✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सांगावा (शतशब्दकथा)

ख
खेडूत यांनी
Wed, 04/08/2015 - 19:46  ·  लेख
लेख
गुटख्याचा भपकारा आला तशी पारू सावध झाली. वासामागनं आन्ना ग्रामशेवक आला. कसल्यातरी फॉर्मवर आंगटा घ्यायाचा म्हनला . येका आटावड्यात तिसऱ्यांदा आलंय. निराधार योजनेचं काम करतो म्हनतुया - बगू. जाताना म्हनला, '' काय ? आटापलं सैपाकपानी-आंगुळ ? '' नस्त्या चौकशा मुडद्याला ! *** जैवंता मेल्यावर दादा म्हनलावता वडगावला चल परत. पन पोरास्नी घिउन कुटं तेनच्यात ऱ्हानार ! आपलीच झोळी फाटकी. नगु मनलं. पेन्शल मिळंल . पर गावातल्या मानसांची नजरच लई वंगाळ ! काय वाटलं अचानक - आन गेली कासाराच्या दुकानात. फोनच्या मशिनीत त्येनंच नंबर फिरीवला. दादाचा आवाज आल्याव रुपाया टाकला. मंग आवाजच फुटंना ! नरडंच आवाळल्यागत झालं ''रडू नगं'' - कासार म्हनला - ''म्या बोलतो. '' ''काय सांगावा?'' ''त्येला मनावं- सांच्याला यिऊन लगी आमाला घिऊन जा !''
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
5513 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

खूप छान... :(

खटपट्या
Wed, 04/08/2015 - 20:19 नवीन
खूप छान... :(
  • Log in or register to post comments

कटु, पण सत्य :(

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 04/08/2015 - 20:25 नवीन
कटु, पण सत्य :(
  • Log in or register to post comments

समाजाची लक्तर

जेपी
Wed, 04/08/2015 - 20:26 नवीन
समाजाची लक्तर
  • Log in or register to post comments

सहमत

एक एकटा एकटाच
Wed, 04/08/2015 - 20:27 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

+१ छान लिहिलंय!

आदूबाळ
गुरुवार, 04/09/2015 - 02:18 नवीन
+१ छान लिहिलंय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

फार आवडली!

नगरीनिरंजन
Wed, 04/08/2015 - 20:29 नवीन
फार आवडली!
  • Log in or register to post comments

अतिशय परिणामकारक कथा!

आतिवास
Wed, 04/08/2015 - 20:29 नवीन
अतिशय परिणामकारक कथा!
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

श्रीरंग_जोशी
Wed, 04/08/2015 - 20:31 नवीन
अतिशय परिणामकारक कथा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

जबरदस्त. अप्रतिम.

सौन्दर्य
Wed, 04/08/2015 - 20:36 नवीन
जबरदस्त. अप्रतिम.
  • Log in or register to post comments

आयला, १०० शब्दात इतक

पॉइंट ब्लँक
Wed, 04/08/2015 - 21:08 नवीन
आयला, १०० शब्दात इतक परिणामकारक? भारीच !
  • Log in or register to post comments

+++१११

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/09/2015 - 13:56 नवीन
+++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक

अतिशय परिणामकारक.

एस
Wed, 04/08/2015 - 21:45 नवीन
मस्तकात संतापाची तिडिक उठवणारी कथा!
  • Log in or register to post comments

१०० शब्दात एवढा आशय मांडता

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 04/08/2015 - 21:51 नवीन
१०० शब्दात एवढा आशय मांडता येईल अशी कल्पना मी स्वप्नातही करु शकलो नसतो.
  • Log in or register to post comments

+१

नाखु
गुरुवार, 04/09/2015 - 10:29 नवीन
थेट आणी वास्तव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

+११११११११११११ :(

बॅटमॅन
गुरुवार, 04/09/2015 - 19:18 नवीन
+११११११११११११ :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

आवडली कथा.

प्रचेतस
गुरुवार, 04/09/2015 - 08:29 नवीन
आवडली कथा.
  • Log in or register to post comments

जबरा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/09/2015 - 08:39 नवीन
काय बोलु... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आपल्या आजुबाजुला असं घडताना

मदनबाण
गुरुवार, 04/09/2015 - 09:22 नवीन
आपल्या आजुबाजुला असं घडताना पाहुन बर्‍याचदा खूप वाईट वाटतं... :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ho Jaun Tera Madamiyan... ;) { Tevar }
  • Log in or register to post comments

नित्याचंच! एक न संपणारा विषय

अनिता ठाकूर
गुरुवार, 04/09/2015 - 11:54 नवीन
नित्याचंच! एक न संपणारा विषय. किति काळ?.. माहित नाही. उपाय?.. माहित नाही.
  • Log in or register to post comments

जबरदस्त !

चिनार
गुरुवार, 04/09/2015 - 11:56 नवीन
कटु सत्य!
  • Log in or register to post comments

उभी राहू म्हनली स्वतःच्या

स्पंदना
गुरुवार, 04/09/2015 - 13:01 नवीन
उभी राहू म्हनली स्वतःच्या पायावर तरी उभी राहू देत नाहीत.
  • Log in or register to post comments

आभार !

खेडूत
गुरुवार, 04/09/2015 - 19:16 नवीन
सर्वांचे खूप आभार !
  • Log in or register to post comments

बदल - अपेक्षाच नको करायला

प्रियाजी
Fri, 04/10/2015 - 14:51 नवीन
म्हणायला वीस संपून एकविसावे शतक उजाड्ले तरी बाईकडे बघ्ण्याची पुरूषाची नजर ती अन तषीच. त्यात बदल कोणत्या शतकात होणार?
  • Log in or register to post comments

काकू तुम्हाला माहित असावं

सूड
Fri, 04/10/2015 - 15:48 नवीन
काकू तुम्हाला माहित असावं म्हणून एक किस्सा सांगतो पुलंचा... नवरा बायको रस्त्याने चाललेले असताना बायको सवयीप्रमाणे एखाद्या बाईत वावगं दिसलं की नवर्‍याला विचारते, "पदर पाह्यलात?" आता नवर्‍याने "हो" म्हटलं की "या वयात बरीक शोभत नाही हो हे!!" "नाही" म्हटलं की, "कुठे बघत असतात वेंधळ्यासारखं देव जाणे"...असं उत्तर असतं. आता यावरुन बायका बोलताना दोन्ही बाजूंनी बोलतात असं मी म्हणणार नाही, कारण नको तिथे जनरलायझेशन न करण्याची अक्कल मला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाजी

त्येंन्ला बेसिक इंस्टिंक्ट

टवाळ कार्टा
Sun, 04/12/2015 - 13:12 नवीन
त्येंन्ला बेसिक इंस्टिंक्ट म्हैत नसावेत ...जौदे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

लाखो वर्षे जौन सुध्धा

टवाळ कार्टा
Sun, 04/12/2015 - 13:15 नवीन
लाखो वर्षे जौन सुध्धा पुरुषांत बदल घडवून आणण्याची इच्चा बाळगण्याची म्हैलांची सवय कधी बदलणार असे लिहून या धाग्याचे पोटेंशियल ३००+ नेउ कै? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाजी

लिहिलं नैस काय?

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 04/12/2015 - 17:03 नवीन
लिहिलं नैस काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

१०० शब्दांच्या आत खूप काही

पलाश
Sun, 04/12/2015 - 16:45 नवीन
१०० शब्दांच्या आत खूप काही सांगितलं आहे. पारू, आन्ना ग्रामसेवक, कासार आणि सांगावा मिळाल्यासरशी बहिणीच्या मदतीला धावुन येणारा दादा हे सगळेजण डोळ्यांपुढे उभे केलेत. शतशब्दकथा आवडली.
  • Log in or register to post comments

ही कोणाची देणगी?

प्रदीप साळुंखे
Sun, 04/12/2015 - 17:53 नवीन
वासनाधुंद प्रवृत्ती ही कोणाची देणगी? स्त्री आणि पूरूष ही कोणाची निर्मिती? अगदी रामायण महाभारतापासून चालू आहे हे सगळं याला पर्याय नाही
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

पैसा
Sun, 04/12/2015 - 21:21 नवीन
अगदी थोडक्या शब्दात केवढा अर्थ भरलाय!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा