Skip to main content

डोंबिवलीला, फूलपाखरांच्या बागेत, मिपा कट्टा करायचा का?

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 19/04/2015 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडळी फूलपाखरू.. निसर्गाचं ‘पंखधारी रत्न’च जणू. आपल्यासारख्या सर्वसामान्यांना या सुंदर, छोट्याशा जीवांबद्दल माहिती व्हावी आणि त्यांच्याविषयी अभ्यासाला चालना मिळावी, या हेतूने डोंबिवलीच्या रोटरी क्लबने रविवारी, दि. २६ एप्रिल, २०१५, सकाळी ९ ते १२ या वेळात रोटरी उद्यान, पेंढरकर कॉलेजसमोर, डोंबिवली (पू.) या ठिकाणी ‘डोंबिवली फूलपाखरू महोत्सव’ आयोजित केला आहे. ‘पाणीवाले बाबा’ राजेंद्र सिंहजी यांचं बीजभाषण (keynote speech), आयझॅक किहीमकर यांचं दृक-श्राव्य सादरीकरण, चर्चासत्र (panel DISCUSSION – सहभाग असद रहमानी (बी.एन.एच.एस.चे संचालक) आणि इतर मान्यवर तज्ज्ञ), मुलांसाठी विविध स्पर्धा असा भरगच्च कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला जोडूनच एक खादाडी कट्टा पण करायचा का? आयोजक सुधांशू नुलकर आणि मुवि खर्च आपापला. ज्यांनी नक्की यायचे आहे, त्यांनी मला किंवा सुधांशू नुलकर ह्यांना व्य.नि. करावेत ही विनंती.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3093
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

डोंबोलीत डासांना फुलपाखरं म्हणायला लागलेत काय हल्ली? :) (सॉरी, सॉरी! पण आयुष्यातला काही काळ डोंबिवलीत प्रत्यक्ष वास्तव्य झालेले असल्याने हा विनोद करायचा मोह आवरला नाही!!! तरी कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा!!)

रस्त्यात असत्यात, बागेत असत्यात बशीत असत्यात, रिक्शीत असत्यात लेडीज डब्ब्यात तर झुंडीने असत्यात . बँकेत असत्यात , हाफिसात असत्यात शाळेत असत्यात , कालेजात असत्यात तर कधी कुणाच्या कलेज्यात असत्यात. फुल्पाख्रे सगळीकडेच असत्यात फकस्त नजर पायजे , जिगर पायजे मग फुल्पाख्रे सगळीकडेच दिसत्यात

रविवारी किती वाजता (साडे आठ, पावणे नऊ) आणि कुठे (रोटरी उद्यान, पेंढरकर कॉलेज) यायचे ते फक्त कळवा. या कट्टयाला हजेरी लावायला नक्की आवडेल. मुवि / नुलकर काका, शनिवारी गरज लागल्यास आधी अवश्य कळवा. मदत करायला नक्की हजर होईन.