सांगावा (शतशब्दकथा)
गुटख्याचा भपकारा आला तशी पारू सावध झाली.
वासामागनं आन्ना ग्रामशेवक आला.
कसल्यातरी फॉर्मवर आंगटा घ्यायाचा म्हनला .
येका आटावड्यात तिसऱ्यांदा आलंय.
निराधार योजनेचं काम करतो म्हनतुया - बगू.
जाताना म्हनला, '' काय ? आटापलं सैपाकपानी-आंगुळ ? ''
नस्त्या चौकशा मुडद्याला !
***
जैवंता मेल्यावर दादा म्हनलावता वडगावला चल परत.
पन पोरास्नी घिउन कुटं तेनच्यात ऱ्हानार !
आपलीच झोळी फाटकी.
नगु मनलं. पेन्शल मिळंल .
पर गावातल्या मानसांची नजरच लई वंगाळ !
काय वाटलं अचानक - आन गेली कासाराच्या दुकानात.
फोनच्या मशिनीत त्येनंच नंबर फिरीवला.
दादाचा आवाज आल्याव रुपाया टाकला.
मंग आवाजच फुटंना !
नरडंच आवाळल्यागत झालं
''रडू नगं'' - कासार म्हनला - ''म्या बोलतो. ''
''काय सांगावा?''
''त्येला मनावं- सांच्याला यिऊन लगी आमाला घिऊन जा !''
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खूप छान... :(
कटु, पण सत्य :(
समाजाची लक्तर
सहमत
+१ छान लिहिलंय!
फार आवडली!
अतिशय परिणामकारक कथा!
हेच म्हणतो
जबरदस्त. अप्रतिम.
आयला, १०० शब्दात इतक
+++१११
अतिशय परिणामकारक.
१०० शब्दात एवढा आशय मांडता
+१
+११११११११११११ :(
आवडली कथा.
जबरा.
आपल्या आजुबाजुला असं घडताना
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ho Jaun Tera Madamiyan... ;) { Tevar }नित्याचंच! एक न संपणारा विषय
जबरदस्त !
उभी राहू म्हनली स्वतःच्या
आभार !
बदल - अपेक्षाच नको करायला
काकू तुम्हाला माहित असावं
त्येंन्ला बेसिक इंस्टिंक्ट
लाखो वर्षे जौन सुध्धा
लिहिलं नैस काय?
१०० शब्दांच्या आत खूप काही
ही कोणाची देणगी?
जबरदस्त!