Skip to main content

सये भांडतेस कशा..

लेखक कहर यांनी सोमवार, 06/04/2015 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
(दूर असलेला नवरा आज बऱ्याच दिवसांनी घरी येतोय म्हणून बायकोची उडालेली त्रेधा पाहून तिच्या मैत्रिणी तिची अशी फिरकी घेतात ) सांज दाराशी गं आली, सये भांडतेस कशा.. काय लागीर लागली अशा राती येड्यापिश्या । सये भांडतेस कशा, भरे घागर पाण्याची तुझे ध्यान कोठे बाई? येळ जाहली जाण्याची । येळ जाहली जाण्याची, बिगीबिगी टाक पाय आडवाट चकव्याची.. मन लागंल वढाय । मन लागंल वढाय, या गं चांदणचाहूली भीव घाली गोरीमोरी तुझी कातर सावली । या गं चांदणचाहूली, रंग ठेव कि राखून मीठ उतरून टाक.. वारे पहाते वाकून । वारे पहाते वाकून, आहे गर्द तुझी खोली माळ केसात मोगरा, वाट पहा गंधाळली । वाट गंधाळली सरे, वीज कडाडे नभात दार उघडण्याआधी जरा बघ आरशात । बघ दिसे आरशात, तुझा साजन बरवा डोळ्या भिडताच डोळा, होई पदर हिरवा ।
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3561
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

लै मस्त ! -दिलीप बिरुटे

;)

मस्त

///तुझे ध्यान कोठे बाई? येळ जाहली जाण्याचीयेळ जाहली जाण्याची, बिगीबिगी टाक पाय ही रचना (फॉरमॅट) वेगळी म्हणूनच आवडली. मस्तच.....