नेता व्हायचंय एका रात्रीत ?
लेखनविषय:
काव्यरस
नेता व्हायचंय एका रात्रीत ?
पूर्वीच्या काळी अनेक वर्षांच्या समाजसेवेनंतर
नेते तयार होत असत.
आता जमाना बदललाय.
जीवन गतिमान झालंय.
डिजिटल युग आलंय.
आता डिजिटल बॅनरमधून नेते तयार व्हायला लागलेत.
तुम्हाला नेता व्हायची इच्छा असेल तर अलिकडे ते फारच सोपं काम झालं आहे.
नेता व्हायचंय एका रात्रीत ?
दाखवून टाक झलक
चौकाचौकात लाव पोरा
शुभेच्छांचे फलक
घरादारात गल्लीबोळात
जरी नसेल तुला स्थान
फलकावरती लिहून टाक
युवकांचे आशास्थान
वडील नेहमीच ओरडत असतात
दाखव काही तरी कर्तृत्व
हरकत काय रे लिहायला
शहराचं खंबीर नेतृत्व ?
वाढेल वलय नेतृत्वाचे
मिळेल तिथे खाता खाता
होऊन जाशील बेट्या एक दिवस
तूच आमचा भाग्यविधाता
वाचने
1728
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
अतिशय सहज सुंदर कविता.
In reply to अतिशय सहज सुंदर कविता. by प्रचेतस
अतिशय सहज सुंदर कविता.
रचना आवडली
परफेक्ट.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद