Skip to main content

असह्य हा उकाडा...

लेखक बाप्पू यांनी बुधवार, 25/03/2015 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या उकाड्यामुळे खूप हैराण झालो आहे. आणि माझे घर अश्या ठिकाणी आहे जिथे बाहेरून भरपूर हवा येण्यासाठी विशेष अशी योजना नाहीये. खिडकी आणि दरवाजे १५ ते २० मिनिटे जरी लावून घेतले तर आतील तापमान आणि बाहेरील तापमान यामध्ये जवळपास ८-१० सेल्सिअस चा फरक पडतो. कित्येकदा घराला लॉक करून थोडा वेळ बाहेर गेलो आणि आल्यावर दरवाजा उघडला कि जणू काही भट्टी मध्ये शिरलोय असे वाटते... या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास रात्री झोपताना होतोय. रात्रभर इतके उकडते कि झोप च येत नाही.. फ्रीज खोलून आतमध्ये स्वताला कोंडून घ्यावे असे वाटते.. ( एकदा असा प्रकार चक्क केला देखील) . गेले ४-५ दिवस पंखा लावून झोपण्याचा प्रयत्न केला शांत झोप लागली खरी पण सकाळी उठल्यावर पायामध्ये खुप वेदना सुरु झाल्या.. मग आठवले कि मागे एकदा डॉक्टरांनी पंख्याचा वापर करू नका असे सांगितले होते. त्यामुळे आता पंख्याचा वापरावर देखील मर्यादा आल्या आहेत. तर थोडक्यात सांगायचे झाले तर मी सध्या तोंड दाबून बुक्यांचा मार खातोय. या निमित्ताने घरी नवीन ए सी किंवा कुलर खरेदी करावा म्हणतोय. पण कधीही या दोन्ही गोष्टी मी आजतागायत खरेदी केल्या नाहीत. ए सी दररोज ऑफिस मध्ये वापरतो पण त्याबद्दल काहीहि माहिती नाही. आणि कुलर आत्तापर्यंत फक्त १-२ नातेवाईकांकडे पहिला आहे. पण त्याचा आवाज इतका मोठा होता कि मी विचारलेला प्रश्न त्यांना ऐकू येणार नाही असे समजून मी प्रश्न विचारण्याच्या भानगडीत पडलो नाही. आज या दोन्ही गोष्टीपैकी एकाची निवड करण्याचा प्रसंग आला . त्यानिमित्ताने पडलेले काही प्रश्न - १ ) VIMP प्रश्न - पंखा आणि पायांचे दुखणे याचा काय सबंध ? २ ) बेड रूम १४० स्क्वेअर फुट आहे. तर तिथे ए सी घेणे चांगले कि कुलर ? ३ ) कुलर जर खरेदी केला तर त्यापासून चांगले output मिळवण्यासाठी काय काय requirement आहेत ? ४ ) ए सी जर खरेदी केला तर त्यापासून चांगले output मिळवण्यासाठी काय काय requirement आहेत ? ५ ) ए सी चे किंवा कूलर्स चे चांगले मॉडेल कोणते ? आपले अनुभव सांगितले तर फार मदत होईल ६ ) कुलर हवेमध्ये humidity निर्माण करतात म्हणजे नेमके काय ? याचा माझ्यावर किंवा रूम मधील इतर वस्तूंवर काय परिणाम होईल ?

वाचने 41219
प्रतिक्रिया 209

प्रतिक्रिया

In reply to by स्पा

मी कुठे म्हटलं शरीराचं तापमान वाढवा. मी म्हटलं थंड केलं तर गरम नाही का वाटणार. तुम्ही का गरम झालात?

In reply to by वेल्लाभट

वेल्लाभट साहेब शरीराचे तापमान ९८" F ते १००"F किंवा ३८ते ३९ सेल्सियस या अत्यंत कमी कक्षेत ठेवले जाते. जेंव्हा बाह्य तापमान वाढल्याने आपल्या शरीराचे तापमान वाढू लागते तेंव्हा शरीर घाम वाळवण्याच्या उपायाने आपले आतील ( CORE ) तापमान टिकवून ठेवते. घाम वाळून जसे शरीराचे तापमान ९८' f ला येते तेंव्हा आपल्याला घाम येणे बंद होते. तेंव्हा शरीराचं तापमान खाली आलं की जास्त उकडणार नाही उलट आपल्याला बरे वाटू लागते जसे आपण कडक उन्हातून थंड सावलीत येतो तेंव्हा. थंडीत जेंव्हा बाह्य तापमान कमी असल्याने जसजशी आपल्या शरीरातून उष्णता गमावली जाते तसे वेगवेगळ्या उपायांनी( त्वचेचे रक्ताभिसरण कमी करून किंवा कुडकुडून ( स्नायूंची वेगाने हालचाल होऊन) शरीरात उष्णता राखली किंवा निर्माण केली जाते. या तर्हांनी शरीराचे तापमान अगदी कमी कक्षेत( NARROW RANGE) नियंत्रित ठेवले जाते.

एक घरगुती उपाययोजना आम्ही रात्री चादरी भिजवुन फरशीवर पसरवायचो आणि छताचा पंखा चालु ठेवायचो. बेडवर झोपायचो... वातावरणात थंड राहण्यास ब-यापैकी मदत होते ! हा उपाय घाटावरचा आहे. मुंबईच्या दमट वातावणात कितपत यशस्वी होईल सांगता येत नाही.

हा उपाय चालणार नाही. एसी हा उत्तम पर्याय आहे.कैलास जीवन ने तलखी कमी होईल. अजुन एक उपाय धने जिरे पाण्यात रात्री भिजवून ते पाणी पिणे

In reply to by मनिमौ

अजुन एक उपाय धने जिरे पाण्यात रात्री भिजवून ते पाणी पिणे ऑऑऑ ..? रात्री भिजवायचे तर प्यायचे केव्हा? सकाळी पिले तर त्याचा effect पुढील रात्रभर राहील काय?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

फेदर्स लॉयड १.५ टन ३ स्टार गेली ५ वर्षे वापरत आहे. विना-मेंटेनन्स मस्त चाललाय.

In reply to by कपिलमुनी

याचा हिशोब करुन घ्या. नाहीतर कुलर त्रासदायक ठरतात. अगदी पुण्यातही आम्हाला रात्री ३ वाजता बंद करावा लागायचा आद्रता वाढली की. अर्थात आता जो आहे सिंफनी त्याला टायमर आहे.

पण मुंबई आम्हाला सोड्त नाही ना..... असो....१ ट्नचा घ्या पण विंडो एसी घ्या... स्प्लिट नको....

In reply to by माम्लेदारचा पन्खा

स्प्लिट आणि विंडो ए सी मध्ये काय फरक असतो ?

In reply to by नितिन थत्ते

=))

तुमच्या एकच खिडकीच्या समोरची भिंत जर मोकळी असेल तर तिथे एक एक्झॉस्ट फॅन लावा. त्याच्या समोर खिडकीत पण एक लावा, पण तो हवा आंत येईल या पद्धतीने. दोन्ही फॅन रात्रभर चालू ठेवा. चांगले वायुवीजन होईल व घरांत हवा खेळून थंडावा वाढेल. हा उपाय एकाकडे केलेला पाहिला आहे. नाहीतर एसीशिवाय पर्याय नाही. १४० चौ. फूट रुमला १.५ टनाचा तरी घ्यावा लागेल.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चिमणराव आमच्या १. ५ टनाच्या एल जी विंडो ए सी चे १८५० वॅट आहेत म्हणजे दर तासाला १५ रुपये बिल आहे रात्री साधारण ५ तास चालतो ( चालू बंद होत) आणी आम्ही दुपारी २ तास लावतो. स्वच्छ हिशेबाने एक दिवसाचे ५० रुपये होतात. म्हणजे महिन्याचे ए सी चे १५०० रुपये होतात. तीन महिने १५ मार्च ते १५ जून चालविला तर ४५०० रुपये होतात. कोणत्याही थंड हवेच्या ठिकाणी इतके पैसे दोन दिवसाचेच होतात. त्यामुळे उन्हाळ्यात मुंबई सोडून आम्ही कुठेही जात नाही. ( शिवाय मुंबईत लोड शेडींग नाही). स्वतःचे थंड घर यासारखे सुख नाही. बायको कटकट करयला लागली तर दोन दिवस बाहेरून जेवण मागवा. तरीही खूपच स्वस्त पडते.

In reply to by सुबोध खरे

भारी प्रतिसाद आणि केलक्यूलेशन तर मस्तच

In reply to by सुबोध खरे

कॅल्क्युलेशन आवडलं. पण दुपारी २च तास कसे काय पुरणार बुवा?

In reply to by आदूबाळ

माझा पहिला ए सी १९९८ मध्ये विशाखापट्टणमला घेतला रुपये १९,०००/- होता. तो २०१४ मध्ये बॉडी गंजल्यामुळे बदलला. दुसरा ए सी मुलांच्या खोलीला २००५ साली लावला आहे तो अजून उत्तम चालू आहे. डेप्रीसिएशन काय झालं ते तुम्ही काढा. आम्ही फक्त एसी ची थंड हवा एप्रीशीएट करतो.

In reply to by प्रचेतस

सुजाताकडची हापूस अन् सीताफळ अन् बदाम-केशर!! जाऊ द्या!! शनिवारपर्यंत नको ती आठवण. (हडपसरला पण एक आहे शाखा-नोबेल समोर, पण मजा नाय)

In reply to by बाप्पू

बरोबर आहे पुणे हा त्यांच्या attitude मुले देश आहे. आम्ही मुंबई नामक ग्रहावर राहतो. इकडे सुद्धा पुण्यासारख्या छोट्या देश बद्दल काहीच्या काही आईकू येते.

In reply to by सूड

ग्रहाचा दर्जा काढुन घेतलेला ना रे त्या आपल्या देशानी? त्यांच्याकडे अपडेट झालेली दिसत नाही माहिती. अज्ञानात सुख म्हणतात ते हेच्च बर्र का. =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आमच्या पुणे देशातील इतिहासाच्या पुस्तकातील हा उतारा. पान क्रमांक - १९८ मुंबई नावाचा ग्रह (लघु ) हजारो वर्षापूर्वी अवकाशात चंद्राभोवती फिरायचा. परंतु खगोल शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार या ग्रहाची दुसर्या एका लघु ग्रहास धडक बसली. या धडकेमध्ये मुंबई ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती खूप क्षीण झाली आणि तो ग्रह तुकडे तुकडे होऊन विखुरला. हे विखुरलेले तुकडे पृथ्वी नावाच्या ग्रहावर भारत देश्याच्या हद्दीत आरबी समुद्रात पडले. अश्या तुकड्यांना समुद्रात बेटाचे स्वरूप प्राप्त झाले असल्याने त्याला आता बेटांचे शहर असे देखील ओळखले जाते. जगातील महान देशांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्या पुणे देश्याच्या नजीकच हे शहर अस्तित्वात आल्यामुळे या शहराला देखील आता लोक थोडेफार महत्व देऊ लागलेत. परंतु या देशातील लोक अजून देखील हे मानायला तयार नाहीत कि आता मुंबई हि भारत देशाचा भाग आहे. आजदेखील काही लोक मुंबई हा ग्रह आहे असे म्हणून इतर देशांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न करतात. पण पुण्यातील लोकांनी वेळोवेळी झालेल्या वैचारिक युद्धात त्यांना पाणी पाजले आहे. ;) त्याला असलेली ग्रहाची मान्यता अंतरविश्व खगोल संशोधन संस्थेने काढून घेतली आहे त्यामुळे त्यांनी आता आपल्या प्रदेशाला ग्रह संबोधणे टाळावे आसे परिपत्रक या संस्थेने कित्येकदा काढून देखील हे लोक सुधरायला तयार नाहीत.

In reply to by बाप्पू

आणखी एक उतारा आहे मुंबई बद्दल आमच्या पुस्तकामध्ये पान नंबर २०७ पुणे देशातील प्रगती पाहून भारत देशातील बिहार आणि उत्तर प्रदेश इ प्रांतातील अनेक लोक पुणे देशात स्थायिक होण्यास आणि व्यवसाय करण्यास येण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु पुण्यातील सदाशिव पेठ, तुळशीबाग, स्वारगेट, कोथरूड, कर्वेनगर व पुण्याच्या इतर सर्व भागात राहणाऱ्या देशभक्त पुणेकर नागरिकांनी याचा बर्यापैकी विरोध केला तसेच जे काही लोक आले त्यांनापुण्याच्या संस्कृती ला मान देणे आणि पुण्यातील च नियम आणि भाषा पाळण्याची सक्ती केली. जे लोक या गोष्टी पळणार नाहीत त्यांना पुणेरी पाट्यान्द्वरे चांगलाच समाचार घेतला.. आजही इथले लोक कोणाचाही अपमान करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे पुणे देशात आजही अस्सल मराठी संस्कृती टिकून आहे. नेमकी उलट परिस्थिती मुंबई शहरामध्ये दिसून येते. त्यांची भाषा आणि संस्कृती केव्हाच नामशेष झाली आहे. पैश्यांच्या हव्यासाने बिहार उत्तर प्रदेश गुजरात इ प्रांतातील लोकांना मुंबईत काहीही करण्याची मुभा दिल्याने आता मुंबईत मराठी नावाचा प्राणी पूर्णपणे संपला आहे. आणि जो काही शिल्लक आहे तो देखील आता " सामनेसे आगे जाके लेफ्ट को जाके बिल्डींग के पिच्छू वाले गार्डन मे भेटते हय " आशी वाक्ये बोलू लागलाय. जेव्हा जेव्हा पुणे देश आणि मुंबई शहर यांच्यामध्ये वैचारिक युद्ध होते तेव्हा मुंबई चे लोक हेच म्हणण्यात धन्यता मानतात कि " पुणे हा जर एक देश असेल तर मुंबई हा एक ग्रह आहे." परंतु मुंबई हा ग्रह नाहीये आणि त्याबद्दल चा इतिहास आपण पान नंबर १९८ वर पहिलआच आहे. .....

In reply to by बाप्पू

आणि या देशातले एक मान्यवर नागरीक, बाप्पूसाहेब, हे १४० स्क्वेअर फुटाच्या खोलीला अर्ध्या टनाचा एसी लावू का एक टनाचा ह्याचा ईथे उहापोह करतायत !!!!!!!!

तुमच्या १४० स्वे.फु. साठी तुम्हाला अर्धा टनी एसी लागेल.आता नवीन एसीसाठी विज देखिल कमी लागते. एसीची किंमत सर्वसाधारण पणे २५००० आहे.

बापूसाहेब पुण्याची हवा कोरडी असते त्यामुळे तेथे कूलर सुद्धा चालू शकतो. परंतु जर मध्येच पाउस पडला ( एप्रिल नंतर बर्याच वेळेस पडतो) तर मात्र हवेतील आर्द्रता वाढून कूलर उपयोगी ठरत नाही आणी घाम घाम होतो आणी अंग चिकटते. परवडत असेल तर वातानुकूलन यंत्र (ए सी)च घ्या. आपल्या १४ X १० फुट आकाराच्या खोलीस दीड टनाचाच एसी घ्या. कारण एक दोन माणसे असतील तर एक टनाचा ए सी पुरेल परंतु जरा दोन माणसे जास्त आली तर एक टनाचा ए सी जेमतेम पुरेल. शिवाय दोन्हीच्या किमतीत दोन तीन हजाराचाच फरक असतो. आणी विजेच्या बिलात फरक पडत नाही कारण तुम्ही जेवढे तापमान ठेवता त्याप्रमाणे तितका वेळ एसी चालू राहतो. विंडो ए सी स्वस्त पडतो परंतु स्प्लिट ए सी चा आवाज बिलकुल नसतो. त्यामुळे रात्री शयनगृहात दूरदर्शन बघणे किंवा संगीत ऐकणे यात व्यत्यय येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली खिडकी कायमची बंद होत नाही. मुळात जर आपल्या घराला एकाच खिडकी आहे असे आपण म्हणता तर ती बंद करणे कितपत शहाणपणाचे ठरेल. विशेषतः पुण्यात उन्हाळ्याचे तीन महिने सोडून आपल्याला ए सी लागणारच नाही मग नैसर्गिक वायू अभिसरण बंद ठेवून भर हिवाळा सोडून आठ महिने ए सी लावण्यात काय हशील आहे? या गोष्टी बहुसंख्य लोक विचारात घेत नाहीत. स्प्लीट एसी अर्थातच महाग असतो. पण आपल्याला संगीताची किती आवड आहे आणी ए सी साठी किती पैसे खर्च करायचे हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे यावरुन आपण ठरवू शकता.

अांम्ही घरी एक साधा उपाय केला अाहे. पलंगासमोरच्या खिडकीत एक छोटा टेबल फॅन अाअातमधे तोंड करून ठेवला अाहे. बेडरूम पूर्ण बंद न करता हवा जायला जागा ठेवली अाहे व हाॅलमधील खिडकी उघडी ठेवतो. रात्री बाहेरची मस्त गार हवा घरात येते व पहाटे चक्क थंडी वाजते. मात्र हे करताना छताचा पंखा बंद ठेवावा. छताचा पंखा हा उकाड्यावरचा उपाय नाही, असे माझे मत अाहे. कारण त्यामुळे वरची हवा, जी गरम असते, ती खाली ढकलली जाते. तसेच छताच्या पंख्यामुळे खोलीतील हवेचा दाब वाढतो व बाहेरची थंड हवा अात येऊ शकत नाही. हा बरोबर हवा त्याच्या विरूध्द परिणाम झाला. पहिल्यांदा घरचे लोक छताचा पंखा बंद करायला राजी नव्हते, पण त्यांना अाता पटले अाहे. खरेतर मी या रचनेचा फोटो काढला होता, पण तो इथे दिसण्यासाठी कुठेतरी अपलोड करावा लागेल. त्यामुळे टाकू शकलो नाही. शक्यतो एसीच्या नादाला लागू नये. तुमचे घर गार झाले, तरी बाहेर तुंम्ही उष्णता फेकता. तुमचा फायदा, ज्यांना एसी परवडत नाही, त्यांच्यासाठी अाधिकचा ताप. - स्वधर्म

In reply to by स्वधर्म

अतिशय उत्तम उपाय ! करुन पाहिलेला आहे. खूपच चांगले परीणाम. फक्त खिडकी उघडी ठेवल्यामुळे उंदीर, घुशी, मांजर आत येउ शकतात. खिडकीला जाळी लावली असल्यास उत्तम.

In reply to by स्वधर्म

पटले नाही. आत मध्ये हवेचा दाब वाढला तर आतील हवा बाहेर जाईल. आणि समतोल प्रस्थपित होईल. बाहेर घाणीचा ट्रक गेला तर आत वास येत नाही का? तेंव्हा दोन्ही पंखे चालू ठेवले तरी आतील हवेच्या अभिसारणावर परिणाम होणार नाही. वर तिमा साहेबांनी लिहिले आहे तसा एक्झॉस्ट फॅन लावूनही तेच काम करता येईल. यात एक प्रश्न असतो कि बाहेरील हवा थंड होईपर्यंत आणि त्या हवेने आपले घर गार होईस्तोवर मध्यरात्र होते तेंव्हा रात्री आठ ते अकरा- बारा पर्यंत आपल्या आरामाची किंमत काय. बर्याच लोकांना गर्मी मुळे लवकर झोप लागत नाही आणि शेवटी थकल्याने झोप लागते आणि दुसर्या दिवशी उत्साह वाटत नाही. त्यातून मारवाडी हिशेब करायचा असेल तर एसी बसवून तो एक तास दीड तास चालवायचा घर आतून थंड करून घ्यायचे आणि नंतर खिडक्या उघडून एक्झॉस्ट फॅन लावून बाहेरील हवा आत खेचायची. या सर्व गोष्टींची किमत काय आणि आपल्याला काय परवडते हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.

In reply to by सुबोध खरे

आत मध्ये हवेचा दाब वाढला तर आतील हवा बाहेर जाईल. आणि समतोल प्रस्थपित होईल.
ही फुटबाॅलमधून हवा निघून गेल्याप्रमाणे एकदाच घडून जाणारी व समतोल प्रस्थापित होणारी प्रक्रीया नाही. छताचा पंखा लावल्यानंतर तिथल्या सिस्टीममध्ये एक स्टेडी स्टेट निर्माण होते. तीत पंख्याच्या वरती कमी दाब व खालच्या बाजूला जास्त दाब तयार होतो. अशा स्थितीत पंख्याच्या वरील बाजूस कमी दाब असल्याने इतर ठिकाणांहून हवा तिथे खेचली जाते व हवेचा प्रवाह तयार होतो. खिडक्या ह्या साधारणपणे पंख्याच्या खालच्या पातळीवर असल्याने, तिथे वातावरणातील (बाहेरील) हवेच्या दाबापेक्षा जास्त दाब असण्याची शक्यता अाधिक असते. पण हे सगळे प्रवाहाच्या प्रोफाईलवर, खोलीच्या अाकारावर , खिडकी किती उंचीवर अाहे, इ.वर अवलंबून अाहे. याचा अर्थ बाहेरची हवा अाजिबातच अात येऊ शकणार नाही, असा नाही. कदाचित खिकीच्या वरच्या भागातून थोडी बाहेरची हवा अात येईलही. परंतु एकूणात, छताच्या पंख्यामुळे बर्याच प्रमाणात अातली तीच तीच हवा फिरवली जात असल्याने, बाहरची हवा कमी प्रमाणात अात येते.
बाहेरील हवा थंड होईपर्यंत आणि त्या हवेने आपले घर गार होईस्तोवर मध्यरात्र होते
पुण्यात तरी संध्याकाळी दुपारच्या तुलनेत बरेच थंड वारे सुटतात, असा अनुभव. अाणि अापल्याला घर गार करण्यापेक्षा अापल्या अंगावर थंड वारे अाल्याशी मतलब. अजून एक - एसी लावल्यावर कंझम्शन कमी करण्यासाठी दार बंद करणे हिताचे असते, पण त्यामुळे तीच तीच हवा घ्यायला लागते. त्यापेक्षा तुलनेने बाहेरची ताजी हवा जास्त चांगली नाही का?

In reply to by सुबोध खरे

तिमा म्हणतात त्याप्रमाणे एक्झाॅस्ट पंखे लावण्याची कल्पना चांगली अाहे, पण ते खोलीतच लावले तर परिणामकारक होईल असे वाटते.

In reply to by स्वधर्म

अ‍ॅक्चुअली, पंख्यामुळे हवा खाली ढकलली जाईल का वर हे पंख्याच्या पात्यांच्या अँगलवर आणि पंख्याच्या फिरण्याच्या दिशेवर अवलंबून असतं. एक्झॉस्ट फॅन पण बाहेरची हवा आत आणायला किंवा आतली हवा बाहेर - दोन्हीकरता उपयोगी पडू शकतो. http://www.hansenwholesale.com/ceilingfans/fan-direction-summer-winter…

समजा पुण्यासारख्या शहरात जिथे फक्त 3 महिने गरम होते अन्यथा थंडी असते तिथे ए.सी फक्त उन्हाळ्याचे 3 महिने चालू ठेवला आणि नंतर बंद केला तर तो खराब होतो का? का तो सतत वापरातच राहीले पाहिजे?

In reply to by अभिजीत अवलिया

अभिजीत अवलिया साहेब तीन महिने वापरून झाल्यावर ए सी बासनात बांधून ठेवायचा नाही. तर दोन तीन महिन्यांनी एकदा नुसता पंधरा मिनिटे चालवा म्हणजे त्याची मोटार जाम होणे ई प्रकार होणार नाहीत. पुढच्या उन्हाळ्याच्या सुरुवातीस त्याचा फिल्टर साफ करा आणी जोवर ए सी वापरता तोवर फिल्टर दर एक महिन्यांनी साफ करा. म्हणजे ए सी वर्षनुवर्षे टिकेल. माझा १९९८ चा ए सी शेवटी त्याची बॉडी गंजल्यामुळे मागच्या वर्षी बदलला. मुलांच्या खोलीतील ए सी नउ वर्षे उत्तम चालू आहे.

मुंबईत वाळा कोठे मिळेल ते माहित आहे का? लॅपटॉप कुलरचे चार्/पाच फॅन्स पडले आहेत. घरगुती कुलर तयार करावा असा विचार हा धागा वाचून मनात आला. अर्थात humidity मुळे काही फायदा होईल असे वाटत नाही पण तेवढेच काहीतरी केल्याचे मनाचे समाधान.. (नाहीतरी सुट्टीत मुलांना काय कामाला लावे याचा प्रश्न आहेच..)

पुण्यात कूलर चालेल. मुंबईत कूलरचं काम नाही. पुण्याच्या हवेची आर्द्रता कमी आहे मुंबईपेक्षा. सो कूलर घेऊ शकता. पण एसी चं सुख एसीतच. आहाहाहा! विडियोकॉन चे वापरतोय गेली अनेक वर्ष. नो तक्रार.

VIMP प्रश्न - पंखा आणि पायांचे दुखणे याचा काय सबंध ? अत्यंत गरमी मुळे आपल्या शरीरातून पाणी घामावाटे बाहेर पडते. पुण्यासारख्या शहरात घाम येत नाही हे खरे नाही तर पुण्यातील हवा कोरडी असल्याने घाम फार पटकन वाळतो. आणि असे शरीरातून पाणी बाहेर गेल्याने त्याबरोबर क्षारही जातात. (सोडियम आणि पोट्याशियम). हे क्षार टिकवण्यासाठी आपली मूत्रपिंडे शरीरातील कॅलशियम आणी पोट्याशियम बरोबर सोडियम ची अदलाबदली करतात. यामुळे आपल्या शरीरातील कॅलशियम कमी होते आणि यामुळे आपले स्नायू दुखतात ( अंग दुखते, उत्साह वाटत नाही). दिवसभर आपण फिरता तेंव्हा झालेली झीज भरून काढण्यासाठी रात्रीची झोप गाढ(REM SLEEP) लागणे जरूर असते. या झोपेत आपले स्नायू एकदम गलितगात्र( RELAX) होतात. ( गाढ झोपेत एकदम उठलात तर शरीरात शक्ती नसल्याचा अनुभव येतो हा यासाठी) आणी हि झोप नीट लागली नाही तर सकाळी उठल्यावर आदल्या दिव्शीचे थकलेले स्नायू आंबलेल्या अवस्थेत असतात. शरीराचा जो भाग थंड होतो तेथील रक्त पुरवठा कमी होतो.त्यामुळे पंखा लावून आपण पाय उघडे ठेवून झोपलात तर स्नायूचा रक्तपुरवठा पाहिजे तितका सुधारत नाही आणि सकाळी उठल्यावर पाय दुखण्याचा अनुभव येतो. यास्तव रात्री झोपताना पायावर पातळ चादर घेऊन झोपणे (पूर्ण उघडे ठेवण्यापेक्षा) आता याला उपाय काय-- एकतर भरपूर पाणी पिणे. शिवाय उसाचा रस,नारळाचे पाणी, लिंबाचे किंवा कोकमाचे सरबत,पन्हे किंवा फळांचा रस हेही घेणे आवश्यक आहे कारण या सर्व रसात पोट्याशियम असते आणी त्यात घातलेल्या मिठात सोडियम असते. अशा तर्हेने आपल्या शरीरातील क्षारांचे आणी पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे आवश्यक आहे. यानंतर आपले घर थंड कसे ठेवता येईल यावर वरती उहापोह झालेला आहेच.

In reply to by सुबोध खरे

आपला प्रतिसाद एकदम शास्त्रीय असल्याने वाचायला थोडा जड गेला. पण नीट वाचल्यावर सगळे काही समजले. खूप खूप धन्यवाद. माझ्या VIMP प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल. या धाग्यावरील आपले सर्वच प्रतिसाद एकदम माहितीपूर्ण आहेत.

एसीच!पॅनासोनिक १.५ टन,स्प्लिट एका खोलीत.दुसर्या खोलीत विन्डो एसी आहे.१.५चाच.पण त्याची काही ना काही कुरकुर निघते.पॅनासोनिक स्प्लिट मात्र असंच अहाहा!! नो तक्रार!!

पुण्यामधे ए.सी.ची गरज नाही. कुलर घेउन टाका एक मस्तं. त्यामधे गुलाबपाणी किंवा वाळा टाकायचा. मज्जानु लाईफ. फक्त थेट वार्‍याच्या झोतामधे झोपायचं किंवा बसायचं नाही. कुलरची मागची बाजु खिडकीमधे किंवा दरवाज्यामधे करुन ठेवायची. :)