महाराष्ट्रात मराठी चित्रपट सिनेमागृहात प्राइम टाइम ला दाखवणे चित्रपटगृहांना अनिवार्य करण्यात आले
ही बातमी वाचली. ट्विटरवर या विरोधातील पोस्ट्स मुळे का होईना #Marathi ट्रेंडिंग झालं. आता गेले काही वर्ष, मराठी आणि मुंबई बाबत जे घडलंय, घडतंय, त्यावर सुचलेलं हे मुक्तक.
देशभरातून लोक मुंबईत आले
मुंबईला 'आपलंसं' करत गेले
मुंबईने त्यांना आपलं मानलं
त्यांनी मुंबईला 'आपलंच' मानलं
आपण आपलं बघितलंच नाही
त्यांना त्यांचं सांगितलंच नाही
आपले राजकीय पक्ष आले
आपल्यातच ते भांडत गेले
आपलं कुणी ऐकलंच नाही
आपल्याला कुणी विचारलंच नाही
आपण आपलं सोडत गेलो
वाकत गेलो मोडत गेलो
आपलं सुद्धा ते आमचं म्हणाले
तेंव्हाही आपण गप्पच राहिलो
उशीर फार झाला होता
तेंव्हा काळ आला होता
आपली 'मनं' जुळलीच नाहीत
आपल्याला ती कळलीच नाहीत
आता आपलंच हिसकावून नेत आहेत ते
त्यांना हवं ते घेत आहेत ते
वर आपल्याला दटावणारे
काल आपले मानले तेच आहेत ते
आता आपण आपलं बोललो
तर राग येतो त्यांना
आपल्यालाच गप्प बसवायचाही
धीर होतो त्यांना
चूक आपलीच मोठी झाली
आपण शोधत बसलो आपला वाली
आता तरी समजू का आपण
की आता एकी दाखवायची वेळ आली?
सक्ती काय कायदे काय नियम कसले करणार
जिकडे तिकडे गळचेपी आहे कसे आपण तरणार
ठरलेल्या त्या सणांना 'ट्रॅडिशनल' होणार आम्ही
आणि 'माज आहे मराठीचा' टिशर्टवर लिहून फिरणार
अवघं मैदान गेलंय आता
घर तेवढं वाचवायला हवं
इंग्रजीवर पकड हवीच
पण आधी मराठी शिकवायला हवं
मुखात असेल मराठी
तर ती मनात असण्याला अर्थ आहे
मनातच ती नसेल
तर आपला मराठी जन्मच व्यर्थ आहे
- अपूर्व ओक
वाचने
2700
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
+१
In reply to मस्त by कविता१९७८
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }मस्तं.
मान गये वेल्लाकाका!! जे ब्बात
कविता, मदनबाण, कॅप्टन, सूड
लय भारी...पण ते "माज आहे
हो मग?
In reply to लय भारी...पण ते "माज आहे by टवाळ कार्टा
अर्रे हो...गल्तीसे मिश्टेक..
In reply to हो मग? by वेल्लाभट
आणि धन्यवाद :)
In reply to लय भारी...पण ते "माज आहे by टवाळ कार्टा
+१
+१
In reply to +१ by नाखु
+२
In reply to +१ by नाखु
:)