Skip to main content

सुभाषबाबू सत्य ..पाळत ...

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शनिवार, 11/04/2015 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
हि बातमी सुभाषबाबूंच्या मृत्यू विषयीचे गूढ अजून किती दिवस गूढ राहणार आहे ? इतके वर्ष इतक्या चौकश्या झाल्या त्यांनी दिलेला निर्वाळा खरा असेल तर पुन्हा पुन्हा हे का चर्चेत येतंय ? त्या दिवशी तैपेई विमानतळावर एकही विमान आले गेले नव्हते हे खरे असेल तर मग तो अपघात झाला हे ह्या समित्यांनी कसे ठरवले ? सुभाषबाबू जर त्या अपघातात मरण पावले नसतील तर मग जपानमध्ये ठेवलेला तो अस्थी/रक्षा कलश कुणाचा ? काय खरे काय खोटे ? त्यात आणखीन हि एक क्लिप ह्यातील अंतिम सत्य कुणाला ठावे ? सामान्य जनांना ते कधी कळणार आहे का नाही ?...बरे पुन्हा समजा ते कळले तर पुढे ?? हे अजून एक भयकारी काही जीवघेणे ...लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे गूढहि तसेच ...

वाचने 36892
प्रतिक्रिया 133

प्रतिक्रिया

In reply to by खंडेराव

खंडेराव , १०० टक्के सहमत.. देशाच्या झालेल्या प्रगतीत हाताचा हात नक्कीच आहे. पण परिस्थिती हाताबाहेर चालली होती हो. गेल्या दहा वर्षात तर देश जागच्या जागी उभा आहे. सोनिया गांधीच्या जवळचे समजल्या जाणाऱ्या चौकडीने वाटोळ केलं की हो देशाचं. त्यांना फक्त गांधीचं नाव हव आहे. बाकी काही नको. हाच गांधींच्या स्वप्नातला भारत आहे का ? मला तरी वाटत नाही. आणि असेल तर गांधींच ते स्वप्न आम्हाला मान्य नाही.

In reply to by चिनार

आहे, पण सोयीच्या हिशोबाला विरोध आहे चिनार.. बाकी गांधीच्या स्वप्नातला भारत मोदीजी आणतायेत. त्यांना शुभेछ्चा देउयात, आणि पुढे जाउयात..

In reply to by खंडेराव

जयदेव मार्तंडा … तुम्ही देशाचे geographical स्थान बघा. उपलब्ध Resources बघा … काहीही नसताना जपान, कोरिया आणि जर्मनी सारखे देश कोठे पोचले. त्यामानाने अजून किती प्रगती व्ह्यायला हवी होती तोही विचार करा न … शाळा कॉलेज हॉस्पीटल आणि इतर basic facilities कॉंग्रेस सरकार ने दिल्या पण त्याचा गवगवा म्हणजे तेवढेही द्यायची इच्छा नव्हती कि काय ?

In reply to by कहर

अहो खायची मारामार होती हरितक्रांती होइपर्यंत. कोणते रिसोर्सेस सांगताय? भिकेवर जगायचो आपण दुष्काळात. येवढ्या मोठ्या देशाला जगवने हे ही कामच होते. जरा समजुन घ्या कि आपण जगाच्या तुलनेत कुठे होतो. १०-१५% लोकसंख्या सुशिक्शित असेल १९४० ला. जपान, जर्मनी, कोरिया या तुलना योग्य नाहीत. ५-१५ कोटी लोकसंखेचे देश हे. त्यात जपानी/जर्मन लोकांचे कौतुक कि महायुद्धानंतर सावरले. तंत्रज्ञानातील प्रगतीत हे दोन्ही कधीपासुनच आपल्या पुढे होते. आणि, हेही मान्य करा की या लोकांची रास्त्रवादाची भावना प्रबळ होती. नाहीतर, आपले अजुनही भय्ये असे, बिहारी तसे, तिकडे आसामात बंगाली कसे, हेच चालुये. पुणे/खानदेश्/मराठवाडा वाद संपत नाहीत अजुन. थोडे अजुनही बघा, पाकिस्तान, आफ्रिकन देश आणि कैक इतर देश तयार झाले १९४० मधे, ते कुठे आहेत?

In reply to by खंडेराव

हेही मान्य करा की या लोकांची रास्त्रवादाची भावना प्रबळ होती. नाहीतर, आपले अजुनही भय्ये असे, बिहारी तसे, तिकडे आसामात बंगाली कसे,हेच चालुये. पुणे/खानदेश्/मराठवाडा वाद संपत नाहीत अजुन. +१०० थोडे अजुनही बघा, पाकिस्तान, आफ्रिकन देश आणि कैक इतर देश तयार झाले १९४० मधे, ते कुठे आहेत? त्यांच्याशी तुलना नकोच... प्रोब्लेम राज्यकर्त्यांमध्ये होता पण आपली समाजरचना / राष्ट्र्भान वगैरे चिंत्य प्रकार होते (अजूनही आहेत)...

In reply to by खंडेराव

अहो पण स्वातंत्र्य मिळवण्यासारख्या उदात्त राष्ट्र्भावानेने प्रेरित असलेल्या लोकांच्या मनात स्वताच्याच राज्यकर्त्यांबद्दल एवढी घृणा निर्माण होण्याचे कारण काय हो… जर प्रगती दिसत होती तर राष्ट्रभावना आणि अभिमान वाढायला हवा होता… काहीतरी असे झाले असेलच ना ज्यामुळे जी राष्ट्रभावना जपान आणि कोरियाने जपली ती आपल्याला जपता जोपासता आली नाही देशात सर्वत्र समान प्रगती करून सर्व राज्यसमभाव, सर्व धर्मसमभाव जोपासत आला असता. मुंबईचा विकास साधताना नागालॅंडचा एवढा विसर पडला कि ते राज्य भारतात आहे हेही लोक विसरले. मुस्लिम मतांसाठी दलित मतांसाठी त्यांच्या कलाने कायदे केले कि इतर धर्म जातीत जन्माला येणे लोकांना पाप वाटावे. अशी विषमता पसरवली गेली याची जबाबदारी कोण घेणार.? मी मान्य करतो कि पहिली ५-६ वर्षे कोन्ग्रेस ने केलेही असेल समाजकारण पण नंतर फक्त आणि फक्त राजकारण आणि अर्थकारणच केले याला कोणी नाकारू शकते का ?

In reply to by कहर

ही घृणा तुम्च्या मनात आहे, माझ्या मनात आहे, पण देशाच्या मनात नाहीये. फार जनरलायझेशन होतय आपल्या भावनांचे. २०१४ सार्वत्रिक निवडणुकात भाजपाला ३१ आणि कॉ.ला १९ ट्क्के मिळालीत मते.
देशात सर्वत्र समान प्रगती करून सर्व राज्यसमभाव, सर्व धर्मसमभाव जोपासत आला असता. मुंबईचा विकास साधताना नागालॅंडचा एवढा विसर पडला कि ते राज्य भारतात आहे हेही लोक विसरले. मुस्लिम मतांसाठी दलित मतांसाठी त्यांच्या कलाने कायदे केले कि इतर धर्म जातीत जन्माला येणे लोकांना पाप वाटावे. अशी विषमता पसरवली गेली याची जबाबदारी कोण घेणार.?
किती विरोधाभास एकाच वाक्यात :-) अहो, एकीकडे समान विकासाची कथा सांगताय, आणि दुसरीकडे हे. माहीतीसाठी २ आकडे - सेक्रेटरीलेवल ( सेंट्रल गव. सर्वोच्च ) १४० अधिकार्यात एकही दलित नाही, भाप्रसे मधे ३% जास्त मुस्लीम पास होत नाहीत. भारतिय लोकसंख्येत १३.४% मुस्लिम आहेत आणि १६.६% दलित. किती वाटा दिलाय बघा आपण. ( आरक्षण नसलेला आरक्षण समर्थक ) खंडेराव

In reply to by खंडेराव

अहो तुम्ही समजला नाहीत. मी सर्वांचा समान विकासाबाद्दलाच बोल्तोय. स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षे झाली तरी मनुष्य जन्माधिष्टीत म्हणजे जातीवर आधारित कायदे आणि आरक्षणे हवीच कशाला ? म्हणजे लायकी नसून आरक्षित लोकांनी पुढे जावे आणि अनारक्षित लोकांनी भविष्य काळात मागासवर्गीय व्हावे असेच ना ? जास्त टक्केवारी असून जागा उपलब्ध नसल्याने शिक्षण घेत न आलेले आणि ४५% ने पास होऊन रडत खडत engineer होऊन पुन्हा सरकारी नोकरीवर आरूढ झालेले अशी किती उदाहरणे आहेत. मी मुंबई आणि नागालॅंड म्हणलो म्हणजे जेव्हा आपण मुंबईचा विकास करत गेलो त्याच्या सोबतच नागलंडचा विकास व्ह्यायला हवा होता. एकावेळी एकाला झुकते माप देणे म्हणजे 'बोका माकड आणि लोण्याचा गोळा' या गोष्टीसारखे होईल (समान नागरी कायद्याचा पुरस्कर्ता ) कहर

In reply to by खंडेराव

कॉंग्रेस स्वातंत्र्यानंतर असलेली राष्ट्रभावना टिकवून ठेवण्यात अयशस्वी ठरली असे म्हणायचे आहे का? जवळपास ३० वर्षे कॉंग्रेस सत्तेत होती, तरीही असे आपण लिहित असाल तर कॉंग्रेस प्रचंड अयशस्वी झाली आणि फक्त पैसे खाण्यात त्यांना रस उरला असे जे विरोधक म्हणतात ते खरे मानावे का?

In reply to by खंडेराव

सहमत!

In reply to by hitesh

याच गांधींना नेहरूंचा सत्तापिपासू रोग लक्षात आला नाही का हो ? बरं स्वातंत्र्य मिळाल्यावर "राष्ट्रीय सभा " विलीन करा अशी गांधीजींची इच्छा होती म्हणे ...६० वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून ..नाही म्हटलं "शुभस्य शीघ्रम!"

In reply to by hitesh

सरदार पटेलाना श्वसनाचा विकार होता. गांधीजींच्या निसर्गोपचार केंद्रातही त्यांच्यावर उपचार होत होते. त्यांची लाइफ एक्स्पेक्टन्सी जास्त नव्हती हे गांधीजीनाही समजले होते. सरदार पटेल त्यानंतर दोन तीन वर्षात वारले. म्हणजे ४७ ला ते पंतप्रधान झाले असते तर पाच वर्षेही ते टर्म पुरी करु शकले नसते. १९५० च्या आसपासच त्यांचे निधन झाले. च्याआयला हे बरंय ! वाटेल तेंव्हा एखाद्या माणसाचा आजार शोधायचा. जेवढे २-३ वर्ष ते जगले तेव्हढ्या काळात पूर्ण भारत संस्थान मुक्त केला त्यांनी. नेहरूंनी कमीत कमी स्वत: च्या पक्षातली घराणेशाही तरी संपवायची होती

In reply to by चिनार

गांधी नेहरुंच्या पलीकडे कॉग्रेसचे अस्तित्व काँग्रेसींनाच सहन होत नाही. त्यांना स्वतःवर नेहमीच एक गांधी नेहरु लागत. सध्यातरी राहुल गांधी ही काँग्रेसची अपरिहार्यता आहे. त्याला एकाएकी बाजूला करता येणार नाही. त्याच्या ऐवजी कदाचित प्रियांकाताईंचा करिष्मा त्यांना वाचवु शकतो पण त्यासाठी ताईंचीच मानसिक तयारी नसावी असे दिसते. शिवाय जावईबाप्पू पण सध्या बर्‍याच प्रकरणात अडकले आहेत त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होउ शकत नसावे.

In reply to by चिनार

बाकीचे प्रश्न राहु देत बाजुला. तुम्हाला जी सुभाष बाबू आणि गांधीजींची काँग्रेस अपेक्षित आहे ती आज अस्तित्वात आहे कुठे? तीच जर नसेल तर बाकीचे प्रश्नच गैरलागू आहेत.

ग्रेट्थुंकर,टॉ.गी.फी,नाना,हितेसभाय्,सचिन आणि माई..... and counting

In reply to by होबासराव

यांची लक्षणे येथे नमूद आहेत वर्गवारी (क्रमांक १,२,७,१० आणि १४)सवडीने वाचा आणि नंतर तुम्हीच ठरवा काय ते

सरदार पटेलाना श्वसनाचा विकार होता. गांधीजींच्या निसर्गोपचार केंद्रातही त्यांच्यावर उपचार होत होते. त्यांची लाइफ एक्स्पेक्टन्सी जास्त नव्हती हे गांधीजीनाही समजले होते. सरदार पटेलांची लाईफ एक्स्पेक्टंसी कमी होती हे समजले होते की ठरवले होते ? एव्हढा मोठा नेता हॉस्पिटल मध्ये जाण्या ऐवजी निसर्गोपचार केंद्रात उपचार का घेत होता ? का तस ठरवल होत ? गांधीनी चालवलेली निसर्गोपचार केंद्र संस्था काय श्वसन विकारावर उपचार करणारी अधिकृत संस्था होती ? लाल बहादुर शास्त्रीही अल्प वयीन ठरले त्या मागे ही असेच तर्क आहेत काय ?

सुभाष चंद्र बोसना काँग्रेसमध्ये वर आणण म्हणजे गांधींजीच्या अहिंसे मुळे भारताला स्वातंत्र मिळाल ह्या मुळ संकल्पनेलाच धक्का बसला असता. आणि म्हणुनच ++ Gandhi however took a personal stand and declared that the loss of Pattabhi was his loss ++

नेताजींच्या कुटूंबावर पाळत ठेवण्याचा वारसा सांगणारा गांधी/नेहरु परिवार आता आपल्या कुटुंबाचा कुलदिपक अधिवेशन सोडून मध्येच कुठे गायब होतो हे सांगु शकत नाही. काय हा विरोधाभास.. !! छ्या छ्या कुळाचं नाक कापलं अगदी. :)

In reply to by खंडेराव

योग्य प्रश्न विचारलास रे खंडेरावा. बोस ह्यांच्या नातेवाईकांच्या खांद्यांवर बंदूका ठेऊन नेहरूंवर गोळीबार चालु आहे असे ह्यांचे मत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मै, कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण कुणावर गोळीबर करत आहे यात आम्हा सामान्यांना स्वारस्य नाही. शाळेपासून बोस आम्हा भारतीयांचे आवडते हीरो आहेत. जर असं समजलं की नेहरूंचा नेताजींच्या स्टालीनकडून होणार्‍या अटकेत सहभाग होता आणि / किंवा स्टालीननं त्यांना अटक करून यातना दिल्या, तर मी एक भविष्यवाणी करतो. न भूतो न भविष्यती अशी दंगल उसळेल आणि गांधी नेहरू परिवार आणि त्यांचे चमचे त्यात होणार्‍या रक्तपातात बुडवून टाकले जातील.

In reply to by काळा पहाड

दंगल घडवायची वाटच बघत बसलाय की ! तुमच्या वरुण आणि मनेकांचं काय करणार ? नेहरु सत्तेत असताना , नेहरुंचा खुनात सहभाग असल्याचा पुरावा असणार्‍या फायली म्हणे नेहरुच वीस वर्षे गुप्तपणे सांभाळत बसले होते. ! अब्बास मस्तान किंवा जावेद अख्तारही इतकी ढिसाळ रहस्यकथा लिहित नसतील. http://en.m.wikipedia.org/wiki/Death_of_Subhas_Chandra_Bose नेताजी गुप्तपणॅ जात होते.. नेहरुनी स्टालेनला आधीच कसे कळवले ?

In reply to by hitesh

दंगल घडवायची वाटच बघत बसलाय की ! तुमच्या वरुण आणि मनेकांचं काय करणार ?
हितेशभौ, मराठी शब्दांचा अभ्यास वाढवा. 'भविष्यवाणी' हा शब्द 'योजना' या शब्दाचा समानार्थी शब्द नाहीये. बाकी ते वरूण आणि मनेका 'आमचे' नाहीयेत. बीजेपीचे आहेत. ते तुमचे आणि आमचे तुम्ही चालू ठेवा. मला त्यात ओढू नका.
नेहरु सत्तेत असताना , नेहरुंचा खुनात सहभाग असल्याचा पुरावा असणार्‍या फायली म्हणे नेहरुच वीस वर्षे गुप्तपणे सांभाळत बसले होते. ! अब्बास मस्तान किंवा जावेद अख्तारही इतकी ढिसाळ रहस्यकथा लिहित नसतील.
नसतील बुवा. जो माणूस शिवाजी महाराजांना 'लुटारू बंडखोर' संबोधतो, महाराष्ट्राच्या बाळगळ्याला नख लावण्याचा विचार करतो, आपल्या जावयाला गांधी आडनाव फक्त राजकारणी विचारांसाठी घ्यायला बाध्य करतो, काश्मीर मध्ये सार्व मत घेण्याची घोषणा करून भारताला काश्मीर प्रश्नात लंगडं करतो, धोरणबंधुता नावाच्या फालतू विचारांतून चीनवर अकारण भरवसा ठेवून युद्ध ओढवून घेतो आणि ते हरतो आणि मग एवढं नुकसान करून मरून जातो त्या माणसाबद्दल मला ना आदर आहे, ना काही विश्वास. तो माणूस काहीही करू शकतो.
नेताजी गुप्तपणॅ जात होते.. नेहरुनी स्टालेनला आधीच कसे कळवले ?
तुम्ही थोडा इतिहासाचा अभ्यास करावा असा सल्ला आहे. अशा वाक्यांतून तुमचा बालिशपणा दिसतो. सध्या एवढंच.

In reply to by काळा पहाड

भारीच आहे :-) अशी पत्रे नेहरु लिहित असतील :-) हा हा हा! हे पुस्तक कोणते आणि लेखक कोण पहाडसाहेब?

In reply to by खंडेराव

श्याम लाल जैन हे नेहरूंचे स्टेनोग्राफर होते. नेताजींच्या मृत्यूबद्दल चौकशी करण्यासाठी आत्तापर्यंत ४ समित्या नेमल्या गेल्या. १९७० मध्ये जी खोसला कमिशन नं चौकशी केली त्यापुढे श्याम लाल जैन यांनी शपथेवर साक्ष दिली आहे की हे पत्र त्यांनी टाईप केलं आणि जे नेहरूंनी स्टालीनला १९४५ मध्ये पाठवलं. या पत्रानुसार २ गोष्टी सिद्ध होतात: १. नेहरूंना बोस पकडले गेलेत, त्यांचा मृत्यू झालेला नाही आणि ते रशियाच्या कैदेत आहेत हे माहिती होतं. २. नेहरू नेताजींबद्दल अतिशय तिरस्काराने लिहितायत - "तुमचा युद्ध गुन्हेगार" असं ते ब्रिटिश पंतप्रधानांना लिहिताहेत. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी. नेहरूंच्या पूर्व स्टेनोग्राफर नं १९७० मध्ये अशी साक्ष देण्यात जर ती खोटी असेल तर त्या स्टेनोग्राफर्चा काय फायदा असावा? बरं ही साक्ष शपथेवर एका कमिशन समोर दिलेली आहे. हा एखादं पुस्तक खपवण्यासाठी उगीचच केलेला सेन्सेशनल क्लेम नाहीये. या पुस्तकात ही माहिती फक्त उधृत केलेली आहे. आणि हा मुद्दा मला हसण्यावारी नेण्यासारखा वाटत नाहीय.

In reply to by काळा पहाड

भाषा बघुन पत्र अगदी गंडलेले वाटले. जो माणुस आयुष्यभर युरोपियन चालिरिती पाळत राहिला तो काय असे लिहिणार नाही. मी माहिती मिळवतो अजुन.. पुस्तकाचे नाव सांगता येइल का?

In reply to by खंडेराव

हे पुस्तकातलं आधीचं पानः हे "रिप्रॉडक्शन फ्रॉम मेमरी" आहे. त्यांना साधारण २५ वर्षांनंतर जसं आठवलं तसं ते सांगतायत. poorvich pan

In reply to by काळा पहाड

आणि सर्व conspiracy theories वाल्यांचे कौतुक वाटले. सादर प्रणाम! पहिली कमिटी - नेमली नेहरुंनी. कोण होते कमीटीत ? शाह नवाझ खान - ( Khan led the army into North Eastern India, seizing Kohima and Imphal which were held briefly by the INA under the authority of the Japanese.[1] In December 1944 Shah Nawaz was appointed as Commander of the No. 1 Division at Mandalay ) नेताजींचे अगदी जवळचे सहकारी. यांना फाशीची शिक्शा झाली होती INA खटल्यात. सुरेशचंद्र बोस - नेताजींचे मोठे भाऊ. एस एन मैत्रा - हे ICS अधिकारी होते. आता, नेहरुंनी नेताजींना गायब केले, ते दोषी आहेत या प्रकरणात, हे माननार्यांनो, ही अशी कमिटी कशाला बनवली असती त्यांनी? जसे जसे अजुन कळेल तसे लिहिलच..

बाबा रे काळ्या पहाडा, अनेक कहाण्या आहेत अशा. विश्वास पाटील ह्यांच्या 'महानायक'मध्ये काय म्हंटले आहे ? हे "sources said" वगैरे ठीक असते पण ठोस पुरावे लागतात की नाही?ह्या sources ना जनतेपुढे,जगापुढे येऊन सरळ बोलायला काय प्रॉब्लेम होता/आहे? नेहरू फाशी देणार होते? अपघात झालाच नाही (जर झाला असलाच तर हात नेहरूंचा!),ते रशियाला गेले...वेश करून भारतात फिरता आहेत... चालु द्या.. गांधी,काँगेसचे नेताजींबरोबर मतभेद जाहीर होते.म्हणूनच त्यांनी कॉन्ग्रेस सोडली.कट करून कोणी कोणाला संपवण्याचे राजकारण ते नव्हते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई, निदान नेहरूंनी बोस आणि भगतसिंग कुटुंबियांवर पाळत ठेवली हे तर खरं आहे की नाही? पुरावे असते तर आपण इथं बोलत बसलोच नसतो. पण या फाईल्स डिक्लासिफाय झाल्या नसत्या तर नेहरू हे असं करू शकतात हे सुद्धा तू हास्यास्पद ठरवलं असतंस. नेहरू अशी पाळत ठेवू शकत नाहीत'च' असं बोलली असतीस. आता सांग नेहरू (ज्यांच्याबरोबर नेताजींचे फक्त 'मतभेद' होते) त्यांच्या बाबतीत असं कसं करू शकतात?

In reply to by काळा पहाड

बरे मला सांग काळ्या पहाडा, पाळत ठेऊन नक्की त्यांना काय फायदा आहे?नेताजीनी कॉन्ग्रेस सोडली तेव्हा कॉन्ग्रेसमधले काहीजणच त्यांच्याबरोबर गेले.सगळी कॉन्ग्रेस गेली नाही.तेव्हा नेहरूंना राजकीय पाठिंबा हा बराच होता.अगदी १९६४ पर्यंत. बोस ह्यांना हिरो म्हणताना ईतरांना व्हिलन केलेच पाहिजे असे नाही.असे ह्यांचे मत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तु विचारलेस काळ्या पहाड्याला, ते असे :-
बरे मला सांग काळ्या पहाडा, पाळत ठेऊन नक्की त्यांना काय फायदा आहे ?
तुला जर ह्या प्रश्णाचे खरेखुरे उत्तर हवे असेल किंवा खरी वस्तुस्थिती जाणुन घ्यायची असेल तर त्यासाठी तुला तुझ्या लाडक्या मयत चाचांकडे वरच्या लोकात जावे लागेल. माझ्या मते तु तसेच करावेस, तिकडे जावेस, चाचांची मुलाखत घ्यावीस व सगळा व्रूत्तांत यालोकी मिपावर मेलवर पाठवावास. म्हणजे आम्हा सर्वांचे अज्ञान दुर होइल शिवाय असे केल्याचे कधी नव्हे ते पुण्य तुला लागेल ते निराळेच.

In reply to by विनोद१८

बाबा रे विनोदा, उत्तर कुजबुज आघाडीला ह्वे आहे.नरेंद्र परतला की तूच का नाही रे गळ घालत राजनाथ्ला,नरेंद्रला? त्या ज्या काही फाईल्स आहेत त्या घेऊनच ये म्हणावे टी.व्ही.वर.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई, या आयबीच्या फाईल्स डिक्लासिफाय 'झाल्या' आहेत. याच्यात राजनाथ आणि नरेंद्रांचा काही संबंध नाही. Two recently declassified Intelligence Bureau (IB) files have revealed that the Jawaharlal Nehru government spied on the kin of Netaji Subhas Chandra Bose for nearly two decades. The files, which have since been moved to the National Archives, show unprecedented surveillance on Bose's family members between 1948 and 1968. Nehru was the prime minister for 16 of the 20 years and the IB reported directly to him. http://indiatoday.intoday.in/story/jawaharlal-nehru-netaji-subash-chand…

In reply to by काळा पहाड

मग पुढची चार वर्षे पाळत कोण आणि का ठेवत होते ? मुळात या इंग्रजी वाक्यांमध्ये सर्वेलन्स आणि स्पायिंग असे दोन शब्द आहेत. आमच्या मेडिसिनच्या भाषेतही सर्वेलन्स हा शब्द येतो. पaण ते एखाद्याच्या किंवा समाजाच्या भल्यासाठी असते. स्पायिंग हे गुप्तपणे करतात.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पाळत ठेऊन नक्की त्यांना काय फायदा आहे?
मग त्यांनी पाळत का ठेवली होती? माई, तुला असं वाटतंय का की त्यांनी पाळत ठेवली होती ही 'कुजबूज' आहे? काँग्रेजींच्या दुर्दैवाने तसं नाहीये. ती डॉक्युमेंटस डिक्लासिफाय झालीयत. आय बी ने पाळत ठेवली गेली होती असं ही डॉक्युमेंट्स सांगतात.
बोस ह्यांना हिरो म्हणताना ईतरांना व्हिलन केलेच पाहिजे असे नाही.असे ह्यांचे मत.
नॅशनल हीरो च्या घरच्यांच्या वर पाळत ठेवणारा माणूस काय लायकीचा असावा मग?
नेताजीनी कॉन्ग्रेस सोडली तेव्हा कॉन्ग्रेसमधले काहीजणच त्यांच्याबरोबर गेले.सगळी कॉन्ग्रेस गेली नाही.तेव्हा नेहरूंना राजकीय पाठिंबा हा बराच होता.अगदी १९६४ पर्यंत.
बर मग यानं काय सिद्ध होतं?

हे पुरावा होऊ शकत नाही. ह्यांनी जे छापलंय त्या पत्र्यांच्या दुसर्या प्रती कोण्या दुसऱ्या स्रोताकडे मिळू शकतील काय?

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

अर्थातच नाही. तो पुरावा असता तर काय हवं होतं. पण या गोष्टी सुद्धा पहिल्यांदाच आम्ही पहातोय. असंही बोललं जातंय की इंदिरा गांधी सरकारनं यातल्या महत्वाच्या पुराव्याच्या फाईल्स कोणतीही कॉपी न सोडता नष्ट केल्या. याच्या कॉपीज कदाचित इंग्लंड मध्ये सुद्धा बहुधा नष्ट केल्या गेल्यात. तरी सुद्धा सध्या ज्या फाईल्स गुप्ततेत ठेवल्या गेल्यात त्या संशोधकांसाठी उघड केल्या जायलाच हव्यात. त्यातून काही धागेदोरे हाती लागतीलही कदाचित. मुळात एका राष्ट्रीय हीरो बद्दल अशा फाईल्स गुप्त ठेवणं हाच एक कट आहे.

आत्तापर्यंत जळल्या असतील त्या.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

तुला गवत खाणार्‍या गायीचे चित्र काढायला लावले होते ना ? गवत कुठे आहे? .... गायीने खाल्ले . अआणि गाय कुठे आहे ? ... गाय पळून गेली. ...,...................... नेहरुनी कट केल्याचे पुरावे कशात आहेत ? नेहरुंच्या फायलीत. फायली कुठे आहेत ? आधी नेहरुनीच संभाळल्या आणि नष्ट केल्या. ........... गोमाता की जय !

In reply to by hitesh

A government panel is likely to decide tomorrow on whether to declassify more files on Netaji Subhas Chandra Bose. There are about 58 files linked to Netaji with the Prime Minister's Office and about 25 with the External Affairs Ministry. http://www.ndtv.com/india-news/will-more-netaji-files-be-made-public-go… तुमच्या दुर्दैवाने आणि भारताच्या सुदैवाने जर या फाईल्स डीक्लासीफाय झाल्या तर मग तुम्हाला गाय, गवत आणि त्या सोबत गाई ने टाकलेला पौटा हि दिसेल्.. मग बघुया.

कि एकच व्यक्ति प्रत्येक वेळेला अशा धाग्यांवर किति डु आय डि वापरुन प्रतिसाद देत असते. पण त्यांचा प्रॉब्लेम हा आहे जो कोणि दुसरी बाजु मांडायचा प्रयत्न करतो तो त्यांच्या लेखि भाजपा चा समर्थक असतो.

In reply to by अत्रन्गि पाउस

..नुसते भाजपाचे समर्थक म्हटले तर समजु शकते हो, परंतु एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे त्यांचा कायम असलेला परकोटीचा 'हिंदुद्वेष्टेपणा' अगदी सुपारी घेउनच आल्यासारखे. त्यांच्या आजवरच्या प्रतिसादाने लक्षात येते कि ते हिंदु नाहीतच, हे हिंदु रक्त नव्हेच. ते नक्कीच गैरर्हिंदु असावेत हिंदु नावांचा आधार घेतलेले 'डु.आय्.डी' इथे असे बरेच 'शिखंडी' असावेत.

In reply to by विनोद१८

"सहमत. लबाडी हा हिंदु धर्माचा स्थायीभाव आहे." हा प्रतिसाद हजरत हितेसभाय बुखारी (विखारी) आणि कं. ह्याचा आहे, गौ. हत्या बंदी (मांसाहार आणि भूक ) ह्या धाग्यावर.

१ नंबर बोललात... राजकिय विरोधि पक्ष जसे नावाला जागतात म्हणजे प्रत्येक गोष्टी ला विरोध केलाच पाहिजे.

नेहरुनी कट केल्याचे पुरावे कशात आहेत ? नेहरुंच्या फायलीत. फायली कुठे आहेत ? आधी नेहरुनीच संभाळल्या आणि नष्ट केल्या. तरी सुद्धा नेहरु हे भारताचे भाग्य विधाता ठरले कसे ? हे काँग्रेसचे कारस्थानच !!

चित्ताने खालिल उतारा वाचा. संदर्ब - श्री. अभिराम दिक्षित यांचे लिखाण ( फेसबुक ) नेहरू द्वेष्ट्यांचे बोस प्रेम नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या घरावर पाळत ठेवल्याची बातमी अनेकांसाठी उन्माद्कारक आहे. देशभक्ती ची व्याख्या बंदुक अशी केली कि बोस हिरो ठरतात आणी आपोपाप गांधी नेहरू शेळपट ठरत असतात . शेळपटांना शेळपट म्हणुन राजकारणात काम भागत नाही . त्याना नीच आणि कपटि देखील सिद्ध करावे लागते. मग बोस यांच्या घरावर पाळत ठेवणे हा कपटिपणाचा पुरावा म्हणून दाखवता येतो . पाळत ठेवणे हे अनेकदा त्यांच्या संरक्षणासाठी असू शकते, किंवा तो एका रुटिन प्रोसेस चा भाग असू शकतो हे ध्यानात घेण्याची काही आवश्यकता उरलेली नसते . देशाचे सरकार हे संस्थात्मक रीतीने राज्यकारभार पाहते . वेगवेगळी कार्यालये स्वायत्तपणे काम करतात . सरकारी कार्यालयांचे काही नियम असतात . त्यातले सर्व नियम पंतप्रधान बनवत नाही . १९४८ ते १९६८ दरम्यान संपूर्ण बोस कुटूंबावर आयबी अधिकाऱ्यांकडून पाळत ठेवल्या गेल्याचं बातमीत म्हटले आहे . या २० वर्षांच्या कालावधीतील १६ वर्ष स्वत: जवाहरलाल नेहरु देशाचे पंतंप्रधान होते. उरलेली चार वर्ष कोण होते ? १९६४ ते ६६ या काळात लाल बद्दूर शास्त्री देशाचे प्रधान मंत्रि होते . लाल बहाद्दूर शास्त्री तर देशभक्त होते ना ? पाकिस्तानला धडा शिकवणारे होते ना ? त्यांच्या कार्यकालात बोस कुटुंबियांवर पाळत ठेवणे का चालू राहिले ? याचा विचार करण्याची नेहरू द्वेष्ट्याना काहीच गरज नसते . भारतीय सैन्य हि एका संस्था - ऑर्गनायझेशन आहे . त्याच्या काही डॉटेड रिपोर्टिंग लाइन्स आयबी पर्यंत जातात. आयबी हि गुप्तचर संस्था अतिशय कार्यक्षम आणि कर्तुत्व वान म्हणून नावाजलेली आहे . बांग्लादेश युद्धात मुक्तीबाहिनी नावाची संस्था उभारून त्यांनी पाक सरकारविरुद्ध प्रचंड जनक्षोभ उसळून दिला होता . हि आयबी का बरे नेताजिंच्या घरावर पाळत ठेवेल ? याचा विचार करायची गरज नाही . नेहरुना देशद्रोही ठरवायला - विचाराचे इंद्रिय शट डाउनच करावे लागते . नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी भारतीय सैन्यात बंड घडवून आणले होते . सैन्यातले बंड हा प्रकार अतिशय सिरीसायली हाताळला जात असतो - कारण तिथे प्रश्न देशाच्या सार्वभौमत्वाचा येतो. भारतीय सैन्यदल ब्रिटिश काळा पासून आहे . सैन्यात दाखल होताना सैन्य आणि कमाडिंग ऑफिसर यांच्याशी एकनिष्ठ रहायची शपथ घ्यायची असते . कमाडिंग ऑफिसरच्या आदेशावर जीव द्यायचा आणि घ्यायचा असतो . सैन्यात विचारवंताला स्थान नाही . तिथे आदेश आणि शपथ याचे महत्व अधिक आहे . सैन्याला जी कामे दिली आहेत ते पाहता हे योग्यही आहे. आझाद हिंद सेनेतील जवानांना भारतीय सैन्याच्या सेवेत पुन्हा घेतले गेले नाही . एकदा शपथ मोडणारा पुन्हा मोडू शकतो हा विचार त्यामागे आहे . नेताजी डाव्या विचारांचे होते . त्यांचा फोर्वर्ड ब्लोक हा जहाल डाव्या विचाराचा पक्ष होता . आझाद हिंद सेनेतले सैनिक डाव्या विचारासाठी पुन्हा बंड करून सत्ता हस्तगत करण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. एकदा शपथ मोडली कि सैन्यात पुन्हा स्थान नाही . आणी जो सैन्यात बंड करेल त्यावर कित्येक दशके पाळत ठेवणे हे सैन्याचे आणि गुप्तचर संस्थांचे काम आहे. ते काम त्यांनी नेहरू काळात केले - लाल बहाद्दूर शास्त्रींच्या काळात केले आणि इंदिरेच्या काळातही केले . हा सरळ साधा प्रोटोकोल आहे . प्रत्येक देशाचे सैन्य तो पाळते . तात्पर्य : १) सुभाष बाबुंवर आयबी ची पाळत होती . ती नेहरू - लाल बहाद्दूर शास्त्री - इंदिरा या तीनही प्रधान मंत्र्यांच्या काळात होती २) सैन्यात झालेले बंड काळजीपूर्वक हाताळाले जाते . त्याच्या प्रोटोकोल चे पालन सैन्य आणि आयबी ने केले ३) नेहरू विरोधकांना सुभाषबाबू हे मुस्लिम प्रेमी होते हे माहित नाही . नेहरू आणी गांधिपेक्षा बाबुंचे प्रेम शतपटीने अधिक होते सुभाषबाबूंचे आकलन करताना कुरुंदकर लिहितात - जे सशस्त्र क्रांतीकारक आहेत, ते सगळे अहिंसाविरोधी . जे अहिंसाविरोधी ते सर्व गांधीविरोधी आणी जो गांधीविरोधी तो हींदुत्ववादी अशी सोयीची समजूत मध्यमवर्गीयांनी केलेली आहे." जुलै ६, १९४४ रोजी आझाद हिंद रेडियो वरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. ह्या भाषणाच्या माध्यामातून नेताजींनी गांधीजींना, जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व अर्जी-हुकुमत-ए-आजाद-हिंद तथा आझाद हिंद फौज ह्यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ह्या भाषणात, नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत, आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे, नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.

In reply to by खंडेराव

आपापल्या मनातील अ/सकारण द्वेष आणि प्रेम फेकायला इतिहासातील कर्तुत्ववान व्यक्तींच्या नावाचा वापर करण्याची हौस भागवायला पब्लीक काय काय चर्चा करतील काहि भरोसा नाहि.

In reply to by खंडेराव

आमच्या डोक्यावर गांधीहत्येचा कलंक लागला आहे म्हणुन आम्हीही तुमच्या डोक्यावर नेताजी प्रकरणाचा कलंक लावणारच. बाकी , गांधीहत्या कुणी व कुठल्या मास्टरमाइंडच्या आदेशानुसार केली हे तर गोडसे बोलतोय नाटकातही आहे

In reply to by hitesh

बाकी , गांधीहत्या कुणी व कुठल्या मास्टरमाइंडच्या आदेशानुसार केली हे तर गोडसे बोलतोय नाटकातही आहे हितेश भाऊ ! गोडसे बोलतोय या नाटकात आपण गोडसेंच बोलणं ऐकणं अपेक्षित आहे. त्यात त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय "गांधी वधाला फक्त मी आणि मीच कारणीभूत आहे!" वधामागचा कोन्ग्रेस ला "अपेक्षित" असलेल्या मास्टर माइण्ड चे नाव जर नाटकात घेतले असते तर कोन्ग्रेस सरकारने त्या नाटकावर इतके वर्ष बंदी ठेवली नसती. तुझ्या वरच्या प्रतिसादावरून तुझा एकंदरीत व्यासंग आणि बुद्धीची पातळी लक्षात आलेली आहे.

In reply to by खंडेराव

सुभाषबाबू हे मुस्लिम प्रेमी होते . नेहरू आणी गांधिपेक्षा बाबुंचे प्रेम शतपटीने अधिक होते. http://m.timesofindia.com/city/ahmedabad/Gujarati-Muslim-gave-Rs-1-cror…

In reply to by खंडेराव

जोपर्यंत का हेरगिरी केली गेली ह्याचा खुलासा होत नाही तोपर्यंत आपल्या तर्कांना काहीही अर्थ नाही. सो, का म्हणून ठेवली पाळत, हे जाहीर होण महत्वाच. बाकी उघड झालेल्या फाईल्समधून जर निर्णय पंडितजींच्या बाजूने लागला तर त्यांना नाहक बडवणाऱ्या लोकांचे चेहरे पाहण्यासारखे असतील! मुद्यांकडे: दीक्षित भले म्हणत आहेत की सैन्य प्रोटोकॉल पाळते आणि म्हणूनच त्यांच्यावर पाळत ठेवली गेली. खरेतर ११ ते १२ हजार आझाद हिंद सैनिकांवर कोर्टमार्शल झालेच होते, त्यांना परत भारतीय फौजेत देखील घेतले गेले नाही, ह्याच कारणामुळे. पेन्शनवगरे सगळ नाकारल्या गेल होत. ह्याचं म्हणण की आयबी सैन्याच्या अखत्यारीत येते, हे ही भारी, आयबी सैन्यात येत नाही आणि तिचा कारभार वेगळा असतो. रॉ अजून वेगळी, जीनी बांगलादेश निर्मितीत सहभाग घेतला होता. दीक्षितांनी सरळ सरळ रॉच क्रेडीट आयबीला देऊन टाकल. आयबी पंतप्रधान कार्यालयाच्या आणि गृहखात्याच्या आधीन येते. तिथे सिव्हिलिअन सरकार निर्णय घेत, आर्मी नाही. म्हणून सैन्यांनी पाळत ठेवायला लावली हे पटण्यासारख नाही.

खंडॅराव , ला ब शास्त्री हे देशभक्त होते म्हणुनच ताश्कंद येथे त्यांचा संयास्पद परिस्थीतीत खुन झाला, जे आपल्या मार्गातले काटे होते ते असेच दुर केले गेले. ते कोणी हे विचारु नका ? देन्ही बोस आणि शास्त्री केसेस मधिल सत्य कधीच बाहेर आले नाही.

भगत सिंगच्या नातेवाईंकावर ही पाळत ठेवली होती ते कस काय समर्थनीय होत ? अशी जासुसी करताना असा कुठला धोका त्यांना दिसला होता ? का भगतसींगचेच नातेवाईक ते डोक फिरल तर सरळ येउन गोळ्या घालतील अशी भिती काँग्रेसच्या नेत्यांना होती,