असह्य हा उकाडा...
सध्या उकाड्यामुळे खूप हैराण झालो आहे. आणि माझे घर अश्या ठिकाणी आहे जिथे बाहेरून भरपूर हवा येण्यासाठी विशेष अशी योजना नाहीये. खिडकी आणि दरवाजे १५ ते २० मिनिटे जरी लावून घेतले तर आतील तापमान आणि बाहेरील तापमान यामध्ये जवळपास ८-१० सेल्सिअस चा फरक पडतो. कित्येकदा घराला लॉक करून थोडा वेळ बाहेर गेलो आणि आल्यावर दरवाजा उघडला कि जणू काही भट्टी मध्ये शिरलोय असे वाटते... या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास रात्री झोपताना होतोय. रात्रभर इतके उकडते कि झोप च येत नाही.. फ्रीज खोलून आतमध्ये स्वताला कोंडून घ्यावे असे वाटते.. ( एकदा असा प्रकार चक्क केला देखील) . गेले ४-५ दिवस पंखा लावून झोपण्याचा प्रयत्न केला शांत झोप लागली खरी पण सकाळी उठल्यावर पायामध्ये खुप वेदना सुरु झाल्या.. मग आठवले कि मागे एकदा डॉक्टरांनी पंख्याचा वापर करू नका असे सांगितले होते. त्यामुळे आता पंख्याचा वापरावर देखील मर्यादा आल्या आहेत. तर थोडक्यात सांगायचे झाले तर मी सध्या तोंड दाबून बुक्यांचा मार खातोय. या निमित्ताने घरी नवीन ए सी किंवा कुलर खरेदी करावा म्हणतोय. पण कधीही या दोन्ही गोष्टी मी आजतागायत खरेदी केल्या नाहीत. ए सी दररोज ऑफिस मध्ये वापरतो पण त्याबद्दल काहीहि माहिती नाही. आणि कुलर आत्तापर्यंत फक्त १-२ नातेवाईकांकडे पहिला आहे. पण त्याचा आवाज इतका मोठा होता कि मी विचारलेला प्रश्न त्यांना ऐकू येणार नाही असे समजून मी प्रश्न विचारण्याच्या भानगडीत पडलो नाही. आज या दोन्ही गोष्टीपैकी एकाची निवड करण्याचा प्रसंग आला . त्यानिमित्ताने पडलेले काही प्रश्न -
१ ) VIMP प्रश्न - पंखा आणि पायांचे दुखणे याचा काय सबंध ?
२ ) बेड रूम १४० स्क्वेअर फुट आहे. तर तिथे ए सी घेणे चांगले कि कुलर ?
३ ) कुलर जर खरेदी केला तर त्यापासून चांगले output मिळवण्यासाठी काय काय requirement आहेत ?
४ ) ए सी जर खरेदी केला तर त्यापासून चांगले output मिळवण्यासाठी काय काय requirement आहेत ?
५ ) ए सी चे किंवा कूलर्स चे चांगले मॉडेल कोणते ? आपले अनुभव सांगितले तर फार मदत होईल
६ ) कुलर हवेमध्ये humidity निर्माण करतात म्हणजे नेमके काय ? याचा माझ्यावर किंवा रूम मधील इतर वस्तूंवर काय परिणाम होईल ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
झालं... वाढला TRP धाग्याचा!
(No subject)
ह्या एका प्रतिसादासाठी
लवकर द्या... उकाड्याने हैराण
पुण्यातली का बाहेरची? गुजर ची
गुजरकडे कोण जातंय, सुजाता
+१
सुजाता मस्तानी म्हणाजे पातळ
अंहं...
सीताफळचं माहीत नाही, पण मँगो
सूड, कोणतीही द्या.. पण द्या
पुणे देश तर मुंबई ग्रह
पुणे देश तर मुंबई ग्रह
ग्रहाचा दर्जा काढुन घेतलेला
आमच्या पुणे देशातील
आणखी एक उतारा आहे मुंबई बद्दल
आणि या देशातले
अच्छा, म्हणजे, "मुंबई हा ग्रह
एसी घेणार असेल तर
आर्धा टन ??? तुम्हाला दीड टन
बापूसाहेब
माण गये खरे सर, आपकी पारखी
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
साधा उपाय
अतिशय उत्तम उपाय ! करुन
पटले नाही.
एसी अाणि छताचा पंखा
तिमा म्हणतात त्याप्रमाणे एक्झाॅस्ट
अॅक्चुअली, पंख्यामुळे हवा
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. उपाय
समजा पुण्यासारख्या शहरात जिथे
काही खराब बिराब होत नाही.
अभिजीत अवलिया साहेब
धन्यवाद
वाळा...
पुण्यात कूलर चालेल. मुंबईत
VIMP प्रश्न - पंखा आणि
आपला प्रतिसाद एकदम शास्त्रीय
एसीच!पॅनासोनिक १.५ टन,स्प्लिट
पुण्यामधे ए.सी.ची गरज नाही.
सर्व मिपाकरांचे याचर्चेला
सिम्फनी
simphony Diet 22 i.
कितीला घेतला ?
किंमत
शेंच्युरी निमीत्त श्री.बाप्पु
...
आता चर्चा मी सुरु केली आहे..
धन्यवाद. :))
डेझर्ट कुलरचं नाव पण नाही