डोंबिवलीला, फूलपाखरांच्या बागेत, मिपा कट्टा करायचा का?
नमस्कार मिपाकर मंडळी
फूलपाखरू.. निसर्गाचं ‘पंखधारी रत्न’च जणू. आपल्यासारख्या सर्वसामान्यांना या सुंदर, छोट्याशा जीवांबद्दल माहिती व्हावी आणि त्यांच्याविषयी अभ्यासाला चालना मिळावी, या हेतूने डोंबिवलीच्या रोटरी क्लबने रविवारी, दि. २६ एप्रिल, २०१५, सकाळी ९ ते १२ या वेळात रोटरी उद्यान, पेंढरकर कॉलेजसमोर, डोंबिवली (पू.) या ठिकाणी ‘डोंबिवली फूलपाखरू महोत्सव’ आयोजित केला आहे. ‘पाणीवाले बाबा’ राजेंद्र सिंहजी यांचं बीजभाषण (keynote speech), आयझॅक किहीमकर यांचं दृक-श्राव्य सादरीकरण, चर्चासत्र (panel DISCUSSION – सहभाग असद रहमानी (बी.एन.एच.एस.चे संचालक) आणि इतर मान्यवर तज्ज्ञ), मुलांसाठी विविध स्पर्धा असा भरगच्च कार्यक्रम आहे.
या कार्यक्रमाला जोडूनच एक खादाडी कट्टा पण करायचा का?
आयोजक सुधांशू नुलकर आणि मुवि
खर्च आपापला.
ज्यांनी नक्की यायचे आहे, त्यांनी मला किंवा सुधांशू नुलकर ह्यांना व्य.नि. करावेत ही विनंती.
प्रतिक्रिया
फुलपाखरं?
=))
लैच भारी..
फुल्पाख्रे डोंबिवलीत नस्त्यात
ती सगळीकडेच अस्तात ;)
फुलपाखरं असतात. पण नजर शोधक
अर्ज कियेला हय
मस्त हाणलायेस गड्या..
मी येतोय!
रविवारी सकाळी ८|| वाजता रोटरी क्लबला भेटू या का?