✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

समस्यापूर्ती

स — सागरलहरी, Sat, 11/22/2008 - 21:47

प्रतिक्रिया द्या
1709 वाचन

💬 प्रतिसाद (4)

समस्येचे उत्तर --

सागरलहरी
Sun, 11/23/2008 - 10:52 नवीन
अरे ? आपणा समस्तांची (काव्य ) प्रसव क्षमतेस कांय झाले ? समस्या .... आज नाही पौर्णिमा ,अन ग्रहण नाही आजला, सांग सखये कोणता तो, चंद्र कैसा ग्रासला ? याला उत्तर ....... स्वैर वार्‍यावरति सोडुन , केस अपुले मोकळे, गंधलोलुप होउनीया , खुडत होती ती फुले . तिमिर घन कचपाशपट तो , मुक्त जो झेपावला, आणि त्याने यौवनेचा , मुखचंद्र् अवचित ग्रासला. दूर गेला घर धनी जो, नाही अजुनी परतला, आस लागुनि भेटिची तिज, जीव तो व्याकूळला. जीव घेणी ती प्रतीक्षा, साहवे ना तीजला आणि चिंतेने तियेचा, मुखचंद्र् अवचित ग्रासला. माळण्याला मधुपुष्पमाला, जाउनी ती बैसली, पाहुनी प्रतिबिंब अपुले, धुंदली आनंदली, आणि पिकला पाहता तो, केस कचपाशातला, काळजीने सुंदरीचा, मुखचंद्र् अवचित ग्रासला. चोरुनी भेटावयाला, प्रियकराला चालली भेटिच्या त्या कल्पनेने, रोमरोमी बहरली, पुढति दिसला अन अचानक, जन्मदाता तीजला, भीतिने त्या यौवनेचा, मुखचंद्र् अवचित ग्रासला. वरील समस्या व त्याची पूर्ती माझे मामा श्री. जे. मधुकर (वय ७२ वर्षे ) यांचे कवन आहे. ते स्वतः आंतर जाल वापरत नाहीत. त्यांना मी "मि.पा." ची ओळख करुन दिली असता त्यांना हे संकेत स्थळ आवडले. व त्यांनी सर्व मिपा करांच्या अभिनंदनार्थ वरील समस्या व पूर्ती मला लिहून दिली आहे. आपला (मामा भक्त भाचा) लहरी सागर.
  • Log in or register to post comments

खुपच सुंदर

वेताळ
Sun, 11/23/2008 - 11:03 नवीन
स्वैर वार्‍यावरति सोडुन , केस अपुले मोकळे, गंधलोलुप होउनीया , खुडत होती ती फुले . तिमिर घन कचपाशपट तो , मुक्त जो झेपावला, आणि त्याने यौवनेचा , मुखचंद्र् अवचित ग्रासला. मस्तच.....त्या यौवनेचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. वेताळ
  • Log in or register to post comments

अस्से आहे

राघव
Mon, 11/24/2008 - 12:34 नवीन
अस्से आहे होय? म्हणजे हा चंद्र म्हणत होतात होय?? :) छान कविता! मामांना नमस्कार सांगा आमचा! शुभेच्छा! मुमुक्षु
  • Log in or register to post comments

माझा एक काव्य प्रयत्न

सागर
Mon, 11/24/2008 - 12:38 नवीन
आज नाही पौर्णिमा ,अन ग्रहण नाही आजला, सांग सखये कोणता तो, चंद्र कैसा ग्रासला ? माझा एक काव्य प्रयत्न कोण म्हणती प्रियेचा मुखचंद्र, तर कोण म्हणती मधुचंद्र आम्हाला तर स्पष्ट दिसतसे, ग्रासियेला तो अमावस्येचा चंद्र :) - सागर
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा