मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संध्याछाया..

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
दिवस संपला होता होता झालि संध्याकाळ संध्येच्या त्या छायेमध्ये झोपे थकला बाळ वाट वाकडी करून दिसाला संध्या छाया आली बाळाच्या त्या चर्येवरती मावळणारि लाली तो ही थकला ती ही थकली सांज वातीला जागा उद्या पुन्हाही सकाळ होइल तोवरि कसला त्रागा? मी ही वदतो छोटी कहाणी प्रत्येका दिवसाची कुठे कुठे ती दिसे पौर्णिमा-बाकी ही अवसेची! चला गड्यांनो समजुन घेऊ रूपक हे संध्येचे जुने जाणते जे जगले ते साधे जीवन साचे ----------------------------- अतृप्त.. https://fbcdn-photos-d-a.akamaihd.net/hphotos-ak-xap1/v/t1.0-0/11096443_821605814592373_4915902059416888880_n.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=357ff6171a093b74d1a5d7b8a75a0f22&oe=55E495A7&__gda__=1436297083_20c4a8e2fb164325aa9caf34be315530

वाचने 2863 वाचनखूण प्रतिक्रिया 10

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सतिश गावडे Mon, 04/06/2015 - 22:02
मस्तं...संध्येचं भावंविश्वं मस्तं रेखाटलय.
हेच म्हणतो. सांजवेळी संध्याकाळी कातरवेळ खुप बोलकी असते. कविता आवडली !!!

In reply to by सूड

नाखु Tue, 04/07/2015 - 08:54
मूळ अवांतर किमान शब्दात कमाल आशय. सविस्तर अवांतर : तांबीय जिल्बीपेक्षा याचेच क्लासेस काढा म्हणजे तुमची प्रतिभा (आणि प्रतीमासुद्धा) सकाळी-संध्याकाळी फुलतच राहील.

In reply to by नाखु

@ : तांबीय जिल्बीपेक्षा याचेच क्लासेस काढा म्हणजे तुमची प्रतिभा (आणि प्रतीमासुद्धा) सकाळी-संध्याकाळी फुलतच राहील.>> आशयघन प्रतिसादासाठि घन आशय धन्यवाद! आम्ही क्लासेस कशाचेच काढु शकत नाही. क्षमस्व! परंतू या दोन्हीही बाजू-आमच्याच आहेत, याची आम्हाला नम्र जाणिव आहे. धन्यवाद!