तयार करतो असे कळाले.

In reply to by रॉजरमूर

यॅम हे तुकतुकीत त्वचेचं रताळ्यासारखं कंदमूळ आहे. याला मध्य भारतात गराडू म्हणून ओळखतात, Yam सुरणही कंदमूळच, पण ते वेगळं, त्याची त्वचा खडबडीत असते: त्याला अरबी (टॅरो रूट) म्हणतात. suran/ arbi

In reply to by बहुगुणी

अरबी म्हणजे अळकुडी, अळूचे मूळ. फोटोत अळकुडीच आहे. सुरण बराच मोठा असतो.

In reply to by बहुगुणी

दुवा उघडल्यावर पूर्ण जगाचा नकाशा दिसतोय ते स्पेसिफिक ठिकाण (इंदोर सराफा) नाही दिसत आहे त्या zee maps साईटवर अगोदर registration करावं लागतं काय ?

In reply to by रॉजरमूर

नकाशात इंदूरवर क्लिक करा, म्हणजे पत्ता मिळेल. रजिस्ट्रेशन करावं लागत नाही. आधिक माहितीसाठी हा लेख.

कोणीतरी फक्त 'पान' या विषयावर एक धागा काढा बरं. (पट्टीचे पान खाणारे (म्हणजे पानपट्टी नव्हे) या क्याटेगरीतील लोकांस खास विनंती).

In reply to by आदूबाळ

रामदास काकांचा लोकप्रभामध्ये एक डिट्टेल लेख आला होता. पण सध्या लिंक सापडत नाहीये. :(

अगागागागागागा....हे समदं खायचं तर डाएट घाला रासभजघनमंडळी आणि हर हर महादेवच मग!!!! बापरे, कधी एकदा जातोय इंदुरास...जातोच आता. माळव्यावर स्वारी केलीच पाहिजे. हीच ती 'उत्तरदक्षण प्रांतीची सुवर्णनदी'.

In reply to by प्रचेतस

यष्टीत एक जागा आमची पकडणे. या गोड खाण्याचा गोड गाण्याशी काही संबध आहे काय ! जाणकारांनी बत्त्या पेटवाव्यात ही विनंती. भाजीपाला नाखु

कुठे काय? काहिच दिसले नाहीये. गराडू, गुलाबजाम, पाणीपुरीचा ष्टॉल काही म्हणता काही दिसलेच नाही. असे असताना कशाला उगीच काय बोलू? फक्त पाणीपुरीचे इतके प्रकार असतात हे माहित नव्हते असे म्हणते.

काय राव तुम्ही...? आता आमच्या डोक्यात चक्र फिरायलेत ना... आताच नाशिकहून गाडी काढून निघालोतर ५ तासांत पोचू.. मस्त खाणं चापू, मस्त नर्मदेत वाकू.. मस्त फिरु.... मस्त हे... मस्त ते .... मस्त.... मस्त... मस्त.... छ्या... उगाच डोक्याचा सराफा केला बॉ...

In reply to by संदीप डांगे

इंदूरास गेलात, तर लगे हाथ मांडूगड, महेश्वर आणि ओंकारेश्वर देखील बघायला विसरू नका. सिमरोळ वरून जाल, तर जवळच 'कजली गड' ही बघण्यालायक आहे.

हाफशेंच्युरी निम्मीत्त सर्व मिपाकरांचा सत्कार (धागाकर्ते सोडुन) एक एक ईनो* पाकीट देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक -जेपी आणी तमाम कार्यकर्ते *अटी लागु.

In reply to by जेपी

एका इनो पाकिटानी काय होणारे? दोन-चार टेंपो पहिजेत किमान.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

एका इनो पाकिटानी काय होणारे? दोन-चार टेंपो पहिजेत किमान. देऊ की* *पुन्हा अटी लागु..

इंदोरला चार वर्ष राहिलेय.आयुष्यातल्या चांगल्या आठवणी आणि भोचकचा सहवास याच गावी घडलाय....रावेरखेडीला बाईकवर गेलेय त्याच्यासोबत.....परत डोळ्यासमोर ते दिवस आले...मनाचा कोपरा हळवा आहे या गावाबाबतचा...