संध्याछाया..
लेखनविषय:
दिवस संपला होता होता झालि संध्याकाळ
संध्येच्या त्या छायेमध्ये झोपे थकला बाळ
वाट वाकडी करून दिसाला संध्या छाया आली
बाळाच्या त्या चर्येवरती मावळणारि लाली
तो ही थकला ती ही थकली सांज वातीला जागा
उद्या पुन्हाही सकाळ होइल तोवरि कसला त्रागा?
मी ही वदतो छोटी कहाणी प्रत्येका दिवसाची
कुठे कुठे ती दिसे पौर्णिमा-बाकी ही अवसेची!
चला गड्यांनो समजुन घेऊ रूपक हे संध्येचे
जुने जाणते जे जगले ते साधे जीवन साचे
-----------------------------
अतृप्त..


वाचने
2863
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
खूपच सुरेख आत्मूस.
सुंदर कविता, आवडली.
मस्तं...संध्येचं भावंविश्वं
In reply to मस्तं...संध्येचं भावंविश्वं by कॅप्टन जॅक स्पॅरो
मस्तं...संध्येचं भावंविश्वं
In reply to मस्तं...संध्येचं भावंविश्वं by कॅप्टन जॅक स्पॅरो
गुर्जी संध्येला बसल्यानंतर तर
In reply to गुर्जी संध्येला बसल्यानंतर तर by सूड
रो (खो) चक प्रश्न.
In reply to रो (खो) चक प्रश्न. by नाखु
@ : तांबीय जिल्बीपेक्षा याचेच
छान... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Atu Amalapuram Remix... ;) { Kotha Janta }अतिशय सुरेख जमली आहे कविता!
झकास.