सये भांडतेस कशा..
(दूर असलेला नवरा आज बऱ्याच दिवसांनी घरी येतोय म्हणून बायकोची उडालेली त्रेधा पाहून तिच्या मैत्रिणी तिची अशी फिरकी घेतात )
सांज दाराशी गं आली, सये भांडतेस कशा..
काय लागीर लागली अशा राती येड्यापिश्या ।
सये भांडतेस कशा, भरे घागर पाण्याची
तुझे ध्यान कोठे बाई? येळ जाहली जाण्याची ।
येळ जाहली जाण्याची, बिगीबिगी टाक पाय
आडवाट चकव्याची.. मन लागंल वढाय ।
मन लागंल वढाय, या गं चांदणचाहूली
भीव घाली गोरीमोरी तुझी कातर सावली ।
या गं चांदणचाहूली, रंग ठेव कि राखून
मीठ उतरून टाक.. वारे पहाते वाकून ।
वारे पहाते वाकून, आहे गर्द तुझी खोली
माळ केसात मोगरा, वाट पहा गंधाळली ।
वाट गंधाळली सरे, वीज कडाडे नभात
दार उघडण्याआधी जरा बघ आरशात ।
बघ दिसे आरशात, तुझा साजन बरवा
डोळ्या भिडताच डोळा, होई पदर हिरवा ।
लई झ्याक.
छान
;)
वाह!!!
मस्तच
वाह!! आवडली कविता
झकास एकदम!
सुरेख... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Atu Amalapuram Remix... ;) { Kotha Janta }जबहर्या.......
मस्त मस्त.
मस्त
धन्यवाद
फारच सुरेख कविता.
///तुझे ध्यान कोठे बाई? येळ
खूप मस्त..